पोटोबा

------------------------------------------------------------------------ 
             उंबर - (श्रावणी शुक्रवार स्पेशल)


          साहित्य 

                             १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ
                             १/२ वाटी तान्दूळाची पिठी
                              १ केळे कुस्करून
                               तळायला तूप
             कृती:

                    १. गूळ १/२ वाटी पाण्यात विरघळून घ्या
                    २. त्यात पिठी आणि केळे घालून एकजिव करून घ्या
                    ३. १५ मिनीटे ठेवा
                    ४. तूप तापत ठेवा
             ५. चमच्याने छोटे गोळे तूपात सोडून तळा (gloden brown)

             वैशिष्ट्य :
                     
                         श्रावणी शूक्रवारी जिवतीच्या नैवेद्याला हे करतात.
                                                                       
                                                                        ( संग्रहित )

-------------------------------------------------------------------------- 
                                 घरगुती फालुदा 


                    साहित्य :

           शेवई (बोम्बिनो कंपनीची),गार निरसं दुध,भिजवलेली सब्जा बी,                           

             २ मोठे स्पून रोझ सिरप,आईस्क्रीम स्कूप , सजावटीसाठी टूटी     
             फ्रुटी,काजू बदाम (ऐच्छिक), चेरी इ .


        
           कृती :

           शेवई उकळून घ्या (बोम्बिनो ची शेवयीचे वैशिष्ट्य तिला उकळी                         आणल्यावर शेवई जाडसर शिजते.)चाळणीने पाणी काढून टाका. 
     जर ती शेवई चिकटलेली असेल तर गार पाण्यात ती सुटी करता येते.

प्रथम एक ग्लास घ्या त्यात तीन मोठे चमचे शेवई 
त्यावर २ मोठा चमचा सब्जा(भिजवलेला) २ चमचे रोझ सिरप घालावे थंड निरसं दुध घालावे.
मोठा स्कूप आईस्क्रीम त्यावर टूटी फ्रुटी,काजू बदाम (ऐच्छिक), चेरी इ .
घालून आपला घरगुती फालुदा तयार . 

                                                        ( संग्रहित )             
----------------------------------------------------
क्रिमी पम्पकिन रेड पेपर सूप.साहित्य....


३ कप पम्पकिन तुकडे.

२  १/२  रेड बेल पेपर तुकडे. 

१ १/२ कप स्वीट पोटयाटो  तुकडे. 

१/४ कप कांद्याची पात कापलेले. 

१ चमचा मसाला.

१ चमचा दालचिनी पावडर 

२ चमचे ऑलिव ओईल .

१ चमचे लसून पेस्ट 

५ कप चिकन स्टोक 

१ चमचा बटर ( मीठ नसलेले )

१ चमचा रोजमरी लिव ( ऐच्छिक )

३/८ चमचा मीठ ( चवी नुसार )कृति ..... 

ओवन ४०० डी .फारण हाईट  गरम करा. एका बाउल मध्ये प्रथम आठ क्रमाने घ्या आणि त्यांत १/८ चमचा मीठ घाला आणि व्यवस्थित सर्व मिसळून घ्या. हे मिक्ष्चर प्यान  मध्ये व्यवस्थित एका थरात पसरावे  आणि ४०० डी .वर बेक करा ( साधारण ३० मिनिटा पर्यंत )

आतां एका सॉस पयन मध्ये सर्व भाज्या , चिकन स्टोक ,उरलेले मीठ टाकून उकळी येवू द्यावी . आता ग्यास कमी करून त्यातील  अर्धे शिजलेले मिक्ष्चर मिक्सर मध्ये टाका थोडे थंड झाल्यावर  आणि ते एकजीव करून घ्या. एका मोठ्या बाउल मध्ये काढून घ्या आणि उरलेले मिक्ष्चर परत मिक्ष्सर  मधून एकजीव करून बावूल  मध्ये काढून घ्या. आता हे  सर्विंग बावूल मध्ये रोज्मरीची पाने गार्निश करून गरमगरम सर्व करा.  ------------------------------------------------------------------------------स्पायसी बीट आणि गाजराचे सूप .......
साहित्य : ----

१/२ केजी  छोटे बीट सोलेले  तुकडे केलेले 

१/४ केजी सोलेले गाजरचे  तुकडे केलेले .

अडीच चमचे ऑलिव ऑईल  
चवीनुसार मीठ 

१ कप  सफरचंदाचे छोटे छोटे सोललेले तुकडे 

३/४ चिरलेले कांदा. 

१ १/२ कप ओर्ग्यानिक वेजिटेबल ब्राथ .

१/२ चमचा गरम मसाला 

२ कप पाणी 

१चमचा  लिंबाचा रस 

३/४ कप दही.


१/४ कप भाजलेले अक्रोडचे बारीक तुकडे.  


कृती :--  


आपले ओवन ४२५ डिग्री वर गरम ठेवा . एका बुल मध्ये बीट आणि गाजराचे तुकडे घेवून ११/२ चमचे ओलिव ऑइल चवीनुसार मीठ , आणि सर्व एकत्र करून घ्या . 

एका बेकिंग पण मध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित ठेवा आणि ४५० डिग्री वर ४० मिनिटे बक करण्यास ठेवा. ओवन मधून काढून बाजूला थंड होण्यास ठेवा. आता बित आणि गाजराचे छोटे छोटे तुकडे करा .कारण बेक करण्यासाठी मोठे तुकडे केलेले होते  आता त्यांत उरलेले ओळीव ऑइल थंड झालेल्या तुकड्यामध्ये मिसळावा .सफरचंद चिरलेला कांदा, गरम मसाला व्यवस्थित मिसळावा. हे मिश्रण परत ओव्हन मध्ये कमी उष्णतेवर  गरम करा व नंतर त्यांत ब्रोथ ,पाणी, टाकून एक उकळी येवूद्या .


आता हे मिश्रण थोडे थंड होण्यास ठेवा. थंड झालेले मिश्रण मिक्ष्सर मधून चांगले मिक्ष करून घ्या. ते मिश्रण चांगले सुपासारखे दिसेल आता एका बुल मध्ये काढून घ्या आणि त्यांत थोडे चवीनुसार लीम्बाचा रस मिसळावे आणि सूप बुल मधून गरम गरम वाढ .त्यापूर्वी त्या सुपावर २ ते ३ चमचे दही व २ चमचे अक्रोडाचे तुकडे घाला आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तीना नवीन सूप देवून आनंद  मिळावा.  ---------------------------------------------------------------------------
शेवग्याचे लोणचे .......

साहित्य:-- दोन ताज्या मधयम आकाराच्या ताज्या शेवग्याच्या शेंगा.


अर्धा किवां एक वाटी (मध्यम आकाराची ) चिंचेचे पेस्ट .


लाल तिखट १ १/२ चमचा .


मीठ चवीनुसार.


१/२ टी स्पून जिरे पावडर.१/४ टी स्पून हळद.


२ चमचे आले लसून पेअस्त.


२ चमचे ( मोठे ) तेल.  फोडणीसाठी जिरे,मोहरी,हिंग वापरणे.

कृती.:-- शेवग्याच्या शेंगा प्रथम निट धून घ्यावे. कोरडे करावे. ह्या शेंगाचे समान छोटे तुकडे करावे .
प्यान मध्ये किंचित तेल घालून मंद आचेवर वाफून घ्यावे व थंड करण्यास ठेवावे. त्याच प्यान मध्ये फोडणीसाठी तेल, जिरे,मोहरी,हिंग, घालून फोडणी तय्यार करावी. ह्या फोडणीत आले लसून पेस्ट, आणि चिंचेचे पेस्ट घालून एकत्र करावे. हें सर्व मिश्रण मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यावे चांगले शिजल्यानंतर त्यांत तीखर ,मीठ,जिरे पावडर, आणि वाफवलेले शेवग्याच्या शेंगा व हळद घालून एकजीव करावे .
आता ग्यास बंद करून थंड होण्यास ठेवावे. थंड झाल्यावर हें लोणचे खाण्यास घेण्यासाठी २/३ दिवस मुरावे लागते. लोणचे मुरल्यानंतर खाण्यास काढावे . हें चविष्ट लोणचे फ्रीज मध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते.


रेसिपी :--- वनमाला म्हैसेकर . पुणे.
-------------------------------------------------------------------------------
भरल्या वांग्याचे झटपट लोणचे..........

साहित्य:--         ४/५ लहान आकाराची ताजी वांगी ( Eggplant )


                          तिखट, धणे पावडर,आमचूर पावडर,किवां एका लिंबाचा रस .


                          चवी पुरते साखर, एक मोठा चमचा तेल, लहान चमचा मोहरी,

कृती:--- एका बुल मध्ये चवी नुसार मीठ,२ चमचे तिखट, २ चमचे धणे पावडर, चवी नुसार साखर व आमचूर पावडर किवां एका लिंबाचा रस हें सर्व एकत्र कर्वे . आणि हें सर्व वाग्याचे चार फाक करून त्यांत भरावे.
ही सर्व भरलेली वांगी कुकर किवां प्रेशर प्यान मध्ये वाफून घ्यावीत. एका प्यान मध्ये १ मोठ चमचा तेल , मोहरी घालून फोडणी करून घ्यावी. ही फोडणी वाफवलेल्या वांग्यात टाकावी. हें फोडणीचे वांगे थंड झाल्यावर खाण्यास घ्यावे.साधारण हें लोणचे २ दिवस टिकेल जर यासं फ्रीज मध्ये ठेवल्यास एक आठवडा ताजे राहते.


टीप:--- भरलेले वांगी वाफवताना पाणी अजिबात घालू नये.
रेसिपी .....श्रीमती पैठणकर. नागपूर.
-------------------------------------------------------------------------------------------------

Ingredient NameUnitQuantity
capsicum

number

5

chilli powderas per taste

coconut powerd

tbsp

1

coriader powder

tbsp

1/2

cumin seeds

curry leaves

ginger garlic paste

tbsp

1

mustard seedspinch

oil

tbsp

1

onion

number

1

saltas per taste

turmericpinch


This is a simple dish with Bell Pepper (Capsicum) goes well with pulka, Chapathi or even rice !!!

To prepare this dish

1. Heat a tbsp of oil in a sauce pan.
2. Add few mustard seeds
3. Add few Cummin seeds
4. Add fresh curry leaves, allow them to crackle
5. Now, add chopped onions, and salt (which helps the onions to cook fatster)
6. When the onions are slightly cooked add pinch of Turmeric
7. Add ginger - garlic paste.
8. When the onions are slightly sauted, add bell pepper (Do not cover it with a lid).
9. When the Bell pepper is slightly cooked, add 1/2 tbsp of coriander powder.
10. 1 tbsp of coriander pwd
11. chilli pwd according to your taste. Mix Well
12. you can be generous in adding cauliflower, potato, or green peas to this bell pepper which will enhance your dish even more.
13. After 10 mins of slow cooking, the capsicum (bell pepper) looks great and your dish is ready.
14. garnish it with Coriander (cilantro).
15. Serve with Chapathi, pulka, or Rice.


------------------------------------------------------------------------१२ -११ -२०१०

पेसर हटू ग्रीन डोसा .

आंध्र प्रदेशातील सकाळचा नाश्त्याचा हिरव्या मुगा पासुन बनविलेला पदार्थ. ( करण्यास लागणारा वेळ ३० मिनिटे व ४ लोकांस पुरेल )

साहित्य ;-----
१- हिरवे मुग          १ ग्लास लहान
२- तांदूळ               १/२ ग्लास लहान
३- कांदा                 १
४- हिरवे मिरच्या        २
५- जिरे                   १ चमचा
६- आले                 १/४
७- मीठ                  चवीनुसार .

कृती :----
हिरवे मुग व तांदूळ एकत्र पाण्यात ६ तास भिजवावे. भिजवलेले मुग व तांदूळ ,हिरवी मिरची, आले, कांदा, मीठ एकत्र करून ग्राईनडर मधून डोसा पीठ   तय्यार करून घ्यावे . हें तय्यार पीठ तापत ठेवलेल्या नॉन स्टिक तव्यावर मधोमध  एक वाटी डोसा पीठ टाकून गोल पसरावे व अधून मधून थोडे तेल चहू बाजूने टाकावे म्हणजे चांगले सुटून येईल. डोसा दोन्ही बाजूने सारखे  भाजून घ्यावे . गरमगरम डोसा खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी किवां आले चटणी बरोबर खाण्यास घ्यावे.


------------------------------------------------------------------------

मुग -सोया बिन सूप 


साहित्य :
 • एक कप मूग
 • अर्धा कप सोयाबीन / सोयाबीन ग्रनुअल्स / सोयाबीन चन्क्स
 • दोन टोमॅटो
 • दोन टे. स्पून तूप
 • ३-४ लसूण पाकळ्या
 •  
 • चवीनुसार मीठ, मीरे पूड, धने पूड, जिरे पूड, लाल तिखट पूड


कृती :
 • मूग, सोयाबीन आणि टोमॅटो कुकर मध्ये चांगले शिजवून घ्या. 
 • लसूण बारीक किसून घ्या नाहीतर बारीक कापून घ्या. 
 • शिजवलेल्या मूग, सोयाबीन आणि टोमॅटो चांगली बारीक पेस्ट करून घ्या. 
 • एका जाड बुडाच्या भांडयामध्ये तूप गरम करून घ्या. त्या तुपात लसूण टाकून लालसर होइपर्यंत भाजा. 
 • नंतर त्यात सगळे मसाले टाकून १० -१५ सेकंद हलवा. 
 • नंतर त्यात भाज्यांची पेस्ट, मीठ आणि गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या.झाला तुमचा मूग सोयाबीन सूप तयार. 
 • --------------------------------------
 •                       पुणेरी मिसळ
 • साहित्य
  . एक वाटी वाटाणे तासभर भिजत घालून कुकरमध्ये ३ शिटया देणे
  . एक वाटी मोड आलेली मटकी घेऊन कुकरमध्ये ३ शिटया देणे
  . दोन कांदे बारीक चिरून घेणे
  . एक टोमॅटो बारीक चिरून घेणे
  . छोटी अर्धी वाटी दाणे भाजून ठेवणे
  . एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून ठेवणे
  . मध्यम आकाराचे २ बटाटे उकडून, सोलून, मध्यम आकाराच्या फोडी करणे
  . एक वाटी नायलॉन चे पोहे
  . एक वाटी तिखट जाड शेव
  १०.एक वाटी फरसाण
  ११. डावभर तुरीची शिजवलेली डाळ

  कृती :-

  पोह्यांचा चिवडा: कढईत १ छोटा टीस्पून तेल गरम करण्यास ठेवावे. त्यात १ टीस्पून मोहोरी , २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, १ टीस्पून डाळं, चिमुटभर हिंग, २ टेबल्स्पून दाणे, २ काड्या कढीपत्ता घालून फोडणी करावी. ग्यास बंद करून कढई खाली उतरवावी, त्यात थोडी हळद, चवीनुसार, वाटीभर नायलॉन चे पोहे, थोडे तिखट घालून कालवून घ्यावी. यात १ टीस्पून चटणीपूडी पावडर कालवावी.तेलावर मोहोरी, हिंग व काळ्या मसाल्याची फोडणी देऊन, १ टीस्पून लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून, त्यावर शिजवलेली डाळ घालून २ वाट्या पाणी घालून उकळवून घ्यावी, व बाजूस काढून ठेवावी.१ टेबल्स्पून तेलावर चिमुटभर हिंग, १ टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालून परतणे. नंतर १ वाटी शिजलेले वाटाणे, अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद घालून एक उकळी आणून बाजूस काढून ठेवावे.उसळः तेलावर मोहोरीची फोडणी घालून मटकी, १ टीस्पून  जिरे, चिमुटभर हिंग, अर्धा टीस्पून तिखट, १ टीस्पून काळा मसाला, किंचित चवी पुरता  गूळ, १ आमसुल आणि १ टेबल्स्पून भाजलेले दाणे घालून नेहेमीप्रमाणे उसळ शिजवावी. शिजवलेल्या डाळीचे पाणी वेगळे काढून ठेवून डाळ वाटाण्यात मिसळावी. तर्री वेगळे काढून ठेवलेले पाणी १ टीस्पून तेलात  २ लसणाच्या पाकळ्या घालून, पाव टी स्पून तिखट व अर्धी वाटी टोमॅटो घालून उकळत ठेवावे.एका प्लेट मध्ये १ डाव कढत वाटाणे-डाळ घालावी. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या ४-५ फोडी घालून, वर एक डाव कढत उसळ घालणे, त्यावर एक डाव नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा घालून, एक डाव जाडी शेव भुरभुरणे, १ टेबल्स्पून बारीक चिरलेला  कांदा व  कोथिंबीर घालावी. सर्व्ह करतांना पळीभर तर्री घालावी लिंबाची फोड बाजूस नक्की ठेवावी.
  अर्धी मिसळ खाल्ल्यावर दही कालवल्यास चव आधिक वाढते! दह्यावर पुन्हा एकदा कढत तर्री घातल्यास आणखी चवदार होते.

  29-10-10
  -----------------------------------------------
  मटार गाजर भाजी

  हा प्रकार करण्यास सोपा व आरोग्यदायक आहे. ही भाजी रुचकर व थोडी तिखट,रंगतदार असल्यामुळे कोणत्याही जेवणा बरोबर उठून दिसेल. ही भाजी चार जणास पुरेसे होईल.

  साहित्य :-

  गाजर ( उभे किवां आडवे १/२ " कापाचे चिरलेले ) दोन वाटी.

  बटाटे ( १/२" काप चिरलेले ) एक वाटी.

  मटार ( हिरवे ) एक वाटी

  तेल दोन चमचे.

  अज्वाइन ( ओवा ) एक लहान चमचा.

  सुके लाल मिरची चार

  धने पावडर एक लहान चमचा .

  हळद अर्धा चमचा.

  मीठ चवीनुसार.

  लिंबाचा रस एक लहान चमचा .

  कृती ;---
  एका पसरट कढईत तेल मध्यम आचेवर तापवावे ( तेल जास्त गरम नसू नये ) त्यांत अज्वाइन ,लाल मिरची ,हळद घालावे व थोडा वेळ परतून घ्यावे. त्यांत गाजराचे ,बटाटा यांचे काप व हिरवे मटार ,धना पावडर व मीठ ( चवीनुसार ) घालून त्यावर झाकण ठेऊन त्यासं साधारण दहा मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यावे. अधून मधून सारखे शीजलेत का ते पाहावे व तसे झाले कि आच बंद करावे. चवी प्रमाणे लिंबाचा रस त्यांत मिसळावे. आतां हा पदार्थ खाण्यासाठी गरमा गरम असतानाच घ्यावे.

  ०७/१२/१०
  -----------------------------------------------------------

चवदार व्हेजि बर्गर--------
साहित्य :--

४ कप मशरूम

२ कप बीट ( कापलेले )

१ १/२ कप बेल पेपर ( कापलेले )

३ १/२ कप बीन्स ( काळे किवा सफेद व काळे डोळे असलेले )

२ १/२ कप बार्ली ( वेजि स्टाक मध्ये शिजवलेले )

२ कप कान्दा ( बारिक चिरलेलेला )

६ भाजलेले लसुन

१ कप सेलरि ( )

१ प्याक बुलिअन ( ) क्युब्स

१ १/२ कप व्हाईट विनेगर

१ चमचा मोहरी पेस्ट

२ चमचे टोम्याटो क्याचप्एक बाउल मध्ये शिजवलेले बीन्स मिक्सर मधुन चागले एकत्र करून घ्या नंतर त्यात कापलेले बीट्स, बेल पेपर व बार्ली एकत्र मिसळुन घ्या आणि बाजुस ठेवा ह्या नंतर ओलिव आइल वर कान्दा ,भाजलेले लसुन व सेलेरी एकत्र मध्यम आचेवर चागले भजुन घ्या आता त्यात वेजि बुलियन क्युब्स ,मोहरी पेस्ट , विनेगर व क्यचप् घालून शिजवा जो पर्यन्त त्यातील पाण्याचा अन्श जाणार नाही आता हे सर्व मिक्सर मधुन एकरूप करून घ्या ह्यात् बीन्स,भज्या व बार्ली चे मिस्रण घाला व परत एकरूप करा आणि बाजूस ढेवा
२ कप ब्रेड क्रम व चार आन्डी घेवून बाजुस ठेवलेया मिस्रणात मिसळुण

एकजिव करा व हे सर्व फ्रिज मध्ये जवळ, जवळ दोन तास ढेवावे ह्या मुळे

मिस्रण चागले एकरूप होइल् दोन तासा नंतर त्याचे लहान किवा मोठे

गोळे तय्यार करून ते सपाट करावे व बेकिन्ग प्यान् मध्ये जवळ जवळ रचावे ( प्रत्येक टिक्की चार इन्चाची असावी ) आता हे सर्व टीक्या ओव्हन मध्ये ३५० डिग्री तापमानात ३०/४० मिनीटे ठेउन पाहवे कि आतुन चागली

शिजली आहे ओव्हन मधुन काढून बाहेर थण्ड् होण्यास ठेवावे
खण्यास घेण्या प्रवी ह्या टिक्या तव्यावर थोडे अलिव आइल मध्ये भजुन घ्यावे म्हणजे ते खरपुस लागतिल हे तय्यार टिक्की बर्गर पाव मध्ये कान्दा ,टोमाटो ( गोलाकार काप ), लेटस व मस्टरड पेस्ट रचून घ्यावे ।

------------------------------------------------------------------
Asian Green Bean Salad
Ingredients


Salad:
3 ounces uncooked linguine
1 pound green beans, trimmed
2 cups diagonally sliced celery
1 cup thinly sliced red bell pepper
1/2 cup (1/2-inch) slices green onions
1/3 cup chopped fresh cilantro
Dressing:
1/4 cup rice wine vinegar
1/4 cup low-sodium soy sauce
2 tablespoons dark sesame oil
2 teaspoons grated peeled fresh ginger
1/2 teaspoon sugar
1/4 teaspoon freshly ground black pepper
3 garlic cloves, minced
1 red jalapeño pepper, seeded and finely chopped (about 1 tablespoon)

Preparation
1. To prepare salad, break linguine in half. Cook pasta according to package directions, omitting salt and fat; add beans during last 3 minutes of cooking. Drain and rinse with cold water; drain. Place mixture in a large bowl. Stir in celery, bell pepper, onions, and cilantro.

2. To prepare dressing, combine vinegar and remaining ingredients in a small bowl; stir with a whisk until blended. Add to salad; toss well. Cover and chill.
8 servings (serving size: 1 cup)
==============================
आचारी पनीर- पालक रयाप

पनीर हा उत्तर भारतात जवळ ,जवळ प्रत्येक भाज्यांत वापरला जातो . पंजाबी लोक ह्याचा जास्त उपयोग करतात. पनीर हें पौष्टिक व प्रोटीन युक्त असल्यामुळे स्वास्थ्यास चांगले असते. पनीर पासून बनवलेले पदार्थ साईड डीश ,एपिटाईझर म्हणून वापरण्यात येतो. ही डीश आठ व्यक्ती साठी पुरेशी आहे.
साहित्य :----
४२५ ग्राम पनीर १/२ " मध्ये चौकोनी तुकडे कापलेले
१/८ चमचा हाळद , १ चमचा लहान मीठ,
१/४ काप दही,
२ मोठे चमचे ओलिव्ह ओईल ,
४ लाल सुकी मिरची
चिमुटभर हिंग,
१/४ लहान्चामाचा कांदा किवां कालोन्जी बी ,
१ लहान चमचा धणे ,
१/४ लहान चमचा मेथी ( फेनुग्रिक बी )
१/२ लहान चमचा मिरे , १ १/२ काप पालकाची पाने.
कृती :---
१- एका बाउल मध्ये पनीर + दही + हळद + मीठ चांगले मिसळून घ्या व बाजूस काढून ठेवा.
२- फ्राय प्यान मध्ये मध्यम आचेवर कांदा/कालोन्जी बी +धणे + मेथी (फेनुग्रीन बी) + मिरे चांगले रंग बदले पर्यंत भाजून घ्या व थंड करण्यासाठी बाजूस काढून ठेवा.
३- हें थंड झालेले एकत्र बी ठेचून लहान लहान तुकडे करून घ्या.
४- आता एका प्यान मध्ये थोडे ओलिव्ह ओईल घेऊन त्यांत लाल मिरच्या चांगले भाजून घ्या व थंड करण्यास बाजूला काढून ठेवा . थंड झाल्यानंतर त्याचे लहान तुकडे करून ठेवा.
५- फ्राय प्यान मध्ये मध्यम आचेवर थोडे ओलिव्ह ओईल मघ्ये चिमुट भर हिंग + पनीरचें तुकडे + दही एकत्र चांग
शिजून घ्या जो पर्यंत दह्यातले पाणी कमी होत नाही तो पर्यंत शिजवा ( जास्त शिजवू नका नाही तर पनीर कोरडे होतील )
६- दही+ पनीर एकत्र झाले पाहिजेत ज्या मुळे पनीर ओलसर राहतील. आतां ग्यास बंद करा.
७- बाजूस काढून ठेवलेले एकत्र बी यांचे तुकडे + पनीर मिश्रण चांगले मिसळून घ्या.
८- हें मिश्रण स्वच्छ धुवून कोरडे केलेल्या पालकाच्या पानातून खाण्यासाठी ध्यावे.
नोट :- आचारी पनीर करण्यास फार सोपे आहे व ही साईड डीश गरम किवां थंड दोनीही प्रकारे आपल्या आवडी प्रमाणे खाता येत
आचारी पनीर जर फ्रीज मध्ये ठेवल्यास एक आठवडा चांगले राहते.
२७-१२-१०
========================================================================
क्रिमी टोम्याटो सूप
गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्याच्या थंडीत गरमा गरम क्रिमी टोम्याटो सूपचा आस्वाद घेताना उबदार होऊन जातो. जर कां त्या बरोबर ग्रील चीज स्यान्डवीच किवां पास्ता असेल तर मग काय विचारता मज्याच मज्या नाही का?


सहा लोकां साठी बनवण्याची कृती खालील प्रमाणे.

साहित्य :---
दोन टेबल चमचे बटर ,एक कप चिरलेले कांदे, एक कप चिरलेले गाजर, १/३ कप चिरलेले सिलेरी ( Celery ), १ १/२ कप वेजिटेबल ब्रोथ ,एक चहाचा चमचा बेसिल पावडर, १/४ मीरी पूड, एक टीन ( २८ ओंस ) डाईस्ड टमाटर ,दोन कप शिजवलेले पास्ता, एक कप दुध .

कृती :---

प्रथम फ्राय प्यान मध्ये बटर हलक्या आचेवर गरम करा व त्यांत चिरलेला कांदा, गाजर, सिलेरी टाकून चांगले लालसर होऊद्या. आता ब्रोथ ,बेसिल, मिरी आणि अर्धे डाईस्ड टमाटर घालून एक उकळी येऊ दया. नंतर १५ मिनिटे ग्यास बंद करून थंड करून घ्या. ह्यात १/२ कप शिजवलेला पास्ता घालून परत मंद आचेवर पाच मिनिटे ठेवा व नंतर उरलेले टमाटर मिक्सर मधून पिऊरी करून घ्या. ही तयार पिऊरी व १/२ उरलेला पास्ता व दुध प्यान मध्ये चांगले गरम करून घ्या पण उकळू नका . गरम करताना वेळो वेळी ह्या मिश्रणास ढवळत राहवे म्हणजे करपणार नाही. हें तयार क्रिमी सूप स्वादिष्ट तसेंच उब देणारे असेल.
पौष्टिकतेची माहिती:-- १७५ क्यालेरीज ,५.२ ग्राम फ्याट, प्रोटीन ६.१ ग्राम, कर्बोहाड्रेड २७.९ ग्राम, फायबर ४ ग्राम, कोलोस्त्राल १३ मिली ग्राम, लोह १.३ मिली ग्राम, सोडियम ४९२ मिली ग्राम, क्याल्शियाम ९३ मिली ग्राम.
---------------------------------------------------------------------------------------------------
फ्राईड चीझ स्टिक्स -अपिटाझर 

साहित्य
दोन पाकिटे मोंटेरेय ज्याक चीझ + हलोपिनो मिरची.
एक कप ऑल परपज आटा.
१ १/२ चहाचा चमचा लाल तिखट.
एक कप सुका ब्रेडक्रम.
एक चमचा सुकी परसली
चार अंडी
तेल आणि वाटल्यास म्यारीनारा सॉस.
कृती
मोंटेरेय ज्याक चीझ चें ३/४ इंचाचे आडवे तुकडे चिरा. आल परपज आटा आणि लाल तिखट एकत्र चांगले मिसळून घ्या. दुसऱ्या बुल मध्ये ब्रेडक्रम व परसली एकत्र चांगले मिसळून घ्या. अंडी चांगले फेसाळून घ्या नंतर त्यांत चीझचे कापलेले तुकडे पूर्ण बुडवून आटा व तिखटाच्या मिश्रणात फिरवा आणि पहा पीठाचे मिश्रण सर्व बाजूने चीझ्ला लागले गेले आहे. परत आजून काहीं चीझचे तुकडे घ्या व ते ब्रेड क्रम च्या मिश्रणात चांगले चहू बाजूने लागेल असे बघावे. हें सर्व चीझचे सर्व तुकडे एका बेकिंग पत्रात किवां व्याक्स पेपरवर ठेवून फ्रीझ मध्ये ३० मिनिटे ठेवा. आता हें चीझचे तुकडे चांगले गोलडन रंग येई पर्यंत तळून घ्या. सर्व तळलेले तुकड्या मधील तेल काढण्यासाठी पेपरवर ठेवा जरा वेळाने ते बरया पैकी तेल विरहित होतील. आता हें म्यारीनारा सास बरोबर खाण्यास घ्य==========================================================================
उपामा कोजहुक्कात्तै

ही डीश तमिलनाड प्रान्तात " पिडी कोजहुक्कात्तै " म्हणून प्रसिध् आहे। ह्या उपम्याचा उपयोग ब्रेक फास्ट किवा रात्रिच्या जेवणासाठी केला जातो। हा पदार्थ प्रोटीन युक्त असल्यामुळे आरोग्यास उत्तम आहे।


साहित्य

तान्दुळ......... १ कप
तुर दाळ......... १ टेबल चमच
खीसलेला नारळ......... २/३ टेबल चमचे ( आवडी प्रमाणे जास्त किवा कमी घालावे )
मीठ.......... चविनुसार
मोहरी ..........१/४ टी स्पून
चना दाळ .....१ टी स्पून
कडीलिम्ब ....३/५ पाकळया.
हीन्ग ........१/४ टी स्पून
सुकलेली लाल मीरची.....दोन
तेल ..१ टेबल चमचा

कृति --१

प्रथम तान्दुल् व दाळ नीट स्वच्छः धुवून घ्या। दोनीहि येकत्र करून घ्या आता मीक्सर मधुन चागले मिसळा तो सूजी सारखा झल पाहिजे।
कढई मध्ये तेल व त्यात मोहरी घाला चन्ग्ले तड तड्ले कि मग चना दाळ ,कडीपत्ता, लाल मीरचिचे तुकडे व हिन्ग घाला। खिसलेले खोबरे + मीठ + ३ कप पाणी घालून उकळत ठेवा आत्ता तयार करून ठेवलेली तन्दुल+डाळ पौडर मन्द आचेवर उकळत्या पाण्यात थोडे थोडे मिसळा व झाकण ठेवा थोडा वेळ जाउद्या आणि नंतर खाली उतरून थण्ड् होण्यासाठि ठेवा। आत्ता त्याचे गोळे तय्यार करून इडली पात्रात ठेऊन २५ मीनिते वाफाळुन घ्या। हे तयार ईडली संभार किवा चटणी बरोबेर सर्व करा।

कृति--२
तान्दुल् + तूर दाळ येकत्र सुके ग्रा ई ड करण्या यैवजि तूर दाळ आर्धा तास भिजवून + चवि प्रमाणे हीरव्या मिचिचे तुकडे घालून मग मिक्सर मधुन चागले मिसळुन मग उकळत्या पाण्यात तान्दलाच्या पीठा बरोबेर शिजवा म्हणजे चागला स्वाद येइल।
---------------------------------------------------------------------------------------------------
Recipe of capsicum sada masala