lekh.dewan-ghewan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lekh.dewan-ghewan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

खरेच " कलकी " अवतार ही शेवटची आशा ...??

















जस जसें वर्षे जात आहेत यु पी ऐ सरकारच्या कारभाराची तस तशी घोटाळ्यांची पण वाढती कमान दिसत आहे. ह्या सर्व घोटाळ्यांची माहिती गोळा करीत असताना असे दिसून आले कि प्रत्येक वर्षी ह्यांची चढती भाजणीच आहे हें खालील संगृहीत केलेल्या आकडेवारी वरून दिसून येईल.
 
 
 
साल.................. घोटाळे.
२००८                     ७
२००९                     ९
२०१०                     २३
२०११ -१२              २२ ...... आता पर्यंत.


असे नाही की स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घोटाळे झाले नाहीत पण सध्याच्या तुलनेने फारच कमी होतें किवां ते उजेडात येत नव्हते . पण  हाल्लीची 
राजकीय नेते मंडळीनी केलेल्या घोटाळ्यांचा  काहीं अंतच लागेना रोज नवी घोटाळा जनते समोर येत आहे आणि त्यांतील रकमा बघूनच जनतेचे तोंडचे पाणी पाळले.


कोणीही हें नाकारणार नाही की खिचडी ( coalition ) सरकार चालविणाऱ्याच पक्षाच्या सर्वे सर्वा सोनिया गांधी आणि स्वच्छ चारित्र्याचे आपले पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा कारभार दिवसे दिवस भ्रष्टाचारी लोक चालवत आहे. आणि आता पर्यंतची आकडेवारी बघता जवळ जवळ छोटे मोठे घोटाळे मिळून ८० च्या जवळ गेलेत व ह्यात गुंतलेला पैसा जवळ जवळ १९ लक्ष करोड इतका आहे आणि ह्यांत काळा पैसा जो स्विस ब्यांकेत आहे जमेस धरल्यास भारताच्या अर्धा GDP २०११-१२ इतका होईल.


भारतीय न्यायव्यवस्था जागरूक व कर्तव्यदक्ष असल्यामुळे बरेच घोटाळे भारतीय जनतेसमोर आलेत. कमीत कमी तात्पुरते कां होईना राजकीय शक्तींवर बराच दबाव आला जें भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालत असत. टेलिकॉम मिनिस्टरला राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली.


एक  कॉंग्रेस खासदार CWG घोटाळ्यात सापडला, आणि त्याला संपूर्ण उन्हाळा व हिवाळा जेलच्या कोठडीत घालवावी लागली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण,देशमुख याना पाय उतार व्हावे लागले कारण आदर्श हौसिंग घोटाळ्यांत CBI ला यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले व  त्यानी  आपल्या चारशिट मध्ये तसा उल्लेख  ही केला.


दोन पूर्व मुख्यमंत्री गोवा राज्याच्या  खाण घोटाळ्यात असल्याचा CBI शोध घेत आहे. कर्नाटकाचे भाजपा पूर्व मुख्यमंत्री येद्द्युराप्पा पाय उतार झाले व त्यांच्यावर क्रिमिनल केसेस टाकण्याची तयारी चालू आहे. बंगारू  पूर्व भाजपा लक्षुमण अध्यक्ष १ लक्ष रुपये घेताना पकडले गेले. तसें बघितले तर अजून किती लोक अश्या घोटाळ्यांत सापडतील काहीं सांगता येत नाही.


आता ह्या सर्वांची सही सलामत सुटण्याची भिस्त फक्त नावाजलेले वकील व निस्वार्थ बुद्धिने आपले कर्तव्य बजावणारे न्यायाधीश हें सर्व रिटायर होणे (जें विकले जात नाहीत  )यांच्यावर आहे जर असे झाले तर ही फार दुर्दैवाची गोष्ट भारतीय जनतेसाठी असेल.    


राजकीय नेते व सरकारी अधिकारी सर्वांनी मिळून लाज  लज्जा पार  सोडून दिली असे आजकाल दिसते .पूर्वी जरा तरी देश भावना जाणून काहीं लोक तरी जनतेसाठी चांगल्या लोकाभिमुख कामाची आखणी करीत. पण सध्याच्या राजकारणात लोकौपयोगी सोडून स्व -उपयोगी कामांना जास्त प्राधान्य दिले जात आहे. खरें तर त्यांची विश्वासहार्ता लोकांना नाही कारण त्यांच्यावर असलेले घोटाळ्यांचे केसेस कोणत्याही प्रकारे न्यायालायासमोर आणून शिक्षा देण्याचे ते स्वतः कसे करतील  ? कारण हीच मंडळी तर सरकार चालवतात ना.


हेचं बघा ना Schweizer या स्विस मासिकाने १९९१ मध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला त्यांत त्यांनी राजीव गांधीचे गुप्त खाते आहे आणि त्यांत $ २.५ बिलियन जमा आहेत. हें $ २.५ बिलियन पैसे आता पर्यंत व्याजासकट $ १० बिलिअन रुपये झाले असतील ( आकडे अमेरिकन ट्रेजरीच्या रेट प्रमाणे आहेत. )



रशियन पत्रकार येवगेनिया अल्ब स  ( Yevgenia Albats ) आपल्या नोंदवहीत असे लिहून ठेवले कि रशियन गुप्तहेर संघटना के .जी .बी .ने काही कागद पत्रात असे नमूद केले कि गांधी घराण्याला " कृतज्ञता " म्हणून पैसे देत होतें.




हें वृत्त सर्व जगातील वर्तमानपत्रांतून १९८८,१९९२, २००२. २००६ आणि २००९, २०१०,२०१२ हिंदू, टाईम्स ऑफ इंडिया, स्टेटमन, इंडिया टुडे इत्यादि प्रसिद्ध झाले तरी पण सोनिया गांधी परिवार आणि राज्यकर्ते सर्वजन   आता पावेतो मौन धारण करून आहेत. ह्या बातमीवर ब्र सुद्धा काढीत नाहीत  ना भारत सरकार कुठलीही कारवाई  करीत नाही कारण राज्याचे हेचं तर सर्वे सर्वा आहत. बरे ही बातमी जर खोटी असती तर ह्यानी सर्व वर्तमान पत्रावर मानहानीचा दावा केला असता नाही का?



दुसरी गोष्ट म्हणजे " बिझिनेस ईनसाईडर ' अमेरिकेतील मासिकाने जगातील सर्वात श्रीमंत राजकीय लोकंची यादी प्रसिद्ध केली त्यांत सोनिया गांधी यांची मालमता जवळ जवळ ४ ते १९ बिलिअन आणि जगात त्यांचा ४था नंबर लावला. त्यांच्यावर फक्त सौदी राजे, ब्रुनैलचे राजे, व न्यूयार्क चे मेयर मिचेल ब्लूमबर्ग ह्या महान हस्ती आहेत.





एवढे जगातील लोकउघडपणे सर्व आकडेवारी प्रसिद्ध करीत आहेत तरी पण आपले सरकार आणि गांधी परिवार हु कां चु करीत नाहीत, हें सरकार त्यांचे आहे पण खरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अपोझिशन पार्टी पण मुग गिळून बसलेत हें काहीं कळत नाही.



हा भ्रष्टाचार रुपी रोग आता न्याय व्यवस्थेत पण दिसून येत आहे जी. के. बालकृष्णन भूतपूर्व चीफ जस्टीस व सध्याचे ह्युमन राईट कामिशन मुख्य त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्या तीन नातेवाईका जवळ हजरो रुपयांची मालमत्ता व काळा पैसा मिळाला .तसेंच जस्टीस पी.डि. दिनकरन चीफ जस्टीस हाईकोर्ट यांच्यावर जमीन बळकावणे आणि काळा पैसा ह्यासारखे आरोप लागलेत. ही दोन एक उदाहरणे सोडल्यास अजून तरी आपली न्यायव्यवस्था बर्यापैकी भ्रष्टाचारापासून दूर आहे ही भारतीय जनतेची एक जमेची बाजू आहे.



 कॉंग्रेस प्रणीत आघाडी सरकार मधले मुख्य पार्टनर कॉंग्रेस यांच्यावर पैसे देवून मत मिळवण्याचा भ्रष्ट प्रकार संसदेतच नोटांचे बंडले दाखवून उघडकीस आणले तरी, ते देशावर राज्य करत आहेत आणि लूट पण.  



श्रीमंत माणसे उतरोउतर आपल्या श्रीमंतीचा डाम डौल व भपका निर्लज्यपणे दाखवताना दिसतात. मुकेश अंबानी रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्व यांनी मुंबईत करोडो रुपये खर्चून आपले निवास्थान बनविले आणि सबंध मिडिया व राजकीय लोक त्याचे स्वागत करताना दिसले. सगळीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हां आपणस सर्वीकडे निर्लज्यपणाचा कळस गाठलेला दिसतो. फक्त साधारण ( आम आदमी ) माणूस अजून तरी   लज्जा बाळगून आहे. 



 सर्व  क्षेत्रांत भ्रष्टाचार , अराजकता, स्वहित,अश्या गुणांनी बरबरटलेला असल्यामुळे सर्व काहीं आलबेल आहे असे म्हणण्यास कोणीही धजावत नाही. म्हणूनच सर्व जनता राजकारण, संसद, आणि न्यायव्यवस्थे पलीकडे जाऊन आपल्या जिवनात काहीं चांगले होईल ह्या आशेवर आण्णा हजारेकडे व त्यांच्या भ्रष्टाचार आंदोलनाकडे आशाळभूत नजरेने बघत आहे. पण आतां जनतेस असे वाटत आहे कि अण्णाचे आंदोलन थोडेस भरकट आहे कदाचित ह्यातून काहीं निष्पन्न होईल  की नाही अशी शंका निर्माण होत आहे. आंदोलनाची दिशा , मार्ग, व सहकारी ह्याचा म्हणावा तसा ताळमेळ दिसत नाही ज्यामुळे मुख्य उद्देश सफल होणार कि नाही ही भीती वाटते. अशावेळी जनतेची  हाक कोण ऐकेल हा प्रश्न भेडसावतो आहे.




श्रीमद्द भागवत गीता जें १२०० वर्षा पुर्वी रचीयले आहे त्यांत कलियुगाचे विस्तृत वर्णन आढळते

" कलियुगात चोर राज्य करतील, राज्यकर्ते लोभी आणि अमानुष वागतील. दरोडेखोर,लुटारू यांची चलती होईल, व्यापार हा सरळ मार्गाने न होता तो लोकाना फसवून केला जाईल, लबाड लोक व्यवसाय आणि व्यापारांत शिरतील व लूट करतील, गरिबी हाच मोठा गुन्हा समजला जाईल न्यायदानात, भक्कम डाम डौल हा मोठा श्रीमंतांचा बडेजावपणा दाखवेल व तसेंच त्यांचे चरित्र ही , ज्याला जास्त ओंगळ शब्दांचे प्रयोग करता येतील तो विद्वान समजला जाईल, असभ्यता हाच खरा चारित्र्याचा गाभा असेल, नैतिक मुल्यांचा ऱ्हास होईल " 


हें सर्व काहीं आताच्या परिस्थितीत होत आहे आणि उतरोतर होत राहील .



सरते शेवटी इतके सारे सांगत असताना भगवंतानी एक दिलासा देणारी गोष्ट सांगितली ती म्हणजे जेव्हा जेव्हा असे काहीं घडेल तेव्हा भगवंत नवा अवतार घेऊन ह्या सर्वांचा निःपात करतील.



यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भावति भारत / अभ्युत्स्थानमधर्मस्य तदात्मानं सृजम्याहम /
रित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम / धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे //


भावार्थ :-- जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानि होतें आणि अधर्माचे प्राबल्य माजते , तेव्हां मी स्वतःला उत्पन्न करितो. साधूंचे संरक्षण , दुष्टांचा नाश आणि धर्मसंस्थापना ह्यांसाठी मी युगायुगांत उत्पन्न होतो. 





kali avatar



ही एक मोठी आशा आहे भारतीय जनतेस   की खरेच भगवंत " कली " अवतार घेऊन सर्व दुष्टांचा नाश करतील आणि सामान्य जनतेस यातुन मुक्त करतील का?


---------------------------------------------------------------------------------
श्री यस. गुरुमूर्ती यांच्या स्तंभ लेखा वरून ( ९ मे २०१२ इंडिअन एक्स्प्रेस ) प्रोछाहित होवून  वैचारिक लेख लिहिला.

सोमवार, ७ मे, २०१२

"आईचे महत्व...!"


 "आईचे महत्व...!"
-----------------------------------------------






मुलांच्या भावनिक जीवनात "आईचे महत्व" खूप असते.
"आई आणि वडील" यांच्यामध्ये मुलांचे जास्त भावनिक नाते",
हे आईबरोबर जोडलेले असते. जन्मदात्या -आईशी " हे जवळचे
भावबंध स्वाभाविक आणि सहजपनाचे असतात.


"आपल्या मुलांवर प्रेम करावे "- हे कधी कुणा आईला सांगावे लागलेले
आहे का ?






आईचे माया , तिचे प्रेम, आपल्या कुटुंबाविषयी तिला असलेली ओढ आणि "काळजी ", या गोष्टी मुलांनाही कळत असतातच ना.! आईची त्याग-भावना , आणि निस्वार्थी -प्रेम भावना " या दोन्ही तर साऱ्या जगाने मान्य केल्या आहेत की.


 "जगातील सव भाषा मधून, त्यातील साहित्या मधून आईचे महत्म्य आणि महत्व अगदी मोठ- मोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले आहे " हे ही आपण पाहतो.


आईच्या मनातील उत्कट भावनेमुळे "आईचे प्रेम" मुलांना सतत
जाणवत असते. म्हणूनच एखादे घाबरलेले मुल, भीतीने भेदरलेले मुल.
आईच्या कुशीत शिरले मी "भयमुक्त होते." आईच्या मायेच्या स्पर्शाने
हे बाल स्वतःला सुरक्षित समजत असते.



"स्त्री-पुरुष", "आई आणि बाप", या दोन्ही नाते-स्वरूपात ज्यावेळी
मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो", त्यावेळी , मुलांचा योग्य सांभाळ ,
आणि योग्य संगोपन"- बापापेक्षा "- मुलाची आई जास्त योग्य करू शकते ',यावर नेहमीच एकमत झालेले आहे.










आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती -मुलांना आपली आईच महत्वाचे वाटत असते. मनातले सारे काही सांगायचे ते आईला ..!" हे विश्वासाचे नाते आई आणि मुलातील भाव-बन्ध अधिक बळकट करणारे आहे.


कुटुंबासाठी सतत झटणारी , निस्वार्थी पणे प्रेम करणारी, सर्वांची काळजी घेणारी आई , घराला आपले सर्वस्व मानणारी आई, आणि "आईला आपले सर्वस्व मानणारी मुले आपल्याला भोवताली दिसतातच की...!
हे असे आहे "आईचे महत्व"..!





लेखक ......Arun V. Deshpande
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चित्रे  गुगलच्या सौजन्याने .

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

" प्राचीन मंत्र , तंत्र ,यंत्र वीद्येचा आधुनिक शिक्षाणात उपयोग "

शीर्षक वाचुन वाचकास आसे वाटेल कि प्राचिन विद्येचा आधुनिक शीक्षणात कसाकाय उपयोग होइल ? परन्तु प्रत्यक्षात हे सत्य आहे कि कोणत्याही प्रकारच्या नव्या सुधारणा किवा आविष्कार मग ते साहीत्यिक आसो वा वैज्ञानीक आसो, कुठल्याही क्षेत्रात पूर्वीच्या उपलब्ध ज्ञानातील उपयुक्त गोष्टीत भर घालुनच प्रगती झाली  आहे. ही प्राचिन साधने कशी अद्यावत आहेत ह्याची जणिव करून देण्यासाठी हा लेख कै. नागोराव बासरकर ह्यानी हिन्दीत लिहला व मी तो भाषान्तरीत करुन आपल्या पर्यन्त पोहोचवीत आहे.  हा लेख   आपणास माहिती पर होईल ही आशा ..........


मंत्र ,तंत्र , यन्त्र ह्या योग प्रकारा विषई काही गैर समज असतिल तर ते दुर व्हावे व आधुनिक शिक्षण शास्त्रातील लोकाना ह्याची माहीती व्हावी व ह्याचा विविध शाखा मध्ये कसा उपयोग होईल ह्याची जाणीव करुन ध्यावी व शीक्षण प्रसारासाठी त्याचा उपयोग व्हावा ह्या एकमेव उद्देशाने हा लेख लीहीण्याचा प्रपंच.........




तंत्र  , मंत्र व यंत्र हे तीन योगाचे प्रकार आहेत. मांड़ी घालून प्राणायाम करणे किवा विविध प्रकारचे शारीरीक आसने करणे म्हणजेच योग नव्हे . श्रीमत भगवतगीतात जो एक सर्व मान्य योग शात्राचा ग्रंथ आहे ,त्यांत योग ह्या शब्दाची व्याख्या खालील प्रमाणे केली आहे.




" योगः कर्म सुकौशलं "

अर्थ : कोणतेही विशिष्ट उद्देश पूर्ण कार्य कुशलता पूर्वक करणे म्हणजेच योग .ज्ञानाचा प्रसार करणे हे उद्दिस्ट कार्य आहे, त्या ज्ञानाचा झरा बुद्धिवान,साधरण तसेच मंदबुद्धी सर्वच प्रकारच्या विद्यार्थीना सहज साध्य व सुगम कसा होईल हे बघणे क्रम प्राप्त होईल .


असा उद्देश सफल होण्या साठी ज्या पद्धतीची मदत घेवून अध्यापक वर्ग व विदयार्थी दोघांनाही सोपे जाईल ती पद्धत म्हणजेच "योग" .


वास्तविक आपण विद्यार्थीना बुद्धिवान , साधारण ,किवां मंदबुद्धी यांत वर्गीकरण करतो हेच मुळात चूक आहे . कारण प्रत्येक प्राणीमात्रा मध्ये भगवंतानी बुद्धी दिली आहे तर, विद्यार्थीना ती नसेल हे कसे श्यक्य आहे.


खरे तर प्रत्येक विद्यार्थात हृदय ,मन , आणि बुद्धी असतेच पण ,कुणा मध्ये एक अंग अधिक आसतो तर दुसऱ्यात दुसरे अंग ईतर दोन्ही अंगा पेक्षा अधिक असतात .


काही व्यक्तीच्या ( आयुर्वेदानुसार ) प्रकृती मध्ये जलतत्व अधिक असते त्यांस आपण बुद्धिवान मानतो . तर काहीं व्यक्ती मध्ये वायूतत्व प्रभावी आस्ते त्यास वात प्रकृती किवां भावना प्रधान मानतो. काहीं व्यक्ती मध्ये पित्त तत्व ( अग्नी ) याचे प्रमाण जास्त असते आशांना पित्तप्रकृती किवां कर्म प्रधान म्हणता ऐईलं.


ह्यां तीनही प्रकारच्या विध्यार्थाकरिता शिक्षण पद्धती मध्ये तीन निरनिराळ्या पद्धतीत शिक्षण द्यावे. त्या म्हणजे मांत्रिक, तांत्रिक व यांत्रिक पद्धत .बुद्धी प्रधान व्यक्ती साठी " यंत्र पद्धत " ,भावना प्रधान व्यक्ती साठी " तंत्र पद्धत" व कर्म प्रधान व्यक्ती साठी " यंत्र पद्धत " ,ह्या योग्य व पोषक ठरतिल व  त्या, त्या व्यक्तींना तें सहज साधता ऐईल.


जर आध्यापकांनीआपला विषय शिकवताना प्रसंगानुसार मंत्र, तंत्र, व यंत्र ह्या तिन्हीचा उपयोग करून आपला विषय शिकविला तर, वर्गातील सर्व विद्यार्थाना सहज समजावता यतो .


यंत्र, मंत्र,व तंत्र म्हंटल कि लोकांची एक चमत्कारिक व अज्ञानाची भावना झालेली आहे . मंत्र मोठ्याने उच्चारून हवेत फुंकर मारली कि स्वतः काहीही न करता काम आपोआप होऊन जाईल .


तसेच तंत्रा प्रमाणे नुस्ती क्रिया म्हणजे सर्व काहीं झाले .


उदा : गणपतीला मोदकाचं नैवेंद्य दाखविला म्हणजे आपण परीक्षा पास होऊ .


ऐखादे यंत्र ( ताईत, गंडे , दोरे , ई. ) गळ्यात किवां दंडावर बाधले कि कोणी अज्ञात भूत, देव स्वतः च कार्य सिद्धीस नेईल.हें किवां आशा प्रकारचे विचार खरोखर बुद्धिहीन बनून अंध श्रद्धेच्या खोल सागरात बूडून टाकतात . म्हणून आशा विचारांचा त्याग करून तंत्र ,मंत्र व यंत्र ह्याची माहिती आणि आभ्यास करावा व त्याची व्याख्या समजून घ्यावी व्याख्या व विवरण थोडक्यात आसे आहे .


तंत्र :----


संस्कृत भाषेत " तन " = ताणणे ( विस्तार करणे ) ह्या धातू पासून " तंत्र " शब्द बनला आहे. आर्थात कुठल्याही विषयाचे विस्तार पूर्वक विवेचन करणे किवां संकुचित ( सारांश ) करून मांडणे,


म्हणजेच " तंत्र " होय .


उदा :-- एखाद्या छवि (फोटो ) ची महाप्रत ( एन्लार्ज ) करणे किवां एखाद्या इमारतीचा हुबेहूब प्रतिकृती ( मॉडेल ) तयार करून दाखविणे.




मंत्र :---


"मन" धातूचा अर्थ मनन किंवा चिंतन. मंत्राची व्याख्या संस्कृतात आशी आहे.


" मन्नत त्र्यायते इति मंत्रः "

ज्याच्या चिंतनाने कार्य सिद्धी होते त्यासच "मंत्र" म्हणतात .


उदा :-- रस्ता पार करण्याचे नियम (मंत्र) " फर्स्ट हाफ लुक टु द राईट,सेकण्ड हाफ लुक द लेफ्ट "


रस्ता ओलांडताना रस्त्याचा आर्धा भाग पार करण्या पूर्वी उजवीकडून यणारे वाहन नीट बघून मगच रस्ता ओलांडा आणि रस्त्याचा  पुढील आर्धा भाग ओलांडताना डाव्या बाजूने वाहन येत नाही ना ह्याची खात्री करूनच मग रस्ता पार करावा . हा "मंत्र" सर्वांनी नीट पाळला तर अपघात न होता रस्ता पार करू. अर्थात ह्या मंत्राचे सतत मनन  ,चिंतनाने  इच्छित फळ प्राप्ती होऊ शकते. इथे रस्ता सुखरूप पार करणे ही फल प्राप्ती.


यंत्र :----


कर्म प्रधान व्यक्तीना मात्र प्रत्यक्ष कृती पाहिल्यावरच समाधान होते. प्रत्यक्ष कृती करून दाखविणारे साधन म्हणजेच "यंत्र " होय.


उदा :---- पिवळा व निळा रंग ह्याचे मिश्रण केल्यास हिरवा रंग तयार होतो.


काचेचे दोन तुकडे एक पिवळा व दुसरा निळा एकत्र केल्याने हिरवा रंग दिसतो हें एक साधन (यंत्र) आहे. आता ह्या मंत्र, तंत्र, व यंत्र चा आधुनिक शिक्षणात विविध विषय शिकविताना व निट आकलन होण्या साठी कसा उपयोग होऊ शकतो व कसा केला आहे पाहू.




तंत्र पद्धतीचे उपयोग ;----


१) लेखन किवां अक्षरे ( आकडे ) वाचायला शिकण्यासाठी चिंचोके, काचेचे तुकडे किवां सीताफळाच्या बिया यांचा उपयोग करणे .


२) गणितात- लघुतम साधरण विभाजक ऐवजी ( लं. स. वि. ) व महत्तम साधारण वीभाजक ऐवजी (म.स.वि.) लिहिणे.


३) विज्ञानात - मग्नेशीयम =Mg . कॉपर (तांबे) =Cu , मर्क्युरी (लोह ) = Hg तसेंच फेरस ( लोह ) =Fe आसे संक्षेपात लिहणे.


४) भूगोलात- मोठ्या किवां विस्तृत भूभागाचा नकाशा /आराखडा ( चार्ट ) काढून शिकवणे हें एक तंत्रच आहे.


५) इतिहासात - एका विशिष्ट काल खंडात दोन निरनिराळ्या देशात उदा; भारत व इग्लंड यांत कोणत्या घटना घडत आहेत, ह्याची तुलनामत्क रित्या माडणे आणि त्या नुसार इतिहासाचे सामाजिक /राजकीय जीवनाचे ज्ञान करून देणे हें ही तंत्रच आहे.




मंत्र पद्धतीचे उपयोग :----


१) भाषा विषय - अन्वय लावण्याच्या पद्धती बाबत संस्कृतात येणे प्रमाणे वचन आहे.


 विशेषण पुरस्कृत्य विषेश्य तद नंतर /

कृतृ , कर्म,क्रिया युक्त एत दन्वरा लक्षणं //


अर्थ ;-- विशेषणाच्या नंतर त्याचे विषेष्य त्या नंतर कर्ता,कर्म , क्रियापद व नंतर त्याच्या विस्त बद्दल वर्णनं केल्या नंतर वाक्य रचना पूर्ण होते.


२) गणीतात ---- व्याज == मुळ x मुद्दल x दर भागिले १०० .


३) विज्ञान शास्त्रात ---- १) वेग = अंतर भागिले काळ .


२) इंद्रधनुष्याचे सप्त रंग ( v .i . b . g . y . o . r ) तांबडा ,नारंगी ,पिवळा हिरवा,निळा , पारवा आणि जांभळा.


४) भूगोल विषयात ----- ऐखाद्दया भू भागाचे हवामान माहित होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे


अ) विषुव वृता पासून त्या स्थानाचे अंतर .


ब ) समुद्र सानिध्य.


क ) उंची


ड ) वायूची दिशा


ई ) पर्वताची दिशा.


प ) पावसाचे प्रमाण .


ड ) जंगल .


व ) जमिनीचे प्रकार .


ह्या आठ गोष्टीचे आद्याक्षर एकत्र केल्याने एक मंत्र तयार होतो जसे --


" वि . स . उं .वा . प . पा . जं . ज . "


ह्या मंत्राच्या सह्याने कोठल्याही स्थानाचे हवामान माहित होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.




यंत्र पद्धतीचे उपयोग :---


1) भाषा विषय शिकविताना ---


शिशु कुंजात (बालवाडीत) मुलांना ऐखाद्या जनावराचे किवा वस्तुचे चित्र पुठ्यावर चिटकवतात व त्याच्या नावांत जेवढी अक्षरे असतात ती वेगवेगळ्या तुकड्यात कापतात. या सर्व तुकड्यांना एकत्र मिळवल्याने अक्षर किवां चित्र तयार होते .हीच आहे यांत्रिक पद्धत.


उदा :-- लेखणी ---- / ले / ख / णी /


२) गणित ---- महिन्याचा पगार माहीत असेल तर प्रति दिवसाचा पगार काढण्याचा तक्ता किवां भारतीय चलन किवां परदेशीय चलनाचे सम मुल्य दाखविण्याचे कोष्टक म्हणजेच यंत्र होय .


३) विज्ञान-शास्त्रात -------- छोट्या शक्तीने मोठे ओझे उचलले जाऊ शकते .


         ओझे( Load )------------ काठी +टेकू ( Fulcrum ) ------------ शक्ती




टीप :--- ही यंत्राची आकृती आहे व ह्यात काठी ,टेकू हें ह्या यंत्राचे भाग आहेत.


४) तर्क -शास्त्र --------- वाद विवादात विजय प्राप्त करण्याचे यंत्र.


सर्व घागरीत दुध आहे. (अ ) ------- विरोधी -------- ( ई) सर्व घागरीत दुघ नाही .






विसं वादी




काही घागरीत दुघ आहे. ( एं ) ------ विरोधी -------- ( ओ ) काही घागीत दुध नाही




स्पष्टीकरण :


अ) विधीरूप सर्वगत सिद्धांत .


ई ) निषेध रूप सर्वगत सिद्धांत


ए) विधीरूप एक देशीय सिद्धांत.


ओ) निषेध रूप एक देशीय सिद्धांत.


टीप :----- हें नक्की लक्षांत आसू द्या कि वाद विवादात विसं वादी सिद्धांत सिद्ध केल्यानेच विजय तुमचाच आहे. म्हणून प्रतिवादीच्या विसंवादी सिद्धांत सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आश्या प्रकारे विविध विषयात यंत्र शाश्त्राचा उपयोग यशस्वी रीतीने करता येतो.


योग शास्त्र मंत्र, तंत्र , यंत्र अनेक विध योगांची माहिती सांगते कि जी मानवी जीवनात प्रत्येक शाखे मध्ये उपयुक्त ठरू शकते. ह्या योग प्रकाराचा विविध विषय शास्त्रात उपयोग केल्यास त्याचा ज्ञान प्रसारासाठी अवश्य उपयुक्त ठरेल.


शिवाय ह्या योगें एका प्राचीन भारतीय शास्त्राची तोंड ओळख होऊन, ह्या शास्त्रा बद्दल समाजात आवड निर्माण झाली तरी सार्थक झाले.






माधव नागोराव बासरकर.


१५-८-२०१० .