मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

महाकवी कालिदास रचित " रघु वंश " 13

मखालयी अन्य त्रिलोचना परी /
वसे तया वृत्त निवेदना करी /
असा न कोणी म्हणवोनी पाठवा /
स्वदास जो हें कळवील पार्थिवा // ६७ //

तथास्तु असें वदुनी रघुप्रती /
निघोनी गेला स्वपथे शची पती /
सुदक्षिणा पुत्र न फार तोषला /
नृपाचिया यज्ञ गृहा निवर्तला // ६८ //

नृपाल त्याच्या अभिनंदना करी /
आधीच वार्ता कळवी जया हरी /
पवी चिये घाव जया कलेवरी /
शिवे मुदे कंपित जाहल्या करी // ६९ //

अशापरी नव्वद आणखी नऊ /
महा सवा पूर्ण करोनिया बहु /
अंतीआयूच्या त्रिदिवास जावया/
सोपान पंक्ति करि त्या चढवाया // ७० //

मग विषय ते सरेचि त्यागोनि तनुज्या प्रती /
नृपति लक्षणे दे सारी श्वेतछत्र सहीत ती /
मुनिवन तरु छाया सेविसदा सकलत्र हा /
सरत वय तो ईश्वाकू चलती कुलमार्ग हा // ७१ //

श्री कालिदास रचना रघु वंश ग्रथ /
काव्यात आद्य गणती इजलागि संत /
राज्याभिषेक रघुचा वदता कथाग /
झाला समाप्त बहु गोड तृतीय सर्ग // ७२ //

***********************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: