पश्चिमी जगाची सर्व आघाडीवर घसरती स्थिती पाहता भारतीयांनी सज्य व्हावे...आपल्या प्रगतीसाठी ..!!
अमेरिकन न्याशनल इन्टलिजंस कॉन्सिलने नुकतेच दोन पाहणी रिपोर्ट्स प्रसिद्ध केले आहेत.
1 ) Global Trends 2030 Alternative World.
2 ) US Strategy for a post-western world : Envisioning 2030
हे रिपोर्ट्स भारतीयांनी जरूर वाचावे कारण ते आपल्या भारताला महासत्ता बनविण्याचा उभारण्यास उपयोगी पडेल. अमेरिका आणि युरोपीय देशांची आर्थिक,सामाजिक आणि जागतिक स्थरावर जी पिछेहाट चालू आहे. हीच ती योग्य वेळ आहे भारतीयांना आपली जागतिक आणि आंतरिक रणनीती ठरविण्यासाठी.
ह्या रिपोर्ट प्रमाणे ह्या देशांच्या प्रगतीचा ग्राफ ज्या वेगाने घसरत आहे ते बघता आणि चीन,भारत ह्या विकसनशील देशाची प्रगती लक्षणीय होत आहे .ह्या पश्चिमी देशांची आर्थिक घसरण होत नाही तर सामाजिक व्यवस्था पण बिघडत चालाली आहे.
अमेरिकेत नुकतेच घडलेले शाळेतील हात्याकांड आणि ईतर अनेक अश्या शुटिगच्या घटना बघता तेथील कौटुंबिक तसेच एकमेकांत असलेली आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम ,एकोपा हा दिसेनास झाला आहे. हे स्पष्टच आहे कि त्याची कौटुंबिक व्यवस्था उतरणीला लागली आहे हे ताज्या घटणे वरून सिद्ध होत.
तो बंदुकधारी निश्चितच अश्याच वुध्वस्त झालेल्या कुटुंबातील असावा कारण तेथील कुटुंब व्यवस्थेला उभारण्याचा कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही .खुलेआम शास्त्रांची उपलभता आणि सरकारचे धोरण आणि कडक कायदे न असणे हे सर्वस्वी जवाबदार आहेत.
अन्गुस मेडिसन यांच्या रिपोर्ट प्रमाणे भारत आणि चीन ह्यांची सन १८२० पर्यंत जागतिक GDP मध्ये ५० % वाटा होता. गेल्या २०० वर्षा पासून पश्चिमी राष्ट्रांचा वरचष्मा होता तो हळु हळू कमी होत आहे
खरे तर हे भाकीत आपल्या श्री अरबिंदोनी फार वर्ष पूर्वीच केला कि
" जेव्हा पश्चिमी देशांची संस्कृती रसातळाला जाईल तेव्हा भारत निश्चित उभरेल "
भारतीयांची मानसिकता अशी झाली कि जो पर्यंत दुसरे आपल्या प्रगती किवा अधोगती बद्दल जाहीरपणे सांगत नाहीत तो पर्यंत आपण मानीतच नाही .जेव्हा वरील दोन रिपोर्ट्स प्रसिध्द झाले व संपूर्ण जगाने याची दाखल घेतली तेव्हा कुठे आपण जागे झालो.
ह्या रिपोर्ट मध्ये नमुद करण्यात आले कि भारत आणि चीन हे दोन्ही देश प्रगतीपथावर आहेत आणि सन २०३० साला पर्यंत अमेरिकेच्या पुढे जातील. येत्या २० वर्षात हे दोन्ही येशिअन सांस्कृतिक देश युरोपीन आणि अमेरिकन संस्कृतीला मागे टाकतील. मध्यम वर्गीय वर्ग झपाट्याने वाढत आहे व यामुळे मुलभूत गरजांसाठी स्पर्धाच लागेल असे दिसुन येते.
पश्चिमी देश व आपल्यात बर्याच गोष्टीत भिन्नता आहे. भारताला महासत्तेकडे जाण्यासाठी ठोस निर्णयाची आवशकता आहे. पश्चिमी देशांच्या व आपल्या देशातील फरक जो प्रकर्षाने जाणवतो ते असे.
१) त्याची ढासळती कुटुंब व्यवथा व बचत.
२) वृद्धांची वाढती संख्या.
३) जनता दीर्घायुषी होत चालल्यामुळे त्याच्यावर होणारा अतिरिक्त खर्च जो सरकारला करावा लोगतो.
४) पश्चिमी देशांतील चर्चवरचा ढासळत चालेला विश्वास हा सर्वात मोठा अडसर आणि प्रश्न आहे.
ह्या रिपोर्ट मध्ये अर्थ, राजकारण,आणि वेगवेगळ्या अंगांची प्रगती आणि घसरण ह्याचे विवेचन केले पण सर्वात मुख्य म्हणजे समाजात चांगली सक्षम कुटुंब व्यवस्था कशी उभी राहिल व त्यायोगे सुदृढ समाज कसा निर्माण होईल ह्याकडे पश्चिमी देशांचे लक्षच नाही हे नमूद करण्यात आले.ह्याचा परिणाम म्हणून कि काय हिनवृती ,नीतीहीन, संकुचित विचारांचा समाज तिथे निर्माण होत आहे .
साधारण ९०च्या दशकात संपूर्ण जगाच्या GDP मध्ये पश्चिमी राष्ट्रे ज्यांना G ७ ( अमेरिका, युरोपीय देश ) संघटना संबोधले जाते यांचा वाटा ५० % इतका होता आणि भारत व चीन प्रगतीशील देशांचा वाटा फक्त ३६ % इतका मर्यादित होता.
सन २०२० पर्यंत G ७ देशांचा वाटा घसरत ३० % वर येईल असे अनुमान आहे ते त्यांच्या सध्याच्या परिस्थिती मुळे आणखीन खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली .
जगात सर्वांनाच बेरोजगाराची समस्या भेडसावत आहे पण युरोपीय देश स्पेन,ग्रीस इथे १६ ते २० वयोगटातील तरुणांची बेरोजगारी जवळ जवळ २० % पेक्षा जास्त दिसून येते. ही टक्केवारी पुढच्या काळांत कदाचित ५० % पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली गेली.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी युरोपीय देशांची लोकसंख्या जागतिक लोसंख्येच्या २५ % होती पण आज ती ११ % पर्यंत खाली आलेली आहे व अंदाज असा आहे कि पुढच्या येणाऱ्या काळांत हीच २% ते ३% पर्यंत घसरेल.
पश्चिमी देशात लग्न न करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे व एकटे जिवनाचा आनंद घेण्याकडे लोकांचा कल दिसतो ह्याच बरोबर घटस्पोटाचे प्रमाण पण वाढत आहेत ही सुद्धा चिंतेची बाब आहे.
ब्रिटानच्या २०११ मध्ये घेतलेल्या सेन्सेक्स प्रमाणे एकटे राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि लोकसंख्येच्या ११.९ % इतकी लोक लग्न झालेले आहेत. एका तपापूर्वी ही संख्या १ मिलियन एवढी होती ती लोक संख्येच्या २०.०४ % इतकी होती.घटस्पोटाचे प्रमाण वाढतच आहे परिस्थिती बिघडत चालली आहे.
ह्या कारणामुळे कुटुंबेच्या कुटुंबे विभक्त झाली आणि एकटा किंवा एकटी राहण्याच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे एकटी आई किवा एकटे वडील ह्यांच्यावर आपल्या मुलांच्या संगोपनाची जवाबदारी पडत आहे .वयोमान वाढत आहे व वृद्धांच्या संख्येत वाढ होत आहे. ह्याचा परिणाम भविष निर्वाह ,अनुदानावर पडत आहे .सरकारवर अतिरिक्त खर्चाचा बोझा वाढतो आहे आणि हा आर्थिक बोझा पेलाविण्यापलीकडे जाईल अशी भीती ह्या देशाना भेडसावीत आहे.
अमेरिकेची परिस्थिती यावेगळी नाही किंबहुना त्याच्या समस्या अधिक बिकट आहेत. सन २०१० मध्ये अमेरिकेत जन्मलेली मुले लग्नाच्या बंधनातुन झालेली नाहीत. ऐकून जन्मलेल्या नवजात अर्भाकांत ७० % मुले अमेरिकन-आफ्रिकन तर ५५ % ल्याटीनोज आहेत.
ह्या वर्षी अमेरिकेत जन्मलेल्या मुलांमध्ये अर्ध्या पेक्षा जास्त व्हाईट अमेरिकन नव्हती ती इतर धर्माची आहेत. हा ट्रेंड बघता अशी भीती व्यक्त होत आहे कि पुढच्या ३० वर्षात चीनी, स्पयानिश यांची संख्या वाढेल आणि व्हाईट अमेरिकन संख्या घटेल .
ह्याचा परिणाम म्हणून चीनी आणि स्प्यानिश ह्या भाष्या अमेरिकेच्या अधिकृत भाष्या होतील आणि असे जर झाले तर तेथील समाजामध्ये तणाव निर्माण होतील आणि परिणामी सिव्हिल वार होण्याची शक्यता निर्माण होईल.
दिनांक १० आक्टोबर २०११ वाल स्ट्रीटच्या अहवाला नुसार जवळ जवळ अर्धे अमेरिकन नागरिक हे सरकारी योजनाचे लाभार्थी असतील.अन्न, निवारा, रोख पैसे , मेडिकेअर ह्या सारखे फुकट मिळणाऱ्या सवलती मुळे सरकारचा आर्थिक बोझा वाढेल.ह्याचे परिणाम मागच्या पांच वर्षापासून आपण अनुभवतो आहोत. अमेरिकन ब्यान्काची हलाख्याची अवस्था, स्वत दारात गृह कर्ज ,कमी व्याजाने कर्ज इतर व्यवस्थापना देणे, ह्या कारणासाठी त्यांच्यावर भीषण परिस्थिती ओढवली ते आपण पहिलेच ना.
पश्चिमी देशांची घसरती अवस्था बघता भारताने आपली भावी महासत्ता बाण्यासाठीची दिशा ठरवावी लागेल. भारताची नाळ ह्या किवा त्या कारणाने पश्चिमी देशाशी जुळलेली आहेत.भारतीय मुले परदेशांत उच्चशिक्षणासाठी जात आहेत आणि नौकरी पण करताना दिसतात. पूर्वी पेक्षा परदेशांत भारतीयांची संख्या अधिक झालेली आहे. परदेशांत भारतीयाना दुयम नागरिकाची वागणूक मिळते हे सत्य आहे .
भारतात शिक्षित मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढत आहे आणि परदेशी माल विकण्यासाठी ही एक मोठी बाजारपेठ आहे .हा मध्यम वर्गीय वर्ग आर्थिक क्षमता राखुन आहे व त्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष ह्या बाजार पेठेकडे लागले आहे.
पश्चिमी देशांची जगण्याचे मॉडेल किती कुचकामी आहे हे त्यांच्या घसरत्या आर्थिक ,सामाजिक परिस्थिती वरून दिसून येते. तेच मॉडेल आपण भारतीय अवलंबणे किती चुकीचे आहे. पण दुर्दव्य म्हणजे आपल्या सरकारची पावले पण त्याच दिशेने पडत आहेत. पश्चिमी देशांच्या दबाव तंत्राला आपले सरकार बळी पडत आहे असे दिसते.
हे खरे आहे कि पश्चिमी देशांच्या योजना किती फोल ठरत आहेत हे दिसत असताना आपण त्याच मार्गाने जावे हे काही पटत नाही. भारताने डोळे उघडे ठेवून आपले ज्यात भले आहे त्याच मार्गावर वाटचाल करावी.
आपली सध्याची राजकीय अवस्था बघता जगातील धनाढय देशाचे मांडलिक होणे भूषणावह आहे असे आपल्या राजकीय नेत्याची मानसिकता बनली कारण त्यांत त्यांचे स्वहित जे दडलेले आहे.
अश्या सर्व परिस्थितीत ही आपला देश प्रगती पथावर आहे व जगात आपले नाव राखण्याच कसोशीने प्रयत्न करीत आहे. भारत महासत्ता बनेल कि नाही हा प्रश्न वेगळा पण पश्चिमी देश मात्र भारताकडे एक बाजारपेठ म्हणूनच पाहतात.
आपली संस्कृती ही पूर्वेच्या संस्कृतीशी मिळती जुळती आहे म्हणून त्यांच्याशी आपण जुळवुन घेवु शकतो पण पाश्चिमात्य संस्कृती ही अधिक दुरची वाटते.
आता भारताने पुढाकार घेवून सर्व पूर्वेकडील देशाना एकत्र आणून UN , जागतिक ब्यांक, IMF सारख्या मजबुत संघटना बनवाव्यात व त्या द्वारे पूर्वेकडील देशाच्या मोठमोठाल्या उद्योगांना स्वस्त दारात कर्ज देणे, सरकाराना आर्थिक मदत करणे तसेच जगाच्या बाजारावर नियंत्रण ठेवणे व त्यायोगे एक महासत्तेचा दावेदार बनावे.
श्री अरबिंदोनी म्हटल्या प्रमाणे
" भारत पश्चिमी देशाच्या ऱ्हासातून वरती येईल "
खरेच असे होईल का ?
भारतीय राजकारणी ह्या कसोटीवर उतरतील का ?
भारतीय नागरिक सक्षम लोकउपयोगी सरकार निवडून आणतील का ?
ह्या सर्वांची उत्तरे येणारा काळच देईल.
मा.ना. बासरकर.
------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख श्री. वैद्यनाथन IIM बंगलोर यांच्या इंग्रजी लेखाचे स्वर्य अनुवाद .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा