गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

महाकवी कालिदास रचित " रघु वंश " ( 4 )

नसेची कारागृही कोणी बंधना /
पुत्रोत्सवी मुक्त करू जया क्षणी /
म्हणोनी फेडी पितराचीया ऋणा /
नृपाल ऐसे करि मुक्त आपणां // २० //

कुमार शास्त्री तरबेज व्हावया /
अंताप्रती शत्रुं रणात न्यावया /
अर्थज्ञ रधी-अर्थ मनांत आणुनी /
सुतास देई रघु नाम तेक्षणी // २१ //

धनीक ऐशा जन कानु शासनी /
सुरम्य अंगे शिशु शोभला जनी /
रवी करांनी जणुं बालचंद्र तो /
दिनोदिनी वाढत जात वाटतो // २२ //

कुमार जन्मे गिरीजा तिचा पती /
जयंत जन्मे शची इंद्र नंदिती /
तया परी संप्रति राज दंपती /
सुता बघोनी बहु तोष पावती // २३ //

रथांग नामा खग दंपती परी /
प्रगाड जें प्रेम परसपरा वरी /
द्विधाजरी वाटतसे सुतामुळे /
परंतु वाडोनिच होत आगळे // २४ //

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: