रविवार, २२ मे, २०१६

जगातील अविश्वानीय पादचारी पथ ( झेब्रा क्रॉसिंग )कलाकृती ……….!!!
रस्ता ओलांडणे म्हटले कि सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येत ते  पलीकडे जाण्याच्चा रस्ता ( झेब्रा क्रॉसींग )पादचारी रस्ता , जो पांढर्या रंगानी रंगवलेले पट्टे  किती कंटाळवाणे  नाही  कां ?
जेव्हा आपले शहरी जिवन , आपल्या अवती भोवतालची जिवनशुन्य वातावरण , घड्याळाच्या काट्यावर ते जगण  सर्व काही निरुच्छाई असेल तर काहीवेळेस त्यांत आनंददायी वातावरण आणणे आवशक  असते. 

मग हेच जर आपण क्रॉसींग करण्याच्या रस्त्यांना  कलापूर्ण व आधुनिक पद्धतीने केले तर हेच कंटाळवाणे वाटणारे क्रॉसींग  स्फुर्तीदाईक  व कलाकुसर व जाहिरातीसाठी पण ह्याचा वापर करू शकु . 

ह्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी जर काही कलात्मक ,आकर्षित करणारे बनविले तर बऱ्याच कंपन्या आपल्या जाहिराती करण्यास तय्यार होतील .
काहीवेळा अशी रस्त्यावर काढलेली कलाकृती बेकायदेशीर ठरवली जाते पण जगातील काही देशांत अविश्वासर्ह अश्या कलाकृती लक्षणीय ठरल्या .
प्रत्यक्षच बघा .
1.  डॉमिनो क्रॉस वॉक ( Domino Crosswalk )


2. क्रॉस वॉक जो तुम्हास सांगतो रस्त्याचे दोन्ही बाजू नीट बघा .

3. तरंगता  क्रॉस वॉक

 

4. मिनेसोटा येथील हिरवा आणि पांढऱ्या पट्ट्याचे क्रॉस वॉक


5. रेल्वे ट्र्याक आणि बंदुकीच्या गोळ्यांनी बनविलेले क्रॉसींग . 

6. राक्षसी पावलाचा ठसा असलेले क्रॉसींग ( नॉर्थ अमेरिका ) 

7. क्रिस क्रॉस क्रॉसींग ( ऑकलंड चायना टाऊन )

8. म्याकडोनाल्ड क्रॉसींग जाहिरात ( स्विझर्लंड )

9. सरमिसळ पांढऱ्या पट्ट्यांनी बनविलेला क्रॉसींग ( सर्बिया )
10. जाहिरातीतुन क्रॉसींग संदेश " गाडी वेगाने न्याल  तर जेलमध्ये बंद व्हाल "

व्हाल "


11. पियानो क्रॉसींग 
12. प्रेमाचा संदेश देणारे क्रोसिंग ( चिन )
13. अनिमेशन क्रॉसींग 
14. योर्कटोन येथील चाकू,सुरे,आणि विविध चमच्यांनी बनवलेले  क्रॉसींग


15.  रंगी बेरंगी व्यान्वूड रोड पादचारी मार्ग , मायामी 
16. सेंटीएरी  आर्ट  पद्धतीने बनवलेले पादचारी मार्ग, न्युयॉर्क . 
17.  संगीत पट्टिका पादचारी मार्ग . 
18. अदभुत  पादचारी मार्ग, हाई ल्यांड टाऊन . 
19. स्मशान भूमीकडे जाणारा पादचारी मार्ग . 
20.  झीप्प अर्धवट लावलेला पादचारी मार्ग, बाल्टिमोर 
21. पांढरे आणी काळे चौकोनी पादचारी मार्ग . 
22. एका प्रार्थमिक शाळे समोरील आनंदमयी पादचारी मार्ग . 
23. बुडबुड्यांचा पादचारी मार्ग , स्लोवेनिया . 


२४. इंद्रधनुषी पादचारी मार्ग , व्ह्यान्कुवर  क्यानडा .  
२५ . सरकते पादचारी पथ . नॉर्थ क्यारोलिना ,अमेरिका


२६ ) गमतीचा खेळ टिक्कर प्रमाणे दिसणारे हे "Fun Hopscotch" क्रॉस वॉक . बाल्टिमोर ,अमेरिका 

७ )  फिश -बोन क्रॉसींग

========================================================

माहिती संकलन मायाजालावरून आणि छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .


शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

एका युनिव्हरसिटीची गोष्ट
कदाचित ही गोष्ट आपण आधी ऐकली अथवा वाचलीही असेल.
आपल्या अंतर्यामी दडलेल्या अहंकारामुळे कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीचे मुल्यमापन कारायला संपुर्णत: चुकत असतो त्याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.

ही गोष्ट आहे जगप्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिव्हरसिटीत (विश्वविद्द्यापीठांत) घडलेल्या एका घटनेची!                                                            हार्वर्ड युनिव्हरसिटी
त्या दिवशीही विश्वविद्द्यापीठांत नेहमीप्रमाणे जोरदार काम चालु होते. विद्द्यार्थ्यांची नांवे नोंदविणे, त्यांची फी जमा करणे, प्राध्यापकांची नेमणुक करणे, अशा एक ना अनेक कामांमध्ये ते विद्द्यापीठ नेहमीप्रमाणेच मग्न होते! युनिव्हरसिटीच्या प्रेसिडॆंटच्या कार्यालयांत रोजचा दिनक्रम चालु होता, पण फार धांवपळ निदान त्यादिवशी तरी नव्हती!


तेव्हढ्यांत कार्यालयाचे दार लोटुन एक करडा ड्रेस घातलेली, मितभाषी स्त्री आपल्या नव-यासहित प्रेसिडेंटच्या कार्यालयांत शिरली. समोर सेक्रेटरीबाई आपाल्या कामांत दंग होत्या. आता कोण तडमडायला आलं आहे अशा त्रासिक चेह-याने सेक्रेटरीने त्या जोडप्याकडे पाहिले. प्रथमदर्शनीच सेक्रेटरीच्या मनांत पहिला विचार आलो तो म्हणजे की ही खेडवळ वाटणारी जोडप्याची ब्याद कशाला बरे ह्या आधुनिक विश्वविद्द्यालयांत आली असावी? अशा मंडळींचा इथे काय संबंध? 

तेव्हढ्यांत त्या स्त्रीएबरोबर आलेला गृहस्थ अतिशय नम्रपणाने सेक्रेटरीला म्हणाला: "नमस्कार, आम्हा ऊभयतांना प्रेसिडॆंटला भेटायचे आहे"

"प्रेसिडॆंटला? तुम्ही त्यांची भेटायसाठी अपाईंटमेंट घेतली आहे कां?"

त्या गृहस्थाच्या नकारार्थी मान हलविण्याकडे लक्षही न देतां सेक्रेटरी तुटकपणे म्हणाली: " प्रेसिडॆंट पुर्ण दिवस खुप बीझी असतील"

"कांही हरकत नाही, आम्ही थांबु की त्यांच्यासाठी त्यांना दोन मिनिटे वेळ मिळेपर्यंत!"

तो गृहस्थ आणि ती स्त्री कोणतीही तक्रार न करतां वेटींगरूममध्ये शांतपणे वाट पाहात बसली!

सेक्रेटरीने देखील फारसे लक्ष दिले नाही. मनांत म्हणाली: "बसा हं वाट पाहात! बघु या किती वेळ थांबता ते!"

त्यानंतर कांही तास निघुन गेले. ते जोडपं तक्रार करेल आणि मग आपण त्यांना "अपाईंटशिवाय आलं ना, की हे असं होतं बर का?" असं लेक्चर मारुन घरी पाठवू असा विचार करीत त्या सेक्रेटरीने देखील त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही!

ते जोडपं मात्र शांतपणे बसुन वाट पहात होतं! आता मात्र सेक्रेटरीबाईला अजिबात राहावलं नाही! ही माणसं तक्रार करीत नाही तरी यांना किती वेळ बसु द्यायचं? ही ब्याद एकदाची इथुन घालविलेली बरी म्हणुन ती शेवटी प्रेसिडेंटच्या कार्यालयांत गेली आणि त्यांना म्हणाली: "सर, हे एक जोडपं गेले कांही तास तुम्हाला भेटायचं म्हणुन थांबले आहेत. तुम्ही जरा त्यांच्याशी दोन मिनिटं बोलतां कां? म्हणजे ते इथुन टळतील तरी एकदाचे?"

प्रेसिडेंटसाहेबांनी चेह-यावर उसने हास्य आणलं आणि आपला कोट सांवरीत ते बाहेर आले. त्या जोडप्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं नि म्हणाले: "हं बोला! मी काय करु शकतो आपल्यासाठी?"

ते जोडपं मोठ्या अदबीने ऊभे राहिलं! त्यांनी कमरेत वाकुन नमस्कार केला आणि ती स्त्री नम्र आवाजांत त्यांना म्हणाली: "आपण एव्हढे बिझी असुनही आम्हाला भेटायला आलांत त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!"

"हो पण आपलं काय काम होतं माझ्याकडॆ?" आवाजातली नाराजी कितीही न दाखविण्याचा यत्न केला तरी ती स्पष्टपणे ऊमटली होती त्यांच्या बोलण्यांत!

ती स्त्री  परत एकदा अति नम्रतेने म्हणाली: " आमचा मुलगा या विश्वविद्द्यालयांत एक वर्ष शिकला, त्याला हे विद्द्यालय खुप आवडायचे! दुर्दैवाने एक वर्षापुर्वी तो एका अपघातामध्ये दगावला, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला ह्या विद्द्यालयांत शक्य असल्यास  ह्याच कॅंपसवर काहीतरी मेमोरियल बसवायचे आहे"

हे सारे ऐकुन प्रेसिडेंटच्या मनावर फारसा परिणाम झाला आहे असे कांही वाटले नाही. ते कांहीशा कोरडेपणानेच म्हणाले:" मॅडम, अहो ते कसं शक्य आहे? अहो इथे हजारो विद्द्यार्थी शिकतात, त्यांतल्या अशा प्रकारच्या विद्द्यार्थ्यांच्या नांवे आम्ही जर पुतळे ऊभारीत बसलो तर ह्या विद्द्यालयाचे रुपांतर एखाद्या स्मशाभुमीमध्ये व्हायला अजिबात वेळ लागणार नाही! छःए छे ते कांही शक्य होणार नाही! या अपण आता!"

ईतक्या वेळ शांतपणे हे संभाषण ऐकत असलेल्या त्या गृहस्थास कांहीतरी म्हणायचे होते, तेव्हढ्यांत ती स्त्री परत प्रेसिडेंटला म्हणाली: "नाही नाही, आपला कांही तरी गैरसमज होतोय! आम्ही पुतळा वगैरे बसवा म्हणुन सांगत नाही तर आमच्या मुलाच्या नांवे एखादी ईमारत विद्द्यालयास द्यावी असा विचार करतोय!"

ते ऐकतांच प्रेसिडेंटने डोळे फिरविले. आपल्या नुकत्याच घातलेल्या नव्या को-या सुटावरुन हात फिरवित पण वैतागलेल्या स्वरांत तो म्हणाला:" अहो निदान नीट विचार करुन तरी बोला. ईमारत विद्द्यालयाला द्यायची म्हणतां? तुम्हाला कल्पना तरी आहे का एका इमारतीसाठी किती पैसे लागतात त्याची की ऊचलली जीभ आणि लावली टाळ्याला?" खिच्यातुन एक पोर्टेबल कॅलकुटर काढुन त्यावर आंकडे टाकीत प्रेसिडेंट पुढे म्हणाला:" अहो सध्या आमच्या हार्वर्ड कॅंपसवर असलेल्या इमारतींचीच किंमत साडेसात मिलियन डॉलर्स आहे!"

आता एव्हढी आंकडेवारी दिल्यावर तरी ह्या जोडप्याचा आवाज नक्कीच बंद होईल अशी त्याची खात्री होती.
ते सारे ऐकुन ती स्त्री थोडा विचार करीत आपल्या नव-यास म्हणाली:" अहो, एव्हढ्या मोठ्या कॅंपसमधल्या इमारतींची किंमत फक्त साडेसात मिलियन डॉलर्स? असं असेल तर मग आपणच कां एखादी युनिव्हरसिटी सुरु करु नये?"

तिच्या नव-याने संमतीदर्शक मान हलविली. तो प्रेसिडेंट फक्त पाहातच राहिला. मनांत म्हणाला: " ही बाई सांगते काय आणि हा माणुस हो म्हणतोय काय? काय हा वेड्यांचा बाजार? जाऊंदे, ह्यांच्या नादी न लागलेलच बरं!"

ते जोडपं प्रेसिडेंटचे धन्यवाद मानुन जायला निघाले! ती सेक्रेटरी धांवत आली नि म्हणाली: "अहो, जाण्यापुर्वी आमच्या व्हिजीटर बूकमध्ये नांव आणि सही कारायला विसरु नका! आम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागतं म्हटलं!"

संमतीदर्शक माना हलुऊन दोघांनीही सह्या केल्या: मिस्टर ॲन्ड मिसेस लेलॅंड स्टॅनफोर्ड.
                                                                         
                                 मिस्टर ॲन्ड मिसेस लेलॅंड स्टॅनफोर्ड.दोघांनी दाराबाहेर पावलं टाकली आणि पार्किंग एरियामधल्या आपल्या गाडीपर्यंत चालत जायच्या वेळेत कॅलीफोर्निया राज्यांतल्या पालो आल्टो ह्या शहरामधली जागा त्यांच्या विश्वविद्द्यालयासाठी "स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी" हे नांव देऊन मुक्रर देखील केली!  माणसाच्या बाह्यरुपावरुन त्याच्याविषयी पुर्वदुषितग्रह करुन    घेणा-या अहंकाराला वास्तविकपणे कुणाच्याच आयुष्यांत स्थान असु नये! मात्र कधी कधी असंही वाटतं की त्या सेक्रेटरीच्या अशा स्वभावदोषामुळेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मदत होऊन या जगप्रसिद्ध अशा विश्वविद्द्यालयाचा जन्म झाला नाही का? जे होते ते ब-यासाठीच म्हणायचे!=================================================


स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी एका मुळ ईंग्रजी कथेचे स्वैर भाषांतर
शशिकांत पानट

यांतील  चित्रे गुगल  च्या सौजन्याने बुधवार, १६ मार्च, २०१६

वर्ष प्रतिपदा ( गुडी पाडवा )...............!!!!

          हिंदू  नव वर्षाच्या शुभेच्छा  ..........!!!!


येणारे नूतन वर्ष आपणास समृद्धी व आनंदमय ,भरभराटीचे ,जाओ ही सदिछ्या .......!!


WISH YOU ALL A VERY VERY HAPPY & PROSPEROUS HINDU NEW  YEAR ...!!हा वर्षारंभाचा पहिला हिंदू सण आहे. पाडव्याचा मुहूर्त हा साडे तिन मुहूर्तापैकी एक आहे. ह्या दिवशी कोणतेही नवी कामे करण्यास प्रारंभ करवा.


चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुडीपाडवा . तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाच्या  वर्ष्याचा  पहिला दिवस होय. या दिवशी सर्वानी पहाटेस उठून सुचिर्भुत होउन देवाची मनोभावे पूजा करावी. व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
 


 तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी.  ह्या गुडीस धर्म शास्त्रात
" ब्रम्ह ध्वज " असे म्हंटले आह.आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. 

                                                  गुडी ह्या गुड़ीची पूजा करून कडू लिंबाची  पाने,मिरी,हरबऱ्याची  डाळ ,ओवा, गुल , व् मीठ घालून मिश्रण तैयार करावे. घराती सर्व लहान थोर मंदालिनी त्याचे सेवन करावे. याच दिवशी पंचंगाचे वाचन करतात आणि  वार्षिक फल जणूण घेतात.   गुडी पाडवा प्रसाद


चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या  अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या  अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. .

त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहे  याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे.गुडी.


संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात. धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. गुडीवरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात.हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा!  गुढ्या उभारायचा दिवस,    पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस,आणि गोडधोड करण्याचा दिवस तसेच नवीन वस्तू खरेदी करण्याचा दिवस, घरातील सान  आणि थोर मंडळीनी एकत्र येवून वर्षारंभ दिवस साजरा करण्याचा दिवस. या धरतीवर  वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण सर्वांनी मिळून मोठ्या थाटात  साजरा करुया.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

छाया  चित्रे  गुगल इमेजस च्या सौजन्याने व माहिती संग्रहित.

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

२०१६-ऑस्कर पारितोषिक वितरण सोहोळा पांढरा की रंगीबेरंगी?ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स ॲन्ड सायन्स (AMPAS) या संस्थेने १९२७ आणि १९२८ या वर्षी तयार झालेले चित्रपट हिशेबांत घेऊन १६ मे १९२९ या दिवशी पहिला पारितोषिक सोहोळा सुप्रसिद्ध हॉलीवूड रूझवेल्ट या हॉटेलमधे साजरा केला.  ह्या सुरुवातीच्या खाजगी समारंभाला फक्त २७० पाहुणे ऊपस्थित होते. तेव्हांपासुन ते आजतागायत ऑस्कर पारितोषिक मिळविणे हे चित्रपट कलावंतांना नोबेल पारितोषिक मिळविण्या इतकेच महत्वाचे, समाधान मिळऊन देणारे व विषेश मानसन्मान मिळऊन देणारे ठरले आहे.

 जशी जशी वर्षे ऊलटली तशी ऑस्कर पारितोषिके मिळविण्याची जिद्द वाढीलाच लागली. हे पारितोषिक म्हणजे चित्रपट कलेच्या क्षेत्रामधला  सर्वोच्च सन्मान समजला गेला. गेल्या जवळ जवळ ८० च्या वर वर्षांत  पारितोषिकाचा कसही बदलत गेला. तो जास्त कडक आणि शिस्तिचा झाला. हळुहळु त्यामधे परदेशी चित्रपटांचा अंत:र्भावही करण्यात आला. ऑस्करच्या तोडीचा अनुभव असलेल्या कलावंतांची बिदागी इतरांच्या मानाने जास्त मिळु लागली. हा समारंभ म्हणजे ऑलिंपीक विजेत्या खेळाडुंसारखाच मोठ्या थाटामाटाने होऊ लागला. चित्रपट क्षेत्रामधला मानाचा तुरा असा सिद्ध झाला.


तसे आतांपर्यंत सुरळीतच चालले होते. मात्र या वर्षी त्याला थोडे गालबोट लागते आहे! या वर्षी त्याला रंग फासला गेला आहे. हा समारंभ विशेषकरुन केवळ पांढ-या कलाकारांनाच न्याय देतो, आणि शिवाय तेही पुरूष कलाकारच. स्त्री कलाकारांना, विशेषकरुन काळ्या स्त्री कलाकारांना ही पारितोषिके हव्या त्या प्रमाणांत मिळत नाहीत असा आरोप ॲकेडमीवर केला गेला आहे. 

Image result for oscars 2016 stage


Image result for oscars 2016 boycott


त्यामधील सत्यासत्यतेची जाण व्हायच्या आंतच कांही काळ्या सुपरस्टार्सनी या वर्षी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णयही घेऊन टाकला आहे. ही नांवे हॉलीवूडमधली गाजलेली, पुर्वी ऑस्कर पारितोषिके मिळविलेली असल्याने तर त्यांचे बोलणे मनावर घेऊन अकादमीने Corrective Actionsसाठी पाऊल ऊचलेलेही आहे. हॉलीवूडनगरी आणि त्यामधे चालत असलेला हा Business किती fast pace operation आहे हेही त्यामुळे सा-या जगाला कळले.


२८ फ़ेबृवारीस हॉलीवूडमधे होणा-या या समारंभाची माहिती, आंकडेवारी या लेखाच्या निमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवावी हा या लेखनाचा ऊद्देश आहे. अकादमीवर होणारे आरोप खरे की खोटे, ह्या चर्चेपासुन अलिप्त राहुन केवळ समारंभाच्या पार्श्वभुमीबद्दल चर्चा करणे हा आणि केवळ हाच हेतु आहे! त्यामुळे माझे व्यक्तीगत मतप्रदर्शन मी केवळ खाजगी बैठकीपुरतेच मर्यादित ठेवणार आहे. ऊद्देश असा की जाणकरांनी त्यांचे स्वत:चे मत तयार करावे. असो

अकादमी आता ८९ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. गेल्या ८९ वर्षांत खाजगी समारंभापासुन सुरु केलेली ही गंगोत्री आता एका विशाल सागरासारखीच रुंदावली आहे. त्यामुळे भरपुर अनुभव गांठीला बांधुन आणि कोणते चित्रपट पारितोषिकासाठी स्पर्धेत आलेले आहेत ते हिशेबांत घेऊनच आतापर्यंतचे नियम केलेले आहेत, आणि कालानुसार त्यामधे योग्य ते बदलही केले गेले आहेत. मग याच वर्षी असा मुद्दा का आणला जातो आहे हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. असो


वास्तविक पाहाता ४ वर्षांपुर्वीच म्हणजे २०१२ पासुन अकादमीने जास्तीत  जास्त स्त्रि-कलाकार आणि मायनारिटी ग्रूप यांना ऊत्तेजन देण्यासाठी कांही अमुलाग्र बदल करायला सुरुवात देखील केलेली आहे. सध्या ज्या कलाकारांना आयुष्यभर मतदानाचा अधिकार दिला आहे ती संख्या ६२६१ आहे. मात्र सगळे लोक मतदानाचा अधिकार बजावतातच असे नाही! सध्या जो आरोप अकादमीवर केला जातो आहे त्यावर ऊपाय म्हणुन त्यांनी तांतडीची बैठक घेऊन खालील निर्णय घेतले आहेत.


१. ज्या ज्या मतदान अधिकार मिळालेल्या कलाकारांनी गेल्या कांही वर्षांत मतदानाचा हक्कच बजावला नाही त्यांचा अधिकार अकादमी ताबडतोब काढुन घेईल.

२. त्यांची रिप्लेसमेंट करतांना शक्यतोवर काळ्या स्त्री कलाकार आणि मायनारिटी कलाकार (काळे, एशियन, स्पॅनिश वगैरे) ह्यांना संधि दिली जाईल.

३. आणि हे करतांना आजपासुन ते २०२० पर्यंत म्हणजे पुढच्या केवळ ४ वर्षांत सध्या असलेल्या काळ्या कलाकारांची, स्त्री काळ्या कलाकारांची संख्या दुपटीवर नेण्यात येईल.


अकादमीने ऊचललेले हे पाऊल खुपच आक्रमक असे आहे. कलाकारांच्या तक्रारीला न्याय देण्यासाठी कंबर कसुन कामाला लागल्याचे चिन्ह आहे.

सध्या अकादमीमधे १५०० स्त्री कलाकार आहेत. आणि ५३५ अ-पांढरे आहेत. आता ही संख्या पुढील चार वर्षांत दुप्प्ट करायची असेल तर २०२० या वर्षी स्त्री कलाकारांची संख्या ३००० आणि अ-पांढरे कलाकार-संख्या १०७० होईल. याचाच अर्थ असा की पुढील चार वर्षांत प्रत्येक वर्षी ही संख्या अनुक्रमे ३७५ आणि १३३ ने वाढवावी लागेल. अकादमीच्या कसाला ऊतरणारे इतके Qualified कलाकार ऊपलब्ध आहेत कां? आणि समजा-फक्त समजा की त्यांच्या कसाला ऊतरणारी ही एव्हढी कलाकार मंडळी मिळाली नाही तर? तर केवळ हे ऊद्दिष्ट पुर्ण करण्यासाथी कसाची क्वालिटी कमी करणार की काय? याचाच अर्थ असा की २०२० ला जी संख्या तयार होईल त्यामध्ये सर्व योग्य कलाकार असतील? या निर्णयाचे दूरवरचे परिणाम किती धोकादायक असतील हे नव्याने सांगायला नकोच! अकादमीचे सध्याचे नियम हे खुप Stringent आहेत. त्या मधे बसणारे कलाकार मिळाले नाहीत तर ऑस्करच्या मुळ संकल्पनेची किती वाट लागेल हे सांगायला भविष्य संगणा-राची गरज नाही! ह्याच अकादमीचे माजी अध्यक्ष Hawk Koch ह्यांनी अनुभवाचे बोल एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलेही आहेत. ते म्हणाले की, "सध्याच्याच कठिण नियमांत कलाकार बसत नाहीत. कारण पुरेसे चांगले कलाकारच नाहीत! मग अकादमीचे मंडळ आणणार आहेत कुठुन १५०० नविन स्त्री कलाकार आणि ५३५ अ-पांढरे कलाकार? आणि ते ही पुढच्या चार वर्षांत? आणि मग ही संख्या केवळ जाहीर केली आहे म्हणुन पुर्ण करण्यासाठी नियम शिथिल करणे हेच करावे लागेल ह्यांना! मग क्वालिटीचे काय? थोडक्यांत म्हणजे केवळ संख्या पुर्ण करण्यासाठी ती Quality शी केलेली तडजोड असेल.
परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या सर्व गोष्टींसाठी अकादमी खरोखरीच जबाबदार आहे कां? अकादमीकडे जे चित्रपट निवडीसाठी म्हणुन आणले जातात वा ठेवले जातात त्यांतुनच ते पारितोषिकासाठी कलाकार निवडणार ना! आख्या अमेरिकेतुन शेकडो चित्रपट ऑस्करसाठी पाठविले जातात. त्यामधुन वस्त्रगाळ करुन निवडसमिती कांही मोजकेच चित्रपट अकादमीकडे पाठविते. आणि केवळ त्यामधुनच अकादमीला ~स्करसाठी चित्रपट आणि त्यामधले कलाकार निवडायची संधि असते. निवडसमिती कोणते चित्रपट वस्त्रगाळ करुन पाठविते त्यावर अकादमीला कांहीच अधिकार नाहीत. त्यांनी फक्त समोर आलेल्या कलाकृतींमधुनच निवड करायची असते. निवडसमितीकडे रंगी बेरंगी कलाकारांचे अथवा मायनारिटींनी कामे केलेले चित्रपट पुरेसे येतात का? समजा ते पुरेसे येतच नसले तर? म्हणजे खर तर गा-हाणे मांडायचेच असेल तर वा तक्रार करायचीच असेल तर ती जी निवडसमिती सुरुवातीस त्यांना अभिप्रेत असलेला कस (Criteria) लाऊन चित्रपटांची निवड करतात त्यांच्याकडे करायला हवी नाही का? आणी तक्रार करणा-या मंडळींना हे माहित नाही असेही नाही! मग ते अकादमीस कां छळताहेत? हे सारे महित असतांना ते डायरेक्ट निवडसमितीकडे कां जात नाहीत? निवडसमितीकडे तक्रार करणे हे त्यांना सहज शक्य आहे पण ते करीत नाही! त्याला अर्थात अनेक कारणे आहेत. एकतर ते त्यांना परवडणारे नसावे! कारण शेवटी निवडसमितीच  ठरविणार की पुढे कोणते चित्रपट निवडायचे! म्हणजे त्यांना दुखऊन चालणार नाही. शिवाय तक्रार केली तरी निवडसमिती इतकी बहाद्दर आहे की ती त्याकडे फारसे लक्ष देणार नाही. कदाचित पुरेसे चित्रपट स्पर्धेमधे भाग घ्यायला ऊतरत देखील नसतील! आणि हे सत्य पचविणे सगळ्यांनाच कठिण जाईल. असे असले तर तक्रार करणा-या मंडळींच्या गा-हाण्यातली हवाच निघुन जाईल. म्हणजे ही शक्यता नाकारता येणार नाही. निवडसमितीची भुमिका अशीही असण्याची शक्यता आहे की समजा १०० चित्रपट पारितोषिकासाठी सादर केले आणि त्यातले ८० पांढ-या लोकांनी तयार केले आणि ऊरलेले अ-पांढ-यांनी वा इतरांनी केलेले असले तर त्या प्रमाणातच फायनल रिझल्ट येईल, तेथे डिस्क्रीमिशनचा प्रश्नच कुठे येतोय? शिवाय डायरेक्ट निवडसमितीकडे जाऊन मांजराच्या गळ्यांत घंटा कोण बांधणार?  निवडसमिती ही अशाच मंडळींची तयार केली आहे की ते हा सर्व प्रकार बिझिनेस म्हणुन पाहात आहेत आणि कोणत्याही ईमोशनल प्रेशरची ते फारशी दखल घेणार नाहीत.शेवटी चित्रपट निर्मिती ही केवळ कलेसाठी कला म्हणुन नव्हे तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती नफा मिळतो आहे, आणि तो वापरुन तुम्ही सरकारला किती टॅक्स देऊ शकणार आहात, मिळालेल्या नफ्यातुन अजुन किती अधिक चित्रपट निर्मिती करणार आहात आणि हा धंदा बरकतीला आणणार आहांत हेही महत्वाचे आहेच ना!


या वर्षी ऑस्कर्सचे अधिकारी एका डझनाच्यावर काळे कलाकार प्रेझेंटर्स आणणार आहेत. शिवाय अ-पांढरे प्रेझेंटर्समधे आपल्या भारताची प्रियांका चोप्रा देखील आहे. एक काळा कलाकारच Chris Rock या समारंभाचे यजमानपद गेली अनेक वर्षे करतो आहे.

Image result for oscars 2016

ऑस्करसारख्या एका कलेच्या देवळांत आमचा देव काळा आणि तुमचा देव पांढरा असा वाद न घालतां त्या देवांची पुजा बांधण्याची संधि मिळणे हे  जास्त महत्वाचे असावे. म्हणुनच रंगांच्या पलीकडे विरोधकांची दृष्टी असणे ही निदान या वर्षीच्या समारंभाची गरज आहे

शेवटी फक्त एकच की धंदा आणि कला यांची सांगड घालणे भल्याभल्यांना जमले नाही! आज हॉलीवूड देखील त्याच ऊंबरठ्यांत अडकले आहे हे मात्र खरे!

 

शशिकांत पानट

------------------------------------------------------------------------------

सर्व छायाचित्रे गुगल ईमेजेसच्या सौजन्याने .