times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

भारतीय लोकशाहीस आता हवे आहे द्वीपार्टी चे राजकारण .......!



भारतीय लोकशाहीस आता हवे आहे द्वीपार्टी चे राजकारण .......!

                               ( एक व्यंगात्मक लघु लेख )


भारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने 
भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  राजकीय पक्ष  बनला . कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे, उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या . काहीं कॉंग्रेस नाराज लोकांनी स्वतःचे वेगळे पक्ष काढले जसें राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्रिणमुल कॉंग्रेस, ऐ डि यम के, डि यम के, टी यम सी , टी डि के, यस पी, बी यस पी, इत्यादि.प्रत्येक पक्षाचा उद्देश निराळा व एकमेकास न पटणारा असा एक राजकीय घोळका भारतात निर्माण झाला .

देशातील दोन राष्ट्रीय पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भा ज पा हें होत .कॉंग्रेस स्वतःला सेकुलर ( निधर्मवादी ) म्हणविते तर भा ज पा हिंदुत्वादी . दोघांनीही ह्याचा बुरखा पांघरून आप आपले सत्तेचे उदिष्ट सफल होण्यासाठी उपयोग करतात . कॉंग्रेस तर अल्पसंख्यांक लोकांचे   आपणास किती कणव  आहे हे दाखवून आपली राजकीय इच्छा पूर्ण करीत आली .तर भाजपा ही हिंदुत्ववादि व जातीभेद करणारी म्हणून व ईतर धर्मांचा द्वेष करणारा पक्ष अशी जनमानसांत पसरविण्यात काही लोकांनी  आपले उद्दिष्ठ साधले  . जरी भाजपा आज सेकुलरवादी आहे असे म्हणत असेल तरी विरोधी म्हणतात त्यांचा छुपा येजेन्डा हा हिंदुतच आहे.


परदेशी हितसंबंधी , धर्मांध संस्था व मतदाताची मतदांन प्रक्रियेत दिसणारी उदासीनता ह्या मुळे दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षाना सरकार स्थापण्यास पुरेसे लागणारे संख्याबळ मिळेनासे झाले . तेंव्हा पासुन मिली जुली सरकार ( आघाडी चे राजकारण व सत्ता ) सुरु झाले .


देशाचा राज्यकारभार सुचारुपणे चालविणे दिवसे दिवस कठीण होत आहे . ह्या मुळे भारतीय राजकारणास स्थिरता मिळेनाशी जाहली . कारण प्रमुख पक्ष ईतर अनेक प्रादेशिक पक्षाना घेवून सरकार चालवताना अनेक अडथळे व प्रत्येक पक्षाची राजकीय इच्छे मुळे सुचारूपपणे चालण्याची प्रथाच मोडकळीस आली. राज्य करणाऱ्या पक्षास स्वहित व ईतर पक्षाचे हित जपणे अशा दुहेरी कात्रीत सापडलेली आढळते. ह्याचा परिणाम देशाच्या प्रगतीवर होत आहे कोणतेही देशहित काम होणे दुरापास्त झाले त्यातून असंख्य आर्थिक घोटाळ्यामुळे देशाचा करभार आणि सर्व आघाडीवरची प्रगती कासवाच्या गतीने होत आहे.


ह्या सर्वावर एकाच तोडगा संभवतो ( जरी तो हास्यास्पद असेल ) व असंभव पण असेल तरी खालील विचार बघा आपणास पटतात का ?

सध्या भारतीय राजकारणामध्ये दोनच मुख्य पक्ष आहेत एक कॉंग्रेस व दुसरी भाजपा ह्या दोनीही पक्षांत मत-मतांतर आहेत हें आपण सर्वच जाणतो तरी पण राष्ट्रहितासाठी व स्वहितासाठी दोघेही एकमेकाच्या जवळ आले व आघाडी तत्वावर राज्यकारभार केला तर....भारतीय राजकीय पटलावर काय धमाल होईल नाही ?


प्रथम ह्या दोन्ही पक्षांनी मिळून एक नवीन पक्ष स्थापावा व त्याचे नामकरण " कॉंग्रेस भारतीय पक्ष ' " व दोघांनी आपल्या मत मतांतारावर असा तोडगा काढावा कि  जेणे करून प्रत्येकाची राजकीय व आर्थिक इच्छा जोपासली गेली जाईल .

दुसरे म्हणजे डावे, उजवे कामुनीस्ट ईतर क्षेत्रीय पक्ष मिळून एक पक्ष किवां आघाडी झाली कि मग देशात फक्त दोनच पक्ष राहतील व हें सर्वजण आलटून पालटून राज्य करतील .

समजा अश्या प्रकारचा समझोता खरेच झाला तर ' काँग्रेस भारतीय पक्ष " निवडणुका जिंकून राजकारभार करील व काहीं वाटाघाटी होतील व एका समान कार्यक्रम व जागा वाटप ह्यावर समझोता होईल.


कदाचित तो "समझोता " असा असेल ........

१) दोन पंतप्रधान असतील ( भारतीय घटनेत दुरुस्ती करून ) एक कामकरणारा व दुसरा बिनकामाचा . आतां पर्यंतच्या सध्याच्या पंतप्रधानाची कामगिरी बघता त्यांना बिनकामाचा व आडवाणी यानां कामाचा पंतप्रधान बनवावे.


२) सोनिया गांधी यांना अजिवन पक्षाचे अध्यक्ष पद व राजपुत्र राहुल यास अजिवन पक्षाचे बोधचिन्ह म्हणून वापरावे तर श्री. वाजपेईना पक्षाचे खंदे वक्ते व कवी म्हणून नेमावे.


३ ) पूर्वीच्या कॉंग्रेसचे वफादार म्हणून अंथोनी व चिदंबरम यानां अनुक्रमें गृह  नसलेले गृहखाते व अनर्थमंत्री नेमावे. तसेंच  लॉं आणि डिसआर्डर आणि मिस फार्मेशन व ब्राड कास्टिंग खाते अनुक्रमें जेटली व सुषमा यांना देण्यात यावे.


४) पूर्वी कांग्रेस व भाजपा सेक्युलर, हिदुत्व विचारधारा ठेवत असत आता  युतिमुळे त्यांनी एक नवी विचारधारा " सांस्कृतिक " घ्यावा म्हणजे सर्व राजनीतिक लोकांत एकाच प्रकारची " संस्कृती ' असेल......... ती कोणती ? आपण सुज्ञ जाणताच.


५ ) " राम मंदिर " उभारण्याचा प्रश्न अश्या प्रकारे सोडवावा कि मंदिर त्याच जागी उभारावे पण त्याचे निर्माण कार्य कलमाडी यांच्याकडे द्यावे म्हणजे ते कधीच पूर्ण होणार नाही व तसेंच भिजत राहील.


६ ) भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलने, उपवास करणारे गांधीवादी श्री हजारे यानां भारतीय वकील बनवून अंटा र्टीकेस पाठवावे कारण आपले राजकीय संबंध आणखी जास्त मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान कामी येईल.

बाबा रामदेव यानां भारतीय योगी म्हणून संपूर्ण जगात पाठवावे व भारतीय योग ह्याची दिक्षा देत सतत फिरत राहावे ह्यामुळे योगास जागतिक मान्यता मिळेल.


७ ) नरेंद्र मोदी जें दोघानाही डोईजड होतील त्यांना प्रधानमंत्री म्हणून शेजारच्या हिंदू राष्ट्र नेपाळला नेमावे कारण जगात तेचं एक हिंदुराष्ट्र आहे. मोदी एक सच्चे कार्यकर्ते आहेत व त्यां देशातील सर्व दुर्लक्षित गोष्टीकडे व मागासलेले असल्यामुळे ते सर्व ठीक ठाक करतील यांत शंकाच नाही.


वरील सर्व समझोत्या प्रमाणे झाल्यास भारतीय जनता खऱ्या अर्थाने शांततेत जिवन जगु शकेल अशी आशां करू व राज्यकारभार पण सुचारुपणे चालेल. भारतीय संसद कोणतीही बाचाबाची, हुल्लडपणा न होता १०० दिवसाच्या वर चालेल ह्याची खात्री असेल व सर्व निवडून आलेले राजकीय नेतेगण शांतपणे  आपआपली अ-लोकोउपयोगी कामे करतील अशी आशां करुया.


!!!.......जय भारत............  मेरा भारत महान..........!!!


---------------------------------------------------------------------------------------------------------

( हा लेख श्री जुग सरय्या ह्यांच्या TOI मधल्या टिप्पणीच्या आधारे लिहिला )

गुरुवार, ५ जुलै, २०१२

राजकारणात उतरू इच्छिणाऱ्याना निवडणुक लढविण्यासाठी राजकीय योग्यता परीक्षा अनिवार्य करावी ....????



सर्व विध्यार्थी वर्गाची खरी परीक्षेची वेळ आहे. त्यातल्या त्यांत जें विध्यार्थी आय आय टी प्रविशाशाठी उछुक असतील त्यां सर्वाना HRD मिनिस्ट्रीच्या नवीन प्रपोजल प्रमाणे सर्वाना कॉमन प्रवेश परीक्षेस बसावे लागेल. इतकेच नाही तर सर्व NIT 's , IIIT,s इच्छुक विध्यार्थ्याना पण ही परीक्षा अनिवार्य केली आहे . हा विषय आतां सर्व भारतात वादाचा ठरला आहे.

परवाच कापील  सिबल यांनी स्पष्ट शब्दात एका TV मुलाखतीत म्हणाले काहीं झाले तरी ह्यात बदल होणार नाही. काहीं IIT"S नी ह्याचा निषेध नोद्विला आहे व ते ठामपणे म्हणतात कि नेहमी प्रमाणे ते त्यांची प्रवेश परीक्षा घेणार. हा वाद कुठवर जाईल हे अंदाजणे कठीणच आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेची स्वयततेचा अधिकार डावलून हा प्रकार केला जात आहे. ह्या मुळे विध्यार्थी वर्गावर प्रचंड ताण पडणार आहे. बिचारे मुले ह्यात भरडली जाणार आणि प्रचंड तणावाखाली ते आणि त्यांचे आइ वडील असणार आहेत.


आजकाल नुसते इन्जिनिअरिन्ग, मेडिकल किवां बिझिनेस आडमिंनीस्ट्रेशन महाविध्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी नाही तर जवळ जवळ सर्व प्रकारच्या पाठ्यक्रमासाठी जीव घेणी चढा ओढ आहे .कारण प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी ९० % मार्क असावे लागते. म्हणूनच बरेच विध्यार्थी विदेशातील युनिव्हर्सिटी मध्ये जाण्यास उछुक असतात कारण शैक्षणिक दर्जा तोच आणि इथल्या पेक्षा खर्च कमी लागतो.


विध्यार्थ्यांच जाऊ द्या पण भारतात सर्व बाबतीत परीक्षा अनिवार्य आहे . आपणास माहित आहे कि सर्वच सरकारी, निमसरकारी,आणि प्रायव्हेट क्षेत्रात ठराविक कला नंतर चाचणी परीक्षा घेतली जाते ते मग बढतीसाठी किवां जें काम करतो त्या मध्ये नवीन आलेल्या गोष्टीची माहिती आहे किवां करून घेणे हा उद्देश असतो. डॉक्टर, वकील, लेखापाल, वस्तू विशारद,एरलाईन पायलेट सरकारी कर्मचारी, ह्या सर्वाना कोणत्याना कोणत्या सतत परीक्षा ध्याव्या लागतात ते त्यांची त्या त्या विषय मधली क्षमता वाढविण्यासाठी .


फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार. हीच मंडळी आपणा सर्वावर राज्य करणार. देशातील बुद्धिजिवी, डॉक्टर , वैद्यानिक , बिझिनेस ऐक्झिक्यूटीव , इंजिनिअर्स, टीचर्स, ह्या सर्वाना आपली त्या त्या विषयातील त्यांची क्षमता वेळोवेळी कोणती ना कोणती परीक्षा देवून सिद्ध करावी लागते .

पण बघा किती विरोधाभास आहे आपल्या प्रजासत्ताक देशात ज्यांचे अगदीच तोडके शिक्षण असले तरी हें लोक देशाचा कारभार चालवु शकतात. ते ही त्या विषयाचे प्राविण्य तर नाहीच नाही पण जुजबी ज्ञान पण नसले तरी . ह्याला पण अपवाद आहे काहीं नेतागण जें शिक्षित व राज्य कारभारा विषयीचे ज्ञान असणारे आभ्यासु पण सरसकट पहिले तर जें लोक दुसऱ्या कोणत्याही कामासाठी योग्य नाहीत ,पैसा व मसल पावर गुंड प्रवृतीचे असतात ते ह्या राजकारणात येतात. कारण इथें येण्यासाठी कोणतेच नियम नाहीत. जें लोक राजकारणात उतरू इच्छितात त्यांना एक प्रकारची " क्षमता परीक्षा " जी मौखिक व राज्य कारभारा विषयी कितपत माहिती आहे हें ठरविण्यासाठी कां असू नये ?


सध्याच्या नियमात तो अंगठा बहाद्दर असला तरी त्याला निवडणुकीत उभे राहता येते फक्त तो गुन्हेगार असू नये. हुशार राजकीय लोकांनी गुन्हेगारीची ही परिभाषा पण आपल्या सोई प्रमाणे लावली .ज्या व्यक्तीवर कोर्टात केस आहे आणि जो पर्यंत त्याला न्यायपालिका दोषी ठरविणार नाही तो पर्यंत तो गुन्हेगार नाही. म्हणूनच बरीच राजकीय मंडळी जरी कैदेत असतील तरी ते निवडणूक लढवीत आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे निवडून पण येत आहेत .ही आपली लोकशाही म्हणावे कि काय ?


भारतीय जनतेचे असे म्हणणे आहे कि ह्या राजकीय नेत्यांना ज्यांना राजकारणात यायचे आहे त्यानां प्राथमीक शिक्षण पात्रता असावी जसें १२ वि पास किवां ग्राजूऐट. असे झाल्यास हा एक मोठा वादाचा विषय होईल व सर्व राजकीय पक्षा कडून याचा विरोध केला जाण्याची शक्यता कोणी नाकारणार नाही .कारण जें लोक ही शैक्षणिक क्षमता आपल्या गरिबी मुळे म्हणा किवां सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वंचित राहिले म्हणून ह्यावर वादविवाद होतील.




बरे असे केले तर जें उमेदवार महात्वाकांशी आहेत त्यानां लेखी परीक्षे ऐवजी मौखिक परीक्षा ध्यावी ती पण एका गठीत समिती कडून ज्यामध्ये निर्वाचन अधिकारी, बुद्धीजीवी व सरकारी उच्च अधिकारी असतील . हें समिती सदस्य इच्छुक व्यक्तीची बौद्धिक,राजकीय क्षमता किती योग्यतेची आहे हें मौखिक मुलाखतीतून जनते समोर मांडतील व ते ज्यांना ते उत्तीर्ण करतील त्यांनाच फक्त निर्वाचन अधिकारी निवडणूक लढविण्यास पात्र ठरवतील. काय पटते का आपणास ?


आजची राजकीय परिस्थिती पाहता कोण्या एका पार्टीला बहुमत मिळणे कठीण आहे. प्रादेशिक पार्ट्या दिवसे दिवस आपली शक्ती व संख्याबळ वाढवत आहेत . त्यामुळेच आपल्या कडे गेली दोन दशक मीलीजुली सरकारे राज्य करीत आहेत . येत्या काहीं दशकांत तरी कोण्या एका पार्टीची राज्य करण्याची क्षमता राहणार नाही. प्रांतीय पार्ट्या केंद्रात प्रबळ होत आहेत व येनकेन प्रकारे आपल्या राज्याला कसा फायदा होईल हें पाहत आहेत. हें ही खरें आहे कि केंद्र कडून मिळालेला निधी राज्यातील लोकां पर्यंत किती पोहोचतो ? हा वेगळा विषय आहे.

केंद्रामध्ये जाणारी राजकीय व्यक्ती मग ती कोणत्याही पक्षाची कां असेना त्यांच्या जवळ उच्च प्रतीची बुद्धी असावी जेणे करून ईतर देशातील धेयवादी व्यक्ती बरोबर चर्चा करण्यास सक्षम व विषयाची जाण असावी .सध्याच्या राजकीय मंडळीत " राजकीय व्यवस्थापन " अगदी नगंन्य आहे म्हणूनच मित्र पक्ष हट्टी व अडेलटट्टू झालेत . त्यांना वाद्विवादा पेक्षा समोरा समोर बसून वैचारिक व सामंजस्याने समजावून आपले म्हणणे साध्य करून घेण्याची क्षमताच नाही म्हणूनच सरकारीपक्ष ज्या योजना आणते त्याला त्यांचेच मित्रपक्ष विरोध करतात व संपूर्ण योजनाच बारगळते व देशाचे नुकसान होते.



म्हणून "राजकीय क्षमता "परीक्षा ही एक चांगली उपाय योजना आहे असे मतदारस वाटते . पण दुर्दैवाने राजकीय लोकाना हें पटणारच नाही आणि म्हणूनच आजच्या राजकीय परिस्थितीत आपले नेतागण सर्व फक्त हुजरे होण्यात समाधानी आहेत.



अशी आशा करू कि हा चाललेला राजकीय खेळ व देशाची दुर व्यवस्था दुर कारयाची असल्यास सर्वांनी एक मुखानी राजकीय व्यक्तींना काहीं तरी पात्रता ठरविण्यास भाग पडावे तरच आपल्या पुढील पिढीस खरी लोकशाही अनुभवास मिळेल.

मेरा भारत महान ....!!!


----------------------------------------------------------


सौजन्य --जुग सुरैया ( TOI ) यांची टिपणी.

रविवार, २ जानेवारी, २०११

" स्मार्ट पाकीट " (Wallet ) एक नवा शोध .......जो आपले बँक आकॅंउंट शिल्लक नियंत्रित करतो.

बऱ्याच वेळा आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण आतां ते शक्य करून दाखविले आहे शंशोधकानी.त्यांनी असे स्मार्ट पाकीट तय्यार केले आहे कि ज्या मुळे तुम्हास वेळो वेळी तुमच्या बचत खात्यात किती पैसे शिल्लक आहेत याची माहिती देईल. त्यां योगें तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण आणू शकता.



Massachusetts Institute Of Technology (USA ) च्या संशोधकांनी तीन प्रकारच्या पैश्याच्या पाकिटाचे प्रोटो टाईप बनविले आणि ज्याच्या द्वारे आपणास आपले बँक खात्यात किती पैसे आहेते ते कळते. त्यां वरून आपण आपली खरीदी करावी का नाही ते ठरवू शकतो.


पहिले पाकीट ( wallet ) आखडले जाते जेव्हा तुमचे बँक खात्यात शिल्लक कमी असते.

दुसरे पाकीट ( Wallet ) ते तर इतके घट्ट आकासते कि ते उघडणे कठीण होऊन जाते. तेव्हां समजावे कि आपली बँक शिल्लक कमी आहे.

तिसरे पाकीट ( Wallet ) तर ह्या दोनीही पेक्षा वेगळे आहे. तुम्ही जस जसें पाकिटातून पैसे खर्च कराल तस तसें ते तुम्हास सुचना मेल द्वारे पाठविते.

आश्चर्य वाटले नां ?

पण हें तीनही प्रकारची पाकिटे सध्या प्रोटोटाईप अवस्थेत व्यवस्थित काम करीत आहेत.
जर का सर्व बँका व उपभोगता यांनी मागणी केली तर
पुढच्या काहीं वर्षांत आश्या प्रकारच्या पाकीटाचां मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्य आहे.

ह्यां तीन ही पाकिटात एक छोटासा काम्पुटर बसवलेला आहे आणि ह्यास ब्लू टूथ नि तुमच्या मोबाईल ला जोडता येते आणि हें माया जाल ( इंटरनेट ) शी जोडल्यामुळे तुमच्या बँक खात्याची माहिती लगेच मिळते.

याचाच अर्थ असा कि तुमच्या पाकिटातील काम्पुटर सतत डेटा अपडेट करत राहील व आपल्या खात्यातील वेळो वेळची शिल्लक पण कळते. ह्या उपयुक्त माहिती द्वारे आपण खर्च करावा किवां नाही हें ठरविता येईल.


काय आहे कि नाही उपयोगी पडणाऱ्या पैश्याच्या पाकिटाचा नवीन शोध ?