पाश्चिमात्य माध्यमे आणि पर्यटक भारताबद्दल बऱ्याच वर्षांपासून असे दाखवतात की येथील माणसे मागासलेले आहेत हे आपल्या लिखाणातून किंवा फोटोंच्या माध्यमातून दाखवताना आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे.
भारत हा देश गरीब आहे इथे लोक व जनावरे मोकाटपाने हिंडताना दिसतात. आणि म्हणून काही काळा पूर्वी जगातून येणार पर्यटक प्रथम विचारणा करतो की गरीब लोकवस्ती कुठे आहे म्हणजे तिथे जाऊन आपल्या क्यामेऱ्यात गचाळ द्रुष्ये कैद करून आपल्या देशांत भारताची परीस्थिती दाखवतात.
हे असे का करतात ते ?कोणास ठाऊक कदाचित प्रपोगंडा असेल भारत विरुद्ध की हा देश म्हणजे " third world. " आहे.
हा समज आता तसा कमी झाला आहे तो आपले भारतीय जागतिक सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्यामुळे .
भारत म्हणजे " स्लमडॉग " नाही पण एके काळी हा देश
" सोने की चिडिया " म्हणून प्रसिद्ध होता आणि त्याची संस्कृती फार प्राचीन आहे . येथील गावे आणि शहरे जागतिक दर्जाची आहेत हे ह्या मंडळींना दाखविण्यासाठी काही छायाचित्रे .
" सोने की चिडिया " म्हणून प्रसिद्ध होता आणि त्याची संस्कृती फार प्राचीन आहे . येथील गावे आणि शहरे जागतिक दर्जाची आहेत हे ह्या मंडळींना दाखविण्यासाठी काही छायाचित्रे .
१ ) यमुना एक्सप्रेस ( दिल्ली -आग्रा )
२) आमची मुंबई
३) वीरभुमी आणि लेक सिटी उदयपूर
४) कोलकत्ता ( आनंदी शहर )
५) काश्मीर ( भारताचे नंदनवन )
६) साबरमती ( अहमदाबाद )
७) भारताची शान प्रजासत्ताक दिन परेड ( दिल्ली )
८) लोटस टेंम्पल
९) क्विन नेकलेस आणि बांद्रा -वरळी सीलिंक ( मुंबई )
१०) राजवाड्याचे शहर जयपुर आता आधुनिक झाले.
११) दक्षिणेकडील अद्भुत शहर हैद्राबाद येथील चारमिनार .
१२ ) भारताची आय टी राजधानी बंगलोर
१३) नॉर्थ ईस्ट भारताचे प्राण असलेले शहर ऐझवाल .
१४) भारताचे अभिमान नॉर्थ ईस्ट गंगटोक .
१५ ) महामार्ग ( हायवे ) चन्नई .
१६) चन्नई येथील सुंदर मरीना बिच
१७ ) छत्रपती शिवाजी इंटरनेशनल एरपोर्ट मुंबई
अशी अनेक छायाचित्रे दाखविता येतील सुंदर भारताची पण पाश्चिमात्य लोक व माध्यमे फक्त वाईट गोष्टीच दाखवितात जणुकाही हेच सत्य आहे या थाटात .
एकविसाव्या शतकात भारत हा शक्तिशाली देश बनत आहे आणि त्याची आर्थिक, सामाजिक व्यवस्था मजबुतीकडे वाटचाल करीत आहे . आता पाश्चिमात्य देश भारताकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत .एक प्रचंड बाजारपेठ ,तरुण प्रशिक्षित वर्ग सर्वच क्षेत्रात आघाडीवर , स्थिर प्रशासन , गुंतवणुकीस वाव असलेला , महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेला देश अशी ख्याती होत आहे.
// जय भारत //
-----------------------------------------------------------------
माहिती आणि छायाचित्रे डेमोक्रॅटिक पेपर ह्यांच्या सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा