सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

देश विदेशातील गणपती......!!





       गणेश  चतुर्थी  ( निज  भाद्रपद  )  १९-९-२०१२.












                        
                    गणपती  बाप्पा मोरया .................!!!!



    " ऊँ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डायधीमहि तन्नो दन्ति:प्रचोदयात्। "











१ ) द्विभुज गणपती ( बाली )







ह्या गणपतीस अग्नी रुपी सुद्धा म्हणतात कारण त्यांना जी चार आयुध्ये ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. 'पाश', 'अंकुश', 'कमल' आणि 'परशू' ही आयुधे ही होत.






२ ) विद्या मूर्ती गणेश-- -( रोम )
 
 
 
इ.स. १७९१ साली “ब्राम्हविक पद्धती” ह्या लॅटीन भाषेत प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात विद्येचा स्वामी म्हणून ह्या श्री गणेशाचा उल्लेख सापडतो. एका हातात लेखणी व दुसर्‍या हातात दौत असे द्योतक दाखविले आहे. रोम मध्ये बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील गणेश मूर्ती ही भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. ही द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी आहे.

रोम मध्ये ह्यास श्री गणेश गुरु म्हणून ओळखले जाते. ही मूर्ती पद्मासन घालून बसलेली आहे आणि मस्तकावर शिवलिंग त्यावर घंटा, कपळावर नाम (भारतीय पद्धतीप्रमाणे) मान सरळ व उंच, मनगट व दंडावर वाळे असून गळ्यात एकही अलंकार किंवा दागिना नाही . डाव्या खांद्यावरून छातीपर्यंत उपवस्त्र, छातीभोवती सर्पांचे वेटोळे असून त्याचा फणा डाव्या बाजूला पसरलेला दिसतो. गणेश मूर्तीच्याशरीराच्या मानणे चेहरा मोठा आहे हें एक रोमन शिल्प संकृतीचाच पुरावा देतो. ही मूर्ती संपूर्ण लाकडी असून भौगोलिक वातावरणाचा कसलाही परिणाम ह्यावर झालेला नसून मूळ स्वरुपात ही मूर्ती आज दिसत आहे.


 
३) बोरोचा गणेश ....( जावा )



 


बोरोचा गणेश” म्हणून ओळखली जाणारी ही पाषाणमुर्ती दिडोंबे गावाजवळ सापडली. ह्या मूर्तीचे डोके शरीराच्या मानाने फारच मोठे आहे. इतके की ते शरीराचा मधला भाग जवळ जवळ झाकून टाकते. डोळे मोठे अगदी मानवी डोळ्यांसारखे असून भुवया जाड आहेत. चारही हातात विविध नेहमीची अस्त्रे असून पाय मुडपलेला आहे व तळवे एकमेकांना स्पर्श करताना दिसतात. 


 त्याने रत्नखचित मुकुट, कुंडले, बाजुबंद व वाळे धारण केलेले आहेत. भरतकाम केलेलें वस्त्र पायावरून खाली आसनावर लोंबत आहेत असे कार्लेले आहे. आसनापुढे नरमुंडाची रांग आहे व मागच्या बाजूस एक लेख कोरलेला असून त्यावर शके १९६० हा काळ कोरलेला आढळतो. 





 


या गणेश मूर्तीचा पुढील भाग भारतीय जावा पद्धतीचा आहे. तर मागील बाजू इंडोनेशियन पद्धीतीची आहे. त्यावर कापालिक यक्षरक्षक ज्याचे बटबटीत डोळे व डोके कोरलेले आहे. जावात बहुतेक देवळाच्या दोन्ही बाजूस भूत पिशाच्यांपासून स्वरक्षण करण्याकरिता उभे केलेले आढळतात.

  


४) श्री गणेश.............( कंबोडिया )
 

 

कंबोडियात गणेशास प्रहकनेस असे म्हणतात. ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. कंबोडिया इतिहासात मात्र ही मुगणेश मूर्ती दुर्मिळ मानली जाते तसेंच चीनी साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे राजे महाराजे आपल्या सिंहासनावर ज्या पद्धतीने बसत त्याच पद्धतीची ही मूर्ती बसलेली आहे.

 



कंबोडिया संस्कृतीचे शिल्प व कला कौशल्याचे दर्शन घडते जेव्हा ही मूर्ती बघतो कंबोडियन राजे ज्या प्रकारचा मुकुट व अलंकार पेहराव धारण करीत असतं त्याच पद्धतीचा मुकुट श्री गणेश धारण केलेला आहे. मुकुट पूढील बाजूस किरीटासारखा व मागील बाजूस चक्राकार उंच उंच व अगदी निमुळता होत गेलेला आहे व विविध प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. ह्या मूर्तीत भारत व चीन संस्कृतीचा मिलाप आढळतो पण नजर मात्र जावा पद्धतीप्रमाणे खाली आहे .



 
५) सूर्य विनायक ---- ( नेपाळ )





 
 
विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ह्या भव्य मंदिरांत मध्य भागी मुख्य देवता सूर्य विनायक व त्याच्या भोवती चित्रांकित चार गणपती आहेत . हें चार ही गणपती नृत्य मुद्रेत आढळतात हें नेपाळच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. 


नेपाल संस्कृती गजाननास स्वयंभू व सूर्य किरणा पासुन उत्पत्ती झाली असे मानतात न कि शिवाचा पुत्र व भारतीय उत्पत्तीच्या कल्पना मानीत नाहीत. हे ह्या मूर्तीचे प्रमुख वैशिष्ठय म्हणजे एक मस्तक व चार हात आहेत. चारही हातात वेगवेगळी वस्तू दिसतात जसें परशु , मोदक पात्र , रद आणि जपमाळ दिसते .



हा सूर्य विनायक दोन मूषकावर बसलेला आहे. चेहरा लांबट सोंड लहान व डोळे तिरकस ,पायात नक्षीदार चिलखत, आणि कपाळावर तृतीय नेत्र किंवा शैवगंध आहे हे विशेष. मस्तकावर शिवा सारखा किरीट आहे शिवपुत्र न मानताही सूर्याप्रमाणे त्याला तेजोवलय दाखविले आहे. आसनावर शिवपिंडी सारखे आकार दिसतो हे आश्चर्य होय. हातातील जपमाळ व पायावरील नक्षीदार चिलखत हे जगात न आढळणारे दुर्मिळ गणेशाच्या मूर्तीत येथे पहावयास मिळते ही गोष्ट आश्चर्यचकित करण्यास लावणारी आहे.




अशी अख्याईका आहे कि हें मंदिर सम्राट अशोकच्या मुलीने ८ व्या शतकांत बांधले तेव्हां पासुन इथें गणेशाची पूजा अर्चा केली जाते. येथील एका भूज पत्रावर आर्य कालीन गणेश आवाहन मंत्र लिहिलेले सापडले " नमो भगवते आर्य गणपती हृदयाय: '" ह्या गणेशाचे नामा निधान व रचना बघून भारतीय संस्कृती व नेपाली संस्कृती ची किती जवळीक होती हें निदर्शनास येते.


 
 ६) योगविंदा श्री गणेश ( श्रीलंका )
 


 
 




                   



 

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्‍या काटरगाव येथील श्री सुब्रमण्यम मंदिरात हा श्री गणेश स्थापित आहे. ह्या गणेशाची मूर्ती आणि रचना थेट आपल्या दक्षिण भारतीय कलाकृतीची  छाप असल्याचे जाणवते. बालाजीला जसें मुकुट आहे त्याच पद्धतीचा मुकुट आणि गळ्यातील दागिने व यज्ञोपवीत साधे ,मूर्ती एकदंत असून डाव्या हातात मोदक वरच्या दोन्ही हातात आयुधे आढळतात. ही आयुधे अस्पष्ट दिसतात.


मूर्तीच्या बाजूस सेवकगण आहेत. मूर्तीच्या आसनावर तीन चित्रे कोरलेली आहेत त्यापैकी मधल्या चित्रात अग्निकुंड, बाजूला पुजारी व शेवटी उंदीर दाखविले आहे .हें दैवत जागृत आहे आणि गाभार्यात कोणासही प्रवेश नाही व  दिवसा दिवे लावावे लागतात ही पद्धत आपल्या कडील दक्षिणी देवालाया सारखीच आहे. हा गणेश वरद असून त्याच्या कृपाप्रसादाचे अनुभव अनेकांना आल्याच्या अनेक कथा आहेत. श्री गणेशाची पूजा पहाटे, दुपारी व संध्याकाळी अशी त्रिवार होतें .


 
७ ) महापियेन श्री गणेश ----( ब्रम्हदेश )




 


श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी अशी माहिती मिळते व ही मूर्ती ६व्या शतकातील असावी असा अंदाज आहे. ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे आणि हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. 



ही मूर्ती मात्र रेखीव असून कंबोडिया गणपती प्रमाणे महाराजा प्रमाणे आसनस्थ आहे. मूर्ती रेखीव व सर्व अलंकारासहित दिसते. दोन संपूर्ण सुळे हे ह्या गणेशाचे वैशिष्ट म्हणावे लागते. गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत व ज्या अवस्थेत ठेवलेला डावा हात आहे हे बौद्ध पंथाचा प्रभाव दिसतो . 



भारतीय, ब्राम्ही, कोम्बोडीयन बौद्ध कलेचा व संस्कृतीचा संगम झालेला दिसून येतो. परदेशातील गणेशाच्या मूर्तीत मूषक वाहन सापडत नाही पण ह्या मूर्ती शेजारी मूषक आढळतो ह्यावरून असे अनुमान केले जाते कि ह्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतो.



 
८) श्री गणेश रत्नजडित---- ( तुर्कस्तान )

भारतीय संस्कृती प्रमाणे वर्णिलेले ‘रत्नखचित’ श्री गणेशाचे दर्शन आपणास तुर्कस्तान येथे घडते. ह्या चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात लाडू त्यावरील हातात बाण व डाव्या हातात मुळा व दुसऱ्या हातात परशु, दंडात व मनगटात तुर्कस्तानीय संस्काराचे दागिने, सोंड, मोदक-पात्राकडे न वळता खाली कानाकडे झुकलेली आहे.









   एन्डेअर येथे बुद्ध स्तूपाच्या भोवतालच्या वाळूत पत्रा व लाकडी रंगीत फळ्या सापडल्या त्यातील एका फळीवर रत्नजडीत ‘श्री गणेश’ भारतीय संस्कृती प्रमाणे तर तुर्कस्तानच्या विशिष्टपणा सह पितींबर, त्यावर व्याघ्रचर्म, मस्तकावर नागाच्या वेटोळ्याचा मुकुट, परंतू गळ्यात रुद्राक्षाच्या ए‍‌वजी मोत्याची माळ दिसते हे त्याचे एक वैशिष्ठ्यच मानवें लागेल.असा हा श्रीगणेश येथे शिवपुत्र म्हणून ओळखला जात असावा असे वाटते.


९) श्री गणेश ---( अल्ची )


अल्ची हें ठिकाण हिमालयाच्या उंच शिखराच्या मागे चीन आणि तुएकस्तन यांच्या खोऱ्यात एक छोटे खेडे आहे जें ह्या जगापासून एकदम अलिप्त आहे तिथे आपली भारतीय संकृती पोहोंचली त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तिथला गणपती.


 बौद्ध संस्कृतीचा प्रसार याही भागात दिसून येतो आणि येथील बौद्ध मंदिराच्या प्रवेशासच  श्री गजाननाची सुबक मूर्ती आपणास पहावयास मिळते . अल्ची येथे मात्र ‘श्री गणेशाला’ अग्रपूजेचा मान दिलेला आढळतो हा श्री गणेश भक्तांचे मन व दृष्टी खिळवून ठेवतो. प्रथम-दर्शनीच आपल्याला नाविण्यपूर्ण वाटते.


वक्रतुंड, सरळ सोंड म्हणून जगमान्य श्री गणेश येथे समांतर रेषेत सरळ सोंड असलेला आढळतो. ही भव्य, आगळी-वेगळी गणेशमूर्ती विराजमान झालेली आहे मृग-चार्मावर एवढेच नव्हे तर त्याच्या दोन्ही बाजूस मृगही आढळतात. 


ब्रम्हदेशातील गणेशाप्रमाणे खांद्यावर घेतलेले उपरणे दोन्ही खांद्यावरून पोटापुढे आलेले दिसते एका हातात सुळा, दुसर्‍या हातात परशु, एक हात गुडघ्यावर व एका हातात जपमाळ असे रूप दिसते. डोक्यावर पंडिताप्रमाणे घेरा, कपाळावर नाम हे सारे विद्येची देवता म्हणूनच आपणांसमोर दिसते. या गणेशाच्या गळ्यात, हातात, दंडात कोणताही दागिना आढळत नाही. तसेच यज्ञोपवीतही आढळत नाही हे थोडेसे गुढ वाटते.



१० ) मध्य एशिया :....
 
 
 
मध्य एशिया खोतान पासून ७५ मैलावरील खाड्लीकार गावी ब्राझाक्लिक चर्चमध्ये १२.४ से.मी. x २५.५ से.मी. आकाराची दोन चित्रे आहेत. त्यातील हे एक गणेश-मूर्तीचे होय. हे ८ व्या शतकातील असून बर्लिन येथील संग्रहालयात (मुझियम) आहे. श्री गणेशा समवेत वराह-रुपात भगवान श्री विष्णू, श्री ब्रम्हदेव व मागे भगवान श्री महादेव ह्या हिंदू देवतांची चित्रेही स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या एका बाजूस चर्चच्या उत्सवाच्या सोहळ्याचे चित्र-चित्रित केलेले आढळते .


 गणेशाकडे पाहणारे दोन इराणीय घर्म प्रचारक, धर्म-प्रचारकांच्या पूर्ण वेषात आढळतात. चित्रांकित केलेल्या मूर्तीकडे पाहून सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेली मूर्ती असेच म्हणावे लागेल. मागे तक्या असलेल्या आसनावर विराजमान झालेला श्री गणेश कव्वाली गाण्यासाठी बसलेल्या स्थितीत बसलेला आढळतो.


डोक्याच्या मागील बाजूस इराण-अरब पद्धतीचा फेटा बांधलेला आढळतो. मुकुट चर्चच्या धर्मगुरूच्या डोक्यावरील मुकुटासारखा तीन पाकळ्यांचा आढळतो. मुकुटामधून आलेले केस कपाळावर दिसतात.नील वर्णीय डोळे, दोन सरळ सुळे, मोठी सोंड, खांद्यापर्यंत लोंबणारे कान, हिरवे जरीकाठी पितांबर त्यावर उपरणे, उपरण्यावर पांढरा पट्टा, गळ्यात वेगळ्या पद्धतीचा मोत्यांचा हार, दंडात दागिने अतिशय सौंदर्यानी युक्त अशा सजलेल्या नटलेल्या, मूर्तीचे दर्शन आपणास घडते. गणेशाच्या एका हातात मोदक व एक हात मांडीवर आढळतो.





११ ) अफगानिस्तान ( काबुल ) महागणपती.


काही वर्षापूर्वी ही गार्देझ येथे सापडली होती व पुढे हीच मूर्ती काबुल येथे नेण्यात आली .अफगाणिस्तानात सापडलेल्या काही मुर्तीपैकी ही एक मूर्ती आहे.मूर्तीचे शिल्पकाम हे हिंद-अफगाण कब शैलीचा वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण  आहे. 








मूर्ती उभी असून तिच्या चौथर्‍यावर संस्कृतमध्ये पूढील प्रमाणे वाक्य कोरलेले आहे. " महान सुंदर विनायकाची प्रतिष्ठापना ख्यातनाम परमभठ्ठारक महाराजाधिराज खिंगला यांनी आपल्या ८० व्या वर्षी महा जेष्ठ मासी त्रयोदशीला विशाखा सिंह लग्नाच्या शुभ मुहूर्तावर केली होती”





ह्या उल्लेखामुळे ही मूर्ती ५ व्या शतकाच्या उत्तरार्धात व ६ व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावी असे वाटते.काबुलचे रहिवाशी पामीर सिनेमाजवळ दर्गा पीर रतननाथ येथे तिची पूजा करीत असतात.






तिबेटच्या भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीत अनेक स्थित्यंतरे घडून आली तरीही बुद्ध-स्तुपावर विराजमान झालेला हा श्री ‘गणेश’ आजही आढळतो आणि तो अढळ आहे.अशा आगळ्या-वेगळ्या गणेशाचे दर्शन घडते.


१४ ) विद्या देवता श्री गणेश-----चीन


भारताच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या चीनमध्ये सफेद वालावर जलरंगाने रंगविलेला श्रीगणेश आढळतो.श्री गणेशाचा प्रवास भारत ते चीन बहुतेक तुर्कस्थान, नेपाळ किंवा तिबेट मधून झाला असला तरी चीन मधील श्री गणेशाचे व  येथील मूर्तीत विलक्षण फरक आढळतो.







भारताला माहित नसलेला कात्रीतेन प्रकार (द्वि गणेश)चीन व जपान शिवाय इतरत्र आढळत नाही. 

विनायक हा एक प्रकार व दुसरा कात्रीतेन असे दोन प्रकार  जपान प्रमाणेच येथे आढळत.
विद्येच्या शोधात निघालेल्या बौद्ध भिक्षुकांनी ही मूर्ती येथे आणली असावी व ५ व्या शकाच्या आरंभी श्री गणेशाची उपासना येथे होत असावी असे वाटते.

तुंग हॉन मधील लेण्यांच्या भिंतीवर कोरलेली मूर्ती तर कु हिस्वेन येथील खडकातून बनविलेली मूर्ती हे चीन मधील अतीप्राचीन मूर्ती होय.



चीनी भिक्षुक चुगणशी ह्यांनी इ.स. ७७४ च्या पुस्तकात ह्या गणेशाचे तपशीलवार वर्णन आढळते.मूर्ती कशी बनवावी, तिचे पूजन कसे करावे, प्रार्थना कशी करावी त्यामुळे कोणते यश प्राप्त होईल ह्याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. 
ह्या पूजनाला ११ व्या शतकात चीनच्या राजाने बंदी घाल्याने हा प्रकार बंद झाला.



श्री गणेश बौद्ध प्रकारा प्रमाणे पाय एकमेकाला छेदून गेलेले,हातात,दंडात व गळ्यात दागिने असताना शिरावर मुकुट नाही.तर बौद्ध भिक्षुकाप्रमाणे किंवा भारतीय पंडितांप्रमाणे त्याची ठेवण आहे.घट्ट पितांबर नसून तो चुणीदार आहे तर अंगात चीन देवते प्रमाणे शेला आहे. उजव्या हातात त्रिशूळाचा वेगळा प्रकार दिसतो तर डाव्या हातात मुळा आहे पण तो शंख सुद्धा असावा असे वाटते.





१५ ) क्युआन शि तिएन- श्री गणेश --जपान








नेपाळ,चीन आणि तिबेट किंवा भारत येथे न आढळणारे हसमुख गणेश मूर्तीचे दर्शन जपान मध्ये घडते. 
या कलाकृतीत  श्रीगणेश हा चीन प्रमाणे विद्वान पंडितांच्या स्वरूपाप्रमाणे असला तरी जपानी तत्ववेत्यांनी स्वत:महा वै राजन या सूत्राचा अभ्यास करून त्याचे स्वरूप प्रकटलेले आहे.



बावीस इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती जपानमध्ये आढळत नाही.काळ्या दगडावर सोनेरी रंगात काढलेल्या टाकोआ मंडलातील  ही कलाकृती आजही डीनजे जी टाकोसन येथे आहे. यानंतर मात्र जपानमध्ये सर्वत्र श्री गणेशाची पूजा होऊ लागली.कोबा डाइती याने प्रथम श्री गणेशाची स्थापना जपानमध्ये केली. 



चारही दिशांचा रक्षक म्हणून प्रसिद्ध असलेला श्री गणेश पुढे चीन प्रमाणेच गुढ विद्येचा स्वामी ठरला व त्यानंतर कोंगी तेन हा प्रकार जपानमध्ये सुरु झाला.



कम्बोडाई हा चतुर्भुज असून न आढळणारी आयुधे हातात आहेत.उजव्या बाजूस  वरच्या हातात कुर्‍हाड तर दुसर्‍या हातात कुंभ,डाव्या हातात धनुष्य-बाण व एका हातात पुष्पमाला आहे.निळे डोळे, हसरा चेहरा व विद्वान पंडिता प्रमाणे शेंडी असलेली 


ही मूर्ती पुस्तकावर बसलेली आढळते. येथेच विद्येच्या स्वामीचे खरे दर्शन घडते.




१६) श्री विघ्नेश्वर ----हनोई



हनोई (उत्तर व्हिएतनाम) येथील ग्रंथालयात जी जुनी सयामी पोथी आहे
तिच्यात श्री गणेशाच्या सहा रेखाकृती आहेत.त्यापैकी कासवावर उभी असलेली विघ्नेश्वर स्वरुपात श्रीगणेश मूर्तीचे दर्शन घडविले आहे.






या मूर्तीच्या सर्वांगावर खूप अलंकार काखाविण्यात आले आहेत.मूर्तीचे गुडघे वाकलेले व एकमेकांपासून दूर अंतरावर आहेत.पायाच्या टाचा जवळ आणलेल्या आढळतात. या मूर्तीचे नाव ‘विघ्नेश्वर’ असून ती कासवावर उभी आहे.कासव हे कुर्मवताराचे चिन्ह आहे. कासवावर आरूढ असलेले असे श्री गजाननाचे आगळेच दर्शन आपणास घडते.


मुकुटाच्या कळसाचा आकार कमळाप्रमाणे असून एकूण मूर्तीचा आकार,कंबर,पितांबर व पट्टा ह्या सर्वांवर कमळाच्या आकाराची छाप आहे.कूण मूर्तीवर देवीची छाप वाटते. कमळाचा आकार व कपाळावर त्रिनेत्र दाखविण्यात आला आहे हे या मूर्तीचे वैशिष्टय आहे. 

भारतात एकही त्रिनेत्र गणपतीची मूर्ती नाही.श्री गणेशाचे ज्ञानपंथ स्वरूप परदेशात उपासले जाते हे एक आश्चर्यच आहे.


हा गणेश चतुर्भुज आहे व उजव्या बाजूच्या वरच्या हातात परशु आहे तर दुसर्‍या हातात संपूर्ण आकाराचा सुळा आहे.डाव्या बाजूच्या वरच्या हातात दोरीचा फास आहे तर दुसर्‍या हातात गोल दाखविला आहे.

ह्या देवतेचे खास विशेष म्हणजे ह्याला एक संपूर्ण सुळा असून 
दुसरा सुळा संपूर्ण तुटलेला आहे. व तो मूर्तीच्या उजव्या हातात दाखविला आहे.तसेच गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत नाही.
श्रीगणेशाचे आगळे दर्शन जगभर पसरलेल्या भारतीय संस्कृतीची साक्ष देत आहे.


 
१७) मनुष्य गजमुख श्री गणेश --इंडोचायना.



 



श्री गजानन ( विनायक ) स्वरुपात ओळखली जाणारी मूर्ती   व्कांगताम प्रांतात मि-सोअन येथील एका मंदिरात मिळाली. 
ही मूर्ती ७ व्या – ८व्या शतकातील असावी.ह्या मूर्तीचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती उभी असून चार हात आहेत.पूढील डाव्या हातात पात्र असून उजव्या हातात पाने असलेली डहाळी असल्याचे दिसून येते. ह्याला त्याच्या संकृतीनुसार विशेष सांकेतिक अर्थ आहे.


आश्चर्य म्हणजे तीला दोन मस्तके असल्या सारखी वाटतात.पूढील मस्तक गजमस्तकासारखे व मागचे मनुष्यासारखे वाटते.

गजमस्तकाच्या कपाळावर गंडस्थळ आहे. हा भाग बराच पुढे आलेला आहे. गोल व समोर पाहणारे डोळे गजमस्तकावर आहेत.तर कान मोठे व पंख्याच्या आकाराचे असून हे मात्र मागच्या मस्तकावर आहेत. 


माथ्यावर पसरट आकाराचे कमलपुष्प तर डोके जाळीदार शीरवस्त्राने झाकलेले आहे.सोंड भरदार असून डाव्या हातातील पात्राकडे वळलेली आहे. 
गळ्यात रत्नमाला व छातीवर सर्पाचे जानवे आहे.कमरेभोवती व्याघ्रचर्म गुंडाळून तिहेरी दोर्‍याने ते आवळलेले आहे.पट्ट्यावरच्या बाजूला रत्नयुक्त पद्म गुंडाळलेला आहे.

हिंदू धर्माचे सर्व संकेत ह्या मूर्तीत असले तरी प्रत्येक बाबतीत चाम्प येथील कला आणि संस्कृतीचा ठसा तिच्यावर उमटलेला आपल्याला स्पष्ट दिसतो.


 
१८ ) श्री गणेश--बोर्निओ



 


ही मूर्ती कोम्बेग येथील एका गुहेत मिळाली. मूर्ती धार्मिक विधीकारता उपयोगात आणलेली नाही.शत्रूच्या हल्यापासून वाचाविण्याकरता मूर्ती दडवून ठेवण्यात आली असावी असा अंदाज आहे. 

येथे सार्वजनिक स्वरुपात श्री गणेश उपासना होते हे येथील विशेष होय.बोर्निओत वैदिक धर्म अस्तित्वात होता हे सिद्ध करणारा एक शिलालेख कोटई येथे सापडला आहे.तो ५व्या शतकातील आहे.त्यात वैदिक, धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताकडून करून घेतल्याची नोंद केलेली आहे. 


कोम्बेन येथील लेण्यात मिळालेली ही गणेशमूर्ती मलाया द्विकल्पातील सर्वात जुन्यापैकी एक आहे.जटाधारी गणेश हे या मूर्तीचे खास वैशिष्टय होय.ह्या मूर्तीच्या हातात व पायात दागिने असले तरी गळ्यात मात्र दोन्ही खांद्यावरून उतरणारा सर्पहार आहे. 

सर्पाचे तोंड डावीकडे आहे हेही मूर्तीचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. डोळे माणसासारखे आणि भुवया सुंदर कोरलेल्या आहेत. 

दोन्ही डोळ्यांच्या मध्ये कपाळावर ऊर्णा आहे.कपाळावर असलेला हा भाग बौद्ध तत्वाचा प्रसारक वाटतो परंतू मूर्तीवर भगवान शिवाची छाप असल्याने तो त्रिनेत्र असावा असे वाटते.

=============================================================


काही विदेशातील श्री गजानन मुर्ति :---------


                               भुतान 





झेक रिपब्लिक 




माजापाहित -जावा 

 
 
 
 


                                                 






                                                 इंडोनेशिया


                                                                   विघ्नांतका




                                        लाओस पोस्टल तिकीटावर श्री गणेश




मंगोलियन 



चंडेला डायनास्टी  





                   श्री गणेश ( तुओल फेअक किन  ) कांडल डायनास्टी 



थाई श्री गणेश.




                                                       श्री गणेश -कोलालम्पुर




                                                                 इंडोनेशिया







                                                                           जपान



 

                                                          
======================================================================

सर्व चित्रे गुगल ईमेजसच्या सौजन्याने व माहिती व संशोधन जगदिश पटवर्धन व विकेपिडिया आणि विविध ब्लॉग वरून.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: