रविवार, ३ जून, २०१२

सरकारी कर्ज आणि भारतीय........



तुम्हास कदाचित माहित नसेल आपण ( भारतीय ) दर माणशी रुपये तेहतीस हजार ( रु. ३३,०००/- ) सरकारी कर्जात बुडालेलो आहोत.


परवाच मला समजले कि मी व माझी पत्नी दोघेही प्रत्येकी रु. ३३,०००.०० सरकारी कर्जात आहोत. खरें ! इतके कर्ज आमच्या डोक्यावर आहे ? हे ही खरे आहे कि मी थोडा खर्चिक आहे पण ,इतकाही नाही कि रु . ६६,०००/- ( दोघांचे मिळून ) वायफळ खर्च करेन. हे जे सरकारी कर्ज आमच्या म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर आहे हे तेव्हां कळले जेव्हा TOI ( टाईम्स ऑफ इंडिया ) चा रिपोर्ट वाचनात आला आणि हबकलोच ! विचारांत पडलो कि इतका पैसा मी किवां माझ्या पत्नीने कुठे व कसा खर्च केला ?
 
 
 
झाली तपास प्रक्रिया सुरु पण व्यर्थ काहीं केल्या त्यां पैश्यांचा हिशेब लागेना. आश्चर्य याचे आहे कि हा बेहिशेबी पैसा कसा काय खर्च झाला ? आमचे घर तर एकदम छोटे आहे आणि कुटुंब पण लहान तरी पण एवढा खर्च ?


सर्व घरातील खर्चाचे हिशेब तपासले इतकेच नाही तर आमच्या चिपु ( कुत्रा ) त्याच्या खाद्यावर तर नाही ना झाला ? ते पण तपासले आणि इतक्या पैश्यांचा तो मटण, चिकन, खाल्ले असेल का ? चिपु जवळच बसलेला होता त्याने बहुदा आमचे बोलणे ऐकले व ताडकन उठला व आपल्या शेपटीने "नाही,नाही " असा संदेश दिला. खातरी झाली कि आमचा चिपु जरी मिश्र जातीचा ( चायनीज + मलेशियन ) असला तरी एवढ्या पैशाचे अभक्ष खाणार नाही.


असो, बर ! घरात खर्च झाले म्हणावे तर तेही नाही कारण घरात कोणतेही येलेक्ट्रोनिक वस्तू विकत घेतली गेली ना घरातील किराणामाल ह्यावर खर्च झाला तर मग हा पैसा ( रु. ६६ हजार -दोघांचे मिळून ) गेले कुठे ?


TOI चा रिपोर्ट वाचला तेव्हां कुठे ह्या रुपयाचे ( कर्जाचे ) गुपित कळले . मी किवां माझ्या पत्नीने ना घरासाठी, ना आमच्या पाळीव प्राण्यावर , किवां आमच्या कोणत्याही आनंदासाठी हें पैसे खर्च केले नाहीत तर, भारत सरकारनी आमच्यावतीने हें पैसे खर्च केलेत.


हा खर्च आमच्या दोघांसाठी नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी खर्च केला गेला मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातिचा असो , लहान, मोठा,श्रीमंत, गरीब ,इतकेच नाहीतर नुकत्याच जन्म घेतलेला बाळ कां असेना ह्या सर्वांसाठी प्रत्येकी रु. ३३ हजार खर्च केले.


त्याचे गणित असे आहे कि जेवढी रक्कम सरकारनी कर्ज म्हणून घेतली भागिले सर्व भारतीय जनता म्हणजे दरडोई रु.३३ हजार देश चालविण्यासाठी विदेशातून काढले. सरसकट सर्व भारतीयांवर हे कर्ज आहे मग तो दुष्काळ भागातील असो, गरीब जो आपल्या कुटुंबाला दोन वेळचे अन्न देऊ शकत नसेल , भिकारी , दारिद्र्य रेषेतील असो ह्या सर्वासाठी सरकारने कर्जाचा डोंगर त्याच्या माथी मारला पण, ह्या सार्वांच्या वतीने बर का ?


आतां प्रश्न मनांत असा येतो कि एवढे कर्ज घेवुन कुठे बरें खर्च केले असतील ? लोकल्याणासाठी, रस्ते, वीज, पाणी, निवारा, दवाखाने, शाळा, ह्यावर असेल असे प्रत्यक्षात दिसत नाही. उलट रोजच्या गरजेच्या वस्तू दिवसे दिवस महाग होत चालले आहे आणि लोकांना ह्या वाढत्या महागाईत जगणे कठीण झाले . शेतकरी लोक रोज आत्महत्या करीत आहेत वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे पण सरकार ह्यावर कुठेच खर्च करताना दिसत नाही .


एकीकडे हें चित्र आहे तर दुसरीकडे सरकार लोकांच्या जिवनाशी निगडीत असलेल्या गोष्टीकडे लक्ष न देतां ते एअर इंडिया सारखे सरकारी बांडगुळ पोसण्यास रु. ३० हजार कोटी खर्च करते. खरें तर एअर इंडियाला भारतीय वाहन म्हटले जाते पण ते तसें नसून त्याला भारतीय वाहत आहेत असे म्हणणे उचित होईल.


भारताचे राष्ट्रपती ह्याचे विदेशवाऱ्या सहकुटुंब ह्यांचावर होणारा खर्च ऐकून रु.२०५ कोटी भारत सरकार करतो. हा खर्च महत्वाचा होता तो जर सरकारनी गरिबांवर, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यावर केला असता तर आज कित्येक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आले नसते पण सरकारला त्याकडे लक्ष ध्यावे असे वाटत नाही ही खेदाची बाब आहे.


आतां कळले ना तुम्हाला कां तुमच्या डोक्यावर रु.३३ हजाराचे कर्ज आहे ? खरेच आपण आभारी असायला पाहिजे सरकारचे ज्यांनी जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करून भारताचे जगात नाव राखले व सर्व भारतीयाना कर्जात बुडविले........


                                         !!!!...........भारत मेरा महान.........!!!!!
------------------------------------------------------------------------------------------------
सौजन्य --जुग सुरैया ( TOI ) यांची टिपणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: