मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

मुंबईची मान शरमे न खाली आहे ....... आजमल कसाब अजून जिवंत आहे ..............

From Drop Box


भारतात फाशीची शिक्षा झालेले किती तरी गुन्हेगारांचे जेल मध्ये भविष सुरक्षित आहे.
मानवतेचा उदो उदो करणारे आणि तथाकथित मानवतावादी विशेषज्ञ , निरपराध जनतेस सामुहिक रक्त रंजित कंठस्नान घालणाऱ्या आतंकवादी ना जरी, न्याय देवतेने फाशी ची शिक्षा ठोठावली तरी, या नराधमाना फाशी देण्याच्या पद्धतीवर आपले अमुल्य मत प्रदर्शन व त्या योगे (द्वारे ) सरकारवर एक प्रकारचे दबाव तंत्र आवलबिले आहे.

विशिष्ट न्यायाधीश श्री. तेहीलीयानी मुंबई आतंक हल्यातील एक मेव जिवंत अपराधी (आतंकवादी ) अजमल कसाब ह्याला फाशीची सजा सुनावली. आपण सर्व जण जाणतो कि ह्या पाकिस्तानी आतंकवाद्या नें १७० निरपराध माणसाना अमानुष पणे कंठ स्नान घातले आणि तो एकटा जिवंत पोलिसांनी पकडला. न्यायमुर्तींनी निकाल देताना स्पष्ट म्हटले कि जो पर्यंत जीव जात नाही तो पर्यंत फाशी द्यावी.पण, दुख या गोष्टीचे आहे कि अजून त्याला कां फासावर लटकविण्यात आले नाही? ह्या नराधमास यमसदनास पाठविण्याची प्रक्रिया कधी सुरु होईल ? ह्या प्रश्नाचे उत्तर आजून अनुत्तरीतच आहेत.

आपले राजकारणी मात्र ह्या गोष्टीवर खल करीत आहेत व राजकीय फायदा कसा होईल ह्याकडे त्यांचे लक्ष आहे. जो सुरक्षा कर्मचारी ह्यात धारातीर्थी पडला त्यांचे नातेवाईक जरी निकालावर आपली ख़ुशी दाखवतात पण त्याच वेळी कसाब ला लवकरात लवकर फाशी द्यावी असें जोरकस पणे आपले मत टीवी ,वर्तमान पत्रात मांडत आहेत.

सर्व राजकीय पक्षाचे ह्यावर एकमत नाही.प्रत्येक जण राजकीय फायद्याच्या मागे लागले आहेत. त्यांना देशाची व नागरिकांची काहीच पडले नाही पण राजकीय पटावर कमी पडू नये ह्या साठी धडपड चालू आहे. निरपराध जनतेची अमानुष कत्तल झाली ह्याचे देणे घेणे काहीच ह्यांना लागत नाही .ही आजकालची राजकारणी मंडळी फक्त राजकारण व फायदा जाणतात बस........

तमाम भारतीय जनतेस वाटते कि कासाबला लवकरात लवकर फ़ाशी झाली पाहिजे. आपल्या देशात फ़ाशी देण्याच्या प्रक्रियेत बराच कालावधी लागतो व तो किचकट प्रकार आहे. तरी पण कोणत्याही राजकारण्यांनी मग तो काणत्याही पक्षाचा असो, हा किचकट प्रकार कमीत कमी ह्या अशा आतंकवादीना जबर धडा शिकविण्यासाठी सोपा करण्याकडे कोणीही पुढाकार घेतला नाही याच खरें दुख आहे..........

काहीं नेत्यांनी तर फाशीची शिक्षा दिलेल्या निकालावर आक्षेप घेऊन एक नवा प्रश्न उभा केला ,तो कोणासच आवडलेला नाही. ज्या अफजल गुरूला संसदेवर हल्ला करण्यासाठी दोषी ठरवुन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ,तो अफजल गुरु गेले नऊ वर्षे जेल मध्ये सुरक्षित जगतो आहे. आश्या आतंकवादीना फाशीची शिक्षा होऊन पण कायद्याच्या किचकट अडचणी मुळे फ़ाशी दिली जात नाही व वर्षानु वर्षे त्यांच्या सुरक्षेवर जनतेचा पैसा खर्ची पडतो त्यां कडे कोणी लक्ष देईल का ?

फ़ाशी झालेल्या गुन्हेगारास उच्य न्यालयात जाता येते आणि त्यां मुळे भारतात फ़ाशी फार कमी वेळा दिली गेली आहे. पण तोच कायदा आपण ह्या नराधमास कां लावावा ? देशद्रोही गुन्हे करणाऱ्या साठी वेगळा कायदा अस्तित्वात असायला पाहिजे जेणे करून आशा आतंक वाद्यांना लगेच न्याय व फ़ाशी ची अंमलबजावणी करता येईल. पण...सध्याच्या कायद्या प्रमाणे जितका विलंब लागेल त्यां काळात ह्या आतंक वादीना जेल मध्ये सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी सरकारची. हा काहीं न्याय नाही ?...........

मुंबई हल्यात जें पोलीस अधिकारी मारले गेलेत त्यांचे नातेवाईक व तमाम जनता ह्यांना कसाब ला लवकरात लवकर फ़ाशी द्यावी असे वाटते आणि तेचं न्यायिक आहे न की , त्याला जेल मध्ये सुरक्षित ठेऊन जनतेचा पैसा खर्ची करणे .

ही केस न्यायालयाने पूर्ण निष्ठेने ,इमानदारीने व संपूर्ण पारदर्शकता ठेऊन हाताळली तसेंच बचाव पक्षाला पुरेपूर वाव दिला गेला . इतकेच नाही तर अमेरिकेच्या एफ. बी. आय. संस्थेच्या अधिकारी वर्गाची पण जाब , जबान्या घेतल्या गेल्या तेव्हा कुठे न्यायमुर्तींनी आपला अंतिम निकाल..... "फ़ाशी". ह्या निकालाने संपूर्ण जगाने बघितले कि भारतीय न्याय संस्था किती पारदर्शक व सच्ची आहे पण..........

लेखणीने आपले काम चोख बजावले व योग्य तो न्याय दिला तरी पण असे म्हणावसे वाटते की.... मुंबई ची मान शारमेने खाली आहे.............
अजमल कसब आजून जिवंत आहे........

मा. ना. बासरकर
१५ आक्टोबर २०१० .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: