शिल्प सोळावे ---
" स्पायडर म्यामन " Spider Maman "
" स्पायडर म्यामन " ( Spider Maman ) हे शिल्प १९९९ साली ब्राँझ , स्टेनलेस स्टील आणि मार्बलने शिल्पकार Louise Bourgeois ह्यांनी घडविले आणि Tate Modern आर्ट ग्यालेरी इथे स्थापित केले .
हे शिल्प एका कोळीनिची प्रतिकृती बनवलेली आहे. ह्या शिल्पाची उंची ३० फुट असुन ह्याच्या स्याकमध्ये पांढरे छोटे छोटे मार्बल्स ठेवण्यात आले आहेत आणी हे अंड्याच्या आकाराचे आहत. म्यामन म्हणजे कोळीण आई आणी तिची नाजुकताव रक्षात्मकल गुण ह्या शिल्पांत दिसुन येते.
शिल्पकाराने आपल्या ह्या कलाकृती बद्दल आपल्या भावना अश्या व्यक्त केल्यात.
"" The Spider is an ode to my mother. She was my best friend. Like a spider, my mother was a weaver. My family was in the business of tapestry restoration, and my mother was in charge of the workshop. Like spiders, my mother was very clever. Spiders are friendly presences that eat mosquitoes. We know that mosquitoes spread diseases and are therefore unwanted. So, spiders are helpful and protective, just like my mother.""
— Louise Bourgeois
शिल्प सतरावे …….
नॉटेड गन शिल्प ( Knotted Gun )
नॉटेड गन ( Knotted Gun ) हे शिल्प अहिंसा ( Non Violence ) ह्या तत्त्वावर स्विडीश शिल्पकार कार्ल फेड्रिक ( Carl Fedrik ) ह्यांनी प्रसिद्ध गायक, गीतकार व तसेच शांतता प्रेमी चळवळीचे शिलेदार जॉन लेननोन नंतर त्यांच्या स्मरणार्थ सन १९८० साली हे शिल्प साकारले .
ह्या शिल्पांत ४५ क्यालीबरचे पिस्तुल आहे आणि त्याची समोरील नळी ही पिरगळलेल्या स्थितीत व वरच्या बाजूस त्याचे तोंड अशी साकारलेली म्हणून ह्यास " नॉटेड गन " असे संबोधण्यात येते.
शिल्प अठरावे …….
द शार्क शिल्प ,ऑक्सफर्ड ,युके
हे शिल्प शार्कच्या २१ व्या जयंतीच्या निमित्याने John Buckley शिल्पकाराने बनविले. हे शिल्प ३२ टन वजनाचे आणि २५ फुट लांबीचे आहे.
ऑक्सफर्ड सिटी कॉन्सिल ने हे उभे करण्यास परवानगी नाकारली कारण त्यांना पक्की खात्री नव्हती की हे शिल्प अश्या घरावर उभे राहू शकेल ? लोकांवर पडण्याची त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त वाटत होती शिल्प उभारणाऱ्या इंजिनिअरनी जेव्हा त्याची खात्री दिली आणि टेक्निकली प्रुव्ह केले तेव्हा परवानगी देण्यात आली .
शिल्प एकोणीसावे ………!
" स्वातंत्र्य " शिल्प ( Freedom ) Philadelphia, Pennsylvania, USA
हे शिल्प जगप्रसिद्ध ग्रीक शिल्पकार Zenos Frudakis ह्यांच्या कल्पनेतून सोळाव्या स्ट्रीट आणि विने स्ट्रीट , फिलाडेफिया , अमेरिका इथे साकार झाले .
शिल्पकार हे शिल्प साकारण्या मागचे आपले मनोगत असे स्पष्ट करतो '
" I wanted to create a sculpture almost anyone, regardless
of their background, could look at and instantly recognize
that it is about the idea of struggling to break free. This
sculpture is about the struggle for achievement of freedom
through the creative process. "
जरी ह्या शिल्पात चार व्यक्ती दिसत असतील तरी एकच व्यक्ती डावीकडून उजवीकडे
वेगवेगळ्या स्थितीत सरकताना दिसेल. सर्वात प्रथम मृत व्यक्ति किवा ममी
जखडलेल्या अवस्थेत दिसतो .
दुसर्या अवस्थेत तो गुलाम जो स्वतः ची सुटका करण्यात धडपडत आहे, तिसर्या
चवथ्या स्थितीत तो संपुर्ण मोकळा झालेला आनंदाने आपले हात उंचावत जखडलेल्या
स्थितीत तो स्वतःस जखडलेल्या अवस्थेतून भिंती पासून मोकळा होवून स्वतंत्र
होण्यासाठी बाहेर पडताना दिसतो.
स्थितीतून स्वतंत्र झाल्याचा स्थितीत दाखवला आहे. शिल्पकाराने अतिशय कल्पकतेने
स्वातंत्र्य प्राप्तीची संकल्पना ह्या शिल्पा द्वारे दाखविले .
विसावे शिल्प ………….!
इंद्रधनुष्या वर विराजमान "पिता / देव " शिल्प …
कार्ल मील्लेस ( Carl Milles ) स्वीडिश शिल्पकार जे कारंजे शिल्प साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत
ह्यांचे वास्तव्य अमेरिकेत होता . यु एन ओ च्या स्थापना प्रित्यर्थ एक शिल्प साकारण्याची जबाबदारी कार्लनां दिली गेली .
त्या प्रमाणे त्यांनी मॉडेल बनविले आणि सेक्रेटरी जनरल ह्यांना दाखविले . हे शिल्प यु ऐन ओ मुख्यालयाच्या समोर " शांततेचे प्रतिक " म्हणुन स्थापित होणार होते पण ,पैश्या अभावी आणि काही लोकांच्या हरकतीमुळे हा प्रोजेक्ट सन १९५४ साली रद्द करावा लागला .
कार्ल ह्यांचा निराशे पोटी सन १९५५ साली त्यांचा मृत्यु झाला . हे शिल्प कार्लच्या निधना नंतर ४० वर्षा नंतर कार्लचे शिष्य मार्शल फेड्रीक्स ( Marshall Fredericks ) ह्याने सन १९९५ साली नाका स्ट्याण्ड ,स्टाक होमच्या उपनगरात निर्माण केले . हे शिल्प ६० फुट उंचीचे त्यावर एक नग्न पिता /देव आर्चच्या शेवटच्या टोकावर उभी आहे आणि त्या आर्चच्या टोकातून पाण्याचा फवारा सोडण्यात आले.
( समाप्त )
===========================================================================
=====================================================================
माहीती आणि छायाचित्रे आंतरजाला वरून गुगल ईमेजेसच्या सौजन्याने .
माहीती आणि छायाचित्रे आंतरजाला वरून गुगल ईमेजेसच्या सौजन्याने .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा