रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

पांढरा चहा ......एक कप.









 पांढरया चहाची शेती.






शीर्षक वाचुन  तुम्हास प्रश्न पडला असेल कि हें काय नवीन आज पर्यंत ग्रीनटी ( चहा ) ,  ब्ल्याकटी ( चहा ) ऐकून होतो पण पांढरा चहा ( टी ) हें नवीनच आहे. हो आपला विचार बरोबर आहे आपण नेहमी दुध घाततेला चहा किवां कोरा चहा घेत असतो त्यांत नंतर ग्रीनटी ची भर पडली आणि ते आपल्या अंगवळणी पण पडले. तसेंच आपण कॉफी पण चहाच्या पद्धतीनेच घेतो.







तुम्ही कधीही पांढऱ्या चहा बद्दल ऐकले नसेल पण सध्या पश्चिमेकडे व अमेरिकेत हा सेवन केला जातो आणि ह्या चहाची मागणी वाढत आहे कारण ह्याच्या औषधी गुणामुळेच. सध्या भारतात पण ह्याचे पदार्पण झाले आहे हां पण, कमी लोकाना ह्या बद्दलची माहिती आहे. नावाप्रमाणे हा चहा पांढरा नाही पण हलका पिवळसर असा ह्याचा रंग आहे आणि ह्याची पाने लांब आणि अणकुचीदार आहेत. हा चहा जगात फार महागडा आहे.




पांढरा चहा काय आहे ?







                                                     पांढऱ्या चहाची पाने




पांढऱ्या चहाची पाने अगदी सुबक व काळ्यायुक्त असतात. ह्यांना पिकविण्यासाठी व वाढीस लावण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. सर्वात चागला मोसम म्हणजे वसंत ऋतूत ह्या चहाची झाडे बहरतात.








ईतर चहाची पाने आंबवुन व नंतर सुकवुन त्याची पावडर केली जाते तसें ह्या चहाच्या पानास करीत नाहीत तर ही पाने एका शेड खाली जिथे ह्याना पुरेशा उन्हात चांगले सुकाविले जातात व ते हळू हळू काळे पडतात व अंबवले जातात. पांढरया चहाला एक प्रकारच सुंदर नाजुक असा फळाचा सुवास असुन ह्यांत " कॉंफिन " ची मात्रा ईतर चहा पेक्षा फारच कमी आहे व प्राणवायुस पूरक असल्यामुळे ह्याचा औषधी सारखा उपयोग होतो.



ह्याचे उगमस्थान -----



ह्या चहाची झाडे १७०० व्या शतकांत चीनच्या फिजुअन प्रांतात आढळले आणि २००० सालांत ह्या वर केलेल्या संशोधनामुळे पश्चिमेकडे ह्याची लोकप्रियता वाढली. हा चहा जागतिक पातळीवर बाजारात आणला गेला. भारत व श्रीलंका ह्या देशातील शेतकऱ्याना ह्याची लागवड करण्यासाठी प्रोच्छाहित करण्यात येत आहे.




                                     " कॅमेल्लिया सिनेन्सीस " 





हा पांढरा चहा हलके ऑक्सिडाईज करून चीन व तैवान आणि थायलंड मध्ये ह्याची लागवड केली जाते. ह्या चहाची पाने आणि कळ्या चीनमध्ये मिळणाऱ्या " कॅमेल्लिया सिनेन्सीस " ह्या जातीच्या झाडापासुन मिळविले जाते.

ह्याची पाने आणि कळ्या नैसर्गिकरित्या उन्हात वळविले जातात तो पर्यंत जेव्हा ते पांढरे रंगाचे होत नाहीत. नंतर त्यानां उकळुन सुकवले जाते पण ईतर चहाच्या पद्धती इथें वापरण्यात येत नाहीत.

खरें तर ह्या चहाचे नाव आले ते मुळी त्याच्या कळ्यावरच्या बारीक नाजुक चंदेरी रंगाच्या थरामुळे आणि हा थर सुकण्याच्या वेळीच दिसण्यास सुरवात होतें म्हणून ह्यास पांढरा चहा असे पडले.









औषधी व रोग प्रतिकारक चहा.........



हा चहा क्यान्सर , रक्तदाब ( उच्य आणि नीच ) कोलेस्ट्रोल सारख्या रोगावर प्रतीबंद्धात्मक आहे इतकेच नाही तर शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठीसुधा ह्याचा उपयोग होतो. आणि आपल्या त्वच्या रोगावर नियंत्रण व वाढु देत  नाही. वयां परत्वे त्वच्या ढिली होतें वर सुरकुत्या येवु  लागतात त्यांना पण हा चहा नियंत्रित करतो व त्यामुळे तुम्ही वायापेक्षा लहान वाटु लागतात.








काय आहे कि नाही सर्व गुण संपन्न औषधी गुण युक्त व रोग प्रतिकारक चहा. ?

 ह्या चहाच्या लागवडीसाठी भारतीय शेतकरी आशाळभूत नजरेने बघत असतील नाही का ?


------------------------------------------------------------------------------

सर्व चित्रे गुगलच्या सौजन्याने .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: