bhrshtaachar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
bhrshtaachar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

जागतिक भ्रस्टाचार रिपोर्ट २०११ ( जागतिक पर्यावरण बदल )......!!!


खरेच बदलते जागतिक पर्यावरण  व तसेंच जागतिक मदत कार्य  

कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास ..............!!!!


सन १९८० च्या मानाने स न  २०१४ पर्यंत जागतिक पर्यावरण बदलामुळे मोठ मोठे संकटे येण्याची जास्त शक्यता आहे.  जगातील जवळ जवळ ९०%  वातावरणाच्या बदलामुळे ३७५ करोड जन संख्येला  धोका सन २०१४ पर्यंत जाणवतो हें एका पाहणी नुसार स्पष्ट करण्यात आले. 




ह्या वातावरण बदलामुळे बऱ्याच नैसर्गिक  आपत्तीना सामोरे  जावे लागेल .खरा धोका तर शेती, अन्न धान्य ,आर्थिक ( मुलभूत ), पाणी आणि निवारा ह्या महत्वाच्या गोष्टीवर पडेल.

भारत  हा  तर शेती प्रधान देश आहे जर कां अशी नैसर्गिक आपत्ती  आलीतर  त्यातून   देश कसा सावरेल ?
सध्याची राजकीय परिस्थिती बघता ह्या महत्वाच्या  मुद्यावर  लक्ष द्यायला  कोणाला वेळ आहे?



अशी विपत्ती आलीच तर जगातून येणारी मदत पिडीत लोकां पर्यंत पोहचेल ही शास्वती नाही . म्हणूनच म्हंटले कि पर्यावरण बदलामुळे येणारया आपत्तींना तोड देताना जागतिक मदतीचा  भ्रष्टाचार अधिक बोकाळेल व तोच भ्रष्टाचार वाढीस  कारणीभूत ठरेल.

जागतिक  रिपोर्टा प्रमाणे जवळ जवळ १३४% जागतिक मदतीचा ओघ  जाईल पुढच्या २० वर्षात.  




 जगातील सर्वच देशाना वातावरण बदलाचा कमी अधिक प्रमाणात धोका संभवतो  असे वर्ल्ड ब्यान्केच्या रिपोर्ट  मध्ये दर्शविले आहे.
कारण सरकारी मदत योजना व त्याची अंमलबजावणी फार खालच्या क्रमांकावर आहे तसेंच सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार ह्या दोन गोष्टी  कारणीभूत ठरतिल.





खाली दिलेल्या आलेख प्रमाणे सर्वात जास्त धोका ( Exteme  ) कोणत्या देशाना आहे त्याची वर्गवारी व जागतिक क्रमांक देण्यात आले बाकी राष्ट्रे मध्यम,कमी धोका यांत मोडतात त्याची वर्गीकरण आणि क्रमांक देण्यात  आला नाही. 


पर्यावरणाच्या बदलामुळे सर्वात जास्त धोका असलेल्या जागतिक देशांची वर्गवारी  व क्रमाक


gcr_animatedmap.gif


जेव्हा अशी आपत्ती कोसळेल तेव्हां जागतिक मदतीचा ओघ त्यां  लोकांसाठी असेल जें लोक यांत होरपळले आहेत. सर्व मदत कार्य  करणार्या येन .जी.ओज . व मदत घेणारी राष्ट्रे यानां  स्वहिताची  जबरदस्त इच्छा पैसे कमावण्याचा राहील, येणारी आपत्ती ही पैश्याशी निगडीत राहील आणि त्यांमुळे भ्रष्टाचार आघीकच वाढेल ही भीती पण सतत जाणवते कारण ठरणार ते " वातावरण बदल."   





" ट्रास्परनसी इंटरन्याशनल " ने अशी आपत्ती आली तर कश्या प्रकारे मदतीचे नियोजन करावे ह्याचे नियम केले .त्याचा दावा आहे कि ह्यां नियमा प्रमाणे प्रत्येक स्थरावर  जर नियोजन केले  गेले  तर ज्यांत  तेथील  सरकार, सेवाभावी संस्था , यांच्या सहयोगाने उद्दिष्ट गाठता येईल व भ्रष्टाचार पण होणार नाही.






भारतीय जनता किती समर्थन करेल कि आपले राजकीय नेते,सेवाभावी संस्था ,सरकारी अधिकारी, व्यापारी वर्ग सचोटीने  काम करतील  यांत  शंका आहे.  





बदलते जागतिक पर्यावरण 






----------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व माहिती व आकडेवारी " ट्रास्परनसी इंटरन्याशनल " च्या  व  चित्रे  गुगल इमेजसच्या
सौजन्याने.

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

देवा आण्णांना तेजोमय राष्ट्रीय प्रेरणा ज्योत बनव ....


आण्णाना .....आण्णाच राहू द्या.......गांधी  बनवू  नका.......!!!!!





भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र  आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत  या देशाला काणत्याही  विदेशी  ताकतीने पराजित केले नाही. जेव्हा जेव्हा दुष्ट कालचक्रात देश अडकला तेंव्हा  ,तेंव्हा आपल्याच स्वजनांनी बाहेरील शक्तींशी मिळून  षड्यंत्र रचून आघात केले यासं इतिहास  साक्षी  आहे.

जयचंद किवां  आम्मी  ज्यांनी  सिकंदर व मुहमद गौरी  ह्याच्याशी  हात मिळवणी करून भारतावर आक्रमण करण्याचा मार्ग दाखविला . आपल्या  स्वार्थासाठी  जगतसेठ, मीर जाफर, आमिचंद सारखे देशद्रोही व्यक्तीनीच इग्रजाशी हात मिळवणी करून  ह्या देशाला पारतंत्र्यातच्या   खाईत ढकलले.  सरदार बहादूर शोभा  सिंह  जें इंग्रंच्या कामाचे ठेकेदार होतें  त्यांनीच भागत सिंह व त्याच्या साथीदाराची ओळख  पटवून दिली व त्यांना अटक झाली. ही सर्व मंडळी तर आपलीच होती पण स्वार्था पोटी  त्यांनी देशाचे किती न भरून येणारे नुकसान केले हें आपण जाणतोच.



 श्री जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन जें संपूर्ण देश व्यवस्था  परिवर्तन घडवून आणण्याची ,प्रबळ इच्छा जागृत करणाया साठी केले जात होतें .ती क्रांतीची मशाल चिरडून टाकण्यासाठी कपटी राजनारायण व चरणसिंग सारखे  आपलेच लोक होते. ह्या सर्व घटना हेच दर्शवितात कि  आपल्या देशाला  क्षति ग्रस्त अवस्थेत नेणारे दुसरे कुणी  नाहीत तर  आपलीच  माणसे आहेत. 

चिंतेची बाब हि आहे कि आज पण संपूर्ण भारत देश  अश्या एका  कठीण अवस्थेतून जात आहे व आता परिवर्तन  मय क्रांती करण्याची  गरज  असताना  पुन्हा काही कुटील व्यक्तीच्या  कारस्थानामुळे    देश कुठल्या मार्गाने जाईल याची शंका वाटत आहे.







आज किशनराव बाबुराव हाजरे उर्फ आण्णा हजारे संपूर्ण देशा  समोर एक क्रांतीची मशाल हाती घेऊन प्रेरणा  देत आहेत. अन्नाची तुलना गांधीशी केली जाते कारण आण्णा "स्वातंत्र्याची  दुसरीलढाई" सध्या लढत आहेत.आण्णा स्वताहा गांधीवादी आहेतआणि त्यांच्याच  आदेर्शावर  आपली वाटचाल  करीत आहेत.


"गांधी टोपी " जी गांधीजीमुळे  प्रसिद्ध   झाली ती टोपी गांधीजीनी  कधीच घातली नाही पण ती, आण्णा परिधान करतात व आज सर्व देशावासीयाना  पण घालण्यास लावले  व ती त्यांची ओळख बनली.  




काही वेळा असे दिसून आले कि टीम-आण्णा  "आण्णा " ना दुसरे गांधी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण असे असेल तर ही फार खेदाची व गंभीर बाब आहे.



आण्णाना  " आण्णा" च राहु द्या.............





राजकीय मंडळीनी ज्या प्रकारे आपला स्वार्थ साधण्यासाठी संपूर्ण देशाची व्यवस्थाच भ्रष्ट करून  टाकली ती सरकारी कर्मचारी वर्गाशी  मिलीभगत व साथीने.  जनता जाणते  कि  काही भ्रष्ट लोक देशाला पोखरून टाकीत आहेत. ह्या कारणाने सामन्य जनतेचा संसद आणि त्यातील निर्वाचित सद्श्यावरचा भरोसा राहिला नाही.



.


सर्व जनता भ्रष्टाचाराच्या  खोल अंधकारमय दरीत फसलेल्या अवस्थेत आहेत आणि  आण्णाहजारे ह्यांचे त्या  विरुद्धचे  जन आंदोलन एक ज्वलंत मशाल बनून जनते समोर आले. संपूर्ण देश हा ह्या आंदोलना मुळे संमोहित झाला .







आण्णा हजारे व गांधी ह्याच्यात तुलना करणे बरोबर नाही तरी  ह्या दोघांच्या  व्यक्तीमत्व, व कर्तुत्व ह्याची तुलनात्मक आभ्यास   करण्याचा   प्रयास करू..

 


सार्वजनिक व व्यवसाईक जीवन  


गांधी :--  मोहनदास करमचंद गांधी हे वकील होते त्यांनी इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेला भारत देश सोडून दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपली वकिली करण्याचा निश्चय केला. भारतीय स्वतंत्रता आंदोलनात ते सामील झाले जेव्हा ते तिथे  श्री गोपाल कृष्ण गोखले यांच्या संपर्कात आले. बराच विचार केल्यानंतर गोखल्याशी संपर्क साधून  भारतीय स्वतंत्रता  आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला.पुढे लाल-बाल.पाल यांचा जमाना संपल्यावर त्यांनी संपूर्ण देशाचे भ्रमण केले व लोकांशी संपर्क साधला व आपली साधे पणा मुळे ते लोकांत प्रिय झाले.



                                         लाल-बाल.पाल




आण्णा :-- एक अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले. किशन बाबुराव हजारे भारतीय सेने मध्ये भर्ती होऊन एक कर्मठ सैनिक बनले.ज्यांनी शत्रू राष्ट्राच्या हल्यात  मृत्यू  जवळून पहिला.  एक गरीब शेतकरी मुलगा सरळ ,साधा  किशनराव ह्या पेक्षा वेगळे ते काय करणार ? 




सैन्यातून  अवकाश प्राप्ती नन्तर  आपले संपूर्ण आयुष  आपल्या गावासाठी वाहिले आणि ती त्यांची कर्म भूमी झाली.  एका मागून  एक छो ट्या  छोट्या  आंदोलना मधून त्यांनी आपल्या गावाची "राळे गण सिद्धी "चा कायापालट केला व आपल्या गावाची ओळख भारतीय नकाशावर उमटवली. 






                                          आन्ना हजारे भारतीय सेनेतिल जवान.


आंदोलनात उतरण्याची कारणे.............


गांधी :--  बर्याच विद्वानाचे मत आहे कि इंग्रजांनी  मोहनदास यांना रेल्वेच्या प्रथम श्रणीच्या डब्यातून धक्के मारून उतरविले नसते तर ते महात्मा झाले नसते.  दक्षिण अफरिकेत त्याचा प्रत्येक वेळी अपमान केला गेला व वकिली पेशेमुळे  दिन दुबळ्या गरीबाच्या  प्रती ते संवेदनशील बनत गेले. मुख्य म्हणजे त्यांना त्यांचा झालेला अपमान सहन झाला नाही त्यात भर पडली ती गरीब लोकांची व्यथा व पिडा  या  कारणाने त्यांनी निश्चय केला  कि इंग्रजी सत्ता उखडून टाकली पाहिजे.




आण्णा:-- आण्णांनी युद्ध काळात मरण फार जवळून पहिले व त्यातून ते वाचले. त्यांना एक नवं जिवन मिळाले पण त्या वेळी  कोणतेही  ध्येय किवां दिशा निश्चित नव्हती. त्यांचे लग्न झाले नव्हते आणि तशी त्यांची इच्छां पण नव्हती. 

सेनेतून अवकाश प्राप्ती नंतर त्याची समोर  कोणतेही ध्येय  नव्हते.त्याच दरम्यान दिल्ली  रेल्वे  स्टेशन वर स्वामी वेवाकानंद लिखित  पुस्तक " Call  to  the youth  for  nation building "  त्याच्या वाचनात आले. त्या पुस्तकातील विविकानंद्च्या विचाराने  प्रेरित होऊन त्यांनी संकल्प केला कि इथून पुढे मी दिन दुबळ्या साठी व राष्ट्र कार्यासाठी माझे जिवन समर्पित करतो. किसन बाबुराव हजारे एक युवा सन्याशी बनले व जनहित कार्यात रत झाले. आण्णा हजारे राष्ट्र भक्त संन्याशी बनून सर्व युवकांचे प्रेरणा स्थान बनले.





 कोणाचा प्रभाव दोघांच्या  विचारधारावर दिसतो........


गांधी :--  गांधीनी आपल्या जिवनात बरीच अध्यात्मिक धर्म ग्रंथांचा आभ्यास केला तसेंच गीतेचेही मर्म जाणून घेण्याचा पर्यंत केला. जें काहीं ते व्यक्तीशः  जिवनात अनुभवले त्यां योगें सत्य शोधण्याचा पर्यंत केला पण अन्तः सर्व धर्म समभाव याचा पुरस्कार केला.  ईश्वर ,अल्ला तेरो नाम या भजनाचा पुरस्कार केला.


 आण्णा :--  आण्णा हजारे सैन्यात २५ वर्षे काढल्यामुळे  आपल्या मोर्च्यावर द्रुढ तेणे  कसे थांबावे हें शिकले. स्वामी विवेकानंद यांचा प्रभावामुळे  त्यांची संकल्प शक्ती द्रुढ झाली. आपल्या गावाची गरिबी अवस्था बघूनच  त्यानां ग्राम कायाकल्प  घडविण्याची  योजना सुचली. 
आण्णा नेहमी सांगतात कि त्यांना गांधी आणि विनोबाजी च्या जीवनातून शिकायला  मिळाले  व  त्या प्रमाणे प्रयोगाला सुरवात केली. 


आण्णा नेहमी आस्थावान राहिले त्यांचा विश्वास आपल्या धर्मावरुन   कधीच  डगमगला  नाही.  गांधी नेहमी जगातील सर्व पंथातील  चागल्या   गोष्टी  कडे लक्ष केंद्रित करीत असत तर आण्णा आपल्या विश्वासावर अधिक द्रुढ राहून इकडे तिकडे भरकटले नाहीत. 


हिदू मुस्लीम सद्भाव जो गांधीना अभिप्रेत होता तो आण्णांनी असा जपाला की कोणीही त्याच्या  कार्याला  सांप्रदायिक रंग देवू शकले नाहीत. 




त्यांनी गावातील  वंचित वर्गास सामाजिक  कार्यक्रमात   बरोबरीने घेऊन अनेक प्रयोग सफल केले. आन्नाच्या सर्व जीवनावर  विवेकानंदाच्या विचारांचा अधिक   प्रभाव पडला  ज्या मुळे ते अलिप्त ,अनासक्त  संन्याशी जिवन जगत आहेत. 




भारत देशास कोणापासून काय मिळाले............

गांधी:----  गांधीनी इग्रजी सत्तेस हलवून सोडले व संपूर्ण देशास एकजूट मजबूत केले. हिंदी-मुस्लीम सद्भावने  साठी त्यांनी आपले आयुष खर्ची  घातले.

जेव्हा  भारतात साम्प्रदाईक  दंगे होत होतें तेव्हां गांधीजी नी सर्व धर्म प्रार्थना  सभा भरविल्या पण त्यांत फक्त हिंदूच सामील  होत होतें. ह्या मुळे सदा सहिष्णू असलेल्या हिंदुनी सेकुलर बनण्याकडे  वाटचाल केली ती गांधीच्या आवाहनावर पण मुस्लीम जनता ह्या पासुन दूरच बघ्याची भूमिका घेत  राहिली.


परिणाम स्वरूप साम्प्रदैक  दंग्या मध्ये  ही  शांतीदूत सेना शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरी कडून यांनाच संपविण्याचा प्रकार घडवीत होते.


गांधीच्या अहिंसा तत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन  प्रयत्नाची  पराकाष्टा करताना दिसत होते. गांधीना आपल्या सहिष्णुता ,  विनम्रता वागणुकीने त्याचे  हृदय परिवर्तन घडवायचे होतें पण या अप्रकृतिक कल्पनेमुळे देशातील दोन समाज विघटीत झाला.त्यांचा "अहिंसा " मार्ग पुढे त्यांच्या नंतर " गांधीवाद" म्हणून जगात प्रसिद्ध झाला.

  आण्णा :--  आण्णा हजारेनी  कधीच राजनीतिक प्रक्रिया मध्ये सक्रीय भाग घेतला नाही. परंतु ग्रामोत्थानच्या रचनात्मक कार्यात कार्यरत राहिले.
आण्णांनी गांधी  सारखे फार देशव्यापी काम केले नाही पण निष्काम भावनेने आपल्या आसपासच्या अभावग्रस्थ समाजाच्या पिडीत लोकांची पिडा नष्ट करण्यासाठी आपल्याला  समर्पण केले.


स्वात्यंत्रकाळा नंतर खर्या अर्थाने गांधीवाद समजला आण्णांच. त्यांनी आपले संपूर्ण जिवन त्यांसाठी खर्ची करीत आहेत. गांधीचे अहिंसा,सहिस्नुता ,सर्व धर्म भाव व गांधीवाद जें स्वता:ला गांधीवादी म्हणवतात ते लोक पण सर्व शिकवण विसरून गेलेत व नुसते त्या नावाने राजकारण करीत आहेत.


ज्या गांधीवादाने  स्वयं गांधीजी काहीही हासील करू शकले नाहीत पण त्याच शस्त्राने आण्णांनी उपोषणं आंदोलने करून सरकारचा अहं चक्काचूर केला. सध्या ज्याला आरक्षण पाहिजे तो रेलरोको,रस्ता रोको, आंदोलने करून मागण्या पदरात पडून घेतो असे चित्र दिसते.


आण्णांनी अडगळिस पडलेला अहिसेचा मार्ग हाताळून पुन्हा एकदा दाखवून दिले कि शांततामय मार्गाने जें साध्य करायचे ते करता येते .









गांधीनी अहिसात्म्क आंदोलने ,उपवास केले पण सर्वच आंदोलने आपले लक्ष गाठू शकले नाही.पण हेचं शस्त्र  आण्णाची ताकद  बनली व भ्रष्टाचार विरुद्धच्या  लढाई मध्ये जनतेचा अफाट पाठींबा मिळाला.






आन्नाच्या पहिल्या जंतर मंतर उपोषणं नंतर देशातील लोक आण्णाना जाणू लागले . त्यांची बाजू सत्याची असल्यामुळे निस्वार्थ बुद्धीने लोकांचे लोकांसाठी चालवलेले आंदोलन पुढे रामलीला मैदानात अफाट  जन समुदायाच्या पाठीब्याने  भारत सरकारला  नमते घ्यावे लागले  आणि आन्नाच्या मागण्या मान्य  कराव्या लागल्या. 






खरें तर बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून टाकण्यात सरकार  यशस्वी झाले  पण तीच चाल आन्नाच्या बाबतीत महागात पडली. आण्णा जवळ ना संपती,ना घर,ना कोठल्याही प्रकारची छुपी धन दौलत आहे .खरें तर त्यांचे जिवन स्वछ निष्कलंक आहे हें जनतेला माहित झाले म्हणून इतका  जनप्रवाह त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला  व उद्दिष्ठा पर्यंत पोहचवला .  





भारत सरकारनी अनेक विध पर्यंत केले आण्णांना व त्यांच्या टीमला वेगवेगळ्या कारणांनी बदनाम करण्याचे पण व्यर्थ झाले. आता तर संसदेचा अवमान केल्याच्या कारणावरून आण्णा टीमला नोटीसे पाठविण्यात आली आहेत. ही  एक प्रकारची सूडबुद्धी नाही का ?
संसदेत सर्वच सद्श्यांची वर्तवणूक बघितली तर त्यांना संसदेच्या अवमानाखाली  रोजच नोटीसा द्याव्या लागतील.




अन्नाची खरी अहिसेची परीक्षा होईल जेव्हा एखाध्या  आंदोलना मध्ये आण्णाच्या जीवाचे काही बरे वाईट होईल तेव्हा चालू असलेले आंदोलन अहिसक मार्गाने चालू राहिले तर ती खरी परीक्षा होईल. नाहीतर अहिसावादी गांधी गेल्यानंतर संपूर्ण भारतात जो काही त्यांच्या अनुयायांनी धुमाकूळ घातला तो सर्व श्रुत आहेच.


आजादीची पहिली लढाई १८४७ मध्ये जाहली आणि आत्ता दुसरी लढाई २०११ मध्ये भारतीय जनता हे जाणते  कि देशाच्या मालमत्तेचा विद्व्हंस ,नासधूस करणे योग्य नाही आणि आण्णा नेहमी सांगत असतात कि अहिसा व शांतीपूर्ण आंदोलन चालू ठेवावे. पण त्याच जनते मधले लोक असेही म्हणताना आढळले कि सरकारनी आमचा अंत पाहु नये आम्हाला आन्नाच राहू द्या अन्यथा चंदशेखर,भगत सिंग बनण्यासाठी मजबूर करू नका. अहिसात्मक आंदोलन तसेच चालू द्या नसता इतिहास काही वेगळा लिहिला जाईल.



--------------------------------------------------------------------------------------------------------

छाया चित्रे गूगल इमेजसच्या सौजन्याने. माहिती- संगृहीत (विविध लेख) डाक्टर.मनोज शर्मा.
--------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतक्रिया :----

श्री. बासरकरसाहेब: नमस्कार:
श्री. अण्णा हजारेंवरचा लेख अप्रतिम आहे. विशेषत: त्यांची गांधींशी केलेली तुलना डोळ्यांत अंजन घालणारी अशी आहे. आपल्या भारताच्या ईतिहासाची एक नविनच घडण घडते आहे. ह्या नविन पर्वाचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य!
एक ऊत्तम लेख रसिकांच्या समोर आणल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!
शशिकांत पानट
Los Angeles

०९/१४/२०११

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

आण्णाचा विजय.......लोकशाहीचा विजय......!!!!!

लोकशक्ती ...जनशक्ती........विजय.......!!!!!!!!!
 आण्णाचा  विजय.......लोकशाहीचा  विजय......!!!!!
अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय. भारत सरकारमधील काहीं नेते  प्रथम पासूनच अन्नाचे आंदोलन कसे मोडून काढतायेईल इकडे जास्त लक्ष केंद्रित केले पण त्याना त्यांच्या  अपेक्षे पेक्षा जास्त  जनमत उभा राहिलं ही अपेक्षा त्यांना नव्हती. त्यांनी आपल्या कडील सर्व अस्त्रांचा उपयोग करून पहिला पण सरते शेवटी जन रेट्या पुढे झुकावेच लागले.
आज जें संसदेत सर्वांनि  आण्णाच्या तीन मुद्यावर सहमती  घडवून आणली  ते काहीं महिन्या पूर्वीच करू शकले असते पण नाही, काही सरकार मधली मंडळी यास प्रत्येक वेळी खो देण्यामध्ये यशस्वी होत  होते व  आण्णा टीमचे सदस्य ताठर  भूमिका  घेत राहिले  तेंव्हा वाटले कि हा तिढा कसा सुटणार ?
      ज्या  मंडळीना या आंदोलनाची तसेंच आण्णाच्या प्रकृतीती चिंता होती तसेंच श्री रविशंकर ,श्री भायू महाराज  आणि ईतर बुद्धीजीवी  लोकांच्या मध्यस्तीने सरते शेवटी  संसदेमध्ये सार्वमत ठराव पास  झाला तो मुखत्वे करून आण्णाच्या तीन मागण्या.
    
      १ )  कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्‍यांना लोकपालाच्या कक्षेत आणा.
      २ )   केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताची नियुक्ती करा 
      ३ )    नागरिकांची सनद





समाजसुधारक माननीय अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाचे रणशिंग फुंकून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अतूट निर्धाराने पुकारलेल्या लढ्याला देशाच्या सर्व भागांतील आणि सर्व समाज घटकांतील युवकांचा मनःपूर्वक सक्रीय पाठिंबा मिळाला  आहे, या युवा शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून व चांगल्या दिशेकडे  वळविले पाहिजे.





दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या आंदोलनामुळे मध्यम वर्गीय मतदार जागरूक झाला व ह्या आंदोलनात सहभागी झाला  होता. आता वेळ आली आहे कि या जागरूक झालेल्या तरुण आणि मध्यम वर्गीय मतदारांनी  येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील आणि आजतागायातचा निष्क्रियपणा बाजूला सारून आपल्या  मतदानाचा हक्क बजावतील तरच योग्य प्रतिनिधी निवडले जातील.



संसदेने लोकपाल विधेयक पारित करून त्याचे रूपांतर कायद्यात  करणे हा भ्रष्टाचार निर्मूलनाचा  एक उपाय झाला. पण जो पर्यंत जनते मध्ये जनजागृती होणार नाही कि लाच घेणारा जसा दोषी तसाच लाच देणारा हि असतो.
म्हणून सर्वांनी प्रतीज्ञा  करावी कि " मी लाच घेणार नाही आणि देणार नाही", आत्मीयतेचा भाव जागविला, तरच प्रचंड मानसिक परिवर्तन करणे शक्य होईल आणि त्या दृष्टीने प्रत्येक  क्षेत्राला आपल्या विचारशैलीत बदल कारावा लागेल.
                                    
आण्णाच्या शब्दात लढाई अर्धी जिंकली ऊरलेल्या लढाईच्या तयारीत राहावे.

-------------------------------------------------------------------------------------------
 अर्क चित्र (सुपर आण्णा ) जगदीश भावसार यांच्या सौज्यान्याने तसेच गुगल इमेजेस.


वाचकांची प्रतिक्रिया :--

 
8/29/2011 10:28 PM
संसद पवित्र आहे पण तिचे पावित्र्य टिकवायचे त्यांनीच तिला आपल्या
वागण्याने अपवित्र केले आहे .त्याची शिक्षा कोणी भोगायची. किरण बेदी व ओम पुरींच्या
वक्तव्यावर लगेच हक्क भंग प्रस्ताव आणता येत असेल तर त्यावर सर्वांचे एक मत होत असेल
तर जनालोकापाल्बिलावर निर्णय घ्यायला उशीर का लागतो तेथेही असाच झटपट निर्णय का घेता
येत नाही आपले मत व्यक्त करण्याचा हक्क सर्व भारतीयांना घटनेने दिला आहे हे लोकसभेतील
आपल्या खासदारांना नक्की माहित नाही ना?

avinash Says:
  Delete
8/29/2011 8:12 PM
संसद पवित्र आहे असे खासदार बोलत असतील तर अधिवेशनात गोंधळ आणि
सभात्याग करतात तेव्हा हे पावित्र्य गायब कसे होते. संसदेचा जितका बहुमूल्य वेळ हे लोक
वाया घालवितात तितके यांचे भत्ते कापले पाहिजेत. सतत गैरहजर असणार्या खासदारांची यादी
सार्वजनिक करणे आवश्यक आहे तेव्हा मतदारांना कळेल कि आपला खासदार काय करतो आणि
 पुन्हा त्याला मत द्यायचे कि नाही हे थातावू शकेल.

|  Delete
8/29/2011 12:46 PM
आपला ब्लॉग पाहिला.चांगला आहे. सध्या अन्ना टीमची ताठर भूमिका,
उर्मतपणा याविषयी रान पेटवले जाते त्याला अर्थ नाही. महाराष्ट्रात अडगळीत पडलेला अण्णा
हा हिरां शोधून त्याच्यामागे सर्व शक्तीनिशी उभी राहिलेली हि टीम.! महाराष्ट्राला न सुचलेले,
अण्णांना राष्ट्रीय थरावरील नेते बनविण्याचे फार मोठे काम अण्णांच्या या टीमने केले आहे.
त्यांना सौम्य शब्दात खाच खळगे समजावून देणे ठीक! पण अशां भाषेत त्यांच्या कामाला कमी
लेखणे कृतघ्नपणाचे होय!



शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

वाचवा रें वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... भारत सरकारचा टाहो.

वाचवा  रें  वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... भारत सरकारचा टाहो.


अण्णा हजारे एक समाज सेवक .

 राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां  सगळ्या देशाचे  गांधीवादी युगपुरुष झाले  आहेत . ते  भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.

हिंदुस्तानच्या इतिहासात  मोगलांनी आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी लुटालूट या ६४ वर्षात या राजकारण्यांनी  या देशात केली आहे. अलीकडच्या काळात ही लुटालूट फारच  प्रमाणाबाहेर गेली आहे.
स्वात्यंत्र मिळाल्या  नंतरच्या सुरुवातीच्या काळात राजकीयनेत्या मध्ये प्रामाणिक नेते मंडळी होती.  पण त्यांची राहण त्यावेळच्या मध्यमवर्गीय माणसासारखी होती.

आजकाल लोकप्रतिनिधी म्हणजे  समजाची सेवा करणारे  नाही  तर उलट  नेतेगीरीचा व्यवसाय करणारे झाले  आहेत . निवडून  आलेला कोणताही लोकनियुक्त प्रतिनिधी वर्षा-दोन वर्षात शंभर पटीने श्रीमंत होतो हें कसे होतें ? याचा कोणी विचार केला आणि जाब विचारला ? सगळ्याच पक्षात खाबूगिरी आहे यातून कोणीही सुटलेला नाही . 



  दैनिक ‘लोकसत्ता’चा ‘हटवादी आणि हतबल' ह्या  अग्रलेखात  म्हटले आहे की, "‘देशात भ्रष्टाचार माजला आहे याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही; पण तो केवळ माझ्याच मार्गाने गेल्यास दूर होईल, असे मानणे हा दुराग्रह झाला. संसदीय लोकशाहीत इतरांच्या मतांचीही बूज राखावी लागते. मी म्हणेन तेच नियम हे म्हणणे हुकूमशहांना शोभते, गांधीवाद्यांस नाही. माझेच विधेयक मंजूर करा नाहीतर मी करतो उपोषण ही दडपशाही झाली.' देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या संसदेला डावलून भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याचा लढा अण्णा हजारे रस्त्यावर लढू पहात आहेत आणि तो पायंडा पडला, तर देशात अराजक येईल," असा युक्तीवाद सरकार कडून  त्यांचे खंदे वीर संसदेत,टीवी ,व पत्रकार परिषदेत करीत आहेत. 


आज अण्णा हजारे यांचा मार्ग या लोकाना " हुकुमशाही  " आहे असे भासविले जाते . पण हें लोक सोयीस्कर रीतीने हें विसरतात कि   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधींनी आमरण उपोषणाला बसले कां तर  भारत सरकार जे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देणे लागत होता ते त्याने त्वरित द्यावेत म्हणून. हे ५५ कोटी  द्यायचे नाहीत असा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता कारण संधीच्या अटी पाळण्यास पाकिस्तान तयार नव्हता तसेंच काश्मीर बळजबरीने घेण्याची कारवाई त्यांच्या कडून झाली होती. तो केंद्रीय मंत्रिमंडळाच निर्णय  गांधींनी बदलायला लावला आणि पाकिस्तानला ती रक्कम मिळाल्यानंतरच  गांधींनी उपोषण मागे घेतले.  असा निर्णय घेऊन गांधींनी सार्वभौम भारताच्या सरकारला झुकविले. तो पायंडा पाडला   नाही का ?


काँग्रेस प्रणीत यु पी ऐ सरकार आरंभीपासूनच श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन ते चिरडून टाकण्याचे धोरण अवलंबले. श्री.हजारे यांच्यावर केलेल्या कारवाई विषयी संसदेत चर्चा चालू असतांना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सरकारची  भूमिका मांडली.भारतात लोकशाही नांदत आहे.आणि  ‘श्री. अण्णा हजारे हे संसदेला आव्हान करत आहेत’, असे वक्तव्य केले.

खरें  तर प्रथमपासूनच काँग्रेसच्या टोळीतील पी. चिदंबरम, कपिल सिब्बल यांनी अण्णांच्या आंदोलनाला ‘घटनाबाह्य’ म्हणून हिणवले. इतकेच नाही तर आण्णानां घटना माहित नाही आणि हें चाललेले आंदोलन फक्त मिडिया समोर येण्यासाठी आहे. किती हास्यास्पद आहे विधान या विद्वानाचे.



आतापर्यंत डॉ.सिंग,चिदंबरम किंवा सिब्बल यांनी ‘जनतेपेक्षा संसद मोठी’,अशी भूमिका घेतली आहे.संसदेत पण ह्यीच गोष्ट ते वारंवार सांगून संसद सदस्यावर  ठसविण्याचा प्रयत्न करीत होतें"संसद कि गरिमा " चा टाहो फोडत होतें.   

मुळात लोकशाहीत जनता ही केंद्रबिंदू असतांना असली विधाने करणे,म्हणजे लोकशाहीच्या विरोधात ही मंडळी नाहीत का ?जनतेनी निवडून दिलेतरच ही नेतेगण संसदेत जातील आणि त्यांनाच तुम्ही दुयम स्थान देतां व निवडून आलेले प्रतिनिधीच   सर्वोच्य   आहेत ? .




बळाचा व सत्तेचा वापर करून स्वतःला हवे तेसें  करण्याची  मानसिकता या सरकारने बाळगली  आणि   याला कोणी विरोध केल्यास त्यावर केलेली कारवाई (कृती )लोकशाहीला कशी धरून आहे, असे सांगत त्याचे समर्थन करतांना  दिसत आहेत.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले. त्या वेळी तेथे १४४ कलम लागू केले होते. राहुल गांधी यांची ही कृती सरकारला  घटनाबाह्य वाटली नाही.  ‘राहुल गांधी यांनी केलेले आंदोलन हे ‘आमआदमी’साठी होते’अशी भुलावण करीत ती योग्यच होती हें पटवताना  दिसत होतें. हें तर "दुप्पटी धोरण " नाही का ? आपला तो सोन्या दुसर्यांचा तो कार्ट अश्या प्रकारे सरकारचे 
धोरण आहे.   

डॉ.मनमोहन  सिंग यांनी त्यांच्या भाषणात ‘अण्णांच्या आडमुठे धोरणामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली व  आण्णांनी  १४४ कलमाचे उल्लंघन केले असे वक्तव्य केले. राहुल गांधी जेव्हा १४४ कलमाचा भंग केला,तेव्हा ते ‘आम आदमीसाठी,आणि  अण्णांनी १४४ कलमाचे उलंघन न करतां त्यानां अटक झाली ते कोणासाठी? मुळात अण्णांना जेथे अटक करण्यात आलें  त्या क्षेत्रामध्ये हे कलम लागू नव्हते.

हें संपूर्ण देशातील जनतेला माहित होतें.या घटनांतून सरकार  स्वतःच्या सोयीप्रमाणे नियमांचे कसे उल्लंघन करत आहे, हे दिसून येते.

यु पी ऐ सरकारनी जनक्षोभाचा ,भावनांचा आदर राखावा.-----


गेले काही दिवस काँग्रेसच्या रथी महारथी  दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल,मनीष तिवारी यांनी अण्णांवर जी खालच्या पातळीवर जाऊन  चिखलफेक केली, ती लोकशाहीला धरून आहे का ?

यु पी ऐ सरकार मधील मंत्रीगण  संसदेच्या श्रेष्ठत्वाविषयी वारंवार संसद सदस्यावर बिम्बवण्याचा पुर्जोर पर्यंत  करतांना दिसले. या संसदेने जनतेला काय दिले  तर  निम्याहून अधिक लोकप्रतिनिधी जें  भ्रष्ट आहेत हें दाखवून दिले . ए. राजा, कलमाडी, कनिमोझी, मारन यांच्यासारखे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोकप्रतिनिधी  या संसदेने भारतीय जनतेला  दिलेली अमुल्य अशी भेट  आहे नाही का ? तर  अशा या संसदेची टिमकी वाजविणे कितपत योग्य आहे हें जनता चांगलेच जाणते

यु पी ऐ सरकारचे संसदेत असलेल्या बहुमताच्या जोरावर  ज्या लोकपाल  विधेयकात अजिबात दम नाही, असे लोकपाल विधेयक संमत करू पहात आहे.ज्या  विधेयकात   अनेक त्रूटी असल्यामुळे  भ्रष्टाचार करण्याची मुभा लोकप्रतिनिधींना मिळणार आहे. हा  हेतू अण्णा व त्यांच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनामुळे   साध्य होत नसल्याने सरकारने  त्यांच्यावर लोकशाही आणि घटना यांच्या नावाखाली हे आंदोलन चिरडण्याचा जो प्रकार चालवला आहे तो निदनीय  आहे. त्याला जनता नक्कीच प्रत्युत्तर देईल.



लोकशाहीत संसदेला काही अधिकार दिले असले तरी  जनभावना महत्त्वाची असते.भ्रष्टाचाराने सर्वत्र  बुडालेल्या  भारतियांना  सरकारी  लोकपाल बिल  नाही  तर अण्णांचे जनलोकपाल विधेयक हवे आहे.

लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य. त्यामुळे भारत सरकारला  लोकभावनेचा आदर हा राखावाच लागेल.अन्यथा आंदोलनाचा अजून तीव्र  भडका उडण्यास कितीसा वेळ लागणार ?  

 

भारत सरकारला .........अण्णांचा पेच


स्वतंत्र भारतातील अखंड बुडालेल्या भ्रष्ट सरकारचं नेतृत्व स्वच्छ चारित्र्याच्या पंतप्रधानाकडे आहे.  यांच्याकडे नैतिक बळ नाही, नेतृत्व गुण नाहीत आणि संघटन कौशल्य ही नाही.असे बऱ्याच विद्वानाचे तसेंच अभ्यासकांचे मत आहे. काँग्रेस पक्षाची स्थितीही या पेक्षा  वेगळी नाही.केंद्र सरकारची अशी   स्थिती असल्याने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत धरसोड वृत्ती मुळे जगभरात नाचक्की होतें आहे. 

अण्णा हजारे यांच्याजवळ संघटीत  संघटना नाही तरिही त्यांना देशाच्या कानाकोपर्‍यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कारण  भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणि अण्णा हजारेच्या स्वछ  चारित्र्यामुळे तो  मिळतो आहे.  आण्णाच्या अटकेनंतर अभूतपूर्व जन समर्थन बघण्यास मिळाला हा जन रेटा सरकारास  मजबूर केले व  आण्णाच्या अटी मानण्यास भाग पडले.




जनतेला घटनात्मक  अधिकार आहे कि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा .श्री. अण्णा हजारे यांना अटक करून सरकारनी  घटनेचीच पायमल्ली केली आहे असे दिसते.  यावरून भारतीय  घटनेला हे सरकार काहीच किंमत देत  नसून उलट हुकूमशाहीच चालवत  असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.


अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाला भाजपचा व ईतर विरोधी  पक्षाना आणि  कम्युनिस्टांचा संपूर्ण पाठिंबा आहे असे नाही . पण विरोधी  पक्षांनी  अण्णांचं आंदोलन दडपू पाहणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत व  रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या केंद्र सरकार बरयाच अडचणीत सापडलं आहे त्याना हे आण्णा रुपी नवे गांधीना कसे आवरावे या संभ्रमात पडले आहे. सरकारमध्ये कोणीही असा नाही कि जो यातून मार्ग दाखवेल आणि दुसरया कुणाची मदत घेणे म्हणजे नाकर्तेपणा जाहीर होईल म्हणूनच सध्या ते टाहो फोडीत आहेत कि...........


वाचवा  रें  वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... !!!!!!!!!



विनंती:---
आण्णा १९ ऑगस्टला रामलीला मैदानात आपले उपोषण चालू ठेवतील अशी घोषणा झाली जरी प्राथमिक लढाई जिंकली तरी पुढे हे आंदोलन कसे शांततेने पार पडेल याची जवाबदारी आण्णा टीम वर आहे.

आण्णांना पाठींबादेणारे जनता  त्यांच्यावर पण हि जवाबदारी  आहे हे कि  संपूर्ण आंदोलन शांततेने पार पडले  तरच अंतिम लढाई जिंकू शकू.......धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------

चित्रे गुगल इमेजस आणि माहिती संग्रहण लोकसत्ता व दैनिक सनातन प्रभातच्या सौजन्याने.

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

भ्रष्टाचार मुळां पासून काढायचा ?......खरें तर "गुप्त स्वहित" प्रथम ओळखलें पाहिजे.


महाराष्ट्रात पर्यटन वाढविण्यासाठी " लेक सिटी / लावासा " प्रकल्पास मंजुरी दिली गेली. महाराष्ट्राचा एक बडा नेता ह्यात गुंततो हें जरी पटण्यासारखे नसले तरी हें सत्य आहे कि ह्या लावासा प्रकल्पांत त्यांच्या काहीं नातेवाईकांचे स्वहित आहे.

ज्या वेळी ह्यां नातेवाईकांनी पैसा गुंतविला त्यां वेळी आम जनतेस हें माहित नव्हते आणि करून पण देण्यात आले नाही. २००० साली हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळी सुचना किवां जनतेस कोठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. यां उलट जवळच्या सर्वाना ह्या प्रकल्पाचे शेअर्स वाटण्यात आले. इथें कोणाचे गुप्त-स्वहित होतें?

मुंबईत " आदर्श "' घोटाळा व यां मुळे मुख्यमंत्रीनां पाय उतार व्हावे लागले कारण आतां सर्वश्रुतच आहे. माझे काम तु कर, तुझे काम मी करतो यां तत्वावर स्वतःचें हित जपण्यासाठी ही राजकारणी मंडळी व अधिकारी मंडळी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात कारण त्यांना कोणीही जाब विचारणारा नाही. असे स्वहित जपण्यास कायद्याची मोडतोड करावी लागते आणि ही मदत उच्य सरकारी अधिकारी व राजकीय संगनमताने त्यांचे स्वहित साधण्यासाठी करतात.

ओडिटर जनरल आफ इंडिया  यांनी २ जी स्पेक्ट्रम लैसेन्सिस देण्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आपल्या रिपोर्ट मध्ये उघड केले. टेलिकॉम मंत्री यानां सर्वांच्या रेट्या मुळे शेवटी पंतप्रधानाना त्यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले.

सर्वांस परिचित असलेले आय. पी. यल. ( इंडिअन प्रीमिअर लीग ) चा लिलाव घोटाळा. अश्या सर्व घोटाळ्यातून एकच दिसते कि कुठे तरी "गुप्त स्वहित" साधण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग केला गेला.
वरील सर्व प्रकरणात हेचं एक मुळ कारण दिसते आणि भारतात राजकीय नेते व सरकारी वर्ग मिळून अधिकारांचा गैर वापर सरांस पणे करून आपापले हित साधत आहेत.

हें सर्व थांबवणे जरी कठीण वाटत असले तरी लोकांनी त्याचा पाठपुरावा केला व जाग्रत मतदानातून हें महा घोटाळे करणाऱ्यांवर जब्बर बसवु शकतात मग, ईतर लहान घोटाळे करणाऱ्यास खीळ बसेल.  श्रीमती इंदिरा गांधीनि आपत्काल घोषित केला तेव्हां सर्व सरकारी तसेंच राजकीय लोकांना आपले स्वहिताचे उद्योग थांबवावे लागले कारण त्यानां माहित होतें कि जर आपण काहीं करू तर किती जब्बर शिक्षा होईल .

जाग्रत जनतेनी मतपेटी द्वारे ह्या लोकांस असा दणका द्यावा जेणे करून पुढे कोणी करू धजू नये. वाचनात आले कि काहीं अवकाश प्राप्त सरकारी अधिकारी
जें भारताच्या सेंन्टरल इन्टलीजंस विभागात कामकरणारे होतें. ज्यांनी निष्ठेने, निष्कलंक पणे आपले कर्तव्य बजाविले त्यांच्या म्हणण्या प्रमाणे व अनुभवाने त्यांच्या मते राजकीय नेते व त्यांच्या सम विचारी सरकारी अधिकारी ,व्यापारी वर्ग ,काही यन. जी. ओ. संस्था व अंडरवर्ल्ड यांच्यात एकमेमाचे  असलेल्या  घनिष्ट संबंधामुळे असे मोठ मोठाले घोटाळे घडत असतात.माल व अन्न धान्याचा तुटवडा ,लालफीत, अपारदर्शकता व चुकाराना शिक्षा न होणे किवां त्यांचे हित संबंध जपणे ह्या सर्वा मुळे अश्या घटना घडतात .

भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.

आता तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा रोग शिक्षण क्षेत्रांत सुद्धा वाढत आहे आपण बघाल तर कोणत्याना  कोणत्या  शिक्षण संस्थेशी राजकीय मंडळीचा संबंध आहेच. नुकताच पुणे येथील भूखंड घोटाळा जो भूखंड मनोरुग्णाच्या पुनर्वसानासाठी राखीव होता तो एका बड्या शिक्षण संस्थेस ज्यांचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे तो भूखंड त्यांना ३० वर्षाच्या भाडे पट्टी कराराने अल्पशा मोबदल्यात दिला. हें कसे झाले कोणास माहित ?

लावासा प्रकल्पा विषयी गुप्तता बाळगणे व तो  फक्त मोजक्याच मंडळीना माहिती असणे व सर्व नियम धाब्यावर बसवून एकही सरकारी अडथळा न येता मंजुरी मिळणे हें कशाचे द्योतक आहे ?

आताचं वाचण्यात आले  स्विस बैन्केचे अध्यक्षांनी असे म्हटले कि " भारतीय लोक गरीब आहेत पण भारत गरीब नाही " त्यांच्या बैन्केत २८० दस लक्ष कोटी पैसे भारताचे जमा आहेत जें भारतीयांनी आपापल्या  खात्यात  जमा केलेले आहेत. विचार करा ह्या पैशातून जवळ,जवळ ३० वर्षे विना कर आकारणी करता केंद्रीय बजेट मांडला तरी तो पुरणार आहे. जर सामाजिक व लोक उपयोगी  प्रकल्पाना फुकट वीज पुरवठा करता येईल. जर कां सर्व भारतीया मध्ये वाटला तर दर डोई रुपये २००० प्रत्येक महिन्यास देता येईल. एवढा पैसा असल्यावर कुठल्याही जागतिक बैन्के कडून कर्ज घेण्याची आवशकता भासणार नाही.

हा सर्व पैसा स्वहित जपूनच उभारला गेला तो राजकारणी,काळा बाजारी, अंडर वर्ल्ड व सरकारी अधिकारी ह्या सर्वांनी केलेले मोठ मोठे घोटाळे करूनच. हा पैसा भारतीयांचा आहे असे आपणास वाटत नाही का? तो परत मिळाला तर चांगल्या लोक उपयोगी कामात खर्च केला तर भारत जगातला सधन राष्ट्र होईल.
  
ह्या सर्वांचा साकल्याने आपण सर्वांनी विचार केला कि वाटते, कि आपण कुठे तरी चुकत आहोत. आपले राजकारण इतके बरबटलेले आहे कि चांगली शिकलेली,चारीत्र्यवान, सामान्य लोकासाठी झटणारा असा नेता येणे कठीणच. स्वात्यंत्र पूर्व काळात जशी देश भक्त मंडळी होती तशी यां काळी मिळणे दुरापास्तच. पण जनजागृती झाली व सर्वांनी विशेषतः उच्च्य व मध्यम वर्ग स्थरातील,शिक्षित व देश भावना असणाऱ्या  लोकांनी जर आपल्या मतांचा वापर करून योग्य उमेदवार निवडला तरच खऱ्या अर्थाने लोकशाही आणू शकू.