शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

श्री गजानानची 32 रूपे......!





1)   बाल गणेश ( गणपती ) ---







सोनेरी रंगसंगतीचा हा श्री  गणेश बालका समान आहे. हातात के , आंबा , उस  आणि फणस आहे .ही  सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि  विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.


2)   तरुण गणपती----






     ह्या रूपात श्री गणेशाला आठ हात आहेत आणि तो  मध्यानिच्या सुर्या सारखा तळापतो आहे.त्याच्या आठही हातात अंकुशगळफास (चाबुकमोदक ,कवठ ,गुलाबी जांब  ,कोवळी साळीचे रोप  उस आहेत.त्या लाल रंगामुळे तरुणाईचा जणु बहरच आलेला आहे


3)   भक्ति गणपती-----








       शरदऋतुच्या पूर्ण चंद्रा प्रमाणे दिसणारा हा गजानन आपल्या भक्तांसाठी एक विश्वास आणि श्रद्धा निर्माण करणारा आहे .भक्तगण नारळ,फुलांचे हार, प्रसाद अर्पण करतात. ह्याच्या हातात केळे , आंबा ,नारळ आणि गोड खिरीची वाटी आहे. हा गणेश आपल्या रूपाने सर्वाना आपल्याकडे आकर्षित करतो .


4)   वीर गणपती----







श्री गणेश ह्या वीररूपात एक शूर, पराक्रमी योद्धा दाखविण्यात आले आहे. शेंदुरी रंगाचा निश्चल उभा असलेला आपल्या भक्तांचे रक्षण करणारा असेरूप धरण केलेला गणेश आहे . त्यांच्या 16  हातात  विविध शत्रे धारण केलेली आहेत जसे, अंकुश,चक्र, गदा, तलवार , धनुष्य बाण, ढाल,भाला किवा शूल, परशू,साप,इत्यादी. ही आयुध्ये   साक्ष   देतात की तो आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सक्षम आहे.



5)   शक्ति गणपती----






हे गणपतीचे रूप म्हणजे शक्तिचे. लाल भडक रंगाची संध्याकालीन   दिसणारी मूर्ती म्हणजे कुटुंबाचे रक्षक असल्याची भावना भक्तांमध्ये जागृत होते असे हे रूप . श्री गणेश आपल्या तीन हातात परशू,मांडीवर शक्ति विराजमान आहे,  अंकुश,आणि  उजव्या हाताने अभय देत आहेत अशी गजानानचे रूप आहे.       



6)   व्दिजा गणपती ---- 






व्दिजा म्हणजे दोन वेळा जन्मलेला .पौराणिक कथे मध्ये गजानानने शिवास पार्वती मातेच्या सांगण्यावरून  अंतःपुरात प्रवेश नाकारले  आणि दोघांत युद्ध झाले त्यांत गजानानचे प्राणोत्क्रम झाले.पर्वती मातेचा आक्रोश आणि गणपती परत जीव दान देण्यासाठी हत्तीचे मस्तक लावून देण्यात आले म्हणून व्दिजा.ह्या रूपात श्री गणेश आपल्या हातात परशु  ,काठी, कमंडलू  ,आणि जपमाळ पुस्तक घेतलेले आहे



7)   सिद्धी गणेश-----






   गणेशाचे हे रूप सोनेरी रंगाचे आणि सोन्यासारखे बहुमुल्य असे आहे तसेच तो चतुरस्त्र,गुनसंपन्न आहे. त्याच्या हातात फुलांचा गुच्छ, परशु , आंबा ,उस, आणि सोंडे तिळाचे लाडू धरलेले आहे.  


8)   उच्छिष्ठा गणेश ------






हे रूप म्हणजे भक्तांनी  खुशाली ,धन्यता अर्पण करण्याजोगी  नीलकांती असलेला श्री गणेशहा गणेश सहा हातांचा आणि मांडीवर बसलेली शक्ती ( संकृती ) , हातात विणा,नीलकमल ,डाळिंब ,जपमाळ आणि ताजे भाताचे रोपटे आहे.

9)   विघ्न्नहरता  गणपती-------











गजाननाचे हे रूप विलोभनीय आहे लालसर रंगाचा आणि रत्न जडित असलेला  '" विघ्न्नहरता" असे मानतात . आठ हातांत शंख, चक्रअंकुश , चाबूक , फुलांचा गुच्छ , मोदक ,उस ,फुलाचे बाणयेणार्या कोणत्याही व्यत्ययांचा नायनाट करण्यास सज्ज्य आहे . म्हणूनच या रुपास विघ्न्न विनाशक गणेश म्हणतात .

10 )  क्षिप्रा गणपती ----







गणपतीचे रूप अंबर रंगात अतिशय देखणे गोजिरे आहे .हा गजानन आपल्या भक्तांवर कृपादृष्टी  वरदान देणारा आहे असे मानतात .  ज्यामुळे    भक्तांचे उत्कर्ष होईल. हा एकदंत आपल्या हातात चाबुक , अंकुश, कल्पवृक्षाची  लहान फांदी, आणि सोंडेत रत्नभरित कुंभ धरला आहे जे उत्कर्षाचे प्रतीक आहे.  



11 ) हेरंब गणेश -----













गणेशाचे हे रूप म्हणजे स्वेतरंगी  दुर्बालांचा रक्षण करता असा आहे .

हा पंच मुखी गणेश सिंहावर आरूढ असलेला आपल्या एका हाताने वरदान आणि दुसऱ्याने अभयदान,रक्षण करण्याचे वरदान देत आहे. इतर हातात जपमाळ,फुलाचे हार,हातोडा,फरशी ,फळे आणि मोदक आहेत.


12) लक्ष्मी गणपती -----










गणेशाचे स्वेतरंगी रूप आपल्या दोन्ही बाजूस रिद्धि ,सिद्धी विराजमान आहेत ज्या हातात नीलकमळ  धारण केलेल्या आहेत  ज्या प्राप्ती आणि चातुर्याच्या प्रमाण समजल्या जातात . एक हात वरद मुद्रेत तर बाकी करांत तलवार,जलकुंभ, पोपट कल्पवृक, कमडलु आहेत. 




13) महा गणपती -----












ह्या रूपांत गजानन महाराजा सारखे ऐटीत सिहासनावर  बसलेले आणि मांडीवर शक्ति बसलेली  हातात नीलकमळ आहे .गणेशास तीन नेत्र आहेत आठ कर आणि प्रत्येक करात अनुक्रमे निळसर फूल,कमळ,उस,भाताचे रोपटे,आणि नेहमीची रक्षक हात्यारे . जे लोक या महा गणपतीची आराधना करतात त्याना बौद्धिक शक्ति , यश आणि दुष्टापासून स्वंरक्षण  मिळेल ह्याची खात्री असते.   



14) विजया गणपती -----   
 










हे रूप तांबुस रंगाचे असुन विजयी  व दुष्टाचा पाडाव करणारे व आपल्या आवडत्या मूषक वाहनावर  बसलेला असा आहे.चार करांत एकदन्त परशू ,लालसर आंबा ,चाबुक धारण  केलेले आहे.


१५) नृत्य गणपती ------





गजानानचे हे रूप म्हणजे नृत्यनिपूण  जो कल्पवृक्षा खाली नृत्य करीत आहे. चार कर असलेला एका हातात सोन्याची अंगठी आहे आणि इतर करात मोदक,चाबुक,परशु धारण  केलेले आहेत.


16) ऊर्ध्वा गणपती -----







 देव गजाननाचे हे रूप तांबूस रंगाचे कमलावर बसलेले हे रूप आहे. त्यांच्या डाव्या मांडीवर शक्ति बसलेली आहे .एका हातात नीलकमल आणि इतर करांत नेहमीचे आयुधे आहेत .


17) एकाक्षरा गणपती -----













एक अक्षर " गं '" जे गणेशाचे मंत्र आहे " गं  गणपतये नम: " ह्या मंत्रोचाराने  भक्तगण श्री गणेशाचा धावा करून आर्शिवाद प्राप्त करतात.गणपतीचे हे रूप तांबूस रंगाचे असुन लाल रत्नांनी सजविलेला आहे.आपल्या मूषक वाहनावर आरूढ असलेले त्रिनेत्री,अर्धचंद्र मस्तकी,हाताने आशिर्वाद देत आहेत .बाकीच्या करांत नेहमीचे आयुधे .



18) वरदा गणपती -----













गणपतीचे  हे रूप शिवाचे काही गुणविशेष घेतलेले दिसते . माथ्यावर अर्धचंद्र कपाळाच्या मध्यभागी तिसरे नेत्र आहे .शक्ति  मांडीवर विराजमान आहे आणि सोंडेत रत्नकुंभ धरलेले ,एका हातात मधाचे भांडे आणि ईतर नेहमीचे अस्त्रे असे हे रूप श्री गजाननाचे आहे.


19) त्रय अक्षरा गणपती .....







 तीन ध्वनि रूप  जे " ओम ' " ॐ " ह्यात आहेत  त्यावरून ह्यांचे नाव " त्रय अक्षरा " गणपती पडले. लालसर तांबूस रंगाचा असा गजानन ज्याच्या लवचिक सुपा सारख्या मोठ्या  कानात " भिकबाळी " धारण केलेले ,हातात आपला तुटलेला दात आणि ईतर आंबा ,परशु ,सोंडेत प्रिय " मोदक ' धरलेला असे मोहक रूप आहे.



20 ) क्षिप्रा गणपती ------







हे गजाननाचे रूप दागिन्यांनी अलंकृत असलेला ,कुश तृणावर विराजमान ,विश्वव्यापि  भव्य पोट बाहेर असलेला ,हातात  तुटलेले दंत, डाळिंब, परशु , कमळ ,आणि कल्पवृक्षाची डहाळी घेतलेले रूप म्हणजे त्वरीत कृपा करणारा असा क्षिप्रा गणपती 



21) हारिदा गणपती -----








सोनेरी रंगाचा ,पिवळे वस्त्र परिधान केलेला हा गजानन एका सिहासनावर शांतपणे बसलेला आहे,हातात चाबूक आणि मोदक व सुळा, परशु  धरलेला असे देखणे रूप असलेला गजानन लोभस दिसतो.  



22) एकदंत गणपती ------












एकदंत म्हणजे ( एक + दंत ) एक दात असलेला ,निळ्या रंगाचा ,भले मोठे पोट ,परशु जो अज्ञान मिटवणारा ,जपमाळ आणि दुसरा आवडता गोड पदार्थ म्हणजे लाडू घेतलेला असे रूप आहे.



23) श्रिष्टी गणपती -----
















हे रूप म्हणजे जगात आनंद पसरवणारा आपल्या सालस व 
ईश्वरीय अश्या मुषकावर आरूढ असलेला गजानन .हातात चाबूक ,परशु ,पिकलेला अंबा, आणि  तुटलेला दात . जो त्यांचे आपल्या भक्तांसाठी त्याग करण्याची तत्परता  दर्शवितो .



24) उधाना गणपती -----










दुष्टांना शिक्षा करणारा , धर्म अमलात आणारा व  रक्षण करणारा, ह्या कामासाठी  दहा हात आहेत आणि प्रत्येक हातात अनुक्रमे रत्न कुंभ , डाळिंब , कमळ ,उस ,गदा, साळीचे रोपटे ,फुलमाला, परशु ,चंद्र विकासी कमळ ,तुटलेले दात .



25 ) रणमोचन गणपती ------













श्री गणेश हा भक्तांना , मानवजातीत गुरफटलेले ( दास्य ) 
,अपराधी,दोषी असणाऱ्या अश्या साऱ्यांना दोष मुक्त करणारा व मोक्षप्रत घेवून जाणारा असा आहे. स्फटिका प्रमाणे पांढरा चेहेरा ,रेशमी  लाल रंगाचे वत्रे धारण केलेला आपल्या हातात परशु , चाबूक, आपले दंत ,आणि फळ धारण  केलेला हा गजानन सर्वाना भावतो .



26 ) धुंडी गणपती ----- 











हे गजाननाचे रूप तांबूस लालसर रंगाचे असून ज्याच्या भक्तीत भक्तगण तल्लीन होतात तो गजानन जो आपल्या हातात रत्न कुंभ घेतलेला ,परशु,तुटलेला दात, आणि तुलसीमाला जे अध्यात्मिक ज्ञानोदयाचा खजिना आहे हे  दर्शविते . आपल्या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांसाठी रिता करण्यास तय्यार अश्या भावात दिसतो .



27 ) द्विमुख गणपती -------









 ह्या  गणपतीचे रूप द्वि म्हणजे दोन मुखी आहे त्यास सर्व बाजूस बघत येत म्हणजे चाहुबजूस लक्ष ठेवता येते. गणेशाची कांती तेजस्वी निळ्या-हिरव्या रंगाची आहे. मस्तकी हिरे रत्न जडित मुगुट परिधान केलेला  आहे. आपल्या चार करांत चाबूक, तुटलेला दात, अंकुश आणि रत्न कुंभ आहे.




28 )   त्रिमुख गणपती ------













ह्या रुपात गजानन पळसाच्या फुलासारखा लाल मुखवर्णी दिसतो आणि सोन्याच्या कमळावर आसनावर बसलेला आहे. ह्या रुपात गणपतीचे उजवे हात वरदान मुद्रेत तर दावे हात अभय मुद्रेत आहेत. बाकी हातात परशु,अमृत कलश ,फासा आणि जपमाला धरलेला आहे



29 ) सिंह  गणपती ------. 







चकचकीत पांढरा रंगाचा असे गणेश रूप सिंहासनवर आरूढ असलेला असा गजानन जो  एका हातात सिंह  धरलेला आपली ताकद आणि निडर वृत्ति दाखविणारा ,तसेच कल्पवृक्षाची डहाळी ,विणा , कमळाचे फुल ,आणि रत्न कुंभ आपल्या हातात धरण केलेला आहे.



30 ) योगा गणपती ------








हे गणपतीचे रूप म्हणजे योगी मुद्रेत ध्यानस्त बसलेले असे आहे.कांती सूर्योदयाची आणि निलवस्त्रे परिधान केलेले आहे.दोन्ही पाय गुडग्यातून दुमडलेले चेहरा शांत ध्यान धारणेस  बसलेले आहे. हातात योगिक काठी , ऊस , जपमाळ आणि चाबुक आहे.



31 ) दुर्गा गणपती ........












हे गणपतीचे रूप बघुन दुर्गामातेचे स्मरण होते कारण दुर्गामातेचे गुण  अजिंक्य , अभेद्य दिसुन येतात. सुवर्णकांती, लाल वस्त्र ,आणि हातात धनुष्य बाण , चाबुक, परशु , झेंडा,  जपमाळ , तुटलेला दंत ह्या सर्व आयुधांनी सज्ज्य असा आहे. 



32) संकट हारा गणपती --------











हे रूप म्हणजे भक्तांचे संकट हरणारा असा आहे. ह्याची कांती सूर्यासारखी आहे आणि नील वत्र  परिधान केलेली,कमळाच्या  फुलावर विराजमान आहे,डाव्या मांडीवर " शक्ती ' हिरव्या गर्द रंगाच्या साडीत बसलेली आहे. आपल्या हातात चाबुक,परशु ,खिरीचे भांडे, एकहात वरद मुद्रेत अभय देणारा असा आहे . 



======================================

शोध सामुग्री ---इ-प्रार्थना .कॉम , गणेश ब्लॉग, आणि श्री गणेश .कॉम 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: