गुरुवार, २४ मे, २०१२

मतदार राजा जागा हो........




........येत्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये ९०% मतदान करण्यासाठी आवाहन.......!!!




सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित जपणारे अनेक लोक बऱ्याच प्रमाणात आहेत आणि अगदीच बोटावर मोजता येतील एवढीच राजनीतिक मंडळी आहेत जी जनतेसाठी काहीं करण्यासाठी योगदान देऊ शकतात.


 गेल्या ६० वर्षात आपल्या राजनीतीचा कसा खेळ खेळला  जातो  तो आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. मनी पावर +मसल पावर , जाती , धर्माच्या नावावर आज तागायतचे निवडणूक लढविले गेले .जनहिताची कोणतीही कामे न करता निवडून येत आहेत. ह्याचे सर्वात मुख्य  कारण म्हणजे शिक्षित लोक मतदान करीत  नाहीत आणि ज्यांचे पोट रोजच्या कमाईवर असते ह्या सारख्या अनेक लोकाना प्रलोभने ,जातीवादाचे जाळे पसरवून किवां दहशदीने मतदान आपल्या बाजूने करून घेत आहेत.


 विचार करा आत्ता पर्यंत झालेल्या सर्व निवडणुका मध्ये आपण  पाहिले कि फक्त ३० % ते ४५ % इतकेच मतदान झाले याचा अर्थ उरलेले जवळ जवळ ६० % मतदार मतदानास येत नाहीत . जगातल्या काहीं देशामध्ये मतदार जर मतदान करीत नसेल तर त्यासं शिक्षेची तरतूद आहे. भारत देश हा स्वतःला सेकुलर म्हणवतो पण इथेच या भ्रष्ट राजकारण्यांनी जातीभेद एवढा जोपासला आणि वाढविला त्यावर ते आपले उदिष्ट साध्य  करून घेत आलेत.


आतां वेळ आली आहे कि सर्वांनी जर मतदान केले तर यांची उद्दिष्टे  धुळीस मिळतील. आजकाल मोजकेच काही उमेदवार सोडले तर अनेकजण बेकायदेशीर व्यवहारात गुंतलेले व्  त्यांचा  अनेक घोटाळ्यातील सहभागामुळेच लोकांना परिचीत आहेत. अनेक मतदार संघात प्रामाणिक नागरीकाला योग्य पर्यायच उपलब्ध नाही.


चित्र असे आहे कि " संसदेची गरिमा " अबाधित ठेवण्याची मक्तेदारी फक्त याच निवडून आलेल्या राजकारण्या जवळ आहे असे त्याना वाटते . पण उलट जनतेनी बऱ्याच वेळा बघितले  कि हीच नेते मंडळी संसदेतच आपल्या स्वार्थासाठी संसदेच्या प्रांगणातच " घटनेची " पायमल्ली करतात .

कायद्याचे मुलभूत ज्ञान नसलेले, शीवीगाळ करणारे आपल्याला मिळालेले अधिकार म्हणजे जनतेच्या पैशातून विदेशवारी करणे, सुखसोयींचा मुक्त उपभोग घेणे व जनतेला कस्पटासमान मानणे असे यांचे वर्तन. आपल्याच मतदार संघातील मोजक्या मतदारांना खुष ठेवले की आपण निवडून येणार, इतर जनतेचे काही सोयरसुतक नाही अशीच यांची वागणूक आपण पाहिलेली आहे.

लोकशाही बळकट करायची असेल तर आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावूया व मतदानाची टक्केवारी ९० - ९५ % इतकी करुया. माहितीच्या अधिकाराने  आपण आपल्या परिसरातील न मतदान केलेल्याची लिस्ट प्राप्त करू शकतो आणि अश्या लोकाना येत्या निवडणुकीत मतदान करण्यास मनवू या. हें सर्व जन जागृती मुळेच शक्य आहे व त्यां मुळे आपली लोकशाही बळकट व  सुदृढ होईल.


लोकशाही ही जगातील ईतर राज्यप्रणाली पेक्षा चागली व्यवस्था आहे हें सर्वश्रुत आहे. पण योग्य समई नागरिकांनी आपली मते मांडणे व त्यावर साधक बाधक चर्चा करणे हा लोकशाहीचा गाभा आहे .जर का सुज्ञ मतदार आपल्या मतदानाच्या जबादारीतून पळ  काढीत आहेत तर दुर्दैव्याने  असे म्हणावे लागेल कि लोकशाहीचा गाभाच आतुन  पोखरला जाईल.


अशी स्थिती भारतीय लोकशाहीवर येवू  नये पण, सध्याची परिस्थिती बघता एक भयावह  परिस्थिती येण्याची चिंन्हे दिसत आहेत आपण नागरिकांनी वेळीच सावध होवून यासं पायबंद  घालू शकू याची खात्री आहे.

मुंबई व ईतर महापालिकेच्या निवडणुकांत मतदानाची टक्केवारी बघता असे खेदाने म्हणावे वाटते कि मतदारांनी आपली  जबाबदारी जी घटनेने मिळाली ती निट पार पाडीत नाहीत. मतदान हा आपला हक्क आहे तसेंच जबाबदारी पण आहे.


पाच वर्षात एकदा मिळणारा हा अधिकार ठामपणे आपले मत माडण्यासाठीच आहे . सगळेच उमेदवार एका माळेचे  मणी आहेत व भ्रष्ट आहेत.  आपल्या मतदार संघातील समस्या प्रभावीपणे मांडत नाहीत किवां मांडता येत नाही मग ते   विधान परिषदेत असो किवां राज्यसभेत / लोकसभेत असो  म्हणून यातील कोणाला निवडून काहीं उपयोग नाही म्हणून मतदान न करणे हें सर्वस्वी  चुकीचे आहे.


घटने प्रमाणे सर्व नागरिकाना एक  अधिकार   निवडणुकी संदर्भात  दिलेला आहे. कंडक्ट ऑफ इलेक्षण रूल्स 1961 कलम 49-ओ अन्वये मतदान न करण्याचे ठरवण्यार्‍या मतदारांना पर्याय दिलेला आहे
कलम 49-ओ पर्याय वापरा व लोकशाही टिकवा .................

49-O. Elector deciding not to vote.-If an elector, after hiselectoral roll number has been duly entered in the register of votersin Form-17A and has put his signature or thumb impression thereon asrequired under sub-rule (1) of rule 49L, decided not to record his
vote, a remark to this effect shall be made against the said entry in Form17A by the presiding officer and the signature or thumb impression of the elector shall be obtained against such remark.


मी एक जबाबदार नागरीक आहे. पण निवडणूकीत उभे राहीलेल्यापैकी एकही उमेदवार मला योग्य वाटत नाही म्हणजेच यापैकी कोणीच नको.. ‘None of the above’ हा पर्याय इलेक्ट्रोनिक मतदान मशीन वर आणण्याला बळकटी आणण्यासाठी मतदान करायला जा. कलम 49-ओ पर्याय वापरा. आपले मत नोंदवा.‘मला मतदान करायचे नाही’ हे आपले मत योग्य प्रकारे नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन रांगेत राहून पाच वर्षात एकदाच आपला अधिकार बजावणे मतदाराची जबाबदेही आहे.


हें ही सत्य आहे कि जर मतदारांनी ह्याचा वापर केला तरी अश्या मतांची मोजणी केली जात नाही म्हणून काहीं विचारवंत ह्या विषयी आवाज उठवत आहेत .त्यांच्या  प्रयत्नाना ईतर समविचारी लोकांनी पुढाकार घेऊन अशी  जनजगृती करावी व ‘None of the above’ हा पर्याय इलेक्ट्रोनिक मतदान मशीन वर आणण्यासाठी राज्यकर्त्याना भाग पाडावे. एकदा कां असे झाले म्हणजे सर्व उमेदवार व त्यांच्या राजकीय पार्टीला समजून चुकेल कि जर आपण प्रामाणिक कार्यकर्त्याला न उभे करतां राजसत्ता मिळवू शकत नाहीत.


तेव्हां सर्व मतदाराना कळकळीची विनंती आहे कि पुढच्या सार्वत्रिक  मतदानाच्या  वेळी सर्वांनी मतदान मग ते नकारार्थी कां असेना पण अवश्य करावे व लोकशाहीला बळकटी द्यावी.


जय मतदार.......जय भारत.....जय लोकशाही........!!!!

1 टिप्पणी:

Nils Photography म्हणाले...

Hi...
Well your opinion is nice but in real life this not going to happen...

I also tried to do -ve voting many times... means I try to vote for nobody...

But I get caught by mess....

1. I dont think voting machine will have option 'Vote For Nobody' in near future... if it added then I will go in polling both and press the button on that...

2. If we dont have this option then We have to give an application if we want to perform this task. (Vote for nobody)

3. I also tried to apply a application but the election officer argued with me as well other political Party members start arguing me so...

I think we are in big trouble now...if you want to give vote then you have to vote for selfish and corrupt political leader or be enemy of all other political party members.

Please check my link

http://nilsmania.blogspot.in/2011/04/want-revolution.html