मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य -------------

 
 
 
 
 
 
 
 
||सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||
|| शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
 
 
 
 
 
सृजन,पालन ,संहार ...सरस्वती,लक्ष्मी,काली........स्त्रीशक्तींना मनःपूर्वक वंदन..
 
 
 
 
 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.....!!
 
 
 
 
 
 
                                   
                                             // श्री ज्ञान सरस्वती देवी प्रसन्न //




    // नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे/ वसत्वं   मम जिव्हाग्रे सर्व   विद्या प्रदाभव //




  श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य





02 srimad_basara_saraswati.jpg

श्री ज्ञान सरस्वती



आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे. ह्याचे प्रमाण म्हणजेच अपौरुषेय वेद, दर्शन ग्रंथ , शास्त्र पुराण हें ग्रंथ होत. सनातन धर्माची मौलिक विशेषता म्हणजे तत्व वाद , अद्वैत सिद्धांत , वैदिक संस्कृतीची व्यवहारिक व पारमार्थिक श्रेष्ठता आणि द्वैत प्रपंचातून अद्वैत रुपात जाणे, किंबहुना आपण ज्यास जिवन मुक्ती म्हणतो ती आवस्था प्राप्त करण्याची समर्थता आहे . मानवास आतिउच्च स्थान प्राप्त होण्याची क्षमता हि ह्या धर्माची ,संस्कृतीची एक विशेषता आहे म्हणूनच आपला भारत देश एकेकाळी संपूर्ण जगाचा गुरु होता.


श्रीमत भागवत गीतेत आपल्या संस्कृतीची व्याख्या सुत्रवत केलीली आहे " मानुषाची मित्र वृत्ती माझ्यात स्थित होऊ दे ,कर्म आणि कर्म लाभात आसक्ती नसू दे ,सिद्धी आणि सिद्धीत समानता राखणे हेचं निष्काम कर्म योग होय. "



भगवंतात समर्पित होणे हेचं सर्व कर्म असावे आणि त्याच्याच चरणी प्रेम राहो अन्यत्र कोठेही आसक्ती निर्माण न होवो . सर्व प्राणी मात्रांत प्रेम असो तसेंच परमेश्वराच्या ठाई नित्य एकभाव अहंकार रहित जिवन असने हेचं खरें सम्यक ज्ञान होय.


ह्याच वचना नुसार ज्यांचे असे वर्तन असेल त्यांचे जिवन अहिक व पारमार्थिक प्राप्ती मध्ये अत्यंत सुखरूप बनेल. वेद शास्त्र ,अठरा पुराण, महाभारत ह्या ग्रंथात ह्याच वचनांचे संग्रह आपणास दिसून येईल.





vyasa1.jpg

                         श्री व्यास मुनी



श्री वेद व्यासांनी श्री सरस्वती माते विषयी मार्कंडेय पुराण, भ्रम्हांड पुराण, कालिका पुराण , तसेंच देवि भागवतात श्री बासर सरस्वती महात्म्य लिहले. पूर्वीच्या कौमाराचाल प्रांतात बासर (व्यासपुर) क्षेत्री स्थित श्री सरस्वती मातेचे महात्म्य ह्या लेखांत संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा  प्रयत्न केलेला आहे.


आचार्य श्री कृष्ण द्वैपायन व्यासानी प्राचिन साधनेची वेगवेगळी अंगे वेदशास्त्र ,उपनिषिदे,वेदसुत्रांत आणि आठरा पुराणात रचना केली आहे. व्यासानी सर्वामधे भारतीय भावना जागृत करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष खर्ची केले आणि ते वृधावस्थे मध्ये आत्मस्थ होउन ब्रम्ह निर्वाणाच्या प्रप्तिच्या मागे लागले.पण त्यांच्या अंतर आत्म्याने संगीतले कि " तुझे कर्ममय जीवन आजून अपूर्ण आहे व जो एक महान उद्देश उराशी बाळगून तू या प्रिथ्वितलावर आवतीर्ण झाला आहेस ते तुझे कार्य अद्याप अपूर्ण आहे.






                                      बासर रेल्वे स्टेशन 


                                       बासर (व्यासपुर)


या संसारातील सर्व कर्तव्ये आणि कर्माची परि समाप्ति झाल्यावरच स्वभावतः आन्तःकारणा मध्ये जी एक प्रकारची पूर्णता प्राप्त होते ती न झाल्यास अंतरसुख लाभेना. श्री व्यासानी वेदात, पुराणात, धर्म शास्त्र , राज्य शास्त्र, निति शास्त्र आणि अर्थ शास्त्र या सर्व ग्रंथात समर्पकपणे भिन्न भिन्न मार्ग आक्रमण करणारया व्यक्ति साठी आणि त्याना कल्याणमय मार्गावर जाण्यासाठी लिहिले होते. इतके विधायक कार्य केल्यावर सुद्धा श्री व्यासाना मन:शांति लाभली नाही.




श्री व्यासानी सर्व मुनि वृन्दा समवेत तिर्थ यात्रा करत करत परम् पावनी गौतमी तिरी आले आणि या पवित्र स्थानि जिथे गंगा माई आपल्या पवित्र पाण्याने अनंत प्राणी मात्रास सुख व शांति देत होती. गौतमी तिरी कदम्ब वनात श्री सरस्वती माता निराकार स्वरुपात स्थित होती. या कदम्ब वनात आनेक प्रकारची वृक्षे,फले फुलाची झाड़े होती. अनेक रागी बेरंगी पक्षांचाचा वास होता व त्यांचा तो चिवचिवाट ऐकुन वाटे कि श्री सरस्वती मातेचे गुनगाण तर करित नाहीत ना ? अशी निसर्ग शोभा दृष्टिस पडताच श्री व्यास मुनि मंत्र मुग्ध होउन आणि इथेच थाबण्याचा बेत केला.




basara-saraswati-temple3.jpg

                           गोदावरी ( दक्षिण गंगा )





दुसऱ्या दिवशी श्री व्यासानी नजिकच्या सरस्वती सरोवरात स्नानादी नित्य कर्म उरकून मातेची विधि युक्त पुजा केली आणि स्तुतिपर रचना करण्यास बसले. कालान्तराने श्री व्यासाना श्री सरस्वती मातेचा निर्गुणरुपी साक्षात्कार झाला व त्या योगे त्यांचे चित शान्त झाले . श्री मातेनी साक्षात्कार दिल्यावर श्री व्यास मुनीना म्हणाली, " हें मुनिवर आपण यां गौतमी तिरीची रोज नित्य नेमाने तीन मुठी वाळू तीन वेगवेगळ्या ठिकाणी विधिवत स्थापना करा " त्या स्थापिलेल्या तीनही ठिकाणी मी सत,रज, तम गुण युक्त तीन स्वरुपात प्रगट होईन व श्री ज्ञान सरस्वती, श्री महालक्ष्मी ,व श्री महाकाली अशी माझे रूपें असतील.






                                         सरस्वती सरोवर




आनेक विद्वानाना प्रश्न्न पडतो की श्री मातेचे रुप साकार आहे की निराकार ,तिला सगुण म्हणावे कि निर्गुण ,व्यक्त रूपा की अव्यक्त रूपा,या सर्व प्रश्नाची उत्तरे श्री व्यास लिखित श्री सरस्वती महात्म्यांत आहे.



स्व प्रकाश निखिला व भासिनी / चिन्मयी त्रिगुण कार्य कारणा /


भेद लक्षण विनाशन क्षमा / शारदा वसतु मे ह्रूदांबुजे //




तत्व वेत्ते लोक व्यक्त पदार्थाच्या बाह्य स्वरुपास दुर्लक्षून अंतरीय मूल स्वरुपास भेदण्याचा प्रयत्न करतात. ज्याचे मन निर्मळ व शान्त चित असते त्याच लोकाना मातेचा निर्गुण साक्षात्कार होतो.



ये  ज्ञानिनां  चिंतास्तु ते  विदुऱात्म परात्परा //




ज्याचे अन्तः करण आत्मज्ञानां मुळे शुद्ध झालेले आहे. त्यांनाच परात्परा चिदरूपा भगवती दिसू शकेल.



एकै वाह जगत्यत्र द्वितीया का परंपरा /


अहं विभूत्या बहुभि रिह रुपैर्यदा स्थिता //



श्री माता आपल्या इच्छा शक्ती द्वारा विश्वाची उत्पती आणि संहार करते. इतकेच काय ब्रम्हा विष्णू आणि महेशादी देवतांची शक्ती श्री मातेच्या शक्तीच्या अंश मात्र आहे. संपूर्ण विश्वाची स्थिती मातेवरच अवलंबून असते.



या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता /


नम तस्यै, नमतस्यै  , नम तस्यै नमो नमः //



पंच महा भूतात सुद्धा ही अतुलनीय शक्ती असते. पण आपल्या सारख्या आल्प बुद्धी मनुष्यास दिसत नाही . ज्यांना श्री मातेची कृपा प्राप्त होते त्यांनाच ह्याचे आकलन होते. सामन्य मानवास ह्या पराशाक्तीचे आकलन होत नाही म्हणून तें नेहमी दुख ,दैन्य व द्रारिद्र्य व आशांतीत जगात असतात .



निर्गुण आराधना करणे अत्यंत कठीण असते म्हणून श्री व्यासानी मातेची आराधना केली कि हें माते तू सगुण सकारूपी होऊन तुझ्या अज्ञानी भक्तांचा उद्धार कर. तद नंतर श्री व्यासांना द्रष्टांत देऊन आज्ञा केली कि रोज गोदातीरी तीन मुष्टी वाळू नित्यनेमाने टाकून आराधना केल्यास त्यां वाळूतून सगुणरूपी माता प्रगट होईल.




                                  व्यास तापो स्थानाकडे जाण्याचा मार्ग 




                                                  तापोस्थान 



श्री व्यासांनी मातेच्या आज्ञने प्रमाणे रोज तीन मुष्टी वाळू टाकून बासर ग्रामी श्री ज्ञान सरस्वतीची विगृही रचना केली .गोदातीरी वसलेल्या ह्या ग्रामास पूर्वी व्यासपुर म्हणत असत व त्याचा अप्भृंश वासरा व पुढे बासर असें झाले . बासर हें पूर्वीच्या हैद्राबाद (निझाम राज्यात ) होते पण भाषावार प्रांत रचनेत हें बासर ग्राम आंध्र प्रदेशात गेले .







                                                                     श्री व्यास


श्री व्यास रचित श्री सरस्वती महात्म्य या ग्रंथात शारदा सरोवराचे वर्णन केले आहे . या सरोवराच्या आठ दिशाना छोटी छोटी आठ सरोवरे आहेत यानां अष्टतीर्थे म्हणतात. मध्य भागी सरस्वती तीर्थ ,पूर्वेस इंद्र तीर्थ , आग्नेयेस सूर्य तीर्थ, दक्षिणेस व्यास तीर्थ, वायव्वेस वाल्मिकी तीर्थ, पश्चिमेस नारायण तीर्थ, व ईशान्येस शिव तीर्थ असें हें आठ तीर्थे आहेत. प्रत्यक तीर्थाचे संक्षिप्त कथानक असें आहे.



१)   इंद्र तीर्थ :--



एके समई उग्र तपस्वी अग्नी पुत्र दुर्वास ऋषी यांना श्री मातेने पुष्पमाला प्रसाद म्हणून दिली . ती पुष्पमाला अलंकित करून दुर्वास मुनी इंद्राकडे गेले आणि त्यांनी ती त्यांना प्रसाद म्हणून दिली.



ऐश्वर्यमत्त देवेंद्राने ती पुष्पमाला यत्किंचित समजून फेकून दिली. दुर्वास मुनी क्रोधीत होऊन त्यांनी इंद्रास शाप दिला कि तू राज भ्रष्ट व कुष्टी होशील. शापा प्रमाणे देवांचा देव राज्य भ्रष्ट व कुष्टी झाला. बृहस्पती च्या सांगण्या प्रमाणे देवेंद्र गोदातीरी आले व नित्य नेमाने श्री सरस्वती तीर्थात स्नान करून मातेची आराधना व अनुष्ठान करू लागले. कालांतराने इंद्रावर मातेची कृपा होऊन देवंद्र शाप मुक्त झाले तेव्हा पासुन या स्थानास इंद्र तीर्थ म्हणतात.





२)  सूर्य तीर्थ :--



एके काळी देवंद्र इंद्र सूर्यावर कोप पुन आपल्या आयुधाने सूर्याच्या सहस्त्र करांचा नाश केला. सूर्य भगवान अति दुखी होऊन बासर ( व्यासपूर ) नगरी प्रस्थान केले व तिथे त्यांनी मातेची अनुष्ठान व आराधना केली आणि तिच्या कृपे मुळे त्यांना सहस्र कर पुन्हा प्राप्त झाले. हेचं तें स्थान सूर्य तीर्थ नावाने प्रसिद्ध आहे.



३)  व्यास तीर्थ :--



 शारदा सरोवर ज्यांत श्री व्यास स्नान करीत व मातेची आराधना करीत तेचं हें व्यास तीर्थ होय.



४)  वाल्मिकी तीर्थ :--



 श्री वाल्मिक ऋषी आपल्या पूर्व काळात दस्यू वृतीने आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असत व नारदाच्या वचना नुसार त्यांनी सरस्वती मातेची आराधना केली त्यां मुळे तें आदि कवी बनले हेचं तें वाल्मिकी तीर्थ होय.



५) नारायण तीर्थ :--



 समुद्र मंथानाच्या वेळी श्री भगवान विष्णूनी असुरांना मोहित करण्या साठी मोहिनी रूप धारण करून सर्व देवतांना अमृत दिले, आणि ही प्रेरणा त्याना श्री माते पासूनच मिळाली.त्यां मुळे हें स्थान नारायण तीर्थ म्हणून ओळखले जाते.



६)  गणेश तीर्थ :--



 भगवती कात्यायनीच्या कृपा प्रसादे श्री गणेशास अग्र पूजेचा मान मिळाला म्हणून त्यास गणेश तीर्थ नाव प्राप्त झाले.



७)  स्कंद ( पुत्र ) तीर्थ :--



 श्री सरस्वती मातेच्या कृपा प्रसादाने श्री स्कंद देव सेनानी बनले व तारक नामक आसुराचा नाश केला. त्रेता युगांत महाराजा दशरथा ना माते च्या कृपा प्रसादे पुत्र प्राप्ती झाली म्हणून हें पुत्र ( स्कंद ) तीर्थ प्रसिद्ध आहे.



८)  शिव तीर्थ :--



दक्ष प्रजापती कन्यकेने जेव्हा आपल्या वडिलांची निर्भत्सना शंकराने केल्याने तिने देह त्याग केला. भगवान शंकरना पत्नी विरहाने ह्या सरोवराच्या ईशानेश ठाण मांडून श्री शारदेची उपासना केली. त्या फल स्वरूप शंकराना हिमालय कन्यका पत्नी म्हणून लाभली. तेव्हा पासुन हें स्थान शिव तीर्थ म्हणून संभोधिले जाते.



श्री व्यासांच्या तंत्र शास्त्रात अनुष्ठान पद्धतीचे सविस्तर वर्णन उपलब्ध आहे. ज्यांत मंत्र, तंत्र, व यंत्र यांचा पद्धतीचे सविस्तर कश्या प्रकारे उपयोगात आणावे ह्याची माहिती दिली आहे.



// तन्यते ज्ञान मननेति तंत्रम //



ज्या शास्त्राच्या पठणाने ,मनन व अनुसरण केल्याने ज्ञानाची अभिवृद्धी होते त्यां शाश्त्रास तंत्र शास्त्र म्हणतात.



// तनोति  विपुलांर्थान तत्वं मंत्र समर्पितान / त्राणांच कुरुते यस्मात
तंत्र मित्यभि धीयते //



तंत्र शाश्त्राने मंत्र शाश्त्राचा बोध होतो. ब्रम्ह व पृक्रती यांचा प्रश्न व सिद्धांत तंत्र शास्त्रात उधृत केला आहे, कोणत्या उपायांनी मनुष प्राणी देवता स्वरूप होईल तसेंच विविध तापातून त्याला मुक्तता मिळेल.आणि ऐहिक सुख प्राप्ती यां सारख्या गंभीर विषयाचे विवेचन तंत्र शास्त्र यां ग्रंथात श्री वेद व्यासांनी केली व प्रतिपादिले कि सर्व तंत्र, मंत्र,व यंत्र विदये मध्ये श्री सरस्वती विद्याच सर्व श्रेष्ठ आहे.





                                               श्री महालक्ष्मी देवी 

विधी युक्त अनुष्ठानाने भाऊक भक्तानां सुलभ रीतीने श्री मातेचा साक्षात्कार होईल व मातेचा अनुगृह कसा मिळेल ह्याचे सविस्तर माहिती ,मंत्रे व अनुष्ठान प्रकार आणि पद्धती ची थोडक्यात माहिती एने प्रमाणे आहे.



                                ----------जप अनुष्ठान-------


श्री ज्ञान सरस्वती मातेचे अनुष्ठान करण्याचे काहीं विशेष नियम आहेत.तें खालील प्रमाणे ....



१)  जप अनुष्ठान करण्या पूर्वी गुरु उपदेश घेणे अवश्क आहे.


२)  श्री मातेची आज्ञा होई पर्यंत अनुष्ठान ४-११- २१ किवां ४० दिवस तिथेच राहून करणे.


३)  दीक्षा घेताना आपले मन व शरीर अंतर बाह्य शुद्ध असावे .


४)  ब्रम्हचर्य चे पालन करावे.


५)  अनुष्ठानास सुरवात केल्यानंतर स्थान बदलू नये.


६)  दिवसातून एकदाच माधुकरीतून मिळालेले प्रसाद तुल्य सात्विक आहारच घेणे.


( बासर ग्रामात फार पूर्वी पासुन ब्राम्हणाच्या घरातून दर रोज मध्यानी सोवळ्यात शिजवलेले अन्न भिक्षा म्हणून सर्व अनुष्ठान करणाऱ्या ना दिली जाते. )


७)  उपवास करून अनुष्ठान करणे उत्तम.


८)  रात्री जमिनीवर झोपणे.


 9)  काम, क्रोध, लोभ ( मोह ) व मच्छर ह्या गुणांचे विसर्जन करावे.


१०)  शक्य असेल तर मौन वृत्त पाळावे.


११)  श्री मातेची यथा शक्ती अर्चना, वंदना व सेवा करावी.


१२)  आपला पूर्ण विश्वास श्री माते चरणी असावा.


१३)  रोजची अंन्हीके संध्या, पूजा गोदा तीरीच स्नान करून अनुष्ठानास बसावे.



 श्री ज्ञान सरस्वती मातेच्या मंदिरातच राहून अनुष्ठान पूर्ण करावे.
ह्या पद्धतीने सर्व नियमांचे पालन केले तर श्री मातेचा अनुग्रह होईल आणि जें भक्त अनुष्टानात एकरूप होतील व वेदोक्त मंत्र ,जपानुष्ठान करतील त्यांचेवर मातेची विशेष करुणा होईल.



श्री ज्ञान सरस्वतीचे नाम मंत्र खाली दिलेल्या प्रमाणे करावे . ह्यात कोणते जप कोणी करावे त्या संबंधी माहिती दिली आहे. प्रत्येकाने आपले जन्म नावाचे आद्य अक्षर बघावे व त्या अक्षरा समोर जो मंत्र लिहलेला आहे तो किती वेळा करावा ह्याचे पण निर्देशन दिले आहे.



संपूर्ण भक्ती भावाने श्री ज्ञान सरस्वती मातेवर श्रद्धा ठेऊन सर्व वरील नियमांचे पालन करून केलेले अनुष्टान श्री मातेच्या अनुग्रहास निश्चित पात्र होतील.


जन्म नाव अक्षर.------नाम मंत्र.---------जप संख्या ( रोज )

   त----ह-- यो           गेश्वरी सरस्वती              ७०००


   थ---अ --क              रतगर्भा                         ७०००

    द---आ -ख            लोकवत्सला                    ७०००

    ध ---इ ---ग           वागेश्वरी                        ६०००

    न ---ई ---घ           श्रीभारती                        ६०००

    प --उ ---- ड         षडेयश्वर्य दामिनी शारदा   ९०००

    फ ---ऊ --च            सरस्वती योगेश्वरी          ७०००

     व ---छ                हिरण्य कर्णेशा वाणी          ६०००

     भ ---ज                  काम प्रदायनी वाणी         ७०००

     म ----झ                आर्या वाणी                      ७०००

    त्र                              गिर्वाणी                        ७०००

     र ---ट ---ए             ईश्वर भारती                  ८०००


     ल -----ठ               उज्वला शारदा                 ८०००

     व ---ड                  चिंतामणी भाषा                ७०००

     श ---- ओ              बुद्धी दायिनी                    ६०००

      ष ----ढ                भारती शारदा                   ७०००

      स ----णं              महाश्री भारती                   ७०००

------------------------------------------------------------------------------


वरील प्रमाणे आपणास किती वेळा रोज अनुष्ठान करावे लागेल तें बघावे पण सर्वात अगोदर गुरु दिक्षा घ्यावी व नंतरच अनुष्टनासाठी बसावे जेणे करून कोणतीही त्रुटी शिल्लक राहणार नाही व इच्छा,फल प्राप्ती अवश्य लाभेल.



मंदिर निर्माण काळ


front_view.jpg

                                   मंदीर   





श्री सरस्वती मातेचे मंदिर अति प्रचीन असल्याचे सांगतात. श्री वेद व्यासांनी सरस्वतीची स्थापना करून एक मंदिर उभारले . हें मंदिर १०० वर्षा पूर्वी जीर्ण व भग्न अवस्थेत सरोवराच्या पश्चिम किनारी होते. हें मंदिर केव्हा भग्न झाले याचा उलेख मिळत नाही परंतु किंवदिन्ता अशी आहे कि १७व्या शतकाच्या शेवटी रोहील्यांनी आक्रमण केले त्यांत मंदिराची मोड तोड झाली आणि त्याच वेळी श्री महालक्ष्मीची  मूर्ती भग्न झाली.


रेनुकापुरच्या श्री माक्काजी पाटलांनी आसपासच्या सर्व खेड्यातून ( राविन्द्रपूर,बासर ,मैलापूर, मादापूर, व रत्नापूर ) निवडक लोकांच्या साह्यातून रोहोल्याचे आक्रमण मोडून काढले.  त्यां विजयाचे स्मारक म्हणून त्यांनी व गावकऱ्यांनी मिळून मंदिरा चि पुनर्बांधणी केली.



ह्या मंदिरातील दोन मूर्तींची विधियुक्त पूजा होत नाही. तेव्हा श्री काली मातेची मूर्ती प्रांगणाच्या पश्चिमेस स्थापण्यात आली. श्री सरसावती मातेची स्थापना श्री जगत गुरु श्री.शंकराचार्य श्रीमत परमहंस परि वाजकाचार्य श्री विद्यारण्य भारती शृंगेरी मठां धीपति ह्यांच्या करकमालने करण्यात आली. मंदिरातीलं लक्ष्मीची मूर्ती तेव्हा काशीहून आणण्यात आली होती.



                                        सरस्वती स्वयंभू मुर्ती 





तीर्थ क्षेत्र-स्थान

बासर श्री ज्ञान सरस्वती मातेचे परम पवित्र तीर्थ क्षेत्र मानले जाते . हें तीर्थ क्षेत्र मनमाड-सिकंदराबाद ह्या रेल्वे मार्गावर गोदावरी उत्तर तीरावर स्थित आहे. भाषावार प्रांत रचनेत बासर ग्राम हें आंध्र प्रदेशात गेले . आता ह्या मंदिराचा जीर्णोधार करण्यात आला व आंध्र प्रदेश सरकारनी हें मंदिर ताब्यात घेतले व सर्व व्यवस्था इंडोमेंट अधिकारी वर्ग बघतात. आता इथें सर्व सुख सोई उपलब्ध करण्यात आले आहेत .




बासर रेल्वे स्टेशन तें मंदिरा पर्यंत डांबरी रस्ते ,दिव्याची सोय रस्त्या लगत,पाणी ,राहण्यासाठी विस्तीर्ण धर्मशाळा व भक्त गणासाठी भोजन व्यवस्था केलेली आहे. इथें महाशिवरात्रीस मोठा उत्सव साजरा केला जातो. नवरात्री उत्सवात श्री मातेची अर्चाना व हवन विशेष प्रकारे केले जाते. बरेच भक्त गण इथें अनुष्ठान व तपस्या करण्यास येतात.





                                        मंदीर प्रवेश द्वार



श्री सरस्वती मातेच्या मंदिराच्या डोंगरावर उत्तरेकडे एक गुहा आहे ह्यास " नरहर मालव " गुहा म्हणतात. ह्या घुहेत नाथ पंथीय श्री धुंडिराज सुत नरहर मालव यांनी तप केले .तेथेच त्यांची समाधी आणि पादुका आहेत. श्री नरहर मालव ह्यांनी लिहिलेली " नवनाथ भक्ती सार " हा ग्रंथ मराठी भाषेत प्रसिद्ध आहे.



                         नरहर मालव गुहा


ह्याच गुहेच्या वायव्य दिशेस एक विशाल पाषाण ( शिळा खंड ) उभा आहे. त्यां पाषाणास दगडाने आघात केल्यास मधुर संगीताचे सूर कानी पडतात. ह्या पाषाणास " शिळा-वेदवती " म्हणतात.



                                         विशाल पाषाण


ब्राम्हण वर्ग व नित्य नैमितिक पूजा-अर्चा


पूर्वी पासुन येथिल ब्राम्हण वर्ग पारंपारिक पद्धतीने पूजा आपापल्या अधिकार प्रमाणे करीत असत. पूजा-आर्चाने चे अधिकार पुजाऱ्यांच्या चार शाखाना होता.


१) माध्यंजन
 २) आश्वलायन
 ३) कण्व
 ४) आपस्तंभ ह्याना क्रमा क्रमाणे मिळत असे.

आता हें सर्व पुजारी वर्ग मंदिराचे आर्चक म्हणून नेमणुका आंध्र प्रदेश राज्याच्या धर्मादाय विभागाने कायम स्वरूपी केल्या आहेत.



सांप्रत ब्रम्ह मुहूर्ता पासून श्री मातेचा अभिषेक ,पूजा ,अर्चना, अलंकार व नैवेद्य आटपून नंतर भक्त जनाची पूजा सुरु होते . दुपारी १२ नंतर श्री मातेला नैवेद्य अर्पित झाल्यावर मंदिर बंद ठेवण्यात येते. भाविकाच्या दर्शनासाठी परत दुपारी ३ वाजता मंदिरांत दर्शन प्रवेश सुरु होतो तो सायंकाळी ७ वाजे पर्यंत असतो. त्यां नंतर श्री ज्ञान सरस्वतीचे षोडशोपचार पूजा, आरती, व तीर्थ प्रसाद दिल्यावर मंदिर दुसऱ्या दिवसा पर्यंत बंद ठेवतात.



सर्व भक्तजनांना विश्वास आहे कि ही माता आपले मनोकामना पूर्ण करील व तशी ख्याति आहे. रात्रीच्या वेळी भक्तजन देवळातच निवास करतात कारण कि मंदिर प्रांगणात श्री सरस्वती माता अदृश्य रूपाने येऊन भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते .



 विद्या प्राप्तीसाठी आपल्या मुलाना शाळेत घालण्या पूर्वी " अक्षर आभ्यास " श्री ज्ञान सरस्वती मातेच्या चरणी ' श्री गणेशा " गिरविला जातो. आणि ह्या विधी नंतरच पालक आपल्या पाल्याला शाळेत विद्या अघ्यानासाठी घालतात.





                                   अक्षर अभ्यास ( पाटी पूजा )



जावे कसे बासरला ?................


बासर श्री ज्ञान सरस्वती तीर्थ क्षेत्रास जाण्यासाठी रेल्वे मार्ग , बस मार्ग थेट बासर पर्यंत उपलभद्ध आहेत. बासर रेल्वे स्टेशन हें मनमाड-सिकिंद्रबाद मार्गावर आहे. बस मार्ग आंध्र व महाराष्ट्र दोन्ही राज्यातून चालविले जातात. बासर हें महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्याच्या सिमे जवळ आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्यात आहे.



आमचे घराणे  श्री ज्ञान सरस्वती मातेचे पुजारीचे पारंपारिक अधिकारी आर्चक आहोत. आमच्या घराण्यास श्री मातेचे वरदान लाभले कि तुमच्या घराण्यात सात पिढ्या हरदास (कीर्तनकार ) होतील व प्रसाद म्हणून छोटी वीणां दिली. आमचे काका कै. श्री शेषबुवा हरिदास बासरकर हें सातवे कीर्तनकार होते.



श्री ज्ञान सरस्वती मातेचा आमच्या घराण्यावर आसाच वरदहस्त व आशीर्वाद राहोत ही तिच्या चरणी प्रार्थना



" यां कुन्देंदू तुषार हार धवला, यां शुभ्र वस्त्रावृता /


या वीणां वर दण्ड मंडित करा , या श्वेत पद्मासना //


या ब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता /

 

सामां पातु सरस्वती भगवती निश्शेष जाडया  पहा // " 







    ( चित्रफित तेलगु भाषेत आहे )




// नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे /
 वस मत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव //




           // इति श्री बासर सरस्वती देवि महात्म्य समाप्त //

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखन व अनुवाद कर्ता :--- श्री. माधव नागोराव बासरकर


ऋण निर्देश व संदर्भ लेखक :----- कै . श्री शेषबुवा हरिदास बासरकर .
                                                 कै. श्री नागोराव बासरकर
                                                 श्रीमान . के. परांकुशा चार्य .
                                                 श्रीमान. जी. माल्लेस्वर शर्मा .
                                                 श्रीमान . नारायण शास्त्री .


सर्व छाया चित्रे गुगलच्या सौजन्याने .


                          ---------छाया चित्रे ---------


मंदिर उद्यान.
images.jpeg



गाभारा प्रवेश.

dscn0406.jpg




मंदिर उद्यान.

basara-saraswati-temple.jpg



मंदिर मुख्य प्रवेश द्वार.
front_view.jpg


प्रवेश द्वार


dsc00013.jpg




                                                                             मंडप


                                                                              उद्यान


                                                                         श्री गंगा माता
                                                    










                                                                         गोपुर













--------------------------------------------------------------------------------------------------------------------







 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: