सोमवार, १३ सप्टेंबर, २०१०

महाकवी कालिदास रचित " रघु वंश "

शय्येवरी ठेविती बाळ जेधवां /


प्रकाश फांके भावताली तेधवां /

तया मुळे निष्प्रभ दीप जाहले /

चित्रातले रेखितसेच भासले // १५ //

अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /

कुमार जन्मास अधी निरोपिती /

श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /

सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //

निर्वातशा स्थानिय पंक जापारी /

तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /

नृपास प्रेम न समाय अंतरी /

विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //

तापोव्नाहूनि वशीष्ट येउनी /

करीतसे जातक कर्म ते क्षणी /

संस्कार योगें बहु तेज पावला /

दिलीप सूनु मणि आकरातला // १८ //

चहूकडे मंगल वाद्य वाजती /

हर्षोछ्यवी रूप जिवाही नाचती /

दिलीप गेही नच एक वाटला /

पंथी सुरांच्या ही प्रमोद दाटला // १९ //

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: