बुधवार, १६ मार्च, २०१६

वर्ष प्रतिपदा ( गुडी पाडवा )...............!!!!

          हिंदू  नव वर्षाच्या शुभेच्छा  ..........!!!!


येणारे नूतन वर्ष आपणास समृद्धी व आनंदमय ,भरभराटीचे ,जाओ ही सदिछ्या .......!!


WISH YOU ALL A VERY VERY HAPPY & PROSPEROUS HINDU NEW  YEAR ...!!







हा वर्षारंभाचा पहिला हिंदू सण आहे. पाडव्याचा मुहूर्त हा साडे तिन मुहूर्तापैकी एक आहे. ह्या दिवशी कोणतेही नवी कामे करण्यास प्रारंभ करवा.


चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुडीपाडवा . तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो





चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाच्या  वर्ष्याचा  पहिला दिवस होय. या दिवशी सर्वानी पहाटेस उठून सुचिर्भुत होउन देवाची मनोभावे पूजा करावी. व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
 


 तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.  ह्या गुडीस धर्म शास्त्रात
" ब्रम्ह ध्वज " असे म्हंटले आह.आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. 





                                                  गुडी



 ह्या गुड़ीची पूजा करून कडू लिंबाची  पाने,मिरी,हरबऱ्याची  डाळ ,ओवा, गुल , व् मीठ घालून मिश्रण तैयार करावे. घराती सर्व लहान थोर मंदालिनी त्याचे सेवन करावे. याच दिवशी पंचंगाचे वाचन करतात आणि  वार्षिक फल जणूण घेतात.   



गुडी पाडवा प्रसाद


चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या  अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या  अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. .

त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहे  याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.



गुडी.


संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. गुडीवरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.







हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा!  गुढ्या उभारायचा दिवस,    पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस,आणि गोडधोड करण्याचा दिवस तसेच नवीन वस्तू खरेदी करण्याचा दिवस, घरातील सान  आणि थोर मंडळीनी एकत्र येवून वर्षारंभ दिवस साजरा करण्याचा दिवस. या धरतीवर  वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण सर्वांनी मिळून मोठ्या थाटात  साजरा करुया.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

छाया  चित्रे  गुगल इमेजस च्या सौजन्याने व माहिती संग्रहित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: