गुरुवार, ५ मे, २०११

न्याय व्यवस्थेत..............भ्रष्टाचार !!!!!!!!!!

रामरावजी एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र सैनिक आपल्याच विचारात गढलेले चालत जात होतें. त्याच वेळी त्यांचे मित्र माधवराव पण सकाळच्या जॉगिंग साठी निघाले. त्यानां रामरावजी आपल्याच तंद्रीत उदग्विन्न मनस्थितीत कोणा कडे लक्ष न देतां चालताना दिसले. माधवरावनी त्यानां बऱ्याच हाका मारल्या पण त्यांचे लक्षच नव्हते .


माधवराव जवळ जाऊन म्हणाले' रामराव काय झाले आपण असे चिंतीत का आहात ? "

" अहो मी विचार करीत होतो कि आतां यां देशात काहीं राम राहिले नाही तर सर्वच रावण झालेत. " रामराव.

" काय म्हणता रामरावजी आण्णा हजारे व आपणासारखी निष्टावान, सामाजिक बांधिलकी मानणारे या देशात आहेत म्हणूनच देश चालला आहे." जरू काहीं खास झाले आहे ज्या मुळे आपण इतके चिंतीत आहात " माधवराव.

" बरोबर " माधवरावजी

" बातमी आली कि न्यायमूर्ती सेन यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोपां करीता संसदेत महा अभियान चालविण्यात येणार आहे "

" पण यात इतके विचार करण्या सारखे काय आहे ?

" का नाही ? माधवराव आतां तर न्याय व्यवस्थेत पण भ्रष्टाचार होतो व त्यांत मोठ मोठे न्यायाधीश सामील आहेत ? "

माधवराव म्हणाले "पण ही कांही नवी गोष्ट नाही यां पूर्वी ही एका दक्षिण भारतातील न्यायाधीशावर पण महा अभियोग चालवला गेला संसदेत आणि त्यावेळी क्षेत्र वाद उकरून त्यानां वाचविण्यात आले. त्याच प्रमाणे न्यायाधीश सेन च्या बाबतीत तेचं होईल

" ही तर खरी आश्चर्याची बाब आहे !! रामराव म्हणाले.

" अहो कारण संसदेत बसलेली काहीं मंडळी अश्या बेईमान,भ्रष्टाचारी लोकांचे मित्र जें आहेत. ते नक्कीच सेन यानां पण वाचविणार " नाही का?......माधवराव.

" खरें सेन वाचतील ?".......रामराव

" ते मला माहित नाही पण एक खरें कि मताच्या राजनीतीत काहीं मते जरूर सेन यांच्या बाजूस पडतील " .......माधवराव.

" अशी घटना संसदेत घडते म्हणजे .....?  नितीमत्ता उरलीच नाही ? असे खेदाने म्हणावे लागते. ......रामराव.

रामरावजी जेव्हा सर्वत्र व  सर्व थरात भ्रष्टाचार माजलेला आहे तिथे न्यायमूर्तीची काय गोष्ट घेऊन बसलात ?

वरिष्ठ वकील श्री भूषण यांच्या म्हणण्या प्रमाणे आतापर्यंतच्या १६ प्रधान न्यायाधीशां पैकी किमान ८ न्यायाधीश भ्रष्टाचारात लथपथलेले होतें.

" अरे देवा !!! इतका भ्रष्टाचार माजलेला आहे ? पण हें श्री भूषण कोण आहेत ?........रामराव.

" श्री भूषण हें सर्वोच्य न्यायालयातील एक वरिष्ठ वकील व पूर्वीचे उत्तर प्रदेश राज्याचे " कायदा मंत्री " होतें. रामरावजी ह्यांच्या मुळेच श्रीमती इंदिरा गांधीनी देशात "आणि बाणी " लागू केली कारण समजवादी नेते श्री राजनारायनजी राय-बरेलीतून श्रीमती गांधी विरुद्ध निवडणूक लढवीत होतें .

या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याची खात्री असल्यामुळे श्री राजनारायणचे वकील श्री भूषण यांनी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला. सुप्रीम कोर्टाने राज नारायण यांच्या बाजूने निकाल दिला व श्रीमती इदिरा गांधी यांची निवड रद्द केली.

तेव्हां इंदिराजींनी आपले पंत प्रधान पद टिकविण्यासाठी देशात "आणि बाणी'" लागू केली व सर्व विरोधी नेत्यांना कोठडीत डांबले. ........माधवराव.

" श्री भूषण हें भ्रष्टाचारा विरुद्ध लढणारे वकील  चारित्र्यवान  आहेत  तर ? "......रामराव

" हो तसें नसते तर श्रीमती इंदिरा गांधीनी त्यांना केव्हाच आपलेसे केले नसते का ? '...माधवराव.

माधवरावजी सेन यांची बातमी ऐकून जेवढी निराशा झाली त्याहून जास्त सुखावलो तो तुमच्या  या माहिती मुळे.

" म्हणूनच मी म्हणतो कि काही  चारित्र्यवान , इमानदार ,सामाजिक बांधिलकी असलेलेल्या व्यक्ती मुळे हा देश चालला आहे. ".......चिंता एवढीच वाटते कि सर्व सामाजिक कार्यकर्त्याचे बलिदान व्यर्थ न जावो .......माधवराव .

" आपण असे का म्हणता ?"........रामराव.

" कारण असा कोणताही वर्ग उरला नाही जो बिकाऊ नाही आणि प्रत्येक वर्गात सच्ची ,सामजिक बांधिलकी असणारे कमी,कमी होत आहेत."

माझी परमेश्वराकडे एकच मागणे आहे कि देवा याना सुबुद्धी दे व जागृतकर भ्रष्टाचार विरुद्ध लढा देण्यासाठी..........माधवराव.

" तथास्तु "............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: