गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

विजयादशमी …… दसरा !!!

























विजयादशमीचा ( दसरा ) हा सण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक  आहे. ह्या दिवशी शिमोल्लंघन ,शमी पूजन, अपराजीतापूजन , आणि शस्त्र पूजन ही  चार कर्मे ह्या सणात  करतात . 







शिमोल्लंघनासाठी गावाच्या सीमे  बाहेर ईशान्य दिशेकडे जातात . 
ज्या ठिकाणी शमी किवा आपट्याचे झाड असेल तिथे जाऊन शमी पूजन ,आपट्याचे पूजन करावे . शमी पूजन करताना शमीचे पूजन करून ह्या श्लोकांनी प्रार्थना करावी . 






शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका /
धारिण्यअर्जुन बाणानां  रामस्य प्रियवादिनी //

करिष्यमाणायात्रायां  यथाकाल सुखं मया  /

तत्र निर्विघ्नकर्ती त्वं भव श्रीरामापूजिते //



अर्थ …। 

शमी शमयते म्हणजे शांत करते ,नष्ट करते . शमीचे काटे तांबूस रंगाचे असते .शमी  रामास  प्रिय असून अर्जूना च्या बाणांना धारण करते. ज्या रामाने तुझी पूजा केली अशी हे शमी मी विजय यात्रेस निघालो हि यात्रा सफल , निर्विध्न व सुखकारक  कर.    



आपट्याचे पूजन करताना खालील मंत्र  म्हणावा . 







अश्मंतक महावृक्ष महादोषनिवारण /
इष्टानां दर्शन देहि कुरु शत्रु  विनाशनम //



अर्थ…। 

हे अश्मंतक महावृक्षा  तुम्ही  मोठमोठ्या दोषांचे निवारण करतात . आमच्या मित्र ,इष्टजन यांची भेट घडवुन आण  आणि शत्रूचा नाश कर . पूजा करून या झाडाची पाने आणून घरच्या देवाना वाहून ती आपल्या इष्टमित्रा ना सोने म्हणून देतात . सोने म्हणजे  आपट्याची पाने लहानांनी मोठ्यांना द्यावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी प्रथा आहे. 



अपराजिता पूजन …। 

ज्या शमीची पुजा करतात तिथेच जमिनीवर अष्टदल काढून त्यावर अपराजिता देवीची मुर्ती स्थापन करून  खालील मंत्र म्हणून पूजा करतात . 

हारेण तु  विचित्रेण भास्वत्कनकमेखला /
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम //



अर्थ…। 

आपल्या गळ्यात चित्रविचित्र प्रकारच्या माळा धारण करणारी ,चकचकीत सुवर्णमेखला आपल्या कटी भोवती बांधलेली अशी जी भक्तांच्या रक्षणासाठी सदैव्य तत्पर असणारी अशी अपराजिता देवी आम्हाला विजयी कर . 


दसऱ्याच्या शुभ मुहूर्ती सावकार आपल्या हिशोबाच्या चोपड्या ,शेतकरी, कारागीर,राजे, सामंत आप आपली शस्त्रे ,अवजारे,आऊते ,हत्यारे यांचे पूजन करतात . विध्यार्थी आपली पुसते आणि लेखणी ची पुजा करतात . 
ह्या सर्व पुजे मागे एकच  उद्देश तो म्हणजे पुजित वस्तुत देव असतो किवा त्या देवरूपी असतात ही  धारणा असते .    







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: