सोमवार, ७ मे, २०१२

"आईचे महत्व...!"


 "आईचे महत्व...!"
-----------------------------------------------






मुलांच्या भावनिक जीवनात "आईचे महत्व" खूप असते.
"आई आणि वडील" यांच्यामध्ये मुलांचे जास्त भावनिक नाते",
हे आईबरोबर जोडलेले असते. जन्मदात्या -आईशी " हे जवळचे
भावबंध स्वाभाविक आणि सहजपनाचे असतात.


"आपल्या मुलांवर प्रेम करावे "- हे कधी कुणा आईला सांगावे लागलेले
आहे का ?






आईचे माया , तिचे प्रेम, आपल्या कुटुंबाविषयी तिला असलेली ओढ आणि "काळजी ", या गोष्टी मुलांनाही कळत असतातच ना.! आईची त्याग-भावना , आणि निस्वार्थी -प्रेम भावना " या दोन्ही तर साऱ्या जगाने मान्य केल्या आहेत की.


 "जगातील सव भाषा मधून, त्यातील साहित्या मधून आईचे महत्म्य आणि महत्व अगदी मोठ- मोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले आहे " हे ही आपण पाहतो.


आईच्या मनातील उत्कट भावनेमुळे "आईचे प्रेम" मुलांना सतत
जाणवत असते. म्हणूनच एखादे घाबरलेले मुल, भीतीने भेदरलेले मुल.
आईच्या कुशीत शिरले मी "भयमुक्त होते." आईच्या मायेच्या स्पर्शाने
हे बाल स्वतःला सुरक्षित समजत असते.



"स्त्री-पुरुष", "आई आणि बाप", या दोन्ही नाते-स्वरूपात ज्यावेळी
मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो", त्यावेळी , मुलांचा योग्य सांभाळ ,
आणि योग्य संगोपन"- बापापेक्षा "- मुलाची आई जास्त योग्य करू शकते ',यावर नेहमीच एकमत झालेले आहे.










आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती -मुलांना आपली आईच महत्वाचे वाटत असते. मनातले सारे काही सांगायचे ते आईला ..!" हे विश्वासाचे नाते आई आणि मुलातील भाव-बन्ध अधिक बळकट करणारे आहे.


कुटुंबासाठी सतत झटणारी , निस्वार्थी पणे प्रेम करणारी, सर्वांची काळजी घेणारी आई , घराला आपले सर्वस्व मानणारी आई, आणि "आईला आपले सर्वस्व मानणारी मुले आपल्याला भोवताली दिसतातच की...!
हे असे आहे "आईचे महत्व"..!





लेखक ......Arun V. Deshpande
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चित्रे  गुगलच्या सौजन्याने .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: