all लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
all लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 7 ) ..........!!!



शिल्प सोळावे ---


" स्पायडर म्यामन  "  Spider  Maman " 



" स्पायडर म्यामन " ( Spider Maman ) हे शिल्प १९९९ साली ब्राँझ , स्टेनलेस स्टील आणि मार्बलने शिल्पकार  Louise Bourgeois  ह्यांनी  घडविले आणि  Tate  Modern आर्ट ग्यालेरी इथे स्थापित केले . 


हे शिल्प एका कोळीनिची प्रतिकृती बनवलेली आहे. ह्या शिल्पाची उंची ३० फुट असुन ह्याच्या स्याकमध्ये पांढरे छोटे छोटे मार्बल्स ठेवण्यात आले आहेत आणी हे अंड्याच्या आकाराचे आहत. म्यामन म्हणजे कोळीण आई आणी तिची नाजुकताव रक्षात्मकल गुण ह्या शिल्पांत दिसुन येते.

शिल्पकाराने आपल्या ह्या कलाकृती बद्दल आपल्या भावना अश्या व्यक्त केल्यात.



"" The Spider is an ode to my mother. She was my best friend. Like a spider, my mother was a weaver. My family was in the business of tapestry restoration, and my mother was in charge of the workshop. Like spiders, my mother was very clever. Spiders are friendly presences that eat mosquitoes. We know that mosquitoes spread diseases and are therefore unwanted. So, spiders are helpful and protective, just like my mother.""


— Louise Bourgeois






शिल्प सतरावे ……. 



नॉटेड गन  शिल्प ( Knotted Gun ) 






नॉटेड गन  ( Knotted  Gun ) हे शिल्प अहिंसा ( Non Violence ) ह्या तत्त्वावर  स्विडीश शिल्पकार कार्ल फेड्रिक ( Carl Fedrik ) ह्यांनी प्रसिद्ध गायक, गीतकार व तसेच शांतता प्रेमी चळवळीचे शिलेदार जॉन लेननोन  नंतर त्यांच्या स्मरणार्थ सन १९८० साली हे शिल्प साकारले . 

ह्या शिल्पांत ४५ क्यालीबरचे पिस्तुल आहे आणि त्याची समोरील नळी ही पिरगळलेल्या स्थितीत व वरच्या बाजूस त्याचे तोंड अशी साकारलेली म्हणून ह्यास " नॉटेड  गन " असे संबोधण्यात येते. 



शिल्प अठरावे ……. 




द शार्क शिल्प ,ऑक्सफर्ड ,युके 








हे शिल्प शार्कच्या  २१ व्या जयंतीच्या निमित्याने John Buckley  शिल्पकाराने बनविले. हे शिल्प ३२ टन वजनाचे आणि २५ फुट लांबीचे आहे. 



ऑक्सफर्ड सिटी कॉन्सिल ने हे उभे करण्यास परवानगी नाकारली कारण त्यांना पक्की खात्री नव्हती की हे शिल्प अश्या घरावर उभे राहू शकेल ? लोकांवर पडण्याची त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त वाटत होती  शिल्प उभारणाऱ्या इंजिनिअरनी  जेव्हा त्याची खात्री दिली आणि टेक्निकली प्रुव्ह केले तेव्हा परवानगी देण्यात आली .   


शिल्प एकोणीसावे ………! 

 " स्वातंत्र्य " शिल्प ( Freedom ) Philadelphia, Pennsylvania, USA 






हे शिल्प जगप्रसिद्ध ग्रीक शिल्पकार Zenos Frudakis ह्यांच्या कल्पनेतून सोळाव्या स्ट्रीट  आणि विने स्ट्रीट , फिलाडेफिया , अमेरिका इथे साकार झाले . 

शिल्पकार हे शिल्प साकारण्या मागचे आपले  मनोगत  असे स्पष्ट करतो '



 
" I wanted to create a sculpture almost anyone, regardless 

of their background, could look at and instantly recognize 

that it is about the idea of struggling to break free. This 

sculpture is about the struggle for achievement of freedom 

through the creative process. "


जरी ह्या शिल्पात चार व्यक्ती दिसत असतील तरी एकच व्यक्ती डावीकडून उजवीकडे 

वेगवेगळ्या  स्थितीत सरकताना दिसेल. सर्वात प्रथम मृत व्यक्ति किवा ममी  

जखडलेल्या अवस्थेत दिसतो . 


दुसर्या अवस्थेत तो गुलाम जो स्वतः ची सुटका करण्यात धडपडत आहे, तिसर्या
चवथ्या स्थितीत तो संपुर्ण मोकळा झालेला आनंदाने आपले हात उंचावत जखडलेल्या 

स्थितीत तो स्वतःस जखडलेल्या अवस्थेतून  भिंती पासून  मोकळा होवून स्वतंत्र 

होण्यासाठी  बाहेर पडताना दिसतो.  

स्थितीतून स्वतंत्र झाल्याचा स्थितीत  दाखवला आहे. शिल्पकाराने अतिशय कल्पकतेने 

स्वातंत्र्य प्राप्तीची संकल्पना ह्या शिल्पा द्वारे दाखविले . 



विसावे शिल्प ………….!



इंद्रधनुष्या वर विराजमान "पिता / देव " शिल्प … 



कार्ल मील्लेस ( Carl Milles ) स्वीडिश शिल्पकार जे कारंजे शिल्प साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत

ह्यांचे वास्तव्य अमेरिकेत होता . यु एन ओ च्या स्थापना प्रित्यर्थ एक शिल्प साकारण्याची जबाबदारी कार्लनां  दिली गेली . 


त्या प्रमाणे त्यांनी मॉडेल  बनविले आणि सेक्रेटरी जनरल ह्यांना दाखविले . हे शिल्प  यु ऐन ओ मुख्यालयाच्या समोर " शांततेचे प्रतिक " म्हणुन स्थापित होणार होते  पण ,पैश्या अभावी आणि काही लोकांच्या हरकतीमुळे  हा प्रोजेक्ट सन १९५४ साली रद्द करावा लागला .


कार्ल  ह्यांचा निराशे पोटी सन १९५५ साली त्यांचा मृत्यु झाला . हे शिल्प कार्लच्या निधना नंतर ४० वर्षा नंतर कार्लचे शिष्य मार्शल फेड्रीक्स ( Marshall Fredericks ) ह्याने सन १९९५ साली नाका स्ट्याण्ड ,स्टाक होमच्या उपनगरात निर्माण केले  . हे शिल्प ६० फुट उंचीचे त्यावर एक नग्न पिता /देव आर्चच्या शेवटच्या टोकावर उभी आहे आणि त्या आर्चच्या  टोकातून पाण्याचा फवारा सोडण्यात आले.  




( समाप्त )

===========================================================================
=====================================================================




माहीती  आणि छायाचित्रे आंतरजाला वरून गुगल  ईमेजेसच्या सौजन्याने . 

रविवार, १७ जानेवारी, २०१६

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 6 ) ..........!!!



शिल्प तेरावे ………. !

एमिनेस्क्यु  (रोमानिया ).......!!



  एमिनेस्क्यु  हे रोमानियात प्रेमकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याच आठवणीत हे शिल्प साकारण्यात आले . 

ह्या कवीच्या जन्मदिनी म्हणजे १५ जानेवारीला इथे त्याच्या स्मरणार्थ मोठा उत्छव साजरा करतात व त्यांच्या  साहित्याची उजळणी केली जाते . 

 एमिनेस्क्यु  यांची रोमानियन भाषेतील एका  सुंदर कवितेचे इंग्रजी  भाषांतरीत कविता

" एंड ईफ …"  And if … 

And If …
And if the branches tap my pane
And the poplars whisper nightly,
It is to make me dream again
I hold you to me tightly.

And if the stars shine on the pond
And light its somber shoal,
It is to quench my mind’s despond
And flood with peace my soul.
And if the clouds their tresses part
And does the moon out blaze,
It is but to remind my heart
I long for you always.
(Translated by 
Corneliu M.  Popescu)





शिल्प चौदावे …।!


नदीकाठची माणसे …. ! ( People  of  the  River  )

सिंगापुरच्या नदीकाठी जर का तुम्ही सहज  भटकण्यास  गेलात तर तुम्हाला ह्या ब्रान्झ  शिल्पकृती दिसतील . ही  सर्व शिल्पे तेथील जिवन राहणीमानावर साकारलेली आहेत. 

ह्या शिल्पाद्वारे सिंगापुरचा इतिहास आणि त्याकाळची प्रगती नवीन सिंगापुर पिढीला अवगत होते. नदीच्या दोन्ही काठावर उंच उंच बिल्डींग्स आहेत आणि रम्य अश्या वातावरणात ह्या शिल्पकृती स्थापित केल्या आहेत.








 

 







 शिल्प पंधरावे ……!

रुंडले पिग्स मॉल, एडीलेट ( ओस्ट्रेलिया )   


 रुंडले मॉल म्हणजे दुकारांचे ब्राँझ शिल्पाचे समुह जो " A Day Out "
 या नावाने प्रसिद्ध आहे. शिल्पकार  Marguerite Derricourt  साऊथ अफ्रिकेत जन्मलेली जी वन्य प्राण्याशी बालपणापासून निगडीत होती ह्यांनी साकारले . ह्या शिल्पांत चार डुकरे ( Pig ) आहेत . 
त्यांतला पहिला जो उभा आहे तो "  Truffle " आणि जो बसलेला आहे तो " Horatio " आणि जो कचऱ्याच्या डब्या जवळ ऊभा आहे तो 
" Oliver  " शेवटी जो आशाळभूत नजरेनी कचऱ्यातील अन्नाकडे बघतो आहे तो " Augusta " 

हे शिल्प चितारण्यामागे शिल्पकार आपले  मनोगत असे स्पष्ट करतो .



" There is a long history of animal figures in urban sculpture which reflect their importance to our society. I chose to sculpt pigs because I was captivated by their shapes and rounded forms,especially when created in a butiful and enduring material like bronze. I really want people to touch them and interact with them ."






                                                             Horatio
      Truffle
     
                                                       Oliver

        Augusta

                                                         
 रुंडले             मॉलची 
छायाचित्रे …!                                                                                             
                                         
                                     











    क्रमशः ........

--------------- छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने          





गुरुवार, ११ जून, २०१५

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 5 ) ..........!!!



  शिल्प दहावे -----

      
 १०) " Man Hanging out ' हे शिल्प ओल्ड टाऊन , पराग्वे 
  (Prague) झेक रिपब्लिक इथे डेविड केर्नी (DavidCerny) 
  ह्यांनी १९९६ मध्ये ब्राँझ कलर मध्ये फायबर ग्लास ने बनविले . 

       हे शिल्प Sigmund Freud ह्यांचा जिवनावर  आधारित आहे .


      ह्या गृहस्थाला बऱ्याच  गोष्टीची अकारण भीती होती . त्यांतल्या 


       त्यांत स्वतःचा मृत्यु बद्दल सर्वात जास्त होती . हाच विषय घेऊन 


       ह्या शिल्पाची निर्मिती केली 














      शिल्प अकरावे -----




       ११ )  झेक शिल्पकार David Černý ह्यांची कलाकृती मानवी 

       डोक्याच्या फिरत्या धातूच्या चाकत्याच्या आधारे एक अद्भुत कारंजी  

        घडवली . 

      हे शिल्प सात फुट उंच चकचकत्या धातूच्या चकत्या ज्या 
     आडव्या बाजुने फिरत असताना एक मानवी डोके तय्यार होते                 आणि एक कारंजे तय्यार होते. ह्याचे वजन १४ टन आहे.  
      
                  हे कारंजे शिल्प जनतेसाठी २००७ साली Whitehall           

        Technology Park , Charlotte, North Carolina. इथे खुले              
          
         करण्यात आले . 













झेक शिल्पकार  Devid cerny  ह्यांची काही शिल्पकृतीची ही  चित्रफित , 
  



http://youtu.be/2dY7229C00g  



शिल्प बारावे --------

        

       12)  मुस्टांग ऑफ लासं कॉलीनस "  शिल्प 

      (The Mustangs of Las Colinas )  राबर्ट ग्लेन ह्यांनी       

       बनवून Williams Square ,लासं कॉलीनस,टेक्सास,अमेरिका इथे 

        स्थापित  केले. 

        
        ह्या शिल्पात उधळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या घोड्यांचे जे टेक्सास     
        प्रांतात ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचे मानले जाते . 

         हे मुस्टांग ( Mustang ) कळपाने पाण्याचा  ओढा   आहेत आणि 

         त्यांच्या खुरांनी पाणी उडत आहे हे प्रत्येक घोड्यांच्या पावलाखाली 

         छोटे छोटे कारंजे बसवून भासविले आहे. टेक्सास राज्याची 

          जिवनशैली संस्कृती, पुढाकार,आक्रमकता ह्या अश्वाच्या     

         माध्यमातून ठळकपणे दाखविले आहे. 











क्रमशः …………… 


====================================================================

चित्रे आणि विडीओ  गुगलच्या सौजन्यने……. 

सोमवार, ११ मे, २०१५

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 4 ) ..........!!!

शिल्प सातवे ………….! 


७) केलिप्स  ( Kelpies ) शिल्प स्कॉटल्यांड , युक़े 

हे शिल्प दोन घोड्यांचे ३० मीटर उंचीचे बनविण्यात आले ते फोर्थ आणि क्लाडे केनालवर बसविण्यात आले. हे शिल्प शिल्पकार Andy Scott 
(अन्ड्ये स्कॉट ) नि साकारले जे त्यांनी स्ट्या न्लेस्टील पासुन बनवले ज्यामुळे सुर्य प्रकाश आणि विद्युत प्रकाश रात्र आणि दिवस परावर्तीत होते मानून हे शिल्प बाराही महिने पाहण्यास मि ळ ते . 






                             शिल्प आठवे.........! 




           ८) लेस वोयेजुर्स ( Les Voyageurs ) 

 हे शिल्प फ्रेंच शिल्पकार Bruno Catalano ह्यांनी साकारले . ह्या ब्राँझ शिल्पात शहरी माणुस  कामावर जात आहे हे दर्शविले पण तेही नाविन्यपुर्णरितीने  ज्यांत  शिल्पाची काही अंग दिसत नाही
व ते गुप्त किवा हरवलेले असे दिसते . शिल्पकारांनी अशी १० शिल्पे marseille ह्या शहरांत बसवली आहेत.











                         शिल्प नववे ………!

 ९) " मजुर कामावर "आहे किंवा" मेनहोल मधुन डोकावणारा मजुर " 

 हे शिल्प ब्रास्टीसाल्वा, सोल्वाकिया( Solvakia ) हे शिल्प "कुमील " ( Cumil ) ह्या नावाने प्रसिध्द आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या शिल्पावर आदळुन बरेच अपघात झाले पण ह्या कामगाराचे  डोके अजुन शाबूत आहे . ह्यामुळे ह्या शिल्पाला स्वतःचे सूचना फलक मिळाले " Man  at  Work "








क्रमशः …………।  ---------------------------------------------------------

छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने …………। 

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

जगातील नाविन्यपूर्ण शिल्पकृती ( 3 )..........!!!





शिल्प " एक्सप्यान्शन " Expansion   न्युयार्क , अमेरिका . 


शिल्पकार ( Paige Bradley ) यांनी सात महिने कष्ट घेवून   प्रथम उत्तम दर्ज्याच्या व्याक्सने एक स्त्री जी ध्यानधारणा मुद्रेत बसलेली आहे हे  शिल्प बनवले . नंतर त्यांनी ते शिल्प  जमिनीवर आपटून फोडली तिचे बरेच तुकडे झाले . ते पाहून त्यास  वाटले की " हा काय मुर्खपणा मी केला ? " पण त्यातूनच त्यांना सुचले कि हे तुकडे परत जोडता येतील व ह्यातून काही तरी नवीन घडेल . ब्र्याडलीनी  ब्रांझ चे असेच  काही तुकडे कास्टिंग करून शिल्प घडविले पण प्रत्येक जोडाच्या आंत प्रकाशित करण्याची व्यवस्था केली आणि एक अद्भुत शिल्पाची निर्मिती झाली . ह्या शिल्पा मागची त्यांची भावना आणि तत्व ज्ञान त्यांच्याच शब्दांत अशी आहे . 


" From the moment we are born, the world tends to have a container already built for us to fit inside: A social security number, a gender, a race, a profession or an I.Q. I ponder if we are more defined by the container we are in, rather than what we are inside. Would we recognize ourselves if we could expand beyond our bodies? Would we still be able to exist if we were authentically 'un-contained'? "



























इगुंना पार्क  येथील शिल्प . एमस्टरड्याम , निदरल्यांड 



एमस्टरड्यामच्या दक्षिणेस Leidseplein  इथे एक छोटे पार्क आहे .त्या पार्कच्या भिंतीवर आणि  हिरवळीवर  सर्व बाजूस  घोरपडी सारखे दिसणारे इगुना सरड्याची मेटलने बनवलेली शिल्पे आहेत. 











======================================================================================