शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

काश्मीरचे भारतात सलग्नीकरण कि विलीकरण .........हा नवा वाद का ????

देशाची फाळणी झाली व सन १९४७ मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी काश्मीर राज्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली .त्यांनी अमानुष अत्याचार, सामुहिक हत्याचे सत्र घडविले संपूर्ण काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण पसरविले.
अराजकता व पाकिस्तानी घुसखोरांना पायबंद न घालता आल्या मुळे तेथील शाषक ( संस्थानिक ) राजे हरिसिंग यांनी आपले काश्मीर राज्य भारतात विलीनीकरण केले .इतर भारतीय संस्थानिका प्रमाणे राजे हरीसिंगानी विलीनीकरण करार नाम्यावर हस्ताक्षर केले.

विलीनीकरणा नंतर भारतीय सैन्य काश्मीर प्रांतात जिथे पाकिस्तानी घुसखोर धुमाकूळ घालत होते त्या सर्वाना पिटाळून लावले. जर त्या समई करारनामा झाला नसता तर..हजारो निरपराध जनतेची हत्या झाली असती. खरें तर जें घुसखार होते तें दुसरे कोणी नसून खुद्द पाकिस्तानी सैन्यच होते. ह्या लढाईत पाकिस्तानी सैन्य पिछाडीस सरकत होते व त्यांनी ताब्यात घेतलेला काश्मीरचा व लडाखचा भाग मुक्त झाला असता पण...

लॉंर्ड माउंट बेटन (गव्हर्नर) च्या सल्या नुसार पंत प्रधान पंडित जवाहर लाल नेहरूंनी काश्मीर प्रश्न यु. यन. ओ. मध्ये नेला. त्या वेळेच्या मंत्री मंडळातील बऱ्याच लोकांनी नेहरुंना असे न करण्या विषयी सल्ला दिला पण, नेहरूंनी कोणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटी फलित काय तर युद्ध बंदी आणि तेंव्हा पासुन जो काश्मीरचा भाग पाकिस्तानकडे राहिला तो आज तागायत.

यु.यन.ओ नी काश्मीर हा वाद्ग्रस्थ भाग म्हणून जाहीर केला. तेव्हा पासुन काश्मीर व लडाखचा भाग जो पाकिस्तानने बळकावलेला आहे तो अद्याप मुक्त झाला नाही. पंडितजी च्या या अदूरदर्शी निर्णयामुळे आज पर्येंत काश्मीरचे घोगड भिजत पडले आहे.

काश्मीर मधले फुटीरवादी संघटना व पाक धार्जिणे काश्मिरी नेते एकमेकाच्या साथीने काश्मीर नेहमीच अशांत ठेवत आले आहेत.
त्यांत भर पडली तें काश्मीरचे मुख्य मंत्री उमर अब्दुला यांचे विधान " काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले नसून सलग्नीकरण झालेले आहे." असे अत्यंत बेजवाबदार विषारी वक्तव्य आणि भर म्हणून कि काय अरुंधती राय एक सन्मान पात्र,सामाजिक कार्यकर्ती व लेखिका यांचे भाष्य " काश्मीर भारताचा अविभाज्य भाग कधीच नव्हता " ह्याने तर आगीत तेल ओतल्या सारखे झाले.

ह्या प्रकारच्या वक्तव्या मुळे फुटीरवादी गिलानी यांना तर चेव आला व त्या गटास चिथावणी दिली गेली.आधीच अशांत असलेल्या काश्मिरात आशा प्रकारच्या वक्तव्या मुळे शांतता होण्या मध्ये अडचण निश्चित निर्माण होईल . ह्या विद्वान लोकांना सांगावे वाटते कि असें विधान करण्या पूर्वी लक्षात असू द्यावे कि व्यक्ती स्वात्यंत्र म्हणजे मनात येईल तें करावे असें नाही.

नुकतेच वाचले कि ह्या दोघा वर देश द्रोह केल्याचा खटला भरवण्यात येईल . भारतीय घटने च्या चौकटीत जि काहीं कारवाई होईल त्यासं सामोरे जावे लागेल. तरी पण आता नवा वाद निर्माण होईल " काश्मीर चे भारतात विलीनीकरण कि सलग्नीकरण ".................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: