गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

नवरात्री उत्सव ………!!





                      Posted Image

                              दुर्गोत्सव ………!!!



                      Posted Image






सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव (  नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन  पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र  २) शरद नवरात्र .



१) वसंत नवरात्र ---- 


ह्यास वसंत आणि चैत्र नवरात्र सुद्धा म्हणतात . हा उत्सव माघ /फाल्गुन मासात  नऊ दिवस साजरा करतात आणि दहाव्या दिवशी रामनवमी उत्सव करून संपतो .


२) शरद नवरात्र ---


ह्यास महा नवरात्र म्हणून साजरा करतात . हा उत्सव भाद्रपद/आश्विन मासात नऊ दिवस मोठ्या  आनंदाने साजरा केले जातो  आणि दहाव्या दिवशी विजयादशमी ( दसरा ) दुष्टावर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून मोठ्या जाल्लोष्यात साजरा केला जातो .






                                        घट 



ह्या उत्सवात घट स्वच्छ व प्रसन्न  वातावरणात स्थापित  करतात व नऊ रात्री  त्या ठिकाणी दिप सतत  प्रज्वलित ठेवतात . 

दुर्गा मातेची,शक्तिची पूजा आर्चा व आराधना नवरात्रीत केले जाते . असे मानले जाते की नऊ दिवस नऊ रुपात हि आदी शक्ति असते म्हणून  ह्या शक्ती मातेचे पूजन करतात .




शक्ति देवीचे  रूपे ……!!


१) दुर्गा ----अजिंक्य

२) भद्रकाली ---मंगल, भाग्य

३) अंबा / जगदंबा --- जगन्न -माता , विश्व माता .

४) अन्नपुर्णा ---- अन्न देणारी

५) सर्वमांगल्या ----आनंद देणारी

६) भैरवी --- भयानक

७) चंद्रिका ---  हिसात्मक / प्रबळ

८) ललिता -- सुंदर

९ ) भवानी -- जिवनदाई /जिवन देणारी

१०) मुकाम्बिका --- गाऱ्हाणे ऐकणारी .


नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा अष्टमी साजरी केली जाते ह्या दिवशी माते  समोर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आसतो .  पश्चिम बंगाल मध्ये अष्टमी भव्य दिव्य स्वरुपात साजरी करतात . नवव्या दिवशी कन्या पुजा ( वयात न आलेल्या  कुमारीका ह्यांची ) करतात . नऊ कुमारीका म्हणजे मातेचे रुपेच समजून त्यांचे पाय धुवून त्यांना कुंकुम तिलक लावतात नविन कपडे आणि पोटभर जेवण देऊन पुजा करणारे पुण्य कमावतात .




नवरात्र कथा ( अख्यायिका )------








चैत्रनवमी महिषासूर राक्षसाचे दमन करणाऱ्या दुर्गेचे पूजन करतात . ह्या राक्षसाने सर्व देवतांचा पराभव करून उन्मत्त झाला म्हणुन ब्रम्हा,विष्णु आणि महेश ह्यांनी आपली शक्ति  दुर्गामातेस दिली आणि मातेने त्याचे पारिपत्य केले व दुष्टाचा नाश केला .







 शरद नवरात्रीत  नऊ दिवस दुर्गा मातेची पुजा आणि दहाव्या दिवशी दसरा म्हणजेच ह्याच दिवशी श्री रामाने रावणाचा पराभव केला तो दिवस विजया दशमी साजरी करतात .


नवरात्रीचे नऊ दिवस तीन , तीन दिवसांचे भाग बनवुन साजरे केले जाते . तीन वेगवेगळ्या रूपातील देवीची पूजा व अर्चना करतात .


एक ते तीन  दिवस  दुर्गा ,काली रुपाची  सिंहावर आरूढ असलेली शस्त्र  अस्त्रानी  सज्ज ,लाल साडीतील देविची पुजा ,अर्चना करतात .






चार ते सहा दिवस  मातेच्या लक्ष्मी रुपास जी धन आणि समृद्धीची देवी म्हणून पुजिली  जाते .







सात  ते नऊ  शेवटचे  दिवस  सरस्वती रूपाचे पूजन केले जाते . ह्या रुपात देवी पांढरी शुभ्र साडी परिधान केलेली आणि हंसावर विराजमान ज्ञान देवता  म्हणुन वंद्य आहे .































ह्या दुर्गोत्सवात " दांडिया ' आणि " गरबा " मोठ्या संख्येने व आनंदात खेळला जातो . गरबा हे  गुजरातचे लोकनृत्य आहे आणि हा खेळ नवरात्रीत विशेषतः खेळला जतो. 



                                गरबा दिप 


एक घट सजवतात आणि त्यावर दिप प्रज्वलित करून मंडपाच्या मधोमध स्थापित करून त्याची पूजा करतात  त्यास " गरबा " म्हणतात आणि गोल रिंगणात स्त्री,पुरुष आबाल  वृद्ध वर्तुळाकृती  पदन्यास  करीत त्या गरब्या भोवती नृत्य करतात .





                                 गरबा नृत्य 


वर्तुळाकृती गरब्याच्या भोवती फिरणे म्हणजे " वेळेची गती " आणि  स्वतः भोवती चक्राकार ( फेरा घेत ) फिरत गरब्याचा वर्तुळ पुर्ण करणे म्हणजे " जन्म,मृत्यु आणि  पुर्नजन्म  "  शेवटी  ह्या विश्वांत  स्थिर असतो  तो सृष्टीकर्ता   (परमात्मा , देव ) आणि इथे ते दुर्गामातेस संबोधण्यात येते.



                                            दांडिया 



                                              टिपऱ्या 


दांडिया नृत्य हा सुद्धा गरबा नृत्या प्रमाणेच खेळला जातो पण हातात लाकडी टिपऱ्या घेऊन केला जातो . ह्या दोन्ही नृत्यात  फरक इतकाच आहे कि गरबा हा दुर्गा देवीच्या आरती अगोदर खेळला जातो तर दांडिया आरती नंतर खेळला जातो . 










 नवरात्री उत्सव निरनिराळ्या राज्यात धार्मिक पध्दतीने विधियुक्त   परंपरागत  केला जातो .


गुजरात ----

दुर्गा पुजा  केल्यानंतर गरबा व दांडिया खेळुन  साजरा करतात .

महाराष्ट्र ----     

वरात्रीच्या १० व्या दिवशी एखादा नवा उद्योग सुरवात करण्यास मंगल दिवस म्हणुन  इथे लोक आपल्या उद्योगाची विधिवत सुरवात  करतात . 


पश्चिम बंगाल ---- 

इथे दुर्गा पूजा फार मोठ्या प्रमाणत भव्य दिव्य देवीच्या मूर्ती मोठ मोठ्या पंडाला मध्ये स्थापन करून पूजा अर्चना करतात . बंगाली सर्व लोक आवर्जून देवीचे दर्शन घेण्यास रोज गर्दी करतात .

पंजाब ---- 

इथे सार्वजण  उपवास करतात आणि आठव्या दिवशी  " कन्या पूजा " म्हणजे कुमारिकेची पुजा करूनच मग उपवास सोडतात .

दक्षिण भारत ---  

निरनिराळ्या देवी देवतांच्या मुर्त्या एका उतरंडी सारख्या लाकडी फळ्यांवर मांडणी करून पुजा  करतात आणि ह्यास "गोलु " म्हणतात . कर्नाटकाच्या  म्हैसुर इथे तिथल्या राजप्रथे प्रमाणे हत्तीना सजविले जाते आणि मिरवणुक  काढतात . चामुंडा देवीची पुजा व अर्चना करतात आणि ९ व्या दिवशी पुस्तके, हत्यारे, वाहनांची पुजा करतात .

केरळ --- 

इथे शेवटचे तीन दिवस पुस्तकांची पुजा करतात . 





                                                  गोलु 


                   Posted Image

                         // दुर्गा माता की जय //  


                    Posted Image
---------------------------------------------------------------------------------

संदर्भ --- हब पेजेस ,विकेपिडिया , गुगल इमेजेस . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: