अनुवाद . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनुवाद . लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

डॉ . अब्दुल कलाम यांनी दिनांक मार्च १२, २०१४ ला भारतीयांना लिहिलेले खुले पत्र………. !!



आपले सर्वांचे लाडके '" मिसाईल म्यान "' माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल  कलाम आपली इहलोकीची यात्रा संपवुन परलोकस्थ झाले . सर्व लहान थोर भारतीयाना वाईट वाटले . प्रत्येकांनी त्याना आपल्या परीने श्रद्धांजली वाहिली . एक वर्ष अगोदर त्यांनी भारतीयांना कळकळीचे पत्र लिहुन सर्वाना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली . ह्या इंग्रजी पत्राचे आमचे मित्र शशी पानट ( अमेरिका ) ह्यांनी अनुवाद करून श्रद्धांजली वाहिली . 











आपल्याकडील मीडिया  इतक नकारार्थी कां  असते ? आपण भारतीय आपली शक्ती आणि कर्तुत्व ओळखण्यांत लाज कां बाळगतो ?खर तर आपला देश किती महान आहे .!
आपल्या लोकांना आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या कितीतरी यश-गाथा आहेत. पण त्या मनः पुर्वक स्वीकारायला नकार देतो कां ? 
दुध उत्पादनात आपण जगात पहिले आहोत , Remote  sensing satellites मध्ये आपण पहिला क्रमांक पटकावला आहे. गव्हाच्या उत्पादनात आपण जगात दुसर्या क्रमाकावर आहोत. तांदळाच्या उत्पादनात आपण पण जागतिक क्रमाक दुसरा आहे. 
आता डॉ . सुदर्शन सारख्या भारतीयांनी एका छोट्या खेडे गावाला स्वतःच्या पायावर उभे करून ,स्वावलंबी करून, त्यांचा कायापालट करून टाकला . या अश्या अनेक ,लाखो यशोगाथा आपल्याकडे असतांना आपला मिडिया मात्र वाईट बातम्या, अनर्थ , आरीष्ट , अपघात आणि दिवाळखोरीच्या बातम्यांनी ग्रासला गेला आहे.

काही दिवसापूर्वी मी तेल-अव्हिव मध्ये होतो आणि तिथे असताना एक वर्तमानपत्र वाचीत होतो. त्याच्या आदल्याच दिवशी बॉम्बिंग सारखा मोठा  अनर्थ घडून गेला व बरीच मनुष्यहानी झाली होती . हमासचे  युद्ध चालू होते. असे असतानाही वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मात्र तिथल्या एका सद्गृहस्थाने आपल्या नापीक वाळवंटासारख्या शेतीवर कामं करून गेल्या पांच वर्षात कसे हिरवेगार नंदनवन केले ह्याचे समग्र वर्णन आणि फोटो छापले होते. ह्या उतेजानात्मक बातमीच्या वाचनाने त्या शहराला जाग आली होती . अर्थात आदल्या दिवशीच्या बॉम्बिंग आणि युद्धाच्या बातम्या ,किती माणसे पडली आहेत, वगैरे सरा मजकूर वर्तमानपत्राच्या आंतल्या पानावर इतर बातम्याच्या आड दडलेला  होता . 
भारतांत आपण आजारपण,मरण, एकमेकावर झालेले हल्ले , गुन्हे, ह्याच बातम्या पुरवीत असतो ,वाचत असतो.आपण इतके नकारार्थी कां वागतो ?दुसरा प्रश्न ,आपण सारे भारतीय परदेशाच्या इतक्या आकर्षणात कसे काय गुरफटत आहोत. ? 
आपल्याला परदेशी टिव्ही पाहिजे, सदरे पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे, हे इथर देशामधून आयातीच्या कल्पनेने आपले मन असे व्यापुन  का जाते ? एवढे आकर्षण का ?
तुम्हाला कल्पना नाही का कि स्वतःबद्दलचा मान सन्मान हा स्वतःला ओळखल्यानेच प्राप्त होतो. 
मी हैदराबादला एका भाषणासाठी गेलो होतो. त्याठिकाणी एका चौदा वर्षाच्या लहान मुलीने माझी स्वाक्षरी मागितली . मी तिला विचारले " तुझ्या आयुष्याचे ध्येय काय ( बेटा ) "? तिने तात्काळ उत्तर दिले " मला सुधारलेल्या भारतात राहायचे आहे " 
तुम्हाला आणि मला तिच्यासाठी आपल्या भारतांत सुधारणा करायच्या आहेत. 
तुम्ही जाहीरपणे सांगायला पाहिजे, घोषणा द्यायला पाहिजेत, " भारत हा सुधारणेच्या मार्गावरचा देश नाही, तर खूप सुधारलेला देश आहे. "
तुम्ही म्हणता  की आपले सरकार कार्यक्षम नाही 
तुम्ही म्हणता की आपले कायदे फार जुने झालेत . 
तुम्ही म्हणता की मुनिसिपालटी  कचरा साफ करीत नाही .
तुम्ही म्हणता की फोन चालत नाही, रेल्वे एक जोकच आहे, आपली एअर लाईन ही  जगांतील घाणेरडी एअर लाईन आहे , पोस्टांत टाकलेले पत्र ठिकाणावर कधीच पोहोचत नाही . 
तुम्ही म्हणता आपला देश कुत्र्याचे जीणे जगतो आहे आणि सर्व  देश म्हणजे एक गोठा झाला आहे . 
तुम्ही म्हणता , म्हणत राहता ……. 
अरे पण ह्या सगळ्यासाठी तुम्ही काय करतां  ?

सिंगापूरला जाणारे तुम्ही आहात अशी कल्पना करा . तुमचे नाव त्या व्यक्तीला द्या , तुमचा चेहरा त्या व्यक्तीचा असेल ,मग तुम्ही सिंगापूरला पोहोचून विमानतळाच्या बाहेत येतां , आणि काय आश्चर्य तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीचा मुखवटा पटकन चढवता. 
सिंगापूरला तुम्ही सिगारेचे थोटूक रस्त्यावर फेकीत नाही , किवा स्टोरमध्ये काहीतरी खात उभे राहत नाही. सिंगापूरच्या नागरिकाना जेव्हढा अभिमान तिथल्या रेल्वेचा वाटतो तेव्हढा ( किंबहु अधिकच ) तुम्हाला वाटतो . 
तिथल्या सुप्रसिद्ध ओचार्ड रोडवर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान प्रवास करण्यासाठी तुम्ही ५ डॉलरचे तिकीट सहज घेता . मग तुम्ही पार्किंग लॉट मध्ये येवुन तुमचे तिकीट पंच करतां .तिथल्या दुकानांत  किवा रेस्टारंटमधे  अधिक वेळ घालविला तर वर लागणारे पार्किंगचे पैसे मुकाट्याने भारतां . तुम्ही तिथे कांही तक्रार करता,नाही ना ?
रमादान चालु असताना दुबई सारख्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांसमोर 

( भर रस्त्यात ) काही खाता  कां ? नाही नां ?

जेड्डाच्या रस्त्यावर तुमच्या डोक्यावर वस्त्र ( रुमाल बांधलेला ) नाही अश्या स्थितीत जातां का तुम्ही ? नाही ना ?
लंडनमध्ये " माझे ISD  किवा STD चे बिल दुसर्याच्या अकौंट मध्ये जाऊदे त्यासाठी हे घे महिन्याला १० पौंड " अशी लाच तुम्ही देऊ शकता का ? देतां कां ? नाही ना ?
वाशिंग्टनमघे  स्पीडलिमिटच्यावर गेलात आणि पोलिसाने पकडले तर " तुला माहित आहे मी कोण आहे ते ? मी अमक्या तमक्याचा मुलगा आहे. चल घे हे १० डॉलर्स अन जाऊदे मला  " असे म्हणण्याची प्राज्ञा आहे कां ?
ओस्ट्रेलिया अथवा न्युझिलंड मध्ये नारळ फोडला तर कचरा पेटीत न टाकता भलतीकडेच टाकण्याचे धर्य तुम्ही दाखवु शकाल का ? नाही नां ?
टोकियोच्या रस्त्यावर पान खाऊन तुम्ही कां थुंकत नाही ? किवां  बॉस्टन रस्त्यावर तुम्ही खोटे सर्टीफिकेट कां  खरेदी करीत नाहीत ? 
होय आपण अजुनही तुमच्या बद्दल बोलतो आहोत …। 
हो तुम्हीच जे परदेशाच्या नियमांचे पालन स्वेच्छेने करता पण स्वदेशाचे नियम मात्र पायदळी तुडविता . 
भारताच्या विमानतळावर ऊतरता न ऊतरता तोच तुम्ही, हो तुम्हीच सिगारेटचे थोटूक , कागदाचे कापटे , हे वाट्टेल तीथे फेकतां . परदेशाच्या भूमीवर त्यांचे नियम पाळणारे, तिथे कायद्याच्या चौकटीत चालणारे, त्यांच्या स्वछेतेचे कौतुक करणारे, तुम्ही आपल्या मायदेशाच्या भुमीला पाय लागताच कां बदलतां एवढे ? तुम्ही तसे कां  वागत नाही ईथे?
अमेरिकेत प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला कुत्र्याने केलेली घाण स्वतःलाच आवरावी लागते, जपान मघ्ये ही तेच , भारतीय नागरिक तसे करतील कां इथे ? 
आपण फक्त निवडणुकीच्या वेळी सरकार निवडण्यासाठी पुढे सरसावतो आणि नंतर आपली जवाबदारी झटकून मोकळे होतो. त्यानंतर मात्र आपण सरकार आपली सर्व प्रकारे सेवा करेल अश्या भ्रमांत राहतो , आराम करतो . त्यांना कोणतीही मदत तर सोडाच पण सारखा नकारार्थी हातभार मात्र नित्य नियमाने सतत आपण  लावितच असतो . 
सरकारने सर्व माफ करावे अशी अपेक्षा आपण ठेवतो ,मात्र सारीकडे पसरलेल्या कचऱ्यातला थोडा भागही उचलण्यासाठी अथवा साफ करण्यासाठी थांबायला आपल्याकडे वेळ नसतो .कारण तुमच्या मते ते काम दुसऱ्या कुणाचे असते , तुमचे नव्हे ! किंबहुना कागदाचा एखादा कपटाही  उचलुन कचऱ्याच्या पेटीत टाकावा असे आपल्या मनात देखील येत नाही . रेल्वेमधील संडास त्यांनी नेहमी स्वच्छ ठेवावे ह्या अपेक्षेबरोबरच तो साफ ठेवण्याचे उत्तरदायित्व आपलेही आहे हे आपल्याला कधीच आठवत नाही . 
भारतीय विमानसेवा अर्थात एअर इंडीया आणि खाजगी विमानसेवा कंपन्यांनी चांगली उत्तम जेवण द्यावे , उत्तम टॉयलेटची व्यवस्था करावी अश्या अप्र्क्षा आपण ठेवतो मात्र  जमले तर  एखादी भुरटी चोरी देखील करायला आपण मागेपुढे  नाही . दुर्दव्याने  हा नियम अशा प्रकारची उत्तम सेवा न देणाऱ्या त्यांच्या नौकर वर्गालाही लागू आहे. 
समाजात असलेल्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांना ,मग ते स्त्रियांविषयी असोत  ,हुंड्याच्या बाबतीत असो   मुलगी झाली म्हणून असो आपण मोठ मोठ्या घोषणा देऊन निषेध व्यक्त करतो पण तेच आपण घरी गेल्यावर मात्र मुग गीळून स्वस्थ बसतो . तिथे तुम्ही नेमके विरुद्ध वागता . 
काय आहे आपले समर्थन ? कोणती करणे आहेत अशी की ज्यामुळे आपण असे वागतो ?
" अरे हा बद्दल होण्यासाठी संपूर्ण सिस्टमच बदलायला पाहिजे . मी एकट्याने बदलुन  काय मोठासा फरक पडणार आहे ? "
मग कोण बदलणार हि सिस्टम ?आणि असत तरी काय ह्या सिस्टममध्ये ?
ह्यामध्ये असतात आपले शेजारी, घरातली ईतर माणसे,इतर शहरे आणि गावे , इतर समाज आणि हो, सरकार देखील ,फक्त त्यामध्ये "मी " आणि " तुम्ही " नसता . हो ना ?
जेव्हा सकारात्मक असा कोणताही बदल घडविण्यासाठी ह्या सिस्टीम मध्ये   योगदान दयायचे असते तेव्हा आपण सार्वजण आपल्या कुटुंबासहित स्वतःला एका कोषांत बंद करून घेतो आणि दूरवर असलेल्या देशांकडे असाहयतेने  पाहत असतो , कोणी तरी मिस्टर क्लीनयेईल ,आणि अशीकाही जादूची कांडी फिरवेल की त्याच्या एका फटकाऱ्याने सारे  काही व्यवस्थित होईल अशा भ्रमात राहतो . तेही जमले नाही तर आम्ही आमचा देशच सोडतो ,आणि एखाद्या भयभित  षंढासारखे पळत सुटतो ,अमेरिकेसारख्या देशांत जातो त्यांच्या ऐश्वर्याची ,त्यांच्या सिस्टमची पोटभरून स्तुती करतो आणि त्यांच्या ऐश्वर्याच्या वाढीसाठी कष्ट करीत राहतो ,आणि न्युयार्काला काही अघटीत घडले की आम्ही इंग्लंड पोहोचतो, इंग्लंडला काम मिळाले नाही तर विमानाने गल्फला जातो, गल्फच्या  अडकलो तर आम्ही भारत सरकारने आम्हाला सोडविले पाहिजे ही मागणी कंठशोष करून आणि सर्व जगाला ऐकु जाईल एवढ्याने  बोंबलतो !!
सगळेचजण नाजायत  फायदा घ्यायला टपलेले आहेत आणि भारतावर बलात्कार करताहेत. सिस्टिमसाठी वा ती चांगली होण्यासाठी कुणीही योगदान करीत नाही , आपली सद्दविवेक बुद्धी आपण पैशाकडे गहाण टाकली आहे . 
प्रिय भारतीयांनो  हे पत्र मी मुद्दामच लिहिले आहे ,ह्यामधून विचारप्रवर्तक असे आत्मनिरीक्षण व्हावे आणि आपल्या सद्द्विवेक बुद्धीला आव्हान दयावे हाच उद्देश आहे. 
शेवटी मी जे, एफ, केनेडी ह्यांनी अमेरिकन नागरिकाना दिलेला संदेश जसा होता तसेच आवाहन आपणां सर्वाना करतो …. 
"  आपण भारतासाठी काय करू शकु , काय करायला पाहिजे ह्याचा विचार करा ,कि जेणे करून  आपला भारत आज अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश आहेत तसा घडु शकेल  "
भारताला आपल्याकडुन काय हवे ते आपण करु या !!!
धन्यवाद 
आपला ,
डॉक्टर अब्दुल कलाम 




------------------------------------------------------------------------------

 अनुवादक ----शशिकांत पानट 

छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .

 




 


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

नमो ..........-(नरेंद्र मोदी )








                                   नमो 



मी तसा कोणत्याही पक्षाला सोवळा मानीत नाही सर्व पक्ष एका माळेची मणी  आहेत पण कॉग्रेसचा  दुटप्पीपणा आणि सततचा गुजरात २००२ च्या दंग्यांचा उलेख व एकट्या मोदीस कोंडीत पकडण्याची त्यांची धडपड व आम्ही किती सोवळे  हे जनतेस दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून वाटले कि काही सत्ये सर्वां  समक्ष यावी ह्या हेतुने लिहले.  


 मोदी भारतीय राजकारणात तेही गुजरात सोडून केंद्रीय नेतृत्व करण्यास समर्थ आहेत असे जेव्हा भाजपा नेत्यांची दुसरी फळी सांगत होती आणि पक्षांत वाढते समर्थन त्याच बरोबर हालचालींना वेग आला व त्यांना २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली.  तेव्हा पासून कांग्रेसचे नेते सर्व बाजूने त्यांच्यावर तुटून पडत आहेत . ह्या सर्व कॉग्रेसी मंडळींचा एकच लक्ष ते म्हणजे २००२ मधील गुजरात दंगे आणि त्यासाठी मोदींना जवाबदार आणि अल्पसंख्याकाच्या झालेल्या हत्या ( गोध्रा  कांड ) घडवून आणल्याचा आरोप करीत आहे. पण आश्चर्य याचे वाटते कि ह्यांच्या युवराजांवर बलात्काराचा आरोप होतो ( सुकन्या सामुहिक बलात्कार केस ) ह्यावर कोणीच बोलत नाही ना त्यांना जाब विचारला जातो . एखाद्यावर गंभीर आरोप होत असताना त्यांना भारताचे भावी पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न कसे बघू शकतात? सुकन्या आणि तिचा संपूर्ण परिवार ह्या घटणे नंतर गायब झाले ते कसे व कोणी केले ह्याचे उत्तर अध्याप जनतेस मिळाले नाही . 







नरेंद्र मोदिनी गुजरात मध्ये शेती उत्पन्न १० ते १२ टक्क्यांनी वाढविले , आशिया खंडातील सर्वात मोठे सोलर प्रकल्प आपल्या राज्यात उभारले.गुजरात हे एकमेव राज्य आहे जे आपल्या १८००० गावांना  चोवीस तास एलेक्ट्रिसिटी पुरविते इतकेच नाही तर जागतिक ब्यांकेच्या २०११ च्या अहवाला नुसार गुजरात मधील रस्ते हे जागतिक दर्ज्याची आहेत  असे नमूद केले .  



फोर्बोस मासिकाने अहमदाबादला जगातील तिसरे शहर जे अत्यंत वेगाने प्रगती पथावर असल्याचे नमूद केले. गुजरात राज्य  हे पर्यटन क्षेत्रात सर्वात आघाडीवर आहे. सर्वात कडी म्हणजे भारत सरकारच्या लेबर खात्याच्या अहवाला नुसार गुजरात राज्यात सर्वात कमी  प्रमाणात बेकारी आहे तरीही कांग्रेस ह्यावर चकार शब्द्द बोलण्यास तय्यार नाही .सन  २००३ ते २०१३ ह्या दहा वर्षात गुजरात मध्ये एकही जातीय दंगल झाली नाही ह्याचे श्रेय मोदीस  देण्यास तय्यार  नाहीत. 


नरेंद्र मादी ह्यांच्याच कारकिर्दीत दंगे झाले असे नाही तर ह्याच गुजरात मध्ये कांग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेले  दंगे कसे विसरतात? आणि त्याचे उत्तर्दाइत्व कोण घेईल?



१  ) १९६९ अहमदाबाद  दंगा ५१२ मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस . 


२ )   १९८६ अहमदाबाद  दंगा ५९ मृयुमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

३ ) १९९२ सुरत दंगा १७५ मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 


ही  झाली नुसत्या गुजरात राज्यातील दंग्यांची यादी आणि त्यावेळी  कॉंग्रेसची  राजवट होती . इतर राज्यात पण हेच राज्य शाषक होते त्या राज्यात पण दंगे झालेत मग त्या सर्व मुख्यमंत्र्यांना जवाबदार का धरू नये फक्त मोदींनाच का ?


१ )  १९४७ बंगाल पांच हजार ते दहा हाजार मृत्युमुखी पडले शाषक का
  कॉंग्रेस. 

२ ) १९६४   रोउरकेला  २००० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

३ ) १९६७  रांची २०० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

४ ) १९७० भिवंडी ८० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

५ ) १९८३  आसाम  ५००० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

६ ) १९८४  दिल्ली शीख विरोधी दंगा २७३३ मृत्युमुखी पडले शाषक 
 कॉंग्रेस  . 


७ ) १९८७ मेरठ ८१ मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

८ ) १९८९ भागलपूर  १०७० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

९ ) १९९२ मुंबई ९००-२००० मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 

१० ) १९९२ अलिगढ १७६  मृत्युमुखी पडले शाषक  कॉंग्रेस  . 


वरील सर्व दंग्या बाबत मौन बाळगतात कारण त्याच्या जवळ लोकांना पटतील अशी उत्तरे नाहीत हेच खरे आहे. मतांचे राजकारण म्हणजे अल्पसंख्याकांचे मते मिळविण्यास कुठल्याही थराला जाण्याची तयारी आणि हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाना   नामोहरम करणे तसेच जनतेची दिशाभुल करणे खोटी आश्वासने देणे आणि अंतिम ध्येय सत्ता काबीज करणे .  




भारतीय तरुण मतदार हे सर्व  बघून म्हणतो कि " आम्हाला २००२ मध्ये काय घडले ह्याची गरज वाटत नाही पण २०२२ साली  काय होईल ह्याकडे अधिक उत्साही आहोत " त्या दृष्टीने कोणता पक्ष कोणता कार्यक्रम आखतो व त्यायोगे भारतास जगात शक्तीशाली देश बनविल त्यालाच राज्य करण्याची संधी दिली जाईल . 

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

पांढरा चहा ......एक कप.









 पांढरया चहाची शेती.






शीर्षक वाचुन  तुम्हास प्रश्न पडला असेल कि हें काय नवीन आज पर्यंत ग्रीनटी ( चहा ) ,  ब्ल्याकटी ( चहा ) ऐकून होतो पण पांढरा चहा ( टी ) हें नवीनच आहे. हो आपला विचार बरोबर आहे आपण नेहमी दुध घाततेला चहा किवां कोरा चहा घेत असतो त्यांत नंतर ग्रीनटी ची भर पडली आणि ते आपल्या अंगवळणी पण पडले. तसेंच आपण कॉफी पण चहाच्या पद्धतीनेच घेतो.







तुम्ही कधीही पांढऱ्या चहा बद्दल ऐकले नसेल पण सध्या पश्चिमेकडे व अमेरिकेत हा सेवन केला जातो आणि ह्या चहाची मागणी वाढत आहे कारण ह्याच्या औषधी गुणामुळेच. सध्या भारतात पण ह्याचे पदार्पण झाले आहे हां पण, कमी लोकाना ह्या बद्दलची माहिती आहे. नावाप्रमाणे हा चहा पांढरा नाही पण हलका पिवळसर असा ह्याचा रंग आहे आणि ह्याची पाने लांब आणि अणकुचीदार आहेत. हा चहा जगात फार महागडा आहे.




पांढरा चहा काय आहे ?







                                                     पांढऱ्या चहाची पाने




पांढऱ्या चहाची पाने अगदी सुबक व काळ्यायुक्त असतात. ह्यांना पिकविण्यासाठी व वाढीस लावण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. सर्वात चागला मोसम म्हणजे वसंत ऋतूत ह्या चहाची झाडे बहरतात.








ईतर चहाची पाने आंबवुन व नंतर सुकवुन त्याची पावडर केली जाते तसें ह्या चहाच्या पानास करीत नाहीत तर ही पाने एका शेड खाली जिथे ह्याना पुरेशा उन्हात चांगले सुकाविले जातात व ते हळू हळू काळे पडतात व अंबवले जातात. पांढरया चहाला एक प्रकारच सुंदर नाजुक असा फळाचा सुवास असुन ह्यांत " कॉंफिन " ची मात्रा ईतर चहा पेक्षा फारच कमी आहे व प्राणवायुस पूरक असल्यामुळे ह्याचा औषधी सारखा उपयोग होतो.



ह्याचे उगमस्थान -----



ह्या चहाची झाडे १७०० व्या शतकांत चीनच्या फिजुअन प्रांतात आढळले आणि २००० सालांत ह्या वर केलेल्या संशोधनामुळे पश्चिमेकडे ह्याची लोकप्रियता वाढली. हा चहा जागतिक पातळीवर बाजारात आणला गेला. भारत व श्रीलंका ह्या देशातील शेतकऱ्याना ह्याची लागवड करण्यासाठी प्रोच्छाहित करण्यात येत आहे.




                                     " कॅमेल्लिया सिनेन्सीस " 





हा पांढरा चहा हलके ऑक्सिडाईज करून चीन व तैवान आणि थायलंड मध्ये ह्याची लागवड केली जाते. ह्या चहाची पाने आणि कळ्या चीनमध्ये मिळणाऱ्या " कॅमेल्लिया सिनेन्सीस " ह्या जातीच्या झाडापासुन मिळविले जाते.

ह्याची पाने आणि कळ्या नैसर्गिकरित्या उन्हात वळविले जातात तो पर्यंत जेव्हा ते पांढरे रंगाचे होत नाहीत. नंतर त्यानां उकळुन सुकवले जाते पण ईतर चहाच्या पद्धती इथें वापरण्यात येत नाहीत.

खरें तर ह्या चहाचे नाव आले ते मुळी त्याच्या कळ्यावरच्या बारीक नाजुक चंदेरी रंगाच्या थरामुळे आणि हा थर सुकण्याच्या वेळीच दिसण्यास सुरवात होतें म्हणून ह्यास पांढरा चहा असे पडले.









औषधी व रोग प्रतिकारक चहा.........



हा चहा क्यान्सर , रक्तदाब ( उच्य आणि नीच ) कोलेस्ट्रोल सारख्या रोगावर प्रतीबंद्धात्मक आहे इतकेच नाही तर शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठीसुधा ह्याचा उपयोग होतो. आणि आपल्या त्वच्या रोगावर नियंत्रण व वाढु देत  नाही. वयां परत्वे त्वच्या ढिली होतें वर सुरकुत्या येवु  लागतात त्यांना पण हा चहा नियंत्रित करतो व त्यामुळे तुम्ही वायापेक्षा लहान वाटु लागतात.








काय आहे कि नाही सर्व गुण संपन्न औषधी गुण युक्त व रोग प्रतिकारक चहा. ?

 ह्या चहाच्या लागवडीसाठी भारतीय शेतकरी आशाळभूत नजरेने बघत असतील नाही का ?


------------------------------------------------------------------------------

सर्व चित्रे गुगलच्या सौजन्याने .


शनिवार, १९ जानेवारी, २०१३

नवीन लेख-----आयुष्याचे मोजमाप


आयुष्याचे मोजमाप
                        
                         (एका सत्यकथेचे स्वैर मराठीकरण)


                                                                 
                                                                               लेखक ....शशी पानट ( अमेरिका )





Rainy Season Scraps, glitter, and pictures



त्या रात्री वादळानं नुसता धुमाकुळ घातला होता. फिलाडेल्फिया भागांतल्या एका निर्जन अशा अगदी छोट्या हाटेलच्या खिडक्या घोंगावणा-या वा-यामुळे धाड धाड वाजत होत्या. बाहेर फारच थंड झालं होतं. त्यांत पावसानं थैमान घालायला सुरुवात केली. हाटेलच्या लाबीत काऊंटरवर बसलेल्या क्लार्कने ऊठून काळजीपूर्वक खिडक्या लावल्या, लाबीच्या मुख्य दर्शनी दारांतुन पावसाची वरसाड आंत येत होती म्हणून ते नीट लावून घेतलं. ते लावतांना त्याला बाहेरच्या पावसाची, घोंगावणा-या वा-याची आणि थंडीची थोडी चुणूक मिळालीच. "आतां एव्हढ्या पावसांत आपल्या हाटेलमध्ये कोण येणार आहे म्हणा?" असं मनाशी पुटपुटतच तो परत काऊंटरपाशी आला. त्याने फ़ायरप्लेस लावली आणि थोड्याच वेळांत त्याच्या ऊबेने तो हरीरानं आणि मनोमनही सुखावला.

मात्र तेव्हढ्यांत दर्शनी दाराजवळ कुणीतरी आले आहे हे त्याने पाहिले...............


 हा लेख वाचण्यासाठी  नवीन लेख  वर टिचकी दया : 




-------------------------------------------------------------------------------------------------------------------
छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने.

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२



 जगाचा अंत २१/१२/१२    ( एक आश्चर्यकारक रिपोर्ट ) 






जगभरातील  निवडक लोकांना जगबुडीच्या संधर्भात  विचारलेल्या निवडक प्रश्नांची आलेल्या 

उत्तरा वरून काढलेला हा निष्कर्ष.


जगबुडीच्या प्रश्नावर अनेकांची मत मतांतर आहेत आणि खरे काय आणि खोटे काय ते कोण 

जाणे . पण जर का खरेच असेल तर लोक त्यावेळे पर्यंत कसे आपले आयुष्य जगायची  इच्छा 

ठेवतात हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जगात  एक चाचणी घेण्यात आली आणि आलेली माहिती 

आश्चर्यात टाकणारी आहे. ह्यावरून एक निश्चित झाले कि लोकांना आपण त्यादिवशी काय करू 

हे निश्चित माहित आहे. 


१)  जगातील आपल्या शेवटच्या दिवशी काय कराल  ?


जगातील ५१ % लोक त्या दिवशी आपल्या कुटुंबा समवेत राहणे पसंद करतात. 

प्रवास व जग बघण्याची इच्छा २२ %लोक करतात. साहजिकच ज्या लोकांची इच्छा जग 

बघण्याची आहे तर ती कोणती ठिकाणे असतील हे जाणून घेण्याची इच्छा झाली .


 २)   जगाच्या शेवटच्या दिवस पर्यंत आपण कोणता देश किवा ठिकाण निवडाल  ?


आश्चायाची गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम स्थान भारताला  मिळाला  आहे.ऐकून ५ ठिकाणाची   

पसंदी दिली त्यांत भारत अग्रस्थानी आहे. दुसरे स्थान  आईसल्यांड तिसरे स्थान चीन व चौथे 

स्थान अर्जेन्टिना  व पाचवी पसंदी अंटार्टिकाला देण्यात  आली .


 ३) जर तुम्हाला सर्व प्रथम जगबुडी काही तासातच होणार अशी आगाऊ सुचना  मिळाली तर तुम्ही ही  सुचना कोणाला द्याल व कशी  ?


४७  % लोकांना शेवटच्या दिवशी सामाजिक नेट वर राहणे जसे फेसबुक,ट्विटर  पसंद आहे 

आणि त्याव्द्वारे लोकांना सूचित करणे इष्ट वाटते. 

२७.५ % लोकांना वेळ पुरेसा नाही तेव्हा कोणास सूचना देणे शक्य होणार नाही असे वाटते. 

५५ % लोक बातम्या आणि ५ % लोक सरकारला सूचित करण्याचे संकेत दिले .

 १५ % लोक इतर साधनाचा उपयोग करून सूचना देण्याचा मानस व्यक्त केला . 



 ४) जगबुडीच्या क्षणी  तुम्ही कुठे राहणे पसंद कराल ?


४० % लोक आपल्या कुटुंबा समवेत राहतील असे सूचित केले .

२० % लोक निसर्गरम्य ठिकाणी जाणे पसंद केले .

२० % लोकांनी  आपल्या परिवार समेत सुंदर  अश्या रम्य ठिकाणी जाणे  पसंद केले. 

६  % लोकांनी परिवार बरोबर पार्टी करू असे सांगितले. 

२  % लोकांनी आपण ह्यातून वाचण्याचा प्रयत्न करू असे नमूद केले. 

१२ % लोकांनी आम्हाला माहित नाही आम्ही काय करू ते. 


 ५) तुम्हाला जर संधी मिळाली तर आपण सुनिश्चित केलेले काम जगबुडीच्या दिवशी एकट्याने पुरे कराल का ?


५२ % लोकांनी  " हो "   तर ४८ % लोकांनी  " नाही " असे उत्तर दिले. 



६)  जगबुडी होण्या अगोदर जर तुम्हाला संधी मिळाली तर खालील पैकी कोणते निवडाल ?


१--  अमेरिकेच्या रस्ता क्रमाक ६६ वर विंटेजकार  सफर. 

२-- मोझांबिक मध्ये डॉल्फिन बरोबर पोहण्याचा आनंद लुटणे. 

३--  डोम आफ द रॉक  ,जेरुसेलम  वरून सुंदर उगवता सूर्य बघणे 

४-- रोम मधील बुल फाईट .
५-- एव्हरेस्ट  चढाईचा आनंद. 

जवळ जवळ ४० % लोकांनी पहिल्या क्रमांकाला प्राधान्य दिले आणि ३० % लोकांनी दुसर्या 

क्रमाकाला पसंदी दिली. ३,४ आणि ५व्या क्रमांकाला अनुक्रमे १५ %,८ % आणि ७ % पसंदी दिली. 



खालील तक्ता  वरील सर्व चाचणीचा अहवाल दर्शवितो.





If the world were to end in 2012, what would you do? From First Choice – The Home of All Inclusive
The 2012 Bucket List was created by First Choice – The Home of All Inclusive



========================================================================

वरील माहिती मायाजाला वरून संग्रहित केली.


शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.



हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.
सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष  काढले  जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण  इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या  बहुदेव वादाची कल्पना  स्वयं ऋग्वेदच करतो.
ज्याला लोक इंद्र, मित्र, वरुण असे संबोधितात ते सर्व एकच आहेत .त्यांची ऋषिमुनी वेगवेगळ्या नावाने आराधाना करतात. वास्तविक पाहता पुराण तर वेगवेगळ्या पंथांच्या निर्माणात गुंतला गेला आहे.
पण ह्याच पुराणात काहीं श्लोक ईश्वराच्या एकत्वाची स्पष्टता करतात जसें...



सत्त्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तै-
र्युक्त: पर: पुरुष एक इहास्य धत्ते
स्थित्यादये हरिविरंचि हरेति संज्ञा:

 श्रेयांसि तत्र खलु सत्त्ववतनोर्नृणां स्यु: ।


प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्व, रज, तम, ह्यांचा स्वीकार करूनच संसारात स्थिती, उत्पत्ति आणि प्रलय ह्या करता अद्वितिय परमात्मा विष्णु, ब्रम्हा आणि रुद्र अशी  नावे धारण केली आहेत.

वरवर बघता आपणास असे दिसते कि हिंदू हें वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य ह्या संप्रदायांत वाटला गेला आहे. सत्य हे आहे कि हिंदू विष्णु (सर्वव्यापी ईश्वर), शिव (कल्याणकर्ता ईश्वर), दुर्गा (सर्वशक्तिमान ईश्वर), गणेश (परम बुद्धिमान वा  सामूहिक बुद्धिचा  द्योतक ईश्वर) ह्यांची उपासना करतो. सर्व हिंदू विष्णु, शिव,दुर्गां व काली  मंदिरांत जाऊन श्रद्धा युक्त होऊन नतमस्तक होतो. म्हणून सर्व हिंदू एक आहेत मग तो काणत्याही संप्रदायाचा असो असे यावरुन निश्चित आहे.

उपनिषीधात खरें तर " एकत्व " जोडण्याच प्रयत्न केलेला दिसतो आणि ज्ञानी लोकांनी असा निष्कर्ष काढला कि जीवात्मा आणि परमात्मा या दोहोत अग्नी आणि त्याची दाहकतेचा जसा संबंध असतो तसाच संबंध आहे. ईश्वर कुठेही दुसरीकडे नाही अपितु तो आपल्या हृदयांत वसलेले आहे. सर्वत्र तो आहे व तो सर्वव्यापी परमात्माच सर्व काहीं आहे. म्हणूनच त्याची स्तुती आणि प्राथना केली जाते.


तेजो सि तेजो मयि धेहि, वीर्यमसि वीर्य मयि धेहि, बलमसि बलं मयि धेहि, ओजोसि ओजो मयि धेहि ।     (यजुर्वेद १९-९)

हे भगवन तुम्ही तेजोपुंज आहात माझ्यात तेज स्थापीत  करा ,आपण वीर्य रूप आहात मला वीर्यवान बनवा, आपण बालरूप आहात माला बलवान बनवा, आपण ओज स्वरूप आहात मला ओजस्वी बनवा अशी प्रार्थना व स्तुती केली आहे.

वेदात वैश्वीकरणावर अधिक बळ  देऊन  म्हंटले आहे ...



अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ।



हे माझे आणि ते त्याचे आहे असा विचार कोत्या मनाचे लोक करतात पण उदार व चारित्र्यवानासाठी तर हें जगच  एक कुटुंब आहे.




सामाजिक ऐकताचा  संदेश पण यांत आहे तो असा---
सह नाववतु सह नौ भुनुक्तु । सह वीर्य करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु । मा विद्विषावहै । शान्ति: शान्ति: शान्ति: ।
हें देवा आम्ही परस्परांची रक्षा करावे, सर्वांनी मिळून उपभोग घ्यावा, एकमेकांच्या साह्याने सामर्थ्य व तेजस्वी बनु, विद्या, बुद्धी वृधिंगत होऊन विद्द्वेषा पासुन दूर राहु अश्या प्रकारे सर्वत्र शांति नांदो .

सार्वभौम भ्रातृत्व व सार्वभौम कल्याणणासाठी पण यांत उलेख आहे तो असा----
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत् ।



सर्व सुखी होवोत,सर्व निरोगी राहोत, सर्वांनाच आपले शुभ दर्शन होवो आणि त्यांचे दु:ख हरो.
-----------------------------------------------------------------------------------------------------
( मुळ लेखन ( इंग्रजी ) श्री विवेक मिश्र यांचे चे हें भाषांतर आहे.)

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य -------------

 
 
 
 
 
 
 
 
||सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ||
|| शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
 
 
 
 
 
सृजन,पालन ,संहार ...सरस्वती,लक्ष्मी,काली........स्त्रीशक्तींना मनःपूर्वक वंदन..
 
 
 
 
 
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.....!!
 
 
 
 
 
 
                                   
                                             // श्री ज्ञान सरस्वती देवी प्रसन्न //




    // नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे/ वसत्वं   मम जिव्हाग्रे सर्व   विद्या प्रदाभव //




  श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य





02 srimad_basara_saraswati.jpg

श्री ज्ञान सरस्वती



आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे. ह्याचे प्रमाण म्हणजेच अपौरुषेय वेद, दर्शन ग्रंथ , शास्त्र पुराण हें ग्रंथ होत. सनातन धर्माची मौलिक विशेषता म्हणजे तत्व वाद , अद्वैत सिद्धांत , वैदिक संस्कृतीची व्यवहारिक व पारमार्थिक श्रेष्ठता आणि द्वैत प्रपंचातून अद्वैत रुपात जाणे, किंबहुना आपण ज्यास जिवन मुक्ती म्हणतो ती आवस्था प्राप्त करण्याची समर्थता आहे . मानवास आतिउच्च स्थान प्राप्त होण्याची क्षमता हि ह्या धर्माची ,संस्कृतीची एक विशेषता आहे म्हणूनच आपला भारत देश एकेकाळी संपूर्ण जगाचा गुरु होता.


श्रीमत भागवत गीतेत आपल्या संस्कृतीची व्याख्या सुत्रवत केलीली आहे " मानुषाची मित्र वृत्ती माझ्यात स्थित होऊ दे ,कर्म आणि कर्म लाभात आसक्ती नसू दे ,सिद्धी आणि सिद्धीत समानता राखणे हेचं निष्काम कर्म योग होय. "



भगवंतात समर्पित होणे हेचं सर्व कर्म असावे आणि त्याच्याच चरणी प्रेम राहो अन्यत्र कोठेही आसक्ती निर्माण न होवो . सर्व प्राणी मात्रांत प्रेम असो तसेंच परमेश्वराच्या ठाई नित्य एकभाव अहंकार रहित जिवन असने हेचं खरें सम्यक ज्ञान होय.


ह्याच वचना नुसार ज्यांचे असे वर्तन असेल त्यांचे जिवन अहिक व पारमार्थिक प्राप्ती मध्ये अत्यंत सुखरूप बनेल. वेद शास्त्र ,अठरा पुराण, महाभारत ह्या ग्रंथात ह्याच वचनांचे संग्रह आपणास दिसून येईल.





vyasa1.jpg

                         श्री व्यास मुनी



श्री वेद व्यासांनी श्री सरस्वती माते विषयी मार्कंडेय पुराण, भ्रम्हांड पुराण, कालिका पुराण , तसेंच देवि भागवतात श्री बासर सरस्वती महात्म्य लिहले. पूर्वीच्या कौमाराचाल प्रांतात बासर (व्यासपुर) क्षेत्री स्थित श्री सरस्वती मातेचे महात्म्य ह्या लेखांत संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा  प्रयत्न केलेला आहे.


आचार्य श्री कृष्ण द्वैपायन व्यासानी प्राचिन साधनेची वेगवेगळी अंगे वेदशास्त्र ,उपनिषिदे,वेदसुत्रांत आणि आठरा पुराणात रचना केली आहे. व्यासानी सर्वामधे भारतीय भावना जागृत करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष खर्ची केले आणि ते वृधावस्थे मध्ये आत्मस्थ होउन ब्रम्ह निर्वाणाच्या प्रप्तिच्या मागे लागले.पण त्यांच्या अंतर आत्म्याने संगीतले कि " तुझे कर्ममय जीवन आजून अपूर्ण आहे व जो एक महान उद्देश उराशी बाळगून तू या प्रिथ्वितलावर आवतीर्ण झाला आहेस ते तुझे कार्य अद्याप अपूर्ण आहे.






                                      बासर रेल्वे स्टेशन 


                                       बासर (व्यासपुर)


या संसारातील सर्व कर्तव्ये आणि कर्माची परि समाप्ति झाल्यावरच स्वभावतः आन्तःकारणा मध्ये जी एक प्रकारची पूर्णता प्राप्त होते ती न झाल्यास अंतरसुख लाभेना. श्री व्यासानी वेदात, पुराणात, धर्म शास्त्र , राज्य शास्त्र, निति शास्त्र आणि अर्थ शास्त्र या सर्व ग्रंथात समर्पकपणे भिन्न भिन्न मार्ग आक्रमण करणारया व्यक्ति साठी आणि त्याना कल्याणमय मार्गावर जाण्यासाठी लिहिले होते. इतके विधायक कार्य केल्यावर सुद्धा श्री व्यासाना मन:शांति लाभली नाही.




श्री व्यासानी सर्व मुनि वृन्दा समवेत तिर्थ यात्रा करत करत परम् पावनी गौतमी तिरी आले आणि या पवित्र स्थानि जिथे गंगा माई आपल्या पवित्र पाण्याने अनंत प्राणी मात्रास सुख व शांति देत होती. गौतमी तिरी कदम्ब वनात श्री सरस्वती माता निराकार स्वरुपात स्थित होती. या कदम्ब वनात आनेक प्रकारची वृक्षे,फले फुलाची झाड़े होती. अनेक रागी बेरंगी पक्षांचाचा वास होता व त्यांचा तो चिवचिवाट ऐकुन वाटे कि श्री सरस्वती मातेचे गुनगाण तर करित नाहीत ना ? अशी निसर्ग शोभा दृष्टिस पडताच श्री व्यास मुनि मंत्र मुग्ध होउन आणि इथेच थाबण्याचा बेत केला.




basara-saraswati-temple3.jpg

                           गोदावरी ( दक्षिण गंगा )





दुसऱ्या दिवशी श्री व्यासानी नजिकच्या सरस्वती सरोवरात स्नानादी नित्य कर्म उरकून मातेची विधि युक्त पुजा केली आणि स्तुतिपर रचना करण्यास बसले. कालान्तराने श्री व्यासाना श्री सरस्वती मातेचा निर्गुणरुपी साक्षात्कार झाला व त्या योगे त्यांचे चित शान्त झाले . श्री मातेनी साक्षात्कार दिल्यावर श्री व्यास मुनीना म्हणाली, " हें मुनिवर आपण यां गौतमी तिरीची रोज नित्य नेमाने तीन मुठी वाळू तीन वेगवेगळ्या ठिकाणी विधिवत स्थापना करा " त्या स्थापिलेल्या तीनही ठिकाणी मी सत,रज, तम गुण युक्त तीन स्वरुपात प्रगट होईन व श्री ज्ञान सरस्वती, श्री महालक्ष्मी ,व श्री महाकाली अशी माझे रूपें असतील.






                                         सरस्वती सरोवर




आनेक विद्वानाना प्रश्न्न पडतो की श्री मातेचे रुप साकार आहे की निराकार ,तिला सगुण म्हणावे कि निर्गुण ,व्यक्त रूपा की अव्यक्त रूपा,या सर्व प्रश्नाची उत्तरे श्री व्यास लिखित श्री सरस्वती महात्म्यांत आहे.



स्व प्रकाश निखिला व भासिनी / चिन्मयी त्रिगुण कार्य कारणा /


भेद लक्षण विनाशन क्षमा / शारदा वसतु मे ह्रूदांबुजे //




तत्व वेत्ते लोक व्यक्त पदार्थाच्या बाह्य स्वरुपास दुर्लक्षून अंतरीय मूल स्वरुपास भेदण्याचा प्रयत्न करतात. ज्याचे मन निर्मळ व शान्त चित असते त्याच लोकाना मातेचा निर्गुण साक्षात्कार होतो.



ये  ज्ञानिनां  चिंतास्तु ते  विदुऱात्म परात्परा //




ज्याचे अन्तः करण आत्मज्ञानां मुळे शुद्ध झालेले आहे. त्यांनाच परात्परा चिदरूपा भगवती दिसू शकेल.



एकै वाह जगत्यत्र द्वितीया का परंपरा /


अहं विभूत्या बहुभि रिह रुपैर्यदा स्थिता //



श्री माता आपल्या इच्छा शक्ती द्वारा विश्वाची उत्पती आणि संहार करते. इतकेच काय ब्रम्हा विष्णू आणि महेशादी देवतांची शक्ती श्री मातेच्या शक्तीच्या अंश मात्र आहे. संपूर्ण विश्वाची स्थिती मातेवरच अवलंबून असते.



या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता /


नम तस्यै, नमतस्यै  , नम तस्यै नमो नमः //



पंच महा भूतात सुद्धा ही अतुलनीय शक्ती असते. पण आपल्या सारख्या आल्प बुद्धी मनुष्यास दिसत नाही . ज्यांना श्री मातेची कृपा प्राप्त होते त्यांनाच ह्याचे आकलन होते. सामन्य मानवास ह्या पराशाक्तीचे आकलन होत नाही म्हणून तें नेहमी दुख ,दैन्य व द्रारिद्र्य व आशांतीत जगात असतात .



निर्गुण आराधना करणे अत्यंत कठीण असते म्हणून श्री व्यासानी मातेची आराधना केली कि हें माते तू सगुण सकारूपी होऊन तुझ्या अज्ञानी भक्तांचा उद्धार कर. तद नंतर श्री व्यासांना द्रष्टांत देऊन आज्ञा केली कि रोज गोदातीरी तीन मुष्टी वाळू नित्यनेमाने टाकून आराधना केल्यास त्यां वाळूतून सगुणरूपी माता प्रगट होईल.




                                  व्यास तापो स्थानाकडे जाण्याचा मार्ग 




                                                  तापोस्थान 



श्री व्यासांनी मातेच्या आज्ञने प्रमाणे रोज तीन मुष्टी वाळू टाकून बासर ग्रामी श्री ज्ञान सरस्वतीची विगृही रचना केली .गोदातीरी वसलेल्या ह्या ग्रामास पूर्वी व्यासपुर म्हणत असत व त्याचा अप्भृंश वासरा व पुढे बासर असें झाले . बासर हें पूर्वीच्या हैद्राबाद (निझाम राज्यात ) होते पण भाषावार प्रांत रचनेत हें बासर ग्राम आंध्र प्रदेशात गेले .







                                                                     श्री व्यास


श्री व्यास रचित श्री सरस्वती महात्म्य या ग्रंथात शारदा सरोवराचे वर्णन केले आहे . या सरोवराच्या आठ दिशाना छोटी छोटी आठ सरोवरे आहेत यानां अष्टतीर्थे म्हणतात. मध्य भागी सरस्वती तीर्थ ,पूर्वेस इंद्र तीर्थ , आग्नेयेस सूर्य तीर्थ, दक्षिणेस व्यास तीर्थ, वायव्वेस वाल्मिकी तीर्थ, पश्चिमेस नारायण तीर्थ, व ईशान्येस शिव तीर्थ असें हें आठ तीर्थे आहेत. प्रत्यक तीर्थाचे संक्षिप्त कथानक असें आहे.



१)   इंद्र तीर्थ :--



एके समई उग्र तपस्वी अग्नी पुत्र दुर्वास ऋषी यांना श्री मातेने पुष्पमाला प्रसाद म्हणून दिली . ती पुष्पमाला अलंकित करून दुर्वास मुनी इंद्राकडे गेले आणि त्यांनी ती त्यांना प्रसाद म्हणून दिली.



ऐश्वर्यमत्त देवेंद्राने ती पुष्पमाला यत्किंचित समजून फेकून दिली. दुर्वास मुनी क्रोधीत होऊन त्यांनी इंद्रास शाप दिला कि तू राज भ्रष्ट व कुष्टी होशील. शापा प्रमाणे देवांचा देव राज्य भ्रष्ट व कुष्टी झाला. बृहस्पती च्या सांगण्या प्रमाणे देवेंद्र गोदातीरी आले व नित्य नेमाने श्री सरस्वती तीर्थात स्नान करून मातेची आराधना व अनुष्ठान करू लागले. कालांतराने इंद्रावर मातेची कृपा होऊन देवंद्र शाप मुक्त झाले तेव्हा पासुन या स्थानास इंद्र तीर्थ म्हणतात.





२)  सूर्य तीर्थ :--



एके काळी देवंद्र इंद्र सूर्यावर कोप पुन आपल्या आयुधाने सूर्याच्या सहस्त्र करांचा नाश केला. सूर्य भगवान अति दुखी होऊन बासर ( व्यासपूर ) नगरी प्रस्थान केले व तिथे त्यांनी मातेची अनुष्ठान व आराधना केली आणि तिच्या कृपे मुळे त्यांना सहस्र कर पुन्हा प्राप्त झाले. हेचं तें स्थान सूर्य तीर्थ नावाने प्रसिद्ध आहे.



३)  व्यास तीर्थ :--



 शारदा सरोवर ज्यांत श्री व्यास स्नान करीत व मातेची आराधना करीत तेचं हें व्यास तीर्थ होय.



४)  वाल्मिकी तीर्थ :--



 श्री वाल्मिक ऋषी आपल्या पूर्व काळात दस्यू वृतीने आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असत व नारदाच्या वचना नुसार त्यांनी सरस्वती मातेची आराधना केली त्यां मुळे तें आदि कवी बनले हेचं तें वाल्मिकी तीर्थ होय.



५) नारायण तीर्थ :--



 समुद्र मंथानाच्या वेळी श्री भगवान विष्णूनी असुरांना मोहित करण्या साठी मोहिनी रूप धारण करून सर्व देवतांना अमृत दिले, आणि ही प्रेरणा त्याना श्री माते पासूनच मिळाली.त्यां मुळे हें स्थान नारायण तीर्थ म्हणून ओळखले जाते.



६)  गणेश तीर्थ :--



 भगवती कात्यायनीच्या कृपा प्रसादे श्री गणेशास अग्र पूजेचा मान मिळाला म्हणून त्यास गणेश तीर्थ नाव प्राप्त झाले.



७)  स्कंद ( पुत्र ) तीर्थ :--



 श्री सरस्वती मातेच्या कृपा प्रसादाने श्री स्कंद देव सेनानी बनले व तारक नामक आसुराचा नाश केला. त्रेता युगांत महाराजा दशरथा ना माते च्या कृपा प्रसादे पुत्र प्राप्ती झाली म्हणून हें पुत्र ( स्कंद ) तीर्थ प्रसिद्ध आहे.



८)  शिव तीर्थ :--



दक्ष प्रजापती कन्यकेने जेव्हा आपल्या वडिलांची निर्भत्सना शंकराने केल्याने तिने देह त्याग केला. भगवान शंकरना पत्नी विरहाने ह्या सरोवराच्या ईशानेश ठाण मांडून श्री शारदेची उपासना केली. त्या फल स्वरूप शंकराना हिमालय कन्यका पत्नी म्हणून लाभली. तेव्हा पासुन हें स्थान शिव तीर्थ म्हणून संभोधिले जाते.



श्री व्यासांच्या तंत्र शास्त्रात अनुष्ठान पद्धतीचे सविस्तर वर्णन उपलब्ध आहे. ज्यांत मंत्र, तंत्र, व यंत्र यांचा पद्धतीचे सविस्तर कश्या प्रकारे उपयोगात आणावे ह्याची माहिती दिली आहे.



// तन्यते ज्ञान मननेति तंत्रम //



ज्या शास्त्राच्या पठणाने ,मनन व अनुसरण केल्याने ज्ञानाची अभिवृद्धी होते त्यां शाश्त्रास तंत्र शास्त्र म्हणतात.



// तनोति  विपुलांर्थान तत्वं मंत्र समर्पितान / त्राणांच कुरुते यस्मात
तंत्र मित्यभि धीयते //



तंत्र शाश्त्राने मंत्र शाश्त्राचा बोध होतो. ब्रम्ह व पृक्रती यांचा प्रश्न व सिद्धांत तंत्र शास्त्रात उधृत केला आहे, कोणत्या उपायांनी मनुष प्राणी देवता स्वरूप होईल तसेंच विविध तापातून त्याला मुक्तता मिळेल.आणि ऐहिक सुख प्राप्ती यां सारख्या गंभीर विषयाचे विवेचन तंत्र शास्त्र यां ग्रंथात श्री वेद व्यासांनी केली व प्रतिपादिले कि सर्व तंत्र, मंत्र,व यंत्र विदये मध्ये श्री सरस्वती विद्याच सर्व श्रेष्ठ आहे.





                                               श्री महालक्ष्मी देवी 

विधी युक्त अनुष्ठानाने भाऊक भक्तानां सुलभ रीतीने श्री मातेचा साक्षात्कार होईल व मातेचा अनुगृह कसा मिळेल ह्याचे सविस्तर माहिती ,मंत्रे व अनुष्ठान प्रकार आणि पद्धती ची थोडक्यात माहिती एने प्रमाणे आहे.



                                ----------जप अनुष्ठान-------


श्री ज्ञान सरस्वती मातेचे अनुष्ठान करण्याचे काहीं विशेष नियम आहेत.तें खालील प्रमाणे ....



१)  जप अनुष्ठान करण्या पूर्वी गुरु उपदेश घेणे अवश्क आहे.


२)  श्री मातेची आज्ञा होई पर्यंत अनुष्ठान ४-११- २१ किवां ४० दिवस तिथेच राहून करणे.


३)  दीक्षा घेताना आपले मन व शरीर अंतर बाह्य शुद्ध असावे .


४)  ब्रम्हचर्य चे पालन करावे.


५)  अनुष्ठानास सुरवात केल्यानंतर स्थान बदलू नये.


६)  दिवसातून एकदाच माधुकरीतून मिळालेले प्रसाद तुल्य सात्विक आहारच घेणे.


( बासर ग्रामात फार पूर्वी पासुन ब्राम्हणाच्या घरातून दर रोज मध्यानी सोवळ्यात शिजवलेले अन्न भिक्षा म्हणून सर्व अनुष्ठान करणाऱ्या ना दिली जाते. )


७)  उपवास करून अनुष्ठान करणे उत्तम.


८)  रात्री जमिनीवर झोपणे.


 9)  काम, क्रोध, लोभ ( मोह ) व मच्छर ह्या गुणांचे विसर्जन करावे.


१०)  शक्य असेल तर मौन वृत्त पाळावे.


११)  श्री मातेची यथा शक्ती अर्चना, वंदना व सेवा करावी.


१२)  आपला पूर्ण विश्वास श्री माते चरणी असावा.


१३)  रोजची अंन्हीके संध्या, पूजा गोदा तीरीच स्नान करून अनुष्ठानास बसावे.



 श्री ज्ञान सरस्वती मातेच्या मंदिरातच राहून अनुष्ठान पूर्ण करावे.
ह्या पद्धतीने सर्व नियमांचे पालन केले तर श्री मातेचा अनुग्रह होईल आणि जें भक्त अनुष्टानात एकरूप होतील व वेदोक्त मंत्र ,जपानुष्ठान करतील त्यांचेवर मातेची विशेष करुणा होईल.



श्री ज्ञान सरस्वतीचे नाम मंत्र खाली दिलेल्या प्रमाणे करावे . ह्यात कोणते जप कोणी करावे त्या संबंधी माहिती दिली आहे. प्रत्येकाने आपले जन्म नावाचे आद्य अक्षर बघावे व त्या अक्षरा समोर जो मंत्र लिहलेला आहे तो किती वेळा करावा ह्याचे पण निर्देशन दिले आहे.



संपूर्ण भक्ती भावाने श्री ज्ञान सरस्वती मातेवर श्रद्धा ठेऊन सर्व वरील नियमांचे पालन करून केलेले अनुष्टान श्री मातेच्या अनुग्रहास निश्चित पात्र होतील.


जन्म नाव अक्षर.------नाम मंत्र.---------जप संख्या ( रोज )

   त----ह-- यो           गेश्वरी सरस्वती              ७०००


   थ---अ --क              रतगर्भा                         ७०००

    द---आ -ख            लोकवत्सला                    ७०००

    ध ---इ ---ग           वागेश्वरी                        ६०००

    न ---ई ---घ           श्रीभारती                        ६०००

    प --उ ---- ड         षडेयश्वर्य दामिनी शारदा   ९०००

    फ ---ऊ --च            सरस्वती योगेश्वरी          ७०००

     व ---छ                हिरण्य कर्णेशा वाणी          ६०००

     भ ---ज                  काम प्रदायनी वाणी         ७०००

     म ----झ                आर्या वाणी                      ७०००

    त्र                              गिर्वाणी                        ७०००

     र ---ट ---ए             ईश्वर भारती                  ८०००


     ल -----ठ               उज्वला शारदा                 ८०००

     व ---ड                  चिंतामणी भाषा                ७०००

     श ---- ओ              बुद्धी दायिनी                    ६०००

      ष ----ढ                भारती शारदा                   ७०००

      स ----णं              महाश्री भारती                   ७०००

------------------------------------------------------------------------------


वरील प्रमाणे आपणास किती वेळा रोज अनुष्ठान करावे लागेल तें बघावे पण सर्वात अगोदर गुरु दिक्षा घ्यावी व नंतरच अनुष्टनासाठी बसावे जेणे करून कोणतीही त्रुटी शिल्लक राहणार नाही व इच्छा,फल प्राप्ती अवश्य लाभेल.



मंदिर निर्माण काळ


front_view.jpg

                                   मंदीर   





श्री सरस्वती मातेचे मंदिर अति प्रचीन असल्याचे सांगतात. श्री वेद व्यासांनी सरस्वतीची स्थापना करून एक मंदिर उभारले . हें मंदिर १०० वर्षा पूर्वी जीर्ण व भग्न अवस्थेत सरोवराच्या पश्चिम किनारी होते. हें मंदिर केव्हा भग्न झाले याचा उलेख मिळत नाही परंतु किंवदिन्ता अशी आहे कि १७व्या शतकाच्या शेवटी रोहील्यांनी आक्रमण केले त्यांत मंदिराची मोड तोड झाली आणि त्याच वेळी श्री महालक्ष्मीची  मूर्ती भग्न झाली.


रेनुकापुरच्या श्री माक्काजी पाटलांनी आसपासच्या सर्व खेड्यातून ( राविन्द्रपूर,बासर ,मैलापूर, मादापूर, व रत्नापूर ) निवडक लोकांच्या साह्यातून रोहोल्याचे आक्रमण मोडून काढले.  त्यां विजयाचे स्मारक म्हणून त्यांनी व गावकऱ्यांनी मिळून मंदिरा चि पुनर्बांधणी केली.



ह्या मंदिरातील दोन मूर्तींची विधियुक्त पूजा होत नाही. तेव्हा श्री काली मातेची मूर्ती प्रांगणाच्या पश्चिमेस स्थापण्यात आली. श्री सरसावती मातेची स्थापना श्री जगत गुरु श्री.शंकराचार्य श्रीमत परमहंस परि वाजकाचार्य श्री विद्यारण्य भारती शृंगेरी मठां धीपति ह्यांच्या करकमालने करण्यात आली. मंदिरातीलं लक्ष्मीची मूर्ती तेव्हा काशीहून आणण्यात आली होती.



                                        सरस्वती स्वयंभू मुर्ती 





तीर्थ क्षेत्र-स्थान

बासर श्री ज्ञान सरस्वती मातेचे परम पवित्र तीर्थ क्षेत्र मानले जाते . हें तीर्थ क्षेत्र मनमाड-सिकंदराबाद ह्या रेल्वे मार्गावर गोदावरी उत्तर तीरावर स्थित आहे. भाषावार प्रांत रचनेत बासर ग्राम हें आंध्र प्रदेशात गेले . आता ह्या मंदिराचा जीर्णोधार करण्यात आला व आंध्र प्रदेश सरकारनी हें मंदिर ताब्यात घेतले व सर्व व्यवस्था इंडोमेंट अधिकारी वर्ग बघतात. आता इथें सर्व सुख सोई उपलब्ध करण्यात आले आहेत .




बासर रेल्वे स्टेशन तें मंदिरा पर्यंत डांबरी रस्ते ,दिव्याची सोय रस्त्या लगत,पाणी ,राहण्यासाठी विस्तीर्ण धर्मशाळा व भक्त गणासाठी भोजन व्यवस्था केलेली आहे. इथें महाशिवरात्रीस मोठा उत्सव साजरा केला जातो. नवरात्री उत्सवात श्री मातेची अर्चाना व हवन विशेष प्रकारे केले जाते. बरेच भक्त गण इथें अनुष्ठान व तपस्या करण्यास येतात.





                                        मंदीर प्रवेश द्वार



श्री सरस्वती मातेच्या मंदिराच्या डोंगरावर उत्तरेकडे एक गुहा आहे ह्यास " नरहर मालव " गुहा म्हणतात. ह्या घुहेत नाथ पंथीय श्री धुंडिराज सुत नरहर मालव यांनी तप केले .तेथेच त्यांची समाधी आणि पादुका आहेत. श्री नरहर मालव ह्यांनी लिहिलेली " नवनाथ भक्ती सार " हा ग्रंथ मराठी भाषेत प्रसिद्ध आहे.



                         नरहर मालव गुहा


ह्याच गुहेच्या वायव्य दिशेस एक विशाल पाषाण ( शिळा खंड ) उभा आहे. त्यां पाषाणास दगडाने आघात केल्यास मधुर संगीताचे सूर कानी पडतात. ह्या पाषाणास " शिळा-वेदवती " म्हणतात.



                                         विशाल पाषाण


ब्राम्हण वर्ग व नित्य नैमितिक पूजा-अर्चा


पूर्वी पासुन येथिल ब्राम्हण वर्ग पारंपारिक पद्धतीने पूजा आपापल्या अधिकार प्रमाणे करीत असत. पूजा-आर्चाने चे अधिकार पुजाऱ्यांच्या चार शाखाना होता.


१) माध्यंजन
 २) आश्वलायन
 ३) कण्व
 ४) आपस्तंभ ह्याना क्रमा क्रमाणे मिळत असे.

आता हें सर्व पुजारी वर्ग मंदिराचे आर्चक म्हणून नेमणुका आंध्र प्रदेश राज्याच्या धर्मादाय विभागाने कायम स्वरूपी केल्या आहेत.



सांप्रत ब्रम्ह मुहूर्ता पासून श्री मातेचा अभिषेक ,पूजा ,अर्चना, अलंकार व नैवेद्य आटपून नंतर भक्त जनाची पूजा सुरु होते . दुपारी १२ नंतर श्री मातेला नैवेद्य अर्पित झाल्यावर मंदिर बंद ठेवण्यात येते. भाविकाच्या दर्शनासाठी परत दुपारी ३ वाजता मंदिरांत दर्शन प्रवेश सुरु होतो तो सायंकाळी ७ वाजे पर्यंत असतो. त्यां नंतर श्री ज्ञान सरस्वतीचे षोडशोपचार पूजा, आरती, व तीर्थ प्रसाद दिल्यावर मंदिर दुसऱ्या दिवसा पर्यंत बंद ठेवतात.



सर्व भक्तजनांना विश्वास आहे कि ही माता आपले मनोकामना पूर्ण करील व तशी ख्याति आहे. रात्रीच्या वेळी भक्तजन देवळातच निवास करतात कारण कि मंदिर प्रांगणात श्री सरस्वती माता अदृश्य रूपाने येऊन भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते .



 विद्या प्राप्तीसाठी आपल्या मुलाना शाळेत घालण्या पूर्वी " अक्षर आभ्यास " श्री ज्ञान सरस्वती मातेच्या चरणी ' श्री गणेशा " गिरविला जातो. आणि ह्या विधी नंतरच पालक आपल्या पाल्याला शाळेत विद्या अघ्यानासाठी घालतात.





                                   अक्षर अभ्यास ( पाटी पूजा )



जावे कसे बासरला ?................


बासर श्री ज्ञान सरस्वती तीर्थ क्षेत्रास जाण्यासाठी रेल्वे मार्ग , बस मार्ग थेट बासर पर्यंत उपलभद्ध आहेत. बासर रेल्वे स्टेशन हें मनमाड-सिकिंद्रबाद मार्गावर आहे. बस मार्ग आंध्र व महाराष्ट्र दोन्ही राज्यातून चालविले जातात. बासर हें महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्याच्या सिमे जवळ आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्यात आहे.



आमचे घराणे  श्री ज्ञान सरस्वती मातेचे पुजारीचे पारंपारिक अधिकारी आर्चक आहोत. आमच्या घराण्यास श्री मातेचे वरदान लाभले कि तुमच्या घराण्यात सात पिढ्या हरदास (कीर्तनकार ) होतील व प्रसाद म्हणून छोटी वीणां दिली. आमचे काका कै. श्री शेषबुवा हरिदास बासरकर हें सातवे कीर्तनकार होते.



श्री ज्ञान सरस्वती मातेचा आमच्या घराण्यावर आसाच वरदहस्त व आशीर्वाद राहोत ही तिच्या चरणी प्रार्थना



" यां कुन्देंदू तुषार हार धवला, यां शुभ्र वस्त्रावृता /


या वीणां वर दण्ड मंडित करा , या श्वेत पद्मासना //


या ब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता /

 

सामां पातु सरस्वती भगवती निश्शेष जाडया  पहा // " 







    ( चित्रफित तेलगु भाषेत आहे )




// नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे /
 वस मत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव //




           // इति श्री बासर सरस्वती देवि महात्म्य समाप्त //

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखन व अनुवाद कर्ता :--- श्री. माधव नागोराव बासरकर


ऋण निर्देश व संदर्भ लेखक :----- कै . श्री शेषबुवा हरिदास बासरकर .
                                                 कै. श्री नागोराव बासरकर
                                                 श्रीमान . के. परांकुशा चार्य .
                                                 श्रीमान. जी. माल्लेस्वर शर्मा .
                                                 श्रीमान . नारायण शास्त्री .


सर्व छाया चित्रे गुगलच्या सौजन्याने .


                          ---------छाया चित्रे ---------


मंदिर उद्यान.
images.jpeg



गाभारा प्रवेश.

dscn0406.jpg




मंदिर उद्यान.

basara-saraswati-temple.jpg



मंदिर मुख्य प्रवेश द्वार.
front_view.jpg


प्रवेश द्वार


dsc00013.jpg




                                                                             मंडप


                                                                              उद्यान


                                                                         श्री गंगा माता
                                                    










                                                                         गोपुर













--------------------------------------------------------------------------------------------------------------------