aanna hajare लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aanna hajare लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

देवा आण्णांना तेजोमय राष्ट्रीय प्रेरणा ज्योत बनव ....


आण्णाना .....आण्णाच राहू द्या.......गांधी  बनवू  नका.......!!!!!





भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र  आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत  या देशाला काणत्याही  विदेशी  ताकतीने पराजित केले नाही. जेव्हा जेव्हा दुष्ट कालचक्रात देश अडकला तेंव्हा  ,तेंव्हा आपल्याच स्वजनांनी बाहेरील शक्तींशी मिळून  षड्यंत्र रचून आघात केले यासं इतिहास  साक्षी  आहे.

जयचंद किवां  आम्मी  ज्यांनी  सिकंदर व मुहमद गौरी  ह्याच्याशी  हात मिळवणी करून भारतावर आक्रमण करण्याचा मार्ग दाखविला . आपल्या  स्वार्थासाठी  जगतसेठ, मीर जाफर, आमिचंद सारखे देशद्रोही व्यक्तीनीच इग्रजाशी हात मिळवणी करून  ह्या देशाला पारतंत्र्यातच्या   खाईत ढकलले.  सरदार बहादूर शोभा  सिंह  जें इंग्रंच्या कामाचे ठेकेदार होतें  त्यांनीच भागत सिंह व त्याच्या साथीदाराची ओळख  पटवून दिली व त्यांना अटक झाली. ही सर्व मंडळी तर आपलीच होती पण स्वार्था पोटी  त्यांनी देशाचे किती न भरून येणारे नुकसान केले हें आपण जाणतोच.



 श्री जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन जें संपूर्ण देश व्यवस्था  परिवर्तन घडवून आणण्याची ,प्रबळ इच्छा जागृत करणाया साठी केले जात होतें .ती क्रांतीची मशाल चिरडून टाकण्यासाठी कपटी राजनारायण व चरणसिंग सारखे  आपलेच लोक होते. ह्या सर्व घटना हेच दर्शवितात कि  आपल्या देशाला  क्षति ग्रस्त अवस्थेत नेणारे दुसरे कुणी  नाहीत तर  आपलीच  माणसे आहेत. 

चिंतेची बाब हि आहे कि आज पण संपूर्ण भारत देश  अश्या एका  कठीण अवस्थेतून जात आहे व आता परिवर्तन  मय क्रांती करण्याची  गरज  असताना  पुन्हा काही कुटील व्यक्तीच्या  कारस्थानामुळे    देश कुठल्या मार्गाने जाईल याची शंका वाटत आहे.







आज किशनराव बाबुराव हाजरे उर्फ आण्णा हजारे संपूर्ण देशा  समोर एक क्रांतीची मशाल हाती घेऊन प्रेरणा  देत आहेत. अन्नाची तुलना गांधीशी केली जाते कारण आण्णा "स्वातंत्र्याची  दुसरीलढाई" सध्या लढत आहेत.आण्णा स्वताहा गांधीवादी आहेतआणि त्यांच्याच  आदेर्शावर  आपली वाटचाल  करीत आहेत.


"गांधी टोपी " जी गांधीजीमुळे  प्रसिद्ध   झाली ती टोपी गांधीजीनी  कधीच घातली नाही पण ती, आण्णा परिधान करतात व आज सर्व देशावासीयाना  पण घालण्यास लावले  व ती त्यांची ओळख बनली.  




काही वेळा असे दिसून आले कि टीम-आण्णा  "आण्णा " ना दुसरे गांधी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण असे असेल तर ही फार खेदाची व गंभीर बाब आहे.



आण्णाना  " आण्णा" च राहु द्या.............





राजकीय मंडळीनी ज्या प्रकारे आपला स्वार्थ साधण्यासाठी संपूर्ण देशाची व्यवस्थाच भ्रष्ट करून  टाकली ती सरकारी कर्मचारी वर्गाशी  मिलीभगत व साथीने.  जनता जाणते  कि  काही भ्रष्ट लोक देशाला पोखरून टाकीत आहेत. ह्या कारणाने सामन्य जनतेचा संसद आणि त्यातील निर्वाचित सद्श्यावरचा भरोसा राहिला नाही.



.


सर्व जनता भ्रष्टाचाराच्या  खोल अंधकारमय दरीत फसलेल्या अवस्थेत आहेत आणि  आण्णाहजारे ह्यांचे त्या  विरुद्धचे  जन आंदोलन एक ज्वलंत मशाल बनून जनते समोर आले. संपूर्ण देश हा ह्या आंदोलना मुळे संमोहित झाला .







आण्णा हजारे व गांधी ह्याच्यात तुलना करणे बरोबर नाही तरी  ह्या दोघांच्या  व्यक्तीमत्व, व कर्तुत्व ह्याची तुलनात्मक आभ्यास   करण्याचा   प्रयास करू..

 


सार्वजनिक व व्यवसाईक जीवन  


गांधी :--  मोहनदास करमचंद गांधी हे वकील होते त्यांनी इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेला भारत देश सोडून दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपली वकिली करण्याचा निश्चय केला. भारतीय स्वतंत्रता आंदोलनात ते सामील झाले जेव्हा ते तिथे  श्री गोपाल कृष्ण गोखले यांच्या संपर्कात आले. बराच विचार केल्यानंतर गोखल्याशी संपर्क साधून  भारतीय स्वतंत्रता  आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला.पुढे लाल-बाल.पाल यांचा जमाना संपल्यावर त्यांनी संपूर्ण देशाचे भ्रमण केले व लोकांशी संपर्क साधला व आपली साधे पणा मुळे ते लोकांत प्रिय झाले.



                                         लाल-बाल.पाल




आण्णा :-- एक अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले. किशन बाबुराव हजारे भारतीय सेने मध्ये भर्ती होऊन एक कर्मठ सैनिक बनले.ज्यांनी शत्रू राष्ट्राच्या हल्यात  मृत्यू  जवळून पहिला.  एक गरीब शेतकरी मुलगा सरळ ,साधा  किशनराव ह्या पेक्षा वेगळे ते काय करणार ? 




सैन्यातून  अवकाश प्राप्ती नन्तर  आपले संपूर्ण आयुष  आपल्या गावासाठी वाहिले आणि ती त्यांची कर्म भूमी झाली.  एका मागून  एक छो ट्या  छोट्या  आंदोलना मधून त्यांनी आपल्या गावाची "राळे गण सिद्धी "चा कायापालट केला व आपल्या गावाची ओळख भारतीय नकाशावर उमटवली. 






                                          आन्ना हजारे भारतीय सेनेतिल जवान.


आंदोलनात उतरण्याची कारणे.............


गांधी :--  बर्याच विद्वानाचे मत आहे कि इंग्रजांनी  मोहनदास यांना रेल्वेच्या प्रथम श्रणीच्या डब्यातून धक्के मारून उतरविले नसते तर ते महात्मा झाले नसते.  दक्षिण अफरिकेत त्याचा प्रत्येक वेळी अपमान केला गेला व वकिली पेशेमुळे  दिन दुबळ्या गरीबाच्या  प्रती ते संवेदनशील बनत गेले. मुख्य म्हणजे त्यांना त्यांचा झालेला अपमान सहन झाला नाही त्यात भर पडली ती गरीब लोकांची व्यथा व पिडा  या  कारणाने त्यांनी निश्चय केला  कि इंग्रजी सत्ता उखडून टाकली पाहिजे.




आण्णा:-- आण्णांनी युद्ध काळात मरण फार जवळून पहिले व त्यातून ते वाचले. त्यांना एक नवं जिवन मिळाले पण त्या वेळी  कोणतेही  ध्येय किवां दिशा निश्चित नव्हती. त्यांचे लग्न झाले नव्हते आणि तशी त्यांची इच्छां पण नव्हती. 

सेनेतून अवकाश प्राप्ती नंतर त्याची समोर  कोणतेही ध्येय  नव्हते.त्याच दरम्यान दिल्ली  रेल्वे  स्टेशन वर स्वामी वेवाकानंद लिखित  पुस्तक " Call  to  the youth  for  nation building "  त्याच्या वाचनात आले. त्या पुस्तकातील विविकानंद्च्या विचाराने  प्रेरित होऊन त्यांनी संकल्प केला कि इथून पुढे मी दिन दुबळ्या साठी व राष्ट्र कार्यासाठी माझे जिवन समर्पित करतो. किसन बाबुराव हजारे एक युवा सन्याशी बनले व जनहित कार्यात रत झाले. आण्णा हजारे राष्ट्र भक्त संन्याशी बनून सर्व युवकांचे प्रेरणा स्थान बनले.





 कोणाचा प्रभाव दोघांच्या  विचारधारावर दिसतो........


गांधी :--  गांधीनी आपल्या जिवनात बरीच अध्यात्मिक धर्म ग्रंथांचा आभ्यास केला तसेंच गीतेचेही मर्म जाणून घेण्याचा पर्यंत केला. जें काहीं ते व्यक्तीशः  जिवनात अनुभवले त्यां योगें सत्य शोधण्याचा पर्यंत केला पण अन्तः सर्व धर्म समभाव याचा पुरस्कार केला.  ईश्वर ,अल्ला तेरो नाम या भजनाचा पुरस्कार केला.


 आण्णा :--  आण्णा हजारे सैन्यात २५ वर्षे काढल्यामुळे  आपल्या मोर्च्यावर द्रुढ तेणे  कसे थांबावे हें शिकले. स्वामी विवेकानंद यांचा प्रभावामुळे  त्यांची संकल्प शक्ती द्रुढ झाली. आपल्या गावाची गरिबी अवस्था बघूनच  त्यानां ग्राम कायाकल्प  घडविण्याची  योजना सुचली. 
आण्णा नेहमी सांगतात कि त्यांना गांधी आणि विनोबाजी च्या जीवनातून शिकायला  मिळाले  व  त्या प्रमाणे प्रयोगाला सुरवात केली. 


आण्णा नेहमी आस्थावान राहिले त्यांचा विश्वास आपल्या धर्मावरुन   कधीच  डगमगला  नाही.  गांधी नेहमी जगातील सर्व पंथातील  चागल्या   गोष्टी  कडे लक्ष केंद्रित करीत असत तर आण्णा आपल्या विश्वासावर अधिक द्रुढ राहून इकडे तिकडे भरकटले नाहीत. 


हिदू मुस्लीम सद्भाव जो गांधीना अभिप्रेत होता तो आण्णांनी असा जपाला की कोणीही त्याच्या  कार्याला  सांप्रदायिक रंग देवू शकले नाहीत. 




त्यांनी गावातील  वंचित वर्गास सामाजिक  कार्यक्रमात   बरोबरीने घेऊन अनेक प्रयोग सफल केले. आन्नाच्या सर्व जीवनावर  विवेकानंदाच्या विचारांचा अधिक   प्रभाव पडला  ज्या मुळे ते अलिप्त ,अनासक्त  संन्याशी जिवन जगत आहेत. 




भारत देशास कोणापासून काय मिळाले............

गांधी:----  गांधीनी इग्रजी सत्तेस हलवून सोडले व संपूर्ण देशास एकजूट मजबूत केले. हिंदी-मुस्लीम सद्भावने  साठी त्यांनी आपले आयुष खर्ची  घातले.

जेव्हा  भारतात साम्प्रदाईक  दंगे होत होतें तेव्हां गांधीजी नी सर्व धर्म प्रार्थना  सभा भरविल्या पण त्यांत फक्त हिंदूच सामील  होत होतें. ह्या मुळे सदा सहिष्णू असलेल्या हिंदुनी सेकुलर बनण्याकडे  वाटचाल केली ती गांधीच्या आवाहनावर पण मुस्लीम जनता ह्या पासुन दूरच बघ्याची भूमिका घेत  राहिली.


परिणाम स्वरूप साम्प्रदैक  दंग्या मध्ये  ही  शांतीदूत सेना शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरी कडून यांनाच संपविण्याचा प्रकार घडवीत होते.


गांधीच्या अहिंसा तत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन  प्रयत्नाची  पराकाष्टा करताना दिसत होते. गांधीना आपल्या सहिष्णुता ,  विनम्रता वागणुकीने त्याचे  हृदय परिवर्तन घडवायचे होतें पण या अप्रकृतिक कल्पनेमुळे देशातील दोन समाज विघटीत झाला.त्यांचा "अहिंसा " मार्ग पुढे त्यांच्या नंतर " गांधीवाद" म्हणून जगात प्रसिद्ध झाला.

  आण्णा :--  आण्णा हजारेनी  कधीच राजनीतिक प्रक्रिया मध्ये सक्रीय भाग घेतला नाही. परंतु ग्रामोत्थानच्या रचनात्मक कार्यात कार्यरत राहिले.
आण्णांनी गांधी  सारखे फार देशव्यापी काम केले नाही पण निष्काम भावनेने आपल्या आसपासच्या अभावग्रस्थ समाजाच्या पिडीत लोकांची पिडा नष्ट करण्यासाठी आपल्याला  समर्पण केले.


स्वात्यंत्रकाळा नंतर खर्या अर्थाने गांधीवाद समजला आण्णांच. त्यांनी आपले संपूर्ण जिवन त्यांसाठी खर्ची करीत आहेत. गांधीचे अहिंसा,सहिस्नुता ,सर्व धर्म भाव व गांधीवाद जें स्वता:ला गांधीवादी म्हणवतात ते लोक पण सर्व शिकवण विसरून गेलेत व नुसते त्या नावाने राजकारण करीत आहेत.


ज्या गांधीवादाने  स्वयं गांधीजी काहीही हासील करू शकले नाहीत पण त्याच शस्त्राने आण्णांनी उपोषणं आंदोलने करून सरकारचा अहं चक्काचूर केला. सध्या ज्याला आरक्षण पाहिजे तो रेलरोको,रस्ता रोको, आंदोलने करून मागण्या पदरात पडून घेतो असे चित्र दिसते.


आण्णांनी अडगळिस पडलेला अहिसेचा मार्ग हाताळून पुन्हा एकदा दाखवून दिले कि शांततामय मार्गाने जें साध्य करायचे ते करता येते .









गांधीनी अहिसात्म्क आंदोलने ,उपवास केले पण सर्वच आंदोलने आपले लक्ष गाठू शकले नाही.पण हेचं शस्त्र  आण्णाची ताकद  बनली व भ्रष्टाचार विरुद्धच्या  लढाई मध्ये जनतेचा अफाट पाठींबा मिळाला.






आन्नाच्या पहिल्या जंतर मंतर उपोषणं नंतर देशातील लोक आण्णाना जाणू लागले . त्यांची बाजू सत्याची असल्यामुळे निस्वार्थ बुद्धीने लोकांचे लोकांसाठी चालवलेले आंदोलन पुढे रामलीला मैदानात अफाट  जन समुदायाच्या पाठीब्याने  भारत सरकारला  नमते घ्यावे लागले  आणि आन्नाच्या मागण्या मान्य  कराव्या लागल्या. 






खरें तर बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडून टाकण्यात सरकार  यशस्वी झाले  पण तीच चाल आन्नाच्या बाबतीत महागात पडली. आण्णा जवळ ना संपती,ना घर,ना कोठल्याही प्रकारची छुपी धन दौलत आहे .खरें तर त्यांचे जिवन स्वछ निष्कलंक आहे हें जनतेला माहित झाले म्हणून इतका  जनप्रवाह त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला  व उद्दिष्ठा पर्यंत पोहचवला .  





भारत सरकारनी अनेक विध पर्यंत केले आण्णांना व त्यांच्या टीमला वेगवेगळ्या कारणांनी बदनाम करण्याचे पण व्यर्थ झाले. आता तर संसदेचा अवमान केल्याच्या कारणावरून आण्णा टीमला नोटीसे पाठविण्यात आली आहेत. ही  एक प्रकारची सूडबुद्धी नाही का ?
संसदेत सर्वच सद्श्यांची वर्तवणूक बघितली तर त्यांना संसदेच्या अवमानाखाली  रोजच नोटीसा द्याव्या लागतील.




अन्नाची खरी अहिसेची परीक्षा होईल जेव्हा एखाध्या  आंदोलना मध्ये आण्णाच्या जीवाचे काही बरे वाईट होईल तेव्हा चालू असलेले आंदोलन अहिसक मार्गाने चालू राहिले तर ती खरी परीक्षा होईल. नाहीतर अहिसावादी गांधी गेल्यानंतर संपूर्ण भारतात जो काही त्यांच्या अनुयायांनी धुमाकूळ घातला तो सर्व श्रुत आहेच.


आजादीची पहिली लढाई १८४७ मध्ये जाहली आणि आत्ता दुसरी लढाई २०११ मध्ये भारतीय जनता हे जाणते  कि देशाच्या मालमत्तेचा विद्व्हंस ,नासधूस करणे योग्य नाही आणि आण्णा नेहमी सांगत असतात कि अहिसा व शांतीपूर्ण आंदोलन चालू ठेवावे. पण त्याच जनते मधले लोक असेही म्हणताना आढळले कि सरकारनी आमचा अंत पाहु नये आम्हाला आन्नाच राहू द्या अन्यथा चंदशेखर,भगत सिंग बनण्यासाठी मजबूर करू नका. अहिसात्मक आंदोलन तसेच चालू द्या नसता इतिहास काही वेगळा लिहिला जाईल.



--------------------------------------------------------------------------------------------------------

छाया चित्रे गूगल इमेजसच्या सौजन्याने. माहिती- संगृहीत (विविध लेख) डाक्टर.मनोज शर्मा.
--------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतक्रिया :----

श्री. बासरकरसाहेब: नमस्कार:
श्री. अण्णा हजारेंवरचा लेख अप्रतिम आहे. विशेषत: त्यांची गांधींशी केलेली तुलना डोळ्यांत अंजन घालणारी अशी आहे. आपल्या भारताच्या ईतिहासाची एक नविनच घडण घडते आहे. ह्या नविन पर्वाचे आपण साक्षीदार आहोत हे आपले भाग्य!
एक ऊत्तम लेख रसिकांच्या समोर आणल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन!
शशिकांत पानट
Los Angeles

०९/१४/२०११

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

आण्णाचा विजय.......लोकशाहीचा विजय......!!!!!

लोकशक्ती ...जनशक्ती........विजय.......!!!!!!!!!
 आण्णाचा  विजय.......लोकशाहीचा  विजय......!!!!!
अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय. भारत सरकारमधील काहीं नेते  प्रथम पासूनच अन्नाचे आंदोलन कसे मोडून काढतायेईल इकडे जास्त लक्ष केंद्रित केले पण त्याना त्यांच्या  अपेक्षे पेक्षा जास्त  जनमत उभा राहिलं ही अपेक्षा त्यांना नव्हती. त्यांनी आपल्या कडील सर्व अस्त्रांचा उपयोग करून पहिला पण सरते शेवटी जन रेट्या पुढे झुकावेच लागले.
आज जें संसदेत सर्वांनि  आण्णाच्या तीन मुद्यावर सहमती  घडवून आणली  ते काहीं महिन्या पूर्वीच करू शकले असते पण नाही, काही सरकार मधली मंडळी यास प्रत्येक वेळी खो देण्यामध्ये यशस्वी होत  होते व  आण्णा टीमचे सदस्य ताठर  भूमिका  घेत राहिले  तेंव्हा वाटले कि हा तिढा कसा सुटणार ?
      ज्या  मंडळीना या आंदोलनाची तसेंच आण्णाच्या प्रकृतीती चिंता होती तसेंच श्री रविशंकर ,श्री भायू महाराज  आणि ईतर बुद्धीजीवी  लोकांच्या मध्यस्तीने सरते शेवटी  संसदेमध्ये सार्वमत ठराव पास  झाला तो मुखत्वे करून आण्णाच्या तीन मागण्या.
    
      १ )  कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्‍यांना लोकपालाच्या कक्षेत आणा.
      २ )   केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताची नियुक्ती करा 
      ३ )    नागरिकांची सनद





समाजसुधारक माननीय अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाचे रणशिंग फुंकून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अतूट निर्धाराने पुकारलेल्या लढ्याला देशाच्या सर्व भागांतील आणि सर्व समाज घटकांतील युवकांचा मनःपूर्वक सक्रीय पाठिंबा मिळाला  आहे, या युवा शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून व चांगल्या दिशेकडे  वळविले पाहिजे.





दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या आंदोलनामुळे मध्यम वर्गीय मतदार जागरूक झाला व ह्या आंदोलनात सहभागी झाला  होता. आता वेळ आली आहे कि या जागरूक झालेल्या तरुण आणि मध्यम वर्गीय मतदारांनी  येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील आणि आजतागायातचा निष्क्रियपणा बाजूला सारून आपल्या  मतदानाचा हक्क बजावतील तरच योग्य प्रतिनिधी निवडले जातील.



संसदेने लोकपाल विधेयक पारित करून त्याचे रूपांतर कायद्यात  करणे हा भ्रष्टाचार निर्मूलनाचा  एक उपाय झाला. पण जो पर्यंत जनते मध्ये जनजागृती होणार नाही कि लाच घेणारा जसा दोषी तसाच लाच देणारा हि असतो.
म्हणून सर्वांनी प्रतीज्ञा  करावी कि " मी लाच घेणार नाही आणि देणार नाही", आत्मीयतेचा भाव जागविला, तरच प्रचंड मानसिक परिवर्तन करणे शक्य होईल आणि त्या दृष्टीने प्रत्येक  क्षेत्राला आपल्या विचारशैलीत बदल कारावा लागेल.
                                    
आण्णाच्या शब्दात लढाई अर्धी जिंकली ऊरलेल्या लढाईच्या तयारीत राहावे.

-------------------------------------------------------------------------------------------
 अर्क चित्र (सुपर आण्णा ) जगदीश भावसार यांच्या सौज्यान्याने तसेच गुगल इमेजेस.


वाचकांची प्रतिक्रिया :--

 
8/29/2011 10:28 PM
संसद पवित्र आहे पण तिचे पावित्र्य टिकवायचे त्यांनीच तिला आपल्या
वागण्याने अपवित्र केले आहे .त्याची शिक्षा कोणी भोगायची. किरण बेदी व ओम पुरींच्या
वक्तव्यावर लगेच हक्क भंग प्रस्ताव आणता येत असेल तर त्यावर सर्वांचे एक मत होत असेल
तर जनालोकापाल्बिलावर निर्णय घ्यायला उशीर का लागतो तेथेही असाच झटपट निर्णय का घेता
येत नाही आपले मत व्यक्त करण्याचा हक्क सर्व भारतीयांना घटनेने दिला आहे हे लोकसभेतील
आपल्या खासदारांना नक्की माहित नाही ना?

avinash Says:
  Delete
8/29/2011 8:12 PM
संसद पवित्र आहे असे खासदार बोलत असतील तर अधिवेशनात गोंधळ आणि
सभात्याग करतात तेव्हा हे पावित्र्य गायब कसे होते. संसदेचा जितका बहुमूल्य वेळ हे लोक
वाया घालवितात तितके यांचे भत्ते कापले पाहिजेत. सतत गैरहजर असणार्या खासदारांची यादी
सार्वजनिक करणे आवश्यक आहे तेव्हा मतदारांना कळेल कि आपला खासदार काय करतो आणि
 पुन्हा त्याला मत द्यायचे कि नाही हे थातावू शकेल.

|  Delete
8/29/2011 12:46 PM
आपला ब्लॉग पाहिला.चांगला आहे. सध्या अन्ना टीमची ताठर भूमिका,
उर्मतपणा याविषयी रान पेटवले जाते त्याला अर्थ नाही. महाराष्ट्रात अडगळीत पडलेला अण्णा
हा हिरां शोधून त्याच्यामागे सर्व शक्तीनिशी उभी राहिलेली हि टीम.! महाराष्ट्राला न सुचलेले,
अण्णांना राष्ट्रीय थरावरील नेते बनविण्याचे फार मोठे काम अण्णांच्या या टीमने केले आहे.
त्यांना सौम्य शब्दात खाच खळगे समजावून देणे ठीक! पण अशां भाषेत त्यांच्या कामाला कमी
लेखणे कृतघ्नपणाचे होय!



शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

वाचवा रें वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... भारत सरकारचा टाहो.

वाचवा  रें  वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... भारत सरकारचा टाहो.


अण्णा हजारे एक समाज सेवक .

 राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां  सगळ्या देशाचे  गांधीवादी युगपुरुष झाले  आहेत . ते  भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.

हिंदुस्तानच्या इतिहासात  मोगलांनी आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी लुटालूट या ६४ वर्षात या राजकारण्यांनी  या देशात केली आहे. अलीकडच्या काळात ही लुटालूट फारच  प्रमाणाबाहेर गेली आहे.
स्वात्यंत्र मिळाल्या  नंतरच्या सुरुवातीच्या काळात राजकीयनेत्या मध्ये प्रामाणिक नेते मंडळी होती.  पण त्यांची राहण त्यावेळच्या मध्यमवर्गीय माणसासारखी होती.

आजकाल लोकप्रतिनिधी म्हणजे  समजाची सेवा करणारे  नाही  तर उलट  नेतेगीरीचा व्यवसाय करणारे झाले  आहेत . निवडून  आलेला कोणताही लोकनियुक्त प्रतिनिधी वर्षा-दोन वर्षात शंभर पटीने श्रीमंत होतो हें कसे होतें ? याचा कोणी विचार केला आणि जाब विचारला ? सगळ्याच पक्षात खाबूगिरी आहे यातून कोणीही सुटलेला नाही . 



  दैनिक ‘लोकसत्ता’चा ‘हटवादी आणि हतबल' ह्या  अग्रलेखात  म्हटले आहे की, "‘देशात भ्रष्टाचार माजला आहे याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही; पण तो केवळ माझ्याच मार्गाने गेल्यास दूर होईल, असे मानणे हा दुराग्रह झाला. संसदीय लोकशाहीत इतरांच्या मतांचीही बूज राखावी लागते. मी म्हणेन तेच नियम हे म्हणणे हुकूमशहांना शोभते, गांधीवाद्यांस नाही. माझेच विधेयक मंजूर करा नाहीतर मी करतो उपोषण ही दडपशाही झाली.' देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या संसदेला डावलून भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याचा लढा अण्णा हजारे रस्त्यावर लढू पहात आहेत आणि तो पायंडा पडला, तर देशात अराजक येईल," असा युक्तीवाद सरकार कडून  त्यांचे खंदे वीर संसदेत,टीवी ,व पत्रकार परिषदेत करीत आहेत. 


आज अण्णा हजारे यांचा मार्ग या लोकाना " हुकुमशाही  " आहे असे भासविले जाते . पण हें लोक सोयीस्कर रीतीने हें विसरतात कि   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधींनी आमरण उपोषणाला बसले कां तर  भारत सरकार जे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देणे लागत होता ते त्याने त्वरित द्यावेत म्हणून. हे ५५ कोटी  द्यायचे नाहीत असा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता कारण संधीच्या अटी पाळण्यास पाकिस्तान तयार नव्हता तसेंच काश्मीर बळजबरीने घेण्याची कारवाई त्यांच्या कडून झाली होती. तो केंद्रीय मंत्रिमंडळाच निर्णय  गांधींनी बदलायला लावला आणि पाकिस्तानला ती रक्कम मिळाल्यानंतरच  गांधींनी उपोषण मागे घेतले.  असा निर्णय घेऊन गांधींनी सार्वभौम भारताच्या सरकारला झुकविले. तो पायंडा पाडला   नाही का ?


काँग्रेस प्रणीत यु पी ऐ सरकार आरंभीपासूनच श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन ते चिरडून टाकण्याचे धोरण अवलंबले. श्री.हजारे यांच्यावर केलेल्या कारवाई विषयी संसदेत चर्चा चालू असतांना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सरकारची  भूमिका मांडली.भारतात लोकशाही नांदत आहे.आणि  ‘श्री. अण्णा हजारे हे संसदेला आव्हान करत आहेत’, असे वक्तव्य केले.

खरें  तर प्रथमपासूनच काँग्रेसच्या टोळीतील पी. चिदंबरम, कपिल सिब्बल यांनी अण्णांच्या आंदोलनाला ‘घटनाबाह्य’ म्हणून हिणवले. इतकेच नाही तर आण्णानां घटना माहित नाही आणि हें चाललेले आंदोलन फक्त मिडिया समोर येण्यासाठी आहे. किती हास्यास्पद आहे विधान या विद्वानाचे.



आतापर्यंत डॉ.सिंग,चिदंबरम किंवा सिब्बल यांनी ‘जनतेपेक्षा संसद मोठी’,अशी भूमिका घेतली आहे.संसदेत पण ह्यीच गोष्ट ते वारंवार सांगून संसद सदस्यावर  ठसविण्याचा प्रयत्न करीत होतें"संसद कि गरिमा " चा टाहो फोडत होतें.   

मुळात लोकशाहीत जनता ही केंद्रबिंदू असतांना असली विधाने करणे,म्हणजे लोकशाहीच्या विरोधात ही मंडळी नाहीत का ?जनतेनी निवडून दिलेतरच ही नेतेगण संसदेत जातील आणि त्यांनाच तुम्ही दुयम स्थान देतां व निवडून आलेले प्रतिनिधीच   सर्वोच्य   आहेत ? .




बळाचा व सत्तेचा वापर करून स्वतःला हवे तेसें  करण्याची  मानसिकता या सरकारने बाळगली  आणि   याला कोणी विरोध केल्यास त्यावर केलेली कारवाई (कृती )लोकशाहीला कशी धरून आहे, असे सांगत त्याचे समर्थन करतांना  दिसत आहेत.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले. त्या वेळी तेथे १४४ कलम लागू केले होते. राहुल गांधी यांची ही कृती सरकारला  घटनाबाह्य वाटली नाही.  ‘राहुल गांधी यांनी केलेले आंदोलन हे ‘आमआदमी’साठी होते’अशी भुलावण करीत ती योग्यच होती हें पटवताना  दिसत होतें. हें तर "दुप्पटी धोरण " नाही का ? आपला तो सोन्या दुसर्यांचा तो कार्ट अश्या प्रकारे सरकारचे 
धोरण आहे.   

डॉ.मनमोहन  सिंग यांनी त्यांच्या भाषणात ‘अण्णांच्या आडमुठे धोरणामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली व  आण्णांनी  १४४ कलमाचे उल्लंघन केले असे वक्तव्य केले. राहुल गांधी जेव्हा १४४ कलमाचा भंग केला,तेव्हा ते ‘आम आदमीसाठी,आणि  अण्णांनी १४४ कलमाचे उलंघन न करतां त्यानां अटक झाली ते कोणासाठी? मुळात अण्णांना जेथे अटक करण्यात आलें  त्या क्षेत्रामध्ये हे कलम लागू नव्हते.

हें संपूर्ण देशातील जनतेला माहित होतें.या घटनांतून सरकार  स्वतःच्या सोयीप्रमाणे नियमांचे कसे उल्लंघन करत आहे, हे दिसून येते.

यु पी ऐ सरकारनी जनक्षोभाचा ,भावनांचा आदर राखावा.-----


गेले काही दिवस काँग्रेसच्या रथी महारथी  दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल,मनीष तिवारी यांनी अण्णांवर जी खालच्या पातळीवर जाऊन  चिखलफेक केली, ती लोकशाहीला धरून आहे का ?

यु पी ऐ सरकार मधील मंत्रीगण  संसदेच्या श्रेष्ठत्वाविषयी वारंवार संसद सदस्यावर बिम्बवण्याचा पुर्जोर पर्यंत  करतांना दिसले. या संसदेने जनतेला काय दिले  तर  निम्याहून अधिक लोकप्रतिनिधी जें  भ्रष्ट आहेत हें दाखवून दिले . ए. राजा, कलमाडी, कनिमोझी, मारन यांच्यासारखे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोकप्रतिनिधी  या संसदेने भारतीय जनतेला  दिलेली अमुल्य अशी भेट  आहे नाही का ? तर  अशा या संसदेची टिमकी वाजविणे कितपत योग्य आहे हें जनता चांगलेच जाणते

यु पी ऐ सरकारचे संसदेत असलेल्या बहुमताच्या जोरावर  ज्या लोकपाल  विधेयकात अजिबात दम नाही, असे लोकपाल विधेयक संमत करू पहात आहे.ज्या  विधेयकात   अनेक त्रूटी असल्यामुळे  भ्रष्टाचार करण्याची मुभा लोकप्रतिनिधींना मिळणार आहे. हा  हेतू अण्णा व त्यांच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनामुळे   साध्य होत नसल्याने सरकारने  त्यांच्यावर लोकशाही आणि घटना यांच्या नावाखाली हे आंदोलन चिरडण्याचा जो प्रकार चालवला आहे तो निदनीय  आहे. त्याला जनता नक्कीच प्रत्युत्तर देईल.



लोकशाहीत संसदेला काही अधिकार दिले असले तरी  जनभावना महत्त्वाची असते.भ्रष्टाचाराने सर्वत्र  बुडालेल्या  भारतियांना  सरकारी  लोकपाल बिल  नाही  तर अण्णांचे जनलोकपाल विधेयक हवे आहे.

लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य. त्यामुळे भारत सरकारला  लोकभावनेचा आदर हा राखावाच लागेल.अन्यथा आंदोलनाचा अजून तीव्र  भडका उडण्यास कितीसा वेळ लागणार ?  

 

भारत सरकारला .........अण्णांचा पेच


स्वतंत्र भारतातील अखंड बुडालेल्या भ्रष्ट सरकारचं नेतृत्व स्वच्छ चारित्र्याच्या पंतप्रधानाकडे आहे.  यांच्याकडे नैतिक बळ नाही, नेतृत्व गुण नाहीत आणि संघटन कौशल्य ही नाही.असे बऱ्याच विद्वानाचे तसेंच अभ्यासकांचे मत आहे. काँग्रेस पक्षाची स्थितीही या पेक्षा  वेगळी नाही.केंद्र सरकारची अशी   स्थिती असल्याने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत धरसोड वृत्ती मुळे जगभरात नाचक्की होतें आहे. 

अण्णा हजारे यांच्याजवळ संघटीत  संघटना नाही तरिही त्यांना देशाच्या कानाकोपर्‍यातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कारण  भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणि अण्णा हजारेच्या स्वछ  चारित्र्यामुळे तो  मिळतो आहे.  आण्णाच्या अटकेनंतर अभूतपूर्व जन समर्थन बघण्यास मिळाला हा जन रेटा सरकारास  मजबूर केले व  आण्णाच्या अटी मानण्यास भाग पडले.




जनतेला घटनात्मक  अधिकार आहे कि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा .श्री. अण्णा हजारे यांना अटक करून सरकारनी  घटनेचीच पायमल्ली केली आहे असे दिसते.  यावरून भारतीय  घटनेला हे सरकार काहीच किंमत देत  नसून उलट हुकूमशाहीच चालवत  असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.


अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाला भाजपचा व ईतर विरोधी  पक्षाना आणि  कम्युनिस्टांचा संपूर्ण पाठिंबा आहे असे नाही . पण विरोधी  पक्षांनी  अण्णांचं आंदोलन दडपू पाहणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत व  रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या केंद्र सरकार बरयाच अडचणीत सापडलं आहे त्याना हे आण्णा रुपी नवे गांधीना कसे आवरावे या संभ्रमात पडले आहे. सरकारमध्ये कोणीही असा नाही कि जो यातून मार्ग दाखवेल आणि दुसरया कुणाची मदत घेणे म्हणजे नाकर्तेपणा जाहीर होईल म्हणूनच सध्या ते टाहो फोडीत आहेत कि...........


वाचवा  रें  वाचवा ....!!!!! या आण्णा पासुन...... !!!!!!!!!



विनंती:---
आण्णा १९ ऑगस्टला रामलीला मैदानात आपले उपोषण चालू ठेवतील अशी घोषणा झाली जरी प्राथमिक लढाई जिंकली तरी पुढे हे आंदोलन कसे शांततेने पार पडेल याची जवाबदारी आण्णा टीम वर आहे.

आण्णांना पाठींबादेणारे जनता  त्यांच्यावर पण हि जवाबदारी  आहे हे कि  संपूर्ण आंदोलन शांततेने पार पडले  तरच अंतिम लढाई जिंकू शकू.......धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------

चित्रे गुगल इमेजस आणि माहिती संग्रहण लोकसत्ता व दैनिक सनातन प्रभातच्या सौजन्याने.

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

लोकपाल बिल .........?????

लोकपाल बिल .........?????



 



शेवटी भारत सरकारनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी आपले " लोकपाल बिल " आपल्या सर्व हितचिंतकांचा व सहयोगी राजकारणी यांचा विचार करून " लोकांसाठी " विधेयक तयार केले व ह्या पावसाळी अधिवेशनात माडण्याची वचनपुर्ती केली. हें विधेयक जनसामाण्यासाठी किती लाभ दायक ठरेल ह्याची चिंता त्यांनी न करणे हें अपेक्षितच होतें. भारत सरकार जवळ रथी महारथी सर्व शस्त्रानिशी सज्य आहेत जें त्यांचे रक्षण करतील.

नुकतेच एका सर्वेक्षणा मध्ये असे आढळून आले कि ह्या सरकारच्या लोकपाल बिलाच्या विरोधात ८५% जनता आहे. खुद्द महारथी कपिल सिबाल यांच्या मतदार संघात ह्या विधेयकावर नाराजी ८५ जनतेनी नोदवली असताना सिब्बल म्हणतात कि ही आकडे वारी जी सर्वेक्षणातून पुढे आली ती फक्त बीजेपी च्या कार्यकर्त्यांनी नोदवलेली आहेत व जनतेचा आम्हास संपूर्ण पाठिंबा आहे.


खरें तर TOI च्या सर्वेक्षणाने सिब्बलयांचे पितळ उघडे पाडले कारण सिविल सोसायटीने केलेले सर्वेक्षण १००% बरोबर होतें असे दिसते.


एक गोष्ट जी समाधानाची आहे ते म्हणजे सर्व विरोधी पक्ष काहीं बाबतीत सिविल सोसायटीनी तयार केलेल्या "जन लोकपाल बिल " यातील मुख्य तरतुदी मान्य केल्या आहेत आणि लोक सभेत ह्या विषयावर सरकारवर कडाडून हल्ला करतील असे वाटते.





सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम आणि सिविल सोसायटीचा मसुदा यातील फरक बघा.





१)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


कोणताही राजकीय नेता किवां सिनियर पब्लिक सरवन्ट आता पर्यंत जेल मध्ये गेला का? नाही...कारण Anti Corruption ( ACB ) आणि CBI हें दोनीही सरकारच्या अधीन आहेत.


ह्या कोणाच्याही विरुद्ध गुन्हा दाखल करावयास त्यानां सरकारची परवानगी आधी घ्यावी लागते.कारण परवानगी देणारेच त्यांत दोषी असतात तेव्हां ती कशी मिळेल ?


सिविल सोसायटी मसुदा:--


लोकपाल हा सेंटरला तर लोकायुक्त राज्या मध्ये स्वतंत्र व निपक्षपातीने तपास व गुन्हा दाखल करतील आणि त्यांना कोणाचीही परवानगी घेण्याची गरज राहणार नाही. तपास काम व गुन्हा दाखल करण्यास २/३ महिन्याचा कालावधीत पूर्ण करावे व एका वर्षच्या आंत गुन्हे गारास गजाआड केले जाईल जर गुन्हा सिद्ध झाला तर.


२)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


कोठलाही सरकारी अधिकारी जो भ्रष्टाचारी आहे व गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला नौकारीतून कमी केले जात नाही. सेन्ट्रल विझिलंस कमिशन जें अश्या भाष्टचारात सापडलेल्या अधिकारी वर्गास नौकारीतून कमी करू शकत नाहीत कारण ही संस्था फक्त advice करू शकते. निर्णय सरकारनी घ्यावयाचा असतो पण दुर्द्व्याने हें कधीच होताना दिसत नाही.


सिविल सोसायटी मसुदा:--
लोकपाल आणि लोकायुक्त यानां संपूर्ण अधिकार राहील जर कोणी सरकारी अधिकारी दोषी आढळल्यास त्याला नौकारीतून काढून टाकण्याचा. CVC आणि स्टेट विजिलंस अनुक्रमें लोकपाल व लोकायुक्त संस्थेमध्ये विलीन केले जाईल.

३)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


जर कोणताही जज मग ते हाईकोर्ट किवां खालच्या कोर्टाचा असेल व ब्राष्टचारात बुडाला असेल तरी त्यांच्या वर पोलीस स्टेशनात साधा FIR बनविण्यासाठी चीफ जस्टीस भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते.


सिविल सोसायटी मसुदा:--


लोकपाल आणि लोकायुक्त यांना संपूर्ण अधिकार असेल भ्रष्ट जजेसच्या विरुद्ध चौकशी व गुन्हा दाखल करण्यास कोणाची ही परवानगी लागणार नाही.

४)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


भारतीय नागरिक भ्रष्टाचार विरुद्ध पुरावे देऊन सुद्धा कोणतीच दक्खल घेतली जात नाही. अश्या सर्व विनंती आर्जे कचऱ्याच्या टोपलीत शेवटी विसावतात.


सिविल सोसायटी मसुदा:--


लोकपाल व लोकायुक्त अश्या प्रकारच्या भ्रष्टाचार निवेदनावर स्वतंत्रपणे चौकशी करतील व दोषी आढळल्यास कारवाई करतील.

५)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


CBI आणि स्टेट विजिलंस डिपारट्मेंट SVD ह्या दोनी संस्था भ्रष्टाचारात बुडालेले आहेत ह्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व कार्य गुप्तपणे चालते आणि ह्याच कारणाने तिथे भ्रष्टाचारास वाव मिळतो. काय गंमत आहे बघा ह्याच दोन्ही संथा भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळतात.


सिविल सोसायटी मसुदा:--


सर्व चौकशी लोकपाल आणि लोकायुक्त करतील ते पूर्णपणे पारदर्शक असेल. चौकशी पूर्ण झाल्या नंतर सर्व कागद पत्रे लोकांना बघण्यास खुले राहील. जर लोकपाल व लोकायुक्त संस्थेतील कर्मचारी भ्रष्टाचारांत दोषी आढळल्यास चौकशी आणि शिक्षा एका महिन्याच्या आंत केली जाईल.


6)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


भ्रष्टाचारी अधिकारी एन्टी करपशन डिपारटमेंट मध्ये ठेवले जातात कारण हें सर्व अधिकारी राजकारणी नेमतात.


सिविल सोसायटी मसुदा:--


लोकायुक्त,लोकपाल आणि सभासद यापैकी कोणत्याही राजकीय नेत्यास कोणासही नेमण्याचा अधिकार राहणार नाही . नेमणुका पारदर्शक व जनतेचा सहभागाने केल्या जातील.

७)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


सर्व सरकारी आफिस मध्ये सामान्य नागरिकास काम करून मिळत नाही. उलट त्यांना सतावले जाते तो पर्यंत जोवर नागरिक कर्मचारी वर्गांनी मागितलेली रक्कम दिली जात नाही.


असा खालच्या थारा पर्यंत भ्रष्टाचार पसरलेला आहे. बरे तक्रार करावी तर त्यांच्या वरिष्ठाकडे पण तिथेहि दाद लागत नाही आणि कोणतीही कारवाई होत नाही त्या भ्रष्ट अधिकार्यावर कारण ते वरिष्ठ पण त्यांत सामील असतात .

सिविल सोसायटी मसुदा:--


लोकपाल व लोकायुक्त नागरिकांच्या तकरारी थेट स्वीकारतील व एका निश्चित वेळेत त्याचा न्याय करतील जर ह्यांत काही विलंब झाला तर रोज रुपये २५० दंड भरावा लागेल जो लोकपाल कीवा लोकायुक्त अधिकारी असेल त्याच्या पगारातून ती रक्कम कापली जाईल व ती रक्कम त्या अर्जदारास विलंबा पोटी देण्यात येईल .


८)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


एखादा भ्रष्ट अधिकारी ज्याच्यावर कोर्टाने शिक्षा ठोठावली तो ती शिक्षा संपवून त्याने लाच खालेली रक्कम आपल्या उर्वरित आयुषा साठी वापरण्यास मोकळा असतो. सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही कि ती लाच खालेली रक्कम परत मिळविण्यासाठी.


सिविल सोसायटी मसुदा:--


एकदा का भ्रष्टास शिक्षा झाली मग तो कोणीही असो त्याने खालेलेली लाच रक्कम सरकारनी ताबडतोब परत घ्यावी.


९)  सध्या अस्तित्वात असलेले सरकारी नियम ( धोरण ):--


सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्या प्रमाणे भ्रष्ट व्यक्तीस कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त सात वर्षाची कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.


सिविल सोसायटी मसुदा:--


अश्या व्यक्तीस ज्याचा भ्रष्टाचार सिद्ध झाला त्याला कमीत कमी पाच वर्षे व जास्तीतजास्त आजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.


आता वेळ आलेली आहे कि सर्व जनतेनी " जन लोकपाल बिल " यासं पाठींबा ध्यावा व सरकारी धोरणाचा जरूर त्या मार्गाने कडाडून विरोध नोदावावा.








सोमवार, २५ एप्रिल, २०११

धिक्कार .....धिक्कार ......जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न.........!!!!!!!!

आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण " भ्रष्टाचार निर्मुलन " साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत " ड्राफ्ट कमेटी " ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .


अण्णांनी उपोषण सोडले व जाहीर झाले कि एका ठरावीक  वेळेत " ड्राफ्ट " तय्यार करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधेयक माडणे व ते पारित करणे ह्यावर सरकार व आंदोलनकरते समाजवादी यांच्यात एकमत झाले. आता वाटले कि सर्व गोष्टी मार्गी लागतील पण ...कसचे काय ?.......


आता हेचं बघा ना ?....... भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जन-सामान्या पर्यन्त पोहचविण्याचे काम आण्णा व त्यांचे समविचारी साथीदारांनी केला. या आंदोलनाची आग संपूर्ण भारतभर पसरली व प्रतिक्रिया सर्वत्र दिसून आली. हें बघून भ्रष्ट नेते मंडळीना धोक्याची घण्टा दिसू लागली व सरकारने थोडे नरमाईचे धोरण आखून आपली नवी खेळी खेळण्यास सुरवात केली.


स्वातंत्र पूर्व काळात व नंतर सर्वच पक्षातील नेते मंडळीचा जनमाणसात प्रभाव होता तो त्यांची देशभक्ति, सचोटी, लोकासाठी काहीं करण्याची जिद्द त्यांच्या ठाई असल्यामुळे. आणि आतां स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली आणि पहा सगळ्याच राजकीय पार्टीचे कोणत्या प्रकारचे नेते मंडळी आहेत? खेद वाटते कि इतकी वर्षे राज्य करून काय दिले जनतेस ? मतांची नीच राजनीती ,पैसा.शक्ती ( गुंडगिरी ) च्या जोरावर आपले उखळ पांढरे करीत आहेत.

अश्या राजकारणा मुळे सुशिक्षित वर्ग ह्यात भाग घेईनासा झाला व एक प्रकारची उदासीनता ,न्यूनगंड ने पछाडला गेला आहे. एकीकडे लोकसंख्या वाढत चालली तसेंच गरिबी पण वाढली . अशिक्षित लोकांची संख्या इतकी जास्त वाढली कि हें नेते मंडळी त्यांना आपले 'वोट बँक' समजू लागली आणि निवडणूक काळात पैसा, मादक पेये , गुंडगिरीच्या जोरावर मते मिळवून निवडणूक जिंकू लागली.


भारतीय राज्य घटनेने दिलेले अधिकार आपल्या अंकित करून स्वहितासाठी वापरू लागली आहेत. अशा नेत्यांना " जन- लोकपाल बिल " जर, जन सामन्याच्या इच्छे प्रमाणे पारित झाले तर काय होईल ह्याचे यानां पुरेपूर कल्पना आहे . आणि म्हणूनच जनतेच्या बाजूने " जन-लोकपाल बिल " ची मांडणी, व्यवस्थापन, अधिकार, व कक्षा अश्या सर्व बाजूवर विचार करण्यास निवडली गेलेली तज्ञ प्रतिनिधी मंडळी जनतेचि बाजू व मत मांडण्यासाठी सर्व ताकदी ने सज्य झाली. सरकारातील नेते मंडळींनी नव्या खेळी नुसार ह्या जन प्रतिनिधींचे चारित्र्य हनन करण्यास सुरवात केली. कां तर जर हें ड्राफ्ट, पुढे विधेयक पास झाले तर त्याचे कायद्यात रुपांतर होईल जें ह्या भ्रष्ट नेत्यास परवडणारे नाही .


कपिल सिब्बल.दिग्विजयसिंग व राजा अमरसिंग ( काँग्रेसचा जवळचा मित्र ) यांनी आपले ठरवुन दिलेले काम करण्यास सुरवात केलीच आहे.  जन प्रतिनिधी भूषण पिता आणि पुत्र, श्री हेगडे,व आण्णा हजारे ह्यांचावर आरोपांवर आरोप करीत आहेत. त्यांचे एकच लक्ष जनमाणसात असलेली ह्या लोकाची प्रतिमा मलीन व्हावी व ही मंडळी कशी योग्य नाहीत प्रतिनिधित्व करण्यासाठी हे दाखवून द्यावे कि ज्या मुळे लोक चर्चा वाढेल व चालू झालेल्या बैठकीवर परिणाम होऊन ह्यास खीळ बसेल व निस्चित केलेल्या समया मध्ये विधेयक पारित होणार नाही.


पण...कोणी तरी ह्याना विचारा कि बाबा तुमच्यातला ( सरकारी प्रतिनिधी ) कोण असा स्वच्छ आहे कि ज्याने आपल्या आयुष्यात  नीतीला सोडून काहीच  केले नाही ?.........ह्या बरबरटलेल्या भ्रष्ट चिखलात एखादा असा नेता आहे कां ज्याच्या अंगावर एक पण शिंतोड उडालेला नाही ? शोधाल तरी सापडणार नाही हें निश्चित कारण सर्वच राजकीय व्यवस्था अशी झाली कि त्यातून कोणीही सुटू शकत नाही.


तर....ही चिखलफेक काय दर्शविते ?  ही तर एक केविलवाणी धडपड आहे नाही का ? म्हणूनच दुतोंडी धोरण राबवीत आहेत. एकीकडे दाखवायचे कि आम्ही जनतेसाठी हें लोकपाल बिल पारित करू तर दुसरी कडे हें कसे मोडीत काढता येईल कारण, हें विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात पारित करावयाचे आहे. जर त्यांच्या खेळी मुळे व्यत्यय आलाच तर बरेच फावेल व ईतर विधेयकाचे जें झाले ह्याचे पण तेचं होईल ह्यात शंका नाही.


आता वेळ आली आहे कि अश्या प्रकारच्या माकडउड्या मारणाऱ्याना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे.
जनमाणसात ह्या खेळीची चीड पसरली पाहिजे. सामजिक सेवासंस्था, प्रसार माध्यमे, व सोशल ग्रुप्स, ह्या सर्वांनी मिळून अशा विघ्न संतोषी ताकदीचा मुकाबला करण्यास एका नव्या जनांदोलनचा संदेश सर्वाना द्यावा व त्या योगें खीळ घालणाऱ्या लोकांस कळूद्या " जन-क्षोभ " तो कसा असतो तो........

आता वेळ आलेली आहे या जन मतांच्या अश्वावर आरुढ होउन सर्व भारतातिल सुजाण नागरिकानी एक होउन ह्या गलिच्छ राजकाराणास समोरे जाउन ताकदिने लढा द्यावा. जी सुशिक्षित ,मध्यम वर्गीय, श्रीमंत वर्ग मतदान प्रक्रिये पासुन इतकी वर्षे दुर रहिला त्यानी व इतर समविचारी लोकानी एकत्र येउन एक नवा पक्ष स्थापन करावा व निवडनुक प्रक्रियेत भाग घ्यावा .

जेणे करुन या निरढावलेल्या राजकारण्याना त्यांच्याच शत्राने नामोहरम करता येइल. जसे म्हणतात ना विषला विषच मारु शकते, त्याच प्रकारे आजच्या राजनीतिला ज्यास हे नेते मण्डळी स्वताहाचे मण्डलीक मानुन त्यास हावी तशी दिशा देतात व स्वार्थ आणि खुर्ची टीकवतात. ह्या राजनितिच्या आखाड्यात उतरुन त्याना प्रत्युत्तर देण्याची खरी गरज आहे.



शेवटी काय तर" सावधान" आपले ध्येय गाठणे हें म्हत्वाचे नाही कां ?

,,,,,,,,उठा........लढा ........लढा

शनिवार, ९ एप्रिल, २०११

सहश्र धन्यवाद ......... आण्णा हजारेजी.

अहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले ...... आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.






सहश्र धन्यवाद ......... आण्णा हजारेजी.



गुरुवार, ७ एप्रिल, २०११

आण्णा हाजारे जी आम्ही सर्व भारतीय आपणा बरोबर आहोत !!!!

भ्रष्टाचार रुपी राक्षसास मिटविण्यास  चाललेल्या  या  जन आन्दोलनास सर्व भारतीयानी श्री आण्णा हजारे सारख्या जेष्ट  गान्धी वादी  समाज सेवकास आपला संपूर्ण पाठीम्बा द्यावा व त्यांच्या  मार्गदर्शना खाली नभुतो न भविष्यती  असे शान्ति पूर्ण आन्दोलन करावे।


श्री आण्णा नी सुचविलेले सर्व मुद्ये कोठलेहि फेरफार रहित या जन-लोकपाल बिलास येत्या मान्सुन सत्रात वीधेयक पारित करण्यास तमाम भारतीय जनता आग्रही असेल



उपोषणाचा आज चवथा दीवस



                                                                  श्री आण्णा हजारे