जागतिक "लाचखोरी" ( Bribary )आलेख व क्रमवारी......२०११.
भारतात भ्रष्टाचार विरुद्ध संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून हा प्रश्न्न धसास लावण्याचा श्री आण्णा हजारे ह्यांच्या नेतृत्वाखाली प्रण केला.
या मुळे सर्व देशाचे लक्ष "भ्रष्टाचार " व "लोकपाल बिल " ह्यावरच केंद्रित झाले आहे.
हा भ्रष्टाचार रुपी राक्षस सर्व सरकारी.निम-सरकारी,अधिकारी व कर्मचारी राजकीय नेते यांच्यामध्ये बोकाळलेला आहे.राजकीय नेते तर जवळ जवळ ९०% यांत बुडालेले आढळतील.
ह्या सर्वांच मुकाबला करण्यासाठी एक समाजसेवी,गांधीवादी,निष्कलंक असे आण्णा हजारे उभे राहिले व संपूर्ण भारतीय जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली म्हणून सरकारला त्याच्या अटी मजूर करणे भाग पडले.
महागाई, भ्रष्टाचार,अनाचार ,स्वर्याचार , ह्या समाज घातक ठरणारया गोष्टीना पायबंद घालण्यास आपली निर्वाचित राजकीय नेते मंडळींची इच्छा शक्तीच नाही कारण ही सर्व मंडळी त्यांत काठोकाठ बुडालेली आहेत.मग कोण बरे कडक कायदे करून आपल्याच पायावर वार करून घेईल.? आणि राजकीय व स्वहित उन्नतीमध्ये बाधा आणील ?
ब्रिटीशांनी भारत सोडून जाताना एक देणगी देऊन गेले ज्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून आपल्यावर राज्य केले ते"Divide and Rule" स्वातंत्र्य प्राप्ती नन्तर त्या काळातील निष्ठावान, आदर्शवान नते होती त्यांनी एका सुजलाम, सुफलाम, उन्नत राष्ट्राची कल्पना केली ते स्वप्न,स्वप्नच रहिले.
त्यानंतरच्या राजकीय नेत्यांनी आपली उन्नती साधण्यासाठी ब्रिटीशांच्या नीतिचा आवलंब करून सर्व भारतीय समाजास जात पात,उच्च-निच्च,श्रीमंत-गरीब या मध्ये विभागला व आपसा , आपसातिल वैर भावना अधिक तीव्र करविले आणि मतांचे राजकारण करुन सत्ता टिकविणे याकडे सर्व लक्ष केंद्रित झाले.
जनसेवा ही आतां राजकीय व्यापार झाला ह्या अश्या संधी साधू राजकारण्यामुळे हें निर्विवाद आहे.
सर्व राजकीय भ्रष्ट नेत्यामुळे " लाच खोरी " ह्या अनिष्ट प्रथेस प्रारंभ झाला आणि तो इतक्या शिगेला पोहोचला कि "लाच" घेणारा व देणाऱ्या दोघानाही ते आपले इति कर्तव्यच वाटू लागले .
ज्या प्रमाणे आपल्या शरीरात रक्त नसा,नसात भिनलेले असते तसेंच "लाच खोरी" चा गुण भरलेले आहे.
ही समस्या फक्त भारताचीच आहे असे नाही तर संपूर्ण जगात थोड्या फार प्रमाणात ही अनिष्ट प्रथा बोकाळलेली आढळेल.
जागतिक लाचखोरीचा आलेख व क्रमवारी " Transparancy International " या संस्थेने प्रत्येक देशाची व त्यांत चालणारया "लाचखोरी" जी त्यां त्यां देशातील व्यापारी वर्गानी आपला व्यापार दुसऱ्या देशात वाढविण्यासाठी ईतर राष्ट्राच्या सरकारी,निम सरकारी लोकाना दिलेली "लाच " व त्यायोगे आर्डेर्स ( orders ) मिळविण्यात केली गेली यावर संशोधन व प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे हा आलेख तयार करण्यात आला आणि तो " Global Brib Payears Index " प्रसिद्ध केला.
ह्या क्रमवारीत आपला देश भारत १९ क्रमाकावर आहे. समाधानाची बाब म्हणजे गेल्या वर्षा पेक्षा यावार्षाची क्रमवारी थोडी सुधारली इतकेच. जागतिक क्रमवारी ठरवताना संपूर्ण जगातील जवळ,जवळ ३००० वरिष्ठ अधिकारी जें अनेक व्यवसाय व्यवस्थापनेत कार्यरत आहेत त्यांच्या मुलाखती आणि कार्य पद्धती जाणून घेऊनच करण्यात आली. त्याच बरोबर " Anti Corruption Group ' ह्यांची पण मदत घेण्यात आली.
हा आलेख ० ते १० या मापदंडात देण्यात आला आहे. ज्या देशातील व्यावसाईक ,व्यापारी वर्गानी कधीही आपल्या व्यापार प्रसारणासाठी ईत्तर देशाच्या सरकारी लोकांना " लाच " दिली नाही त्यां देशाला १० क्रमांक व त्याच प्रमाणे सर्वात जास्त लाच देणार्या देशाला ० क्रमांक देण्यात आले. आपला व्यवसाय विस्तारास्ठी सर्वच देशातील व्यापारी मंडळी लाच देतात हें सर्वसाधारण सर्वच करतात असे पाहणीत आढळून आले.
ऐकून जगातील २८ देशाच्या क्रमवारीत भारताचा १९ वा क्रमांक लागतो व लाचखोरी मापदंडा नुसार ७.५ गुणांनी अजून तरी आपण तळात आहोत.
नाही म्हणायला २००८ च्या तुलनेने काहीं प्रमाणात सुधारणा झालेली आहे ते फक्त ०.७ गुणाची. याचा अर्थ असा कि आपले व्यापारी वर्ग जें ईतर देशात जाऊन आपला व्यवसाय करण्यास परवानगी मिळविण्यासाठी २००८ साली "लाच " देऊन कामे करुन घेत असत त्यां पेक्षा २०११ मध्ये ०.७ गुणांनी कमी लाचखोरी केली. .
ह्या यादीत सर्वात वाईट परिस्थिती रशिया, चीनची आहे जें अनुक्रमें २७,२८ व्या क्रमांकावर आहेत. २०१० मध्य रशिया व चीनच्या कंपन्यांनी जवळ. जवळ $ १२० मिलीयांची इंव्हेस्मेनट ईतर देशांत केली व सर्वात जास्त " लाच " ह्याच लोकांनी दिली असे पाहणीत आढळून आले. सर्वात कमी " लाच " देणारे देश निदर्लंड,आणि स्विझर्लंड .भारताच्या पाठोपाठ तुर्की, सौदी अरेबिया, अर्जीनटीना, यु.ऐ.ई , इंडोनेशिया, म्याक्सिको ही राष्ट्रे लाच देण्यात मोडतात.
ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल यांनी तय्यार केलेल्या आलेख व क्रमवारी वरून असे लक्षात येईल कि खाजगी व्यवसाय कंपन्या कोणत्याना कोणत्या प्रमाणात "लाच " देतात व आपली कामे करुन घेतात.
जागतिक " लाच खोरी " आलेख व क्रमवारी २०११.........
क्रमांक ---- देश ----------- गुण
-----------------------------------------
१ निदरलंड ८.८
२ स्विझर्लंड ८.८.
३ बेल्जियम ८.७
४ जर्मनी ८.६
५ जपान ८.६
६ आस्ट्रेलिया ८.५
६ क्यानाडा ८.५
८ सिंगापूर ८.३
८ युनायटेड किंग्डम ८.३
१० युनायटेड स्टेट्स ८.१
११ फ्रांस ८.०
११ स्पेन ८.०
१३ साउथ कोरिया ७.९
१४ ब्राझील ७.७
१५ होंग कोंग ७.६
१५ इटाली ७.६
१५ मलेशिया ७.६
१५ साउथ अफ्रिका ७.६
१९ तैवान ७.५
१९ भारत ७.५
१९ टर्की ७.५
२२ सौदी अरेबिया ७.४
२३ अर्जीनटीना ७.३
२३ यु. ये .ई ७.३
२५ इंडोनेशिया ७.४
२६ म्याक्सिको ७.०
२७ चीन ६.५
२८ रशिया ६.१
( जागतिक क्रमवार आणि आलेख ० ते १० या मापदंडात ज्या देशातील व्यापारी वर्ग अजिबात" लाच" देत नाहीत आपले काम करून घेण्यासाठी त्यांना गुण १० देण्यात आला व ज्या देशातील व्यापारीवर्ग नेहमीच " लाच" देऊन आपले काम करून घेतात त्याना ० गुण दिला आहे. )
प्रत्येक क्षेत्रा नुसार " लाच " देण्याचा जागतिक आलेख व क्रमवारी २०११ ..........
क्रमांक ------- क्षेत्र ............................गुण .
१ शेती ७.१
१ लाईट मानुफ्क्चारिंग ७.१
३ सिव्हीलीयान येर स्पेस ७.०
३ इन्फोर्मेशन तेक्नालोजी ७.०
५ ब्यान्किंग ,फायनान्स ६.९
५ वन ६.९
७ कन्झुमर सर्विसेस ६.८
८ टेली कम्युनिकेशन ६.७
८ ट्रान्सपोरटेशन, स्टोरेज ६.७
१० आर्म्स,डिफेन्स, मिलिटरी ६.६
१० फिशरीज ( मच्छी व्यवसाय ) ६.६
१२ हेवी म्यानूफाक्चारिंग ६.५
१३ फार्मासुटीकॅल, हेल्थ केअर ६.४
१३ पॉवर जनरेशन ,ट्रान्समिशन ६.४
१५ मायनिग ६.३
१६ ओईल ,ग्यास ६.२
१७ रियल इस्टेट, प्रॉपरटी,
लीगल, बिझिनेस सर्विसेस ६.१
१७ युटीलीटीज ६.१
१९ पब्लिक वर्क्स कनष्ट्रकशन ५.३
( ० ते १० या मापदंडा नुसार ज्या देशाचे व्यापारी सर्वात जास्त दुसर्या देशाच्या लोकांना "लाच" देऊन सर्व क्षेत्रात काम करून घेतात त्याना " ० " गुण दिला गेला व ज्या कंपन्या कधीच कोणत्याही क्षेत्रात "लाच" देत नाहीत त्याना १० गुण दिला गेला .)
भ्रष्टाचार हा नुसतेच सरकारी अधिकारी,राजकीय नेते करतात असे नाही तर आपले व्यापारी व खाजगी कंपन्या पण यास खतपाणी घालतात स्वतःच्या स्वार्थासाठी नाही का ?
स्विस ब्यांकेत जो काळा पैसा भारतीयांनी जमा केला तो अश्याच मिळालेल्या लाचेतून हें स्पष्ट होतें.
------------------------------------------------------------------------------
वरील सर्व आकडेवारी ट्रान्स्परन्सी इंटरन्याशनल यांच्या सौजन्याने संगृहीत केले.