bolg लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
bolg लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

सच्ची कहाणी डॉलर विरुद्ध रुपया.........








अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या  भावाशी निगडीत ठेवली आहे. कारण त्यांना कळले कि सोने आणि पेट्रोल ची किमत सारखीच आहे म्हणून त्यांनी मिडिल इस्ट मधील देशा सोबत एक करारनामा केला आणि त्यामुळे  ते लोक पेट्रोल डॉलर मध्येच  विकतात.

 ह्याच कारणाने त्यांच्या डॉलरवर छापलेले असते " this note is legal tender of all debts  pablic and privete " ह्याचा अर्थ जर का  तुम्ही  डॉलरच्या किमती  बदल्यात सोने मागितले तर त्यांचे गव्हर्नर देणार नाहीत . ह्या उलट भारत सरकाचा रुपया म्हणतो "  ” I promise to pay the bearer ......' असे नोटेवर छापलेले असते आणि खाली रिझर्व ब्यांकेच्या गव्हर्नरची सही आहे. याचा अर्थ जर तुम्ही रुपयाच्या किमती बदल्यात सोने घेवू शकता असा होतो .

डॉलरचा रेट खाली आणू शकू जर भारतीयांनी एक आठवडा आपली वाहने रस्त्यावर आणली
 नाहीत तर होणार्या पेट्रोल बचती मु ळे  डॉलरची किमत कमी होईल हे सत्य आहे कारण डॉलरची किमत   पेट्रोलशी  निगडीत आहे आणि  ह्यालाच  म्हणतात " Derivative Trading."


आता आपण उदाहरण  बघू या. आपला देश जेव्हा मिडिल इस्ट देशाकडे पेट्रोल विकत घेण्यासाठी जातो तेव्हा ते फक्त डॉलरच्या बदली पेट्रोल विकतात. समजा आपल्याकडे डॉलरची गंगाजळी पुरेशी नाही तेव्हा नाईलाजाने आपणास अमेरिकेकडे डॉलरची मागणी करावी लागते .ते जेव्हडे  डॉलर देतात त्या बदली आपण आपले रुपये देतो म्हणजेच तेवढ्या किमतीचे सोने नाही का ? पण गमत अशी आहे कि जर आपले मन बदलले आणि अमेरिकेस डॉलर परत करून आपले सोने घेवू तर ते देणार नाहीत व सांगतील "  Have we promised to return something back to you? Haven’t you checked the Dollar ? We clearly printed on the Dollar that it is Debt” कारण अमेरिकेस त्यांचे डॉलर चलन छापण्यासाठी सोन्याची गरज नाही ते कागदावर छापतात जेव्हा लागेल तसे.
प्रश्न असा उरतो अमेरिका मिडिल इस्ट कडून पेट्रोल डॉलर देवून घेत असेल असे  नाही भारताची खरी गोची अशी आहे कि आपणास डॉलर घ्यावे लागते पेट्रोल साठी म्हणजेच पर्यायाने तेवढ्या किमतीचे सोने देवून .जर भारतीयांनी पेट्रोलचा वापर अगदी जरुरी असेल तरच केला तर डॉलरची किमित निश्चित खाली येईल, 

दुसरा भाग म्हणजे आपल्या देशासाठी आपले उत्तर्दाइत्व   काय आहे ह्याची सर्व जनतेस माहिती  असावे .राजकारणी लोक निर्बुद्ध असल्या प्रमाणे वागत आहेत हे सत्य असले तरी त्यांना निवडून देणारे आपणच आहोत तेव्हा चुकीची दुरुस्ती आपणासच  करावी लागेल .भारताची खालावत जाणारी परिस्थिती सुधारायची असेल तर काही गोष्टी जनतेस कराव्या लागतील.

२००८ मध्ये डॉलरचा भाव रु, ३०-४० होता आता २०१३ तो रु,६३-६५ इतका झाला .ह्यावरून काय दिसते अमेरिकेची इकोनामी सुधारत आहे  नाही उलट आपली रसातळाला जात आहे हे सत्य .

आपल्या देशाची अर्थ व्यवस्था आपल्या हातात आहे जवळ जवळ ३०,००० कोटी रुपये बाहेरील देशात जात आहेत कारण जगभरातून जो माल आपल्या देशात विकला जातो त्यामुळे. परदेशी कंपनी ज्या मालाची इथे विक्री करीत   आहेत  जसे कोक,पेप्सी,पिझा ,बर्गर, सौंदर्य  ब्र्यांड ,सिंगल ब्र्यांड ,मल्टीपल ब्र्यांड वस्तू इत्यादी.जर का भारतीयांनी ठरविले कि ज्या वस्तू इथे मिळतात त्या वस्तू दुसर्या देशाच्या असतील तरी घेणार नाही आणि फक्त भारतीयच घेवू तर २/३ वर्षात आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सौजन्य राधिका  Gr. ह्यांच्या तेलगु लघु लेखावरून …… 

गुरुवार, २४ मे, २०१२

मतदार राजा जागा हो........




........येत्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये ९०% मतदान करण्यासाठी आवाहन.......!!!




सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित जपणारे अनेक लोक बऱ्याच प्रमाणात आहेत आणि अगदीच बोटावर मोजता येतील एवढीच राजनीतिक मंडळी आहेत जी जनतेसाठी काहीं करण्यासाठी योगदान देऊ शकतात.


 गेल्या ६० वर्षात आपल्या राजनीतीचा कसा खेळ खेळला  जातो  तो आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. मनी पावर +मसल पावर , जाती , धर्माच्या नावावर आज तागायतचे निवडणूक लढविले गेले .जनहिताची कोणतीही कामे न करता निवडून येत आहेत. ह्याचे सर्वात मुख्य  कारण म्हणजे शिक्षित लोक मतदान करीत  नाहीत आणि ज्यांचे पोट रोजच्या कमाईवर असते ह्या सारख्या अनेक लोकाना प्रलोभने ,जातीवादाचे जाळे पसरवून किवां दहशदीने मतदान आपल्या बाजूने करून घेत आहेत.


 विचार करा आत्ता पर्यंत झालेल्या सर्व निवडणुका मध्ये आपण  पाहिले कि फक्त ३० % ते ४५ % इतकेच मतदान झाले याचा अर्थ उरलेले जवळ जवळ ६० % मतदार मतदानास येत नाहीत . जगातल्या काहीं देशामध्ये मतदार जर मतदान करीत नसेल तर त्यासं शिक्षेची तरतूद आहे. भारत देश हा स्वतःला सेकुलर म्हणवतो पण इथेच या भ्रष्ट राजकारण्यांनी जातीभेद एवढा जोपासला आणि वाढविला त्यावर ते आपले उदिष्ट साध्य  करून घेत आलेत.


आतां वेळ आली आहे कि सर्वांनी जर मतदान केले तर यांची उद्दिष्टे  धुळीस मिळतील. आजकाल मोजकेच काही उमेदवार सोडले तर अनेकजण बेकायदेशीर व्यवहारात गुंतलेले व्  त्यांचा  अनेक घोटाळ्यातील सहभागामुळेच लोकांना परिचीत आहेत. अनेक मतदार संघात प्रामाणिक नागरीकाला योग्य पर्यायच उपलब्ध नाही.


चित्र असे आहे कि " संसदेची गरिमा " अबाधित ठेवण्याची मक्तेदारी फक्त याच निवडून आलेल्या राजकारण्या जवळ आहे असे त्याना वाटते . पण उलट जनतेनी बऱ्याच वेळा बघितले  कि हीच नेते मंडळी संसदेतच आपल्या स्वार्थासाठी संसदेच्या प्रांगणातच " घटनेची " पायमल्ली करतात .

कायद्याचे मुलभूत ज्ञान नसलेले, शीवीगाळ करणारे आपल्याला मिळालेले अधिकार म्हणजे जनतेच्या पैशातून विदेशवारी करणे, सुखसोयींचा मुक्त उपभोग घेणे व जनतेला कस्पटासमान मानणे असे यांचे वर्तन. आपल्याच मतदार संघातील मोजक्या मतदारांना खुष ठेवले की आपण निवडून येणार, इतर जनतेचे काही सोयरसुतक नाही अशीच यांची वागणूक आपण पाहिलेली आहे.

लोकशाही बळकट करायची असेल तर आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावूया व मतदानाची टक्केवारी ९० - ९५ % इतकी करुया. माहितीच्या अधिकाराने  आपण आपल्या परिसरातील न मतदान केलेल्याची लिस्ट प्राप्त करू शकतो आणि अश्या लोकाना येत्या निवडणुकीत मतदान करण्यास मनवू या. हें सर्व जन जागृती मुळेच शक्य आहे व त्यां मुळे आपली लोकशाही बळकट व  सुदृढ होईल.


लोकशाही ही जगातील ईतर राज्यप्रणाली पेक्षा चागली व्यवस्था आहे हें सर्वश्रुत आहे. पण योग्य समई नागरिकांनी आपली मते मांडणे व त्यावर साधक बाधक चर्चा करणे हा लोकशाहीचा गाभा आहे .जर का सुज्ञ मतदार आपल्या मतदानाच्या जबादारीतून पळ  काढीत आहेत तर दुर्दैव्याने  असे म्हणावे लागेल कि लोकशाहीचा गाभाच आतुन  पोखरला जाईल.


अशी स्थिती भारतीय लोकशाहीवर येवू  नये पण, सध्याची परिस्थिती बघता एक भयावह  परिस्थिती येण्याची चिंन्हे दिसत आहेत आपण नागरिकांनी वेळीच सावध होवून यासं पायबंद  घालू शकू याची खात्री आहे.

मुंबई व ईतर महापालिकेच्या निवडणुकांत मतदानाची टक्केवारी बघता असे खेदाने म्हणावे वाटते कि मतदारांनी आपली  जबाबदारी जी घटनेने मिळाली ती निट पार पाडीत नाहीत. मतदान हा आपला हक्क आहे तसेंच जबाबदारी पण आहे.


पाच वर्षात एकदा मिळणारा हा अधिकार ठामपणे आपले मत माडण्यासाठीच आहे . सगळेच उमेदवार एका माळेचे  मणी आहेत व भ्रष्ट आहेत.  आपल्या मतदार संघातील समस्या प्रभावीपणे मांडत नाहीत किवां मांडता येत नाही मग ते   विधान परिषदेत असो किवां राज्यसभेत / लोकसभेत असो  म्हणून यातील कोणाला निवडून काहीं उपयोग नाही म्हणून मतदान न करणे हें सर्वस्वी  चुकीचे आहे.


घटने प्रमाणे सर्व नागरिकाना एक  अधिकार   निवडणुकी संदर्भात  दिलेला आहे. कंडक्ट ऑफ इलेक्षण रूल्स 1961 कलम 49-ओ अन्वये मतदान न करण्याचे ठरवण्यार्‍या मतदारांना पर्याय दिलेला आहे
कलम 49-ओ पर्याय वापरा व लोकशाही टिकवा .................

49-O. Elector deciding not to vote.-If an elector, after hiselectoral roll number has been duly entered in the register of votersin Form-17A and has put his signature or thumb impression thereon asrequired under sub-rule (1) of rule 49L, decided not to record his
vote, a remark to this effect shall be made against the said entry in Form17A by the presiding officer and the signature or thumb impression of the elector shall be obtained against such remark.


मी एक जबाबदार नागरीक आहे. पण निवडणूकीत उभे राहीलेल्यापैकी एकही उमेदवार मला योग्य वाटत नाही म्हणजेच यापैकी कोणीच नको.. ‘None of the above’ हा पर्याय इलेक्ट्रोनिक मतदान मशीन वर आणण्याला बळकटी आणण्यासाठी मतदान करायला जा. कलम 49-ओ पर्याय वापरा. आपले मत नोंदवा.‘मला मतदान करायचे नाही’ हे आपले मत योग्य प्रकारे नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन रांगेत राहून पाच वर्षात एकदाच आपला अधिकार बजावणे मतदाराची जबाबदेही आहे.


हें ही सत्य आहे कि जर मतदारांनी ह्याचा वापर केला तरी अश्या मतांची मोजणी केली जात नाही म्हणून काहीं विचारवंत ह्या विषयी आवाज उठवत आहेत .त्यांच्या  प्रयत्नाना ईतर समविचारी लोकांनी पुढाकार घेऊन अशी  जनजगृती करावी व ‘None of the above’ हा पर्याय इलेक्ट्रोनिक मतदान मशीन वर आणण्यासाठी राज्यकर्त्याना भाग पाडावे. एकदा कां असे झाले म्हणजे सर्व उमेदवार व त्यांच्या राजकीय पार्टीला समजून चुकेल कि जर आपण प्रामाणिक कार्यकर्त्याला न उभे करतां राजसत्ता मिळवू शकत नाहीत.


तेव्हां सर्व मतदाराना कळकळीची विनंती आहे कि पुढच्या सार्वत्रिक  मतदानाच्या  वेळी सर्वांनी मतदान मग ते नकारार्थी कां असेना पण अवश्य करावे व लोकशाहीला बळकटी द्यावी.


जय मतदार.......जय भारत.....जय लोकशाही........!!!!

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

नारळी पौर्णिमा ( श्रावण शुद्ध पौर्णिमा )


नारळी पौर्णिमा  ( श्रावण शुद्ध पौर्णिमा )
राखी पौर्णिमा ( रक्षा बंधन ) / श्रावणी



नारळी पौर्णिमा :--- 





प्रामुख्याने  हा सण समुद्रकाठी राहणारे कोळी  बांधव साजरा करतात. वर्षाऋतूत समुद्र खवळलेला असतो व त्यामुळे कोळी बांधव मासेमारी साठी आपली बोटी समुद्रात घेऊन जात  नाहीत तसेंच जहाजे  सुद्धा नागरून ठेवतात. समुद्रदेवतेचा कोप होऊ नये व सर्व नौकां, जहाजे, बोटी सुरक्षित राहाव्यात आणि समुद्र शांत राहावा म्हणुन त्याची  पूजा
केलीजाते. जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कोळी लोक नारळ अर्पण करतात.  











राखी पौर्णिमा ( रक्षा बंधन ) :---




हा दिवस रक्षा बंधन म्हणुन साजरा होतो. ह्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व आपले रक्षण भावाने करावं असा या राखी बांधण्या मागचा हेतू असतो.
नेमका रक्षाबंधनाचा हा पवित्र सण कधीपासून साजरा होतो याची माहिती उपलब्ध नाही पण पुराणात अशी कथा आहे की, "पुर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला.
त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले". त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.
बहीण भावाच्या अतूटप्रेमाची आठवण नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात.  या विधीस "पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.




येनबद्धो बलिराजा दानवेन्द्र: महासुर:  /  
तेन त्वां प्रतिबद्ध नामि रक्षो मा चल मा //











श्रावणी ( श्रावण शुद्ध पौर्णिमा ) :---



                                                 यज्ञोपवीत  ( जानवे )





श्रावणी म्हणजे यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करण्याचा विधी. हा विधी श्रवण नक्षत्रावर करावं . असे सर्वजण ज्यांचे उपनयन ( मोंज्य ) झालेले आहे त्यांनी एकत्र येऊन हा विधी करावा ह्यांत प्रथम शरीरशुद्धीसाठी पंचगव्य  प्राशन करावे  नंतर गणपतीपूजन, होम, ब्रम्हयज्ञ,भस्म स्नान ,गोमय स्नान , मृतिका स्नान व शुद्धजल स्नान करावे. सप्तऋषींची पूजा करावी आणखी एक होम करावा ज्यांत सातूच्या पिठाच्या  २१ आहुत्या द्याव्या. प्रत्येकाने २ गोळ्या  ( सातूच्या )पाण्याबरोबर दातास न लागता भक्षण करावे.








गायत्री जप करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे. ब्राम्ह्चार्याने १ यज्ञोपवीत तर गृहस्ताने २ धारण करावीत.  


------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रे गुगल इमेजसच्या सौजन्याने .... 
(माहिती संकलन: विकिपेडिया)