sangrahit लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sangrahit लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ मार्च, २०१६

वर्ष प्रतिपदा ( गुडी पाडवा )...............!!!!

          हिंदू  नव वर्षाच्या शुभेच्छा  ..........!!!!


येणारे नूतन वर्ष आपणास समृद्धी व आनंदमय ,भरभराटीचे ,जाओ ही सदिछ्या .......!!


WISH YOU ALL A VERY VERY HAPPY & PROSPEROUS HINDU NEW  YEAR ...!!







हा वर्षारंभाचा पहिला हिंदू सण आहे. पाडव्याचा मुहूर्त हा साडे तिन मुहूर्तापैकी एक आहे. ह्या दिवशी कोणतेही नवी कामे करण्यास प्रारंभ करवा.


चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुडीपाडवा . तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो





चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाच्या  वर्ष्याचा  पहिला दिवस होय. या दिवशी सर्वानी पहाटेस उठून सुचिर्भुत होउन देवाची मनोभावे पूजा करावी. व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
 


 तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.  ह्या गुडीस धर्म शास्त्रात
" ब्रम्ह ध्वज " असे म्हंटले आह.आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. 





                                                  गुडी



 ह्या गुड़ीची पूजा करून कडू लिंबाची  पाने,मिरी,हरबऱ्याची  डाळ ,ओवा, गुल , व् मीठ घालून मिश्रण तैयार करावे. घराती सर्व लहान थोर मंदालिनी त्याचे सेवन करावे. याच दिवशी पंचंगाचे वाचन करतात आणि  वार्षिक फल जणूण घेतात.   



गुडी पाडवा प्रसाद


चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या  अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या  अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. .

त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहे  याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.



गुडी.


संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. गुडीवरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.







हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा!  गुढ्या उभारायचा दिवस,    पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस,आणि गोडधोड करण्याचा दिवस तसेच नवीन वस्तू खरेदी करण्याचा दिवस, घरातील सान  आणि थोर मंडळीनी एकत्र येवून वर्षारंभ दिवस साजरा करण्याचा दिवस. या धरतीवर  वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण सर्वांनी मिळून मोठ्या थाटात  साजरा करुया.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

छाया  चित्रे  गुगल इमेजस च्या सौजन्याने व माहिती संग्रहित.

बुधवार, १० एप्रिल, २०१३

चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुडी पडावा ) हिन्दु नव वर्षारंभ


                      Posted Image

 

               गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ……!!



                         Posted Image




चैत्र शुद्ध प्रतिपदा ( गुडी पडावा ) हिन्दु नव वर्षारंभ

 

महत्व ----
 
जगात १२ ही  महिने कोणता ना कोणता महिना हा वर्षारंभ असतो जसे,  जानेवारी,(ईंग्रजी  नव वर्ष ) ,एप्रिल आर्थिक नव वर्ष, सौर वर्ष, चांद्र वर्ष, लुनार वर्ष, शैक्षणिक वर्ष, ईत्यादी'

नव वर्षाचे उगम हे वेदा पासून सुरु झाले . द्वादशमासै: संवत्सर: असे वेदात प्रतिपादले आहे. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेस नव वर्षारंभ ह्यास  नैसर्गिक, अध्यात्मिक,ऐतिहासिक करणे आहेत .  

 

ऐतिहासिक ------
 
१) वालीचा वध रामाने केला.
 
 २) रावणाचा  पराभव करून श्री राम अयोध्येत परतले तो हाच दिवस,
 
 ३ ) हुणांचा पराभव शकांनी  केला 
 
 ४ ) शालिवाहनाने ह्याच दिवशी शत्रूचा पराभव केला आणि ह्याच दिवसा पासून " शालीवन शक " सुरु झाले.

 

अध्यात्मिक ------
 
श्री ब्रम्ह देवांनी  श्रुष्टीची निर्मिती केली आणि सत्ययुगास प्रारंभ झाला  तो ह्याच दिवशी म्हणून हा दिवस  "वर्षारंभ दिवस  "म्हणून साजरा केला जातो.

 

 नैसर्गिक ------  
 
  जगात जानेवारी हा महिना वर्षारंभ म्हणून साजरे करतात पण गुडी पाडवा  ( चैत्र शुद्ध प्रतिपदा ) हाच जगाचा वर्षारंभ दिन आहे. चैत्र मासात वर्षाचे कालचक्र विश्वाच्या  उत्पत्ती  काळाशी  निगडीत  असल्यामुळे  श्रुष्टी  नवचैत्याने  बहरून  येते . या उलट जानेवारी महिना हा वर्षाचे कालचक्र विश्वाच्या लय काळाशी निगडीत असल्यामुळे चेतनाहीन, अनुउत्साहित  वातावरण असते.

गुडी पाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी निर्माण होतात आणि त्या लहरी आपणास उत्साही व चैतन्य निर्माण करणारे असतात. 





                Posted Image
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

तुळस----- नवीन लेख



आमचे मित्र डाक्टर हेमंत सहश्रबुद्धे यांचा भारतीय तुलसी वर माहितीपूर्ण लेख  तसेच उपयोग तिन भागात दिली आहे . हे तिन्ही भाग आम्ही आपल्या वाचका साठी  पोस्ट करीत आहोत.


धन्यवाद.
------------------------------------------------------------------------------


तू ळ स ( तुलसी )


मित्रहो,  ७ नोव्हेंबर अर्थात कार्तिक शुद्ध १२, या चातुर्मास्य समाप्तीच्या दिवशी तुलसी विवाह काल सुरु होतो .  त्या निमित्ताने तुळशीबद्दल काही सांगावेसे वाटते.







                                   भारतीय तुळस ( तुलसी )

सर्वप्रथम मी या परमेश्वराला तुल्य-सी असलेल्या म्हणजे जिची तुलना परमेश्वराशी होऊ शकते अशा या तुळस देवतेला मन:पूर्वक नमस्कार करून आपल्याशी संवाद साधतो.


       भाग १......................


तुळशीचे आजच्या शास्त्रीय भाषेतील वेगवेगळ्या प्रजातीन प्रमाणे वेगवेगळी नावे आहेत. श्वेत तुळस [पांढरी तुळस] - Ocimum Sanctum , ,कृष्ण तुळस [काळी तुळस]- Ocimum Dilosum  आणि तिसरी एक प्रजाती आहे तिला Ocimum Tenuiflorum असे म्हणतात.



                                                  
                            [पांढरी तुळस] - Ocimum Sanctum




                                
                           [काळी तुळस]- Ocimum Dilosum 






                                      Ocimum Tenuiflorum



संस्कृत मध्ये तुळशीची तिच्या उपयोगानुसार, उत्पत्ती स्थानानुसार आणि इतर अनेक गुण धर्मांनुसार वेगवेगळी नावे आहेत. ती अशी.







ग्राम्या---- गावात, सर्वत्र होणारी,




सुलभा---- सहज मिळणारी,









सुरस आणि सुरसा---- चांगल्या रसाची,


सुभगा---- कल्याणकारी,


भुतेष् आणि भूतप्रीया---- सर्व प्राण्यांना आवडणारी,


पुतपत्री---- जिची पाने खाल्ल्याने शरीर पवित्र होते,


सूरदुंदुभी आणि देवदुंदुभी---- जिच्या पानांमध्ये देव रहातात,


अपेत राक्षसी ---- राक्षसांचा म्हणजेच कीटक[ डास], जंतूंचा नाश करणारी,


कायस्था---- शरीर स्थिर, दृढ करणारी,


सुरभी, स्वादुगंधा ---- सुगंध असणारी,


वृंदा---- वृंदा नावाची एक राक्षसपत्नी विष्णूच्या वरदानाने पृथ्वीवर अवतरीत झाली म्हणून तसेच तिच्यावर एकत्रित  फुले लागतात म्हणून वृंदा,



तसेच आपल्याला नावावरून सहज अर्थ कळेल अशीही काही नावे आहेत.

पावनी, पापघ्नी, तीव्रा, सरला, त्रिदशमंजरी, मंजरी, सुमंजरी, बहुमंजरी, त्रिदशमंजरी, वैष्णवी, विष्णू वल्लभा, विष्णुप्रिया,  हरिप्रिया, कृष्णप्रिया वगैरे....इंग्रजीत तुळशीला ती डास नष्ट करत असल्याने " मस्कीटो प्लांट " सुद्धा म्हणतात तसेच ती पवित्र असल्याने "होली बसिल" असेही म्हणतात.



तुलसीपत्रसहितं जलं पिबति यो नर:!

सर्वपापविनिर्मुक्तो मुक्तो भवती भामिनी  !!


असा तुळशी बद्दल उल्लेख आढळतो. याचा अर्थ तुळशीची पाने घातलेले पाणी पिणारे सर्व रोगांपासून मुक्त होतात.


जर्मन संशोधक Dr एडवर्ड बाख, ज्यांनी आपली वार्षिक ५००० पौंडांची वैद्यकीय practice सोडून देऊन संशोधनाला वाहून घेतले आणि नोसोड्स आणि बाख फ्लॉवर थेरपीचा जन्म झाला. ज्यात फुले निर्झराच्या स्वच्छ पाण्यात बुडवून ठेऊन सुर्प्रकाशात ठेवल्यावर फुलातील गुणधर्म त्या पाण्यात उतरतात हे त्यांच्या लक्षात आले. अशा ३८ फुलावर संशोधन करून त्यांनी वेगवेगळ्या मानसिक विकारांवर औषधे शोधून काढली.


त्यांची ज्ञानेंद्रिये इतकी संवेदनाक्षम झाली होती की त्यांनी त्या त्या फुलाची पाकळी जिभेवर टाकल्यावर त्यांना त्यामुळे शरीरात झालेले बदल लगेच लक्षात येत असत. या बाख फ्लॉवर औषधांनी लाखो लोक मानसिक त्रास, अपघात, दुर्दैवी मृत्यू नंतरच्या धक्क्यातून सावरलेले आहेत. असो, तर हेच तत्व हिंदुंच्या पूजेत वापरले गेले आहे. पूजेच्या वेळेला तीर्था मध्ये दुध, मधासहित तुळस, दुर्वा देखील असतात.


गणेश उपासना करता उष्णता आणि पित्त वाढत असल्याने ते शमण्यासाठी दुर्वांचे तीर्थ किंवा रस, शंकर किंवा शिव उपासना करताना वात वाढत असल्याने [ किंवा वात वाढल्यावर] बेलाचे तीर्थ किंवा रस आणि विष्णू किंवा नारायणाची [नार + आयन किंवा अयन अर्थात पाण्याचा किंवा पाण्यातील देव. पाणी हे सोम + अग्नी या दोन देवतांनी बनलेले आहे किंवा पाण्यात अग्नी असतो असे उल्लेख आहेत हे सोम म्हणजे ऑक्सिजन आणि अग्नी म्हणजे हायड्रोजन. पाण्यातील एलेक्ट्रोंस आणि प्रोतोंस त्यांच्या भार स्वरूपात विहरू लागल्यावर त्यांना आयन असेच म्हंटले जाते.


कफ वाढत असल्याने तुळशीचे तीर्थ किंवा रस वापरणे उपयुक्त असल्याने वैदिक धर्मात धर्माच्या माध्यमातून या गोष्टी अगदी सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविल्या गेल्या, ज्या अगदी स्वस्त किंवा बिनपैशाच्या आहेत.


   
 तुळस [ भाग२]............


वेंकटेश्वरा विद्यापीठ आणि इतर काही संशोधकांच्या अभ्यासानुसार तुलस हीच एक वनस्पति अशी आहे की जी "ओझोन" [O३] बाहेर टाकते. सध्या म्हंटल्या जाणार्या ग्रीन हाउस इफेक्ट नुसार पृथ्वीवर आलेल्या सूर्य प्रकाशातील थर्मल इन्फ्रारेड किरण वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात येथील भयानक प्रदूषणामुळे धरून ठेवले गेल्याने पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्यामुळे बर्फ़ाच्छादित पर्वतावरील बर्फ वितळून हे पाणी समुद्रात मिसळून समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.


फ्रीज सारख्या उपकरणांमुळे अर्थात त्यात वापरल्या गेलेल्या CFC सारख्या रसायनांमुळे वातावरणाच्या वरील ओझोनचा थरही विरळ होत चालला आहे. आणि या निर्माण झालेल्या मोठ्या जागेतून सूर्य प्रकाश अजून तीव्रतेने पृथ्वीवर येतो आहे. आपण अंगावर जे Body स्प्रे मारतो त्यामुळे शरीराभोवतीचा ओझोन कमी होतो. या सर्वांवर बिन खर्चिक आणि सोपा उपाय म्हणजे तुळस लावणे होय.


तुळशीला सकाळी माय भगिनी पाण्याचे अर्घ्य देऊन नमस्कार करून प्रदक्षिणा करतात. त्यामुळे पाण्यातून परावर्तीत झालेल्या सूर्यप्रकाशातील ७ रंग त्या स्त्रीच्या शरीरावर पडून तिला त्याचा फायदा होतो. तसेच तुळशीच्या वासाने मन प्रफुल्लीत होते. हवा तुळशीने शुद्ध तर झालेलीच असते. त्याचाही लाभ होतो.


 प्र+ दक्षिणेचा सुद्धा लाभ होतो. प्र म्हणजे पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूने. सारे सौर मंडळ, ग्रह, तारे, आकाशगंगा, अणु, रेणू सारे सारे फिरत आहेत. त्यामुळे जगाची निर्मिती, स्थिती आणि पोषण चालू आहे. तर मग आपणही जर आपल्याला पूज्य असलेल्या देव, गुरु किंवा वनस्पती आणि प्रतीकाभोवती जर फिरलो म्हणजेच प्रदक्षिणा केली तर आपलेही जीवन सुलभ, आनंदी आणि सुखमय होईल.


ग्रहणकाळामध्ये अन्न आणि पाणी दुषित होऊ नये म्हणून त्यावर तुळशीची पाने ठेवतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल आणि तुळस घालतात.....दोन्हीही जंतुघ्न असल्याने... तुळशीतून उडणारे यलो ओईल हे हवा शुद्धही करते आणि डासांना पळवून सुद्धा लावते.


इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की खूप पूर्वी माझ्या एक गोष्ट वाचनात आली होती ती म्हणजे पुण्याजवळील NCL Laboratory ला तुळशीच्या पानात "सोन्याचा" अंश आढळून आला होता. कदाचित त्यामुळेच रुक्मिणीने श्रीकृष्णाची सुवर्णतुला करताना तुळशीचे एक पान सोन्याच्या पारड्यात टाकले असावे.


   तुलस [भाग ३]........



आता तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू.

                                            ( 1 )

तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे.

                                          ( 2)

तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे.
                                          ( 3 )
पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात.

                                           ( 4  )

स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग [शरीरातील गुणसूत्रांमध्ये विचित्र बदल होऊन होणारे रोग], आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात.

                                             ( 5 )


योग्य वैद्य किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास खूप उपयोग होऊ शकतो. कोठेही विश्वास हा महत्वाचा आहे. तुळशीचे शेकडो उपयोग आहेत. ते या छोट्याश्या लेखात देणे शक्य नाही आणि तो लेखाचा हेतूही नाही. माझ्या प्रत्येक लेखात त्या त्या गोष्टीबद्दल प्रचलित नसलेली आणि विज्ञानाचा पाया असलेली माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.
                                             

अखेरीस एक सांगावेसे वाटते की तुळस ही फक्त एक वनस्पती नसून एक संस्कृती आहे. कधी तणावात असाल, कंटाळले असाल तर तुळशीचा वास घेऊन बघा ...कसे शांत, तणावरहित वाटते ते........!!!!


 तुळशीच्या वासानेच एक प्रकारची पवित्र, मंगल अशी आध्यात्मिक अनुभूती येते. म्हणून मित्रांनो घराजवळ एक तरी तुळशीचे रोप लावाच आणि देशसेवा, समाजसेवा, विश्व्सेवा आणि निसर्गसेवा करा. छातीवर बिल्ला लावून आणि दारावर समाजसेवक अशी पाटी लावूनच फक्त समाजसेवा होत नसते. ती अशा छोट्या छोट्या गोष्टतूनही पुढे जाते.


आपण आपल्या धार्मिक परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, कर्मकांड या सारयांकडे स्वच्छ, निर्मल आणि तरीही सजगतेने पहायला शिकू या. आणि या भारतमातेचा, वैदिक धर्माचा झेंडा सारया विश्वात मोठ्या विश्वासाने, डौलाने फड्कावूया.... चला मित्र, मैत्रिणींनो, बंधुंनो, भगिनींनो चला.....स्वत:च्या परंपरांकडे उपहासाने बघण्याचा दृष्टीकोन टाकून जग बदलूया........ मी केव्हाच त्या वाटेवर निघालोय....तुम्ही?


Dr हेमंत उर्फ कलादास.......


इतर देशातील तुलसी -------




अफ्रीकन ब्लू बेसिल

                                                     
                                    MEDITERREANEAN
BESIL



                                 इतालियन बेसिल




                               



                                 म्याक्सिकन स्पायसी  बेसील




 थाई बेसिल

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------











शनिवार, १४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांत ........१४ जानेवारी

Makar Sankranti







मकरसंक्रांत भारतीय हिंदुंचा एक मोठा सण आहे. हा सण भारताच्या बऱ्याच राज्यात साजरा केला जातो तसेंच जगातील काहीं देशात सुद्धामोठ्या आनंदाने व उत्साहात   साजरा करतात. 

हा सण भारतात बिहार,बंगाल , पंजाब, महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान, आणि तामिळनाडू राज्यात मोठ्या आनंदाने व मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो.


Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes



भारता बाहेर ही ह्या सणाला मोठे महत्व दिले गेले आहे. नेपाल  मध्ये " माघी " किवां "माघी संक्रांति "
थांईलंड मध्ये हा सण " सोंगकरण' आणि मायनामार मध्ये " थिंग यान " या नावाने जल्लोषात  साजरा केला जातो.

 
 
 
Makar Sankranti History
 
 
 
संक्रांत हा सूर्याचे संक्रमण दक्षिण दिशा ते उत्तर दिशे कडे होतें हिंदू परंपरेनुसार आणि समजेनुसार जवळ जवळ ऐकून १२ अशी संक्रांती आहेत. पण फक्त मकर संक्रांतिच साजरी केली जाते कारण सूर्य "धनु " राशीतून " मकर " राशीत प्रवेश करतो. 
 
 
 
  



*************  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा   ************* 


 
 
 

Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes

 

मकर संक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र हें समान असतात आणि ह्या नंतर दिवस मोठा व उष्ण असतो आणि रात्र लहान . आर्य लोक पूर्वी अतिमाहन दिवस म्हणून साजरा करीत असत. महाभारत काळात पण हा दिवस अती महत्वाचा व शुभ दिन मानला जाई कारण ह्या दिवशी जर कोणास मरण आले तर तो मोक्षास जातो. पितामह भीष्म शरपंजरी होतें तेव्हां ह्या दिवशाची म्हणजे उत्तरायण येण्याची वाट पाहत आपले मरण ढकले कारण मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून.  


Makar Sankranti Greetings, Makar Sankranti scraps, Makar Sankranti wishes



महाराष्ट्र राज्यात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो ह्या दिवशी तीळ आणि गुलानी बनविलेले पदार्थ आपली नातेवाईकास व मित्र मंडळीना देतात व म्हणतात " तीळ गुळ घ्या गोड गोड बोला " ह्या दिवशी आकाशांत पतंग पण उडवून आनंद लुटतात .



                                         तीळ -गुळाचे लाडू  व साखरेचा  हलवा



                                                        

                                                             तीळ -गुळाचे लाडू


गुजरात मध्ये तर जागतिक पतंग उडविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. उत्तर प्रदेशात खिचडी "गरिबांना वात्लीजते तर आंध्रा मध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा करतात व गरिबांना तिळगुळाचे पदार्थ वाटण्यात येते. ह्या दिवशी पवित्र गंगे मध्ये स्नान करणे म्हणजे मोक्ष प्राप्ती होतें असा एक समज आहे म्हणून बरेच लोक ह्या दिवशी गंगा स्नान करतात.

                                             पतंगाची रांग .


तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ह्या दोन्ही राज्यात हा सण " पोंगल " म्हणून साजरा करतात तो तीन दिवस १३ ते १५ जानेवारी . १३ ला "भोगी " १४ ला " संक्रांति " व १५ ला तमिळ लोक " मट्टू पोंगल "
तर आंध्रातील लोक " कानुमा " साजरा करतात.

कर्नाटका राज्यात मुले,बायका, पुरुष नवीन वस्त्र परिधान करून आपल्या नातेवाईकाना तिळ,गुळ ,खोबर, शेगदाणे, ह्यांचे मिश्रण करून वाटतात. खेड्यात तर शेतकरी आपलें बैल तसेंच गाईना स्वछ
धुतात   व  त्यांना वेगवेगळ्या रंगानी व वस्त्रानी सजवून त्यांची पूजा करतात व वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढतात.

=========================================================================


सर्व माहिती आणि छायाचित्रे संग्रहित.






बुधवार, ४ जानेवारी, २०१२

जागतिक भ्रस्टाचार रिपोर्ट २०११ ( जागतिक पर्यावरण बदल )......!!!


खरेच बदलते जागतिक पर्यावरण  व तसेंच जागतिक मदत कार्य  

कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास ..............!!!!


सन १९८० च्या मानाने स न  २०१४ पर्यंत जागतिक पर्यावरण बदलामुळे मोठ मोठे संकटे येण्याची जास्त शक्यता आहे.  जगातील जवळ जवळ ९०%  वातावरणाच्या बदलामुळे ३७५ करोड जन संख्येला  धोका सन २०१४ पर्यंत जाणवतो हें एका पाहणी नुसार स्पष्ट करण्यात आले. 




ह्या वातावरण बदलामुळे बऱ्याच नैसर्गिक  आपत्तीना सामोरे  जावे लागेल .खरा धोका तर शेती, अन्न धान्य ,आर्थिक ( मुलभूत ), पाणी आणि निवारा ह्या महत्वाच्या गोष्टीवर पडेल.

भारत  हा  तर शेती प्रधान देश आहे जर कां अशी नैसर्गिक आपत्ती  आलीतर  त्यातून   देश कसा सावरेल ?
सध्याची राजकीय परिस्थिती बघता ह्या महत्वाच्या  मुद्यावर  लक्ष द्यायला  कोणाला वेळ आहे?



अशी विपत्ती आलीच तर जगातून येणारी मदत पिडीत लोकां पर्यंत पोहचेल ही शास्वती नाही . म्हणूनच म्हंटले कि पर्यावरण बदलामुळे येणारया आपत्तींना तोड देताना जागतिक मदतीचा  भ्रष्टाचार अधिक बोकाळेल व तोच भ्रष्टाचार वाढीस  कारणीभूत ठरेल.

जागतिक  रिपोर्टा प्रमाणे जवळ जवळ १३४% जागतिक मदतीचा ओघ  जाईल पुढच्या २० वर्षात.  




 जगातील सर्वच देशाना वातावरण बदलाचा कमी अधिक प्रमाणात धोका संभवतो  असे वर्ल्ड ब्यान्केच्या रिपोर्ट  मध्ये दर्शविले आहे.
कारण सरकारी मदत योजना व त्याची अंमलबजावणी फार खालच्या क्रमांकावर आहे तसेंच सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार ह्या दोन गोष्टी  कारणीभूत ठरतिल.





खाली दिलेल्या आलेख प्रमाणे सर्वात जास्त धोका ( Exteme  ) कोणत्या देशाना आहे त्याची वर्गवारी व जागतिक क्रमांक देण्यात आले बाकी राष्ट्रे मध्यम,कमी धोका यांत मोडतात त्याची वर्गीकरण आणि क्रमांक देण्यात  आला नाही. 


पर्यावरणाच्या बदलामुळे सर्वात जास्त धोका असलेल्या जागतिक देशांची वर्गवारी  व क्रमाक


gcr_animatedmap.gif


जेव्हा अशी आपत्ती कोसळेल तेव्हां जागतिक मदतीचा ओघ त्यां  लोकांसाठी असेल जें लोक यांत होरपळले आहेत. सर्व मदत कार्य  करणार्या येन .जी.ओज . व मदत घेणारी राष्ट्रे यानां  स्वहिताची  जबरदस्त इच्छा पैसे कमावण्याचा राहील, येणारी आपत्ती ही पैश्याशी निगडीत राहील आणि त्यांमुळे भ्रष्टाचार आघीकच वाढेल ही भीती पण सतत जाणवते कारण ठरणार ते " वातावरण बदल."   





" ट्रास्परनसी इंटरन्याशनल " ने अशी आपत्ती आली तर कश्या प्रकारे मदतीचे नियोजन करावे ह्याचे नियम केले .त्याचा दावा आहे कि ह्यां नियमा प्रमाणे प्रत्येक स्थरावर  जर नियोजन केले  गेले  तर ज्यांत  तेथील  सरकार, सेवाभावी संस्था , यांच्या सहयोगाने उद्दिष्ट गाठता येईल व भ्रष्टाचार पण होणार नाही.






भारतीय जनता किती समर्थन करेल कि आपले राजकीय नेते,सेवाभावी संस्था ,सरकारी अधिकारी, व्यापारी वर्ग सचोटीने  काम करतील  यांत  शंका आहे.  





बदलते जागतिक पर्यावरण 






----------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व माहिती व आकडेवारी " ट्रास्परनसी इंटरन्याशनल " च्या  व  चित्रे  गुगल इमेजसच्या
सौजन्याने.

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

जागतिक " लाच खोरी " ( Bribary ) आलेख व क्रमवारी......२०११.

जागतिक "लाचखोरी" ( Bribary )आलेख व क्रमवारी......२०११. 

 भारतात भ्रष्टाचार विरुद्ध संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून हा  प्रश्न्न धसास लावण्याचा श्री आण्णा हजारे ह्यांच्या  नेतृत्वाखाली प्रण  केला.

या मुळे सर्व देशाचे लक्ष "भ्रष्टाचार " व "लोकपाल बिल " ह्यावरच  केंद्रित झाले आहे.


हा भ्रष्टाचार रुपी राक्षस सर्व सरकारी.निम-सरकारी,अधिकारी व कर्मचारी राजकीय नेते यांच्यामध्ये बोकाळलेला  आहे.राजकीय नेते तर  जवळ जवळ ९०% यांत बुडालेले आढळतील.


ह्या सर्वांच मुकाबला करण्यासाठी एक समाजसेवी,गांधीवादी,निष्कलंक असे  आण्णा  हजारे उभे राहिले व संपूर्ण भारतीय जनता त्याच्या  पाठीशी  उभी राहिली म्हणून सरकारला त्याच्या  अटी मजूर  करणे भाग पडले. 


महागाई, भ्रष्टाचार,अनाचार ,स्वर्याचार , ह्या समाज  घातक  ठरणारया  गोष्टीना  पायबंद घालण्यास  आपली निर्वाचित राजकीय  नेते मंडळींची  इच्छा शक्तीच नाही कारण ही सर्व मंडळी त्यांत काठोकाठ  बुडालेली  आहेत.मग कोण बरे कडक कायदे करून आपल्याच पायावर  वार करून घेईल.? आणि  राजकीय व स्वहित उन्नतीमध्ये बाधा आणील ?


ब्रिटीशांनी भारत सोडून जाताना एक देणगी देऊन गेले ज्याचा  त्यांनी  पुरेपूर उपयोग करून आपल्यावर  राज्य केले ते"Divide  and Rule"  स्वातंत्र्य प्राप्ती नन्तर त्या  काळातील निष्ठावान, आदर्शवान  नते  होती   त्यांनी एका सुजलाम, सुफलाम, उन्नत राष्ट्राची कल्पना केली ते  स्वप्न,स्वप्नच रहिले. 


त्यानंतरच्या राजकीय नेत्यांनी आपली उन्नती साधण्यासाठी ब्रिटीशांच्या नीतिचा आवलंब करून सर्व भारतीय समाजास जात पात,उच्च-निच्च,श्रीमंत-गरीब या मध्ये विभागला व आपसा , आपसातिल वैर भावना अधिक तीव्र करविले आणि मतांचे  राजकारण  करुन सत्ता टिकविणे याकडे सर्व लक्ष  केंद्रित झाले. 

जनसेवा ही आतां राजकीय व्यापार झाला ह्या अश्या संधी साधू  राजकारण्यामुळे हें निर्विवाद आहे. 


सर्व राजकीय भ्रष्ट नेत्यामुळे " लाच खोरी " ह्या अनिष्ट प्रथेस प्रारंभ  झाला आणि तो इतक्या  शिगेला पोहोचला कि "लाच" घेणारा व देणाऱ्या दोघानाही ते आपले इति कर्तव्यच वाटू लागले .


ज्या प्रमाणे आपल्या शरीरात रक्त नसा,नसात भिनलेले असते  तसेंच "लाच खोरी" चा गुण  भरलेले आहे. 

ही समस्या फक्त भारताचीच  आहे असे नाही तर संपूर्ण  जगात  थोड्या  फार  प्रमाणात ही अनिष्ट प्रथा  बोकाळलेली आढळेल.  


जागतिक लाचखोरीचा आलेख व क्रमवारी " Transparancy International " या संस्थेने प्रत्येक  देशाची व त्यांत चालणारया  "लाचखोरी" जी त्यां त्यां देशातील व्यापारी वर्गानी आपला व्यापार  दुसऱ्या देशात  वाढविण्यासाठी ईतर राष्ट्राच्या सरकारी,निम सरकारी लोकाना दिलेली  "लाच " व त्यायोगे  आर्डेर्स ( orders ) मिळविण्यात  केली गेली यावर संशोधन व प्रत्यक्ष पाहणीच्या  आधारे हा आलेख तयार करण्यात आला आणि तो  " Global Brib Payears Index "  प्रसिद्ध केला. 






ह्या क्रमवारीत आपला देश भारत १९ क्रमाकावर आहे. समाधानाची बाब  म्हणजे गेल्या वर्षा पेक्षा  यावार्षाची क्रमवारी थोडी सुधारली इतकेच. जागतिक क्रमवारी ठरवताना संपूर्ण जगातील जवळ,जवळ ३०००  वरिष्ठ अधिकारी जें अनेक व्यवसाय व्यवस्थापनेत कार्यरत आहेत  त्यांच्या मुलाखती आणि कार्य  पद्धती जाणून घेऊनच करण्यात आली. त्याच बरोबर " Anti Corruption Group ' ह्यांची पण मदत घेण्यात आली.


हा आलेख ० ते १० या मापदंडात देण्यात आला  आहे. ज्या देशातील  व्यावसाईक ,व्यापारी वर्गानी  कधीही आपल्या व्यापार   प्रसारणासाठी ईत्तर देशाच्या सरकारी लोकांना " लाच " दिली नाही त्यां देशाला १० क्रमांक व त्याच प्रमाणे सर्वात जास्त लाच देणार्या  देशाला ० क्रमांक देण्यात आले.  आपला व्यवसाय विस्तारास्ठी सर्वच देशातील व्यापारी मंडळी लाच देतात हें सर्वसाधारण सर्वच करतात असे पाहणीत आढळून आले.


ऐकून जगातील २८ देशाच्या क्रमवारीत भारताचा १९ वा क्रमांक लागतो व लाचखोरी मापदंडा नुसार ७.५ गुणांनी अजून तरी आपण तळात आहोत.  

नाही म्हणायला २००८ च्या तुलनेने काहीं प्रमाणात सुधारणा झालेली आहे ते फक्त ०.७ गुणाची. याचा अर्थ असा कि आपले व्यापारी वर्ग जें ईतर देशात जाऊन आपला व्यवसाय करण्यास परवानगी मिळविण्यासाठी २००८ साली "लाच " देऊन कामे करुन   घेत असत त्यां पेक्षा २०११ मध्ये ०.७ गुणांनी कमी लाचखोरी केली. .

ह्या यादीत सर्वात वाईट परिस्थिती रशिया, चीनची आहे जें अनुक्रमें  २७,२८ व्या क्रमांकावर आहेत. २०१० मध्य रशिया व चीनच्या  कंपन्यांनी जवळ. जवळ $ १२० मिलीयांची इंव्हेस्मेनट ईतर देशांत  केली  व सर्वात जास्त " लाच " ह्याच लोकांनी दिली असे पाहणीत आढळून आले.  सर्वात कमी " लाच " देणारे देश निदर्लंड,आणि स्विझर्लंड .भारताच्या पाठोपाठ तुर्की, सौदी अरेबिया, अर्जीनटीना, यु.ऐ.ई , इंडोनेशिया, म्याक्सिको ही राष्ट्रे लाच देण्यात मोडतात. 


ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल यांनी तय्यार केलेल्या आलेख व क्रमवारी  वरून असे लक्षात येईल कि खाजगी व्यवसाय कंपन्या कोणत्याना  कोणत्या  प्रमाणात  "लाच " देतात व आपली कामे करुन घेतात. 

जागतिक " लाच खोरी " आलेख व क्रमवारी २०११.........


क्रमांक ---- देश ----------- गुण
-----------------------------------------

१              निदरलंड            ८.८
२              स्विझर्लंड          ८.८.
३              बेल्जियम          ८.७
४              जर्मनी               ८.६
५              जपान               ८.६
६               आस्ट्रेलिया       ८.५
६               क्यानाडा         ८.५
८               सिंगापूर           ८.३            
८       युनायटेड किंग्डम    ८.३
१०       युनायटेड स्टेट्स    ८.१
११           फ्रांस                    ८.०
११           स्पेन                    ८.०
१३       साउथ कोरिया       ७.९ 
१४         ब्राझील                 ७.७ 
१५         होंग कोंग              ७.६ 
१५          इटाली                  ७.६ 
१५        मलेशिया               ७.६ 
१५      साउथ अफ्रिका       ७.६ 
१९         तैवान                    ७.५ 
१९         भारत                    ७.५ 
१९          टर्की                     ७.५ 
२२     सौदी अरेबिया          ७.४ 
२३    अर्जीनटीना               ७.३ 
२३       यु. ये .ई                  ७.३ 
२५     इंडोनेशिया              ७.४ 
२६     म्याक्सिको             ७.०
२७       चीन                      ६.५ 
२८      रशिया                    ६.१   
 
 
( जागतिक क्रमवार आणि आलेख ० ते १० या मापदंडात ज्या देशातील व्यापारी वर्ग अजिबात" लाच" देत नाहीत आपले  काम करून घेण्यासाठी  त्यांना  गुण १० देण्यात आला व ज्या  देशातील   व्यापारीवर्ग नेहमीच " लाच" देऊन आपले काम करून घेतात त्याना ० गुण दिला आहे. ) 


प्रत्येक क्षेत्रा नुसार " लाच " देण्याचा जागतिक  आलेख व क्रमवारी २०११ ..........


क्रमांक ------- क्षेत्र ............................गुण .

१                  शेती                               ७.१ 
१               लाईट मानुफ्क्चारिंग        ७.१ 
३             सिव्हीलीयान येर स्पेस      ७.० 
३             इन्फोर्मेशन तेक्नालोजी     ७.० 
५            ब्यान्किंग ,फायनान्स        ६.९ 
५             वन                                     ६.९ 
७             कन्झुमर सर्विसेस             ६.८ 
८             टेली कम्युनिकेशन            ६.७
८              ट्रान्सपोरटेशन, स्टोरेज    ६.७ 
१०           आर्म्स,डिफेन्स, मिलिटरी  ६.६ 
१०      फिशरीज ( मच्छी व्यवसाय )  ६.६ 
१२     हेवी म्यानूफाक्चारिंग              ६.५ 
१३     फार्मासुटीकॅल, हेल्थ केअर      ६.४ 
१३    पॉवर जनरेशन ,ट्रान्समिशन    ६.४ 
१५         मायनिग                             ६.३ 
१६         ओईल ,ग्यास                       ६.२ 
१७        रियल  इस्टेट, प्रॉपरटी,
         लीगल, बिझिनेस सर्विसेस      ६.१
१७        युटीलीटीज                           ६.१ 
१९    पब्लिक वर्क्स कनष्ट्रकशन        ५.३ 


( ० ते १० या मापदंडा नुसार ज्या देशाचे व्यापारी सर्वात जास्त दुसर्या देशाच्या लोकांना "लाच" देऊन सर्व क्षेत्रात  काम  करून  घेतात त्याना  " ० " गुण  दिला गेला व ज्या कंपन्या  कधीच  कोणत्याही क्षेत्रात "लाच"  देत नाहीत त्याना  १० गुण दिला गेला .)           




भ्रष्टाचार हा नुसतेच सरकारी अधिकारी,राजकीय नेते करतात असे नाही तर आपले व्यापारी व खाजगी कंपन्या पण यास खतपाणी  घालतात  स्वतःच्या  स्वार्थासाठी नाही का ?    


स्विस ब्यांकेत जो  काळा  पैसा भारतीयांनी जमा केला तो अश्याच  मिळालेल्या लाचेतून हें स्पष्ट होतें. 

------------------------------------------------------------------------------

वरील सर्व आकडेवारी ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल  यांच्या सौजन्याने संगृहीत केले.