रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

२०१६-ऑस्कर पारितोषिक वितरण सोहोळा पांढरा की रंगीबेरंगी?



ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स ॲन्ड सायन्स (AMPAS) या संस्थेने १९२७ आणि १९२८ या वर्षी तयार झालेले चित्रपट हिशेबांत घेऊन १६ मे १९२९ या दिवशी पहिला पारितोषिक सोहोळा सुप्रसिद्ध हॉलीवूड रूझवेल्ट या हॉटेलमधे साजरा केला.  ह्या सुरुवातीच्या खाजगी समारंभाला फक्त २७० पाहुणे ऊपस्थित होते. तेव्हांपासुन ते आजतागायत ऑस्कर पारितोषिक मिळविणे हे चित्रपट कलावंतांना नोबेल पारितोषिक मिळविण्या इतकेच महत्वाचे, समाधान मिळऊन देणारे व विषेश मानसन्मान मिळऊन देणारे ठरले आहे.

 जशी जशी वर्षे ऊलटली तशी ऑस्कर पारितोषिके मिळविण्याची जिद्द वाढीलाच लागली. हे पारितोषिक म्हणजे चित्रपट कलेच्या क्षेत्रामधला  सर्वोच्च सन्मान समजला गेला. गेल्या जवळ जवळ ८० च्या वर वर्षांत  पारितोषिकाचा कसही बदलत गेला. तो जास्त कडक आणि शिस्तिचा झाला. हळुहळु त्यामधे परदेशी चित्रपटांचा अंत:र्भावही करण्यात आला. ऑस्करच्या तोडीचा अनुभव असलेल्या कलावंतांची बिदागी इतरांच्या मानाने जास्त मिळु लागली. हा समारंभ म्हणजे ऑलिंपीक विजेत्या खेळाडुंसारखाच मोठ्या थाटामाटाने होऊ लागला. चित्रपट क्षेत्रामधला मानाचा तुरा असा सिद्ध झाला.


तसे आतांपर्यंत सुरळीतच चालले होते. मात्र या वर्षी त्याला थोडे गालबोट लागते आहे! या वर्षी त्याला रंग फासला गेला आहे. हा समारंभ विशेषकरुन केवळ पांढ-या कलाकारांनाच न्याय देतो, आणि शिवाय तेही पुरूष कलाकारच. स्त्री कलाकारांना, विशेषकरुन काळ्या स्त्री कलाकारांना ही पारितोषिके हव्या त्या प्रमाणांत मिळत नाहीत असा आरोप ॲकेडमीवर केला गेला आहे. 

Image result for oscars 2016 stage


Image result for oscars 2016 boycott


त्यामधील सत्यासत्यतेची जाण व्हायच्या आंतच कांही काळ्या सुपरस्टार्सनी या वर्षी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णयही घेऊन टाकला आहे. ही नांवे हॉलीवूडमधली गाजलेली, पुर्वी ऑस्कर पारितोषिके मिळविलेली असल्याने तर त्यांचे बोलणे मनावर घेऊन अकादमीने Corrective Actionsसाठी पाऊल ऊचलेलेही आहे. हॉलीवूडनगरी आणि त्यामधे चालत असलेला हा Business किती fast pace operation आहे हेही त्यामुळे सा-या जगाला कळले.


२८ फ़ेबृवारीस हॉलीवूडमधे होणा-या या समारंभाची माहिती, आंकडेवारी या लेखाच्या निमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवावी हा या लेखनाचा ऊद्देश आहे. अकादमीवर होणारे आरोप खरे की खोटे, ह्या चर्चेपासुन अलिप्त राहुन केवळ समारंभाच्या पार्श्वभुमीबद्दल चर्चा करणे हा आणि केवळ हाच हेतु आहे! त्यामुळे माझे व्यक्तीगत मतप्रदर्शन मी केवळ खाजगी बैठकीपुरतेच मर्यादित ठेवणार आहे. ऊद्देश असा की जाणकरांनी त्यांचे स्वत:चे मत तयार करावे. असो

अकादमी आता ८९ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. गेल्या ८९ वर्षांत खाजगी समारंभापासुन सुरु केलेली ही गंगोत्री आता एका विशाल सागरासारखीच रुंदावली आहे. त्यामुळे भरपुर अनुभव गांठीला बांधुन आणि कोणते चित्रपट पारितोषिकासाठी स्पर्धेत आलेले आहेत ते हिशेबांत घेऊनच आतापर्यंतचे नियम केलेले आहेत, आणि कालानुसार त्यामधे योग्य ते बदलही केले गेले आहेत. मग याच वर्षी असा मुद्दा का आणला जातो आहे हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. असो


वास्तविक पाहाता ४ वर्षांपुर्वीच म्हणजे २०१२ पासुन अकादमीने जास्तीत  जास्त स्त्रि-कलाकार आणि मायनारिटी ग्रूप यांना ऊत्तेजन देण्यासाठी कांही अमुलाग्र बदल करायला सुरुवात देखील केलेली आहे. सध्या ज्या कलाकारांना आयुष्यभर मतदानाचा अधिकार दिला आहे ती संख्या ६२६१ आहे. मात्र सगळे लोक मतदानाचा अधिकार बजावतातच असे नाही! सध्या जो आरोप अकादमीवर केला जातो आहे त्यावर ऊपाय म्हणुन त्यांनी तांतडीची बैठक घेऊन खालील निर्णय घेतले आहेत.


१. ज्या ज्या मतदान अधिकार मिळालेल्या कलाकारांनी गेल्या कांही वर्षांत मतदानाचा हक्कच बजावला नाही त्यांचा अधिकार अकादमी ताबडतोब काढुन घेईल.

२. त्यांची रिप्लेसमेंट करतांना शक्यतोवर काळ्या स्त्री कलाकार आणि मायनारिटी कलाकार (काळे, एशियन, स्पॅनिश वगैरे) ह्यांना संधि दिली जाईल.

३. आणि हे करतांना आजपासुन ते २०२० पर्यंत म्हणजे पुढच्या केवळ ४ वर्षांत सध्या असलेल्या काळ्या कलाकारांची, स्त्री काळ्या कलाकारांची संख्या दुपटीवर नेण्यात येईल.


अकादमीने ऊचललेले हे पाऊल खुपच आक्रमक असे आहे. कलाकारांच्या तक्रारीला न्याय देण्यासाठी कंबर कसुन कामाला लागल्याचे चिन्ह आहे.

सध्या अकादमीमधे १५०० स्त्री कलाकार आहेत. आणि ५३५ अ-पांढरे आहेत. आता ही संख्या पुढील चार वर्षांत दुप्प्ट करायची असेल तर २०२० या वर्षी स्त्री कलाकारांची संख्या ३००० आणि अ-पांढरे कलाकार-संख्या १०७० होईल. याचाच अर्थ असा की पुढील चार वर्षांत प्रत्येक वर्षी ही संख्या अनुक्रमे ३७५ आणि १३३ ने वाढवावी लागेल. अकादमीच्या कसाला ऊतरणारे इतके Qualified कलाकार ऊपलब्ध आहेत कां? आणि समजा-फक्त समजा की त्यांच्या कसाला ऊतरणारी ही एव्हढी कलाकार मंडळी मिळाली नाही तर? तर केवळ हे ऊद्दिष्ट पुर्ण करण्यासाथी कसाची क्वालिटी कमी करणार की काय? याचाच अर्थ असा की २०२० ला जी संख्या तयार होईल त्यामध्ये सर्व योग्य कलाकार असतील? या निर्णयाचे दूरवरचे परिणाम किती धोकादायक असतील हे नव्याने सांगायला नकोच! अकादमीचे सध्याचे नियम हे खुप Stringent आहेत. त्या मधे बसणारे कलाकार मिळाले नाहीत तर ऑस्करच्या मुळ संकल्पनेची किती वाट लागेल हे सांगायला भविष्य संगणा-राची गरज नाही! ह्याच अकादमीचे माजी अध्यक्ष Hawk Koch ह्यांनी अनुभवाचे बोल एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलेही आहेत. ते म्हणाले की, "सध्याच्याच कठिण नियमांत कलाकार बसत नाहीत. कारण पुरेसे चांगले कलाकारच नाहीत! मग अकादमीचे मंडळ आणणार आहेत कुठुन १५०० नविन स्त्री कलाकार आणि ५३५ अ-पांढरे कलाकार? आणि ते ही पुढच्या चार वर्षांत? आणि मग ही संख्या केवळ जाहीर केली आहे म्हणुन पुर्ण करण्यासाठी नियम शिथिल करणे हेच करावे लागेल ह्यांना! मग क्वालिटीचे काय? थोडक्यांत म्हणजे केवळ संख्या पुर्ण करण्यासाठी ती Quality शी केलेली तडजोड असेल.




परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या सर्व गोष्टींसाठी अकादमी खरोखरीच जबाबदार आहे कां? अकादमीकडे जे चित्रपट निवडीसाठी म्हणुन आणले जातात वा ठेवले जातात त्यांतुनच ते पारितोषिकासाठी कलाकार निवडणार ना! आख्या अमेरिकेतुन शेकडो चित्रपट ऑस्करसाठी पाठविले जातात. त्यामधुन वस्त्रगाळ करुन निवडसमिती कांही मोजकेच चित्रपट अकादमीकडे पाठविते. आणि केवळ त्यामधुनच अकादमीला ~स्करसाठी चित्रपट आणि त्यामधले कलाकार निवडायची संधि असते. निवडसमिती कोणते चित्रपट वस्त्रगाळ करुन पाठविते त्यावर अकादमीला कांहीच अधिकार नाहीत. त्यांनी फक्त समोर आलेल्या कलाकृतींमधुनच निवड करायची असते. निवडसमितीकडे रंगी बेरंगी कलाकारांचे अथवा मायनारिटींनी कामे केलेले चित्रपट पुरेसे येतात का? समजा ते पुरेसे येतच नसले तर? म्हणजे खर तर गा-हाणे मांडायचेच असेल तर वा तक्रार करायचीच असेल तर ती जी निवडसमिती सुरुवातीस त्यांना अभिप्रेत असलेला कस (Criteria) लाऊन चित्रपटांची निवड करतात त्यांच्याकडे करायला हवी नाही का? आणी तक्रार करणा-या मंडळींना हे माहित नाही असेही नाही! मग ते अकादमीस कां छळताहेत? हे सारे महित असतांना ते डायरेक्ट निवडसमितीकडे कां जात नाहीत? निवडसमितीकडे तक्रार करणे हे त्यांना सहज शक्य आहे पण ते करीत नाही! त्याला अर्थात अनेक कारणे आहेत. एकतर ते त्यांना परवडणारे नसावे! कारण शेवटी निवडसमितीच  ठरविणार की पुढे कोणते चित्रपट निवडायचे! म्हणजे त्यांना दुखऊन चालणार नाही. शिवाय तक्रार केली तरी निवडसमिती इतकी बहाद्दर आहे की ती त्याकडे फारसे लक्ष देणार नाही. कदाचित पुरेसे चित्रपट स्पर्धेमधे भाग घ्यायला ऊतरत देखील नसतील! आणि हे सत्य पचविणे सगळ्यांनाच कठिण जाईल. असे असले तर तक्रार करणा-या मंडळींच्या गा-हाण्यातली हवाच निघुन जाईल. म्हणजे ही शक्यता नाकारता येणार नाही. निवडसमितीची भुमिका अशीही असण्याची शक्यता आहे की समजा १०० चित्रपट पारितोषिकासाठी सादर केले आणि त्यातले ८० पांढ-या लोकांनी तयार केले आणि ऊरलेले अ-पांढ-यांनी वा इतरांनी केलेले असले तर त्या प्रमाणातच फायनल रिझल्ट येईल, तेथे डिस्क्रीमिशनचा प्रश्नच कुठे येतोय? शिवाय डायरेक्ट निवडसमितीकडे जाऊन मांजराच्या गळ्यांत घंटा कोण बांधणार?  निवडसमिती ही अशाच मंडळींची तयार केली आहे की ते हा सर्व प्रकार बिझिनेस म्हणुन पाहात आहेत आणि कोणत्याही ईमोशनल प्रेशरची ते फारशी दखल घेणार नाहीत.



शेवटी चित्रपट निर्मिती ही केवळ कलेसाठी कला म्हणुन नव्हे तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती नफा मिळतो आहे, आणि तो वापरुन तुम्ही सरकारला किती टॅक्स देऊ शकणार आहात, मिळालेल्या नफ्यातुन अजुन किती अधिक चित्रपट निर्मिती करणार आहात आणि हा धंदा बरकतीला आणणार आहांत हेही महत्वाचे आहेच ना!


या वर्षी ऑस्कर्सचे अधिकारी एका डझनाच्यावर काळे कलाकार प्रेझेंटर्स आणणार आहेत. शिवाय अ-पांढरे प्रेझेंटर्समधे आपल्या भारताची प्रियांका चोप्रा देखील आहे. एक काळा कलाकारच Chris Rock या समारंभाचे यजमानपद गेली अनेक वर्षे करतो आहे.

Image result for oscars 2016

ऑस्करसारख्या एका कलेच्या देवळांत आमचा देव काळा आणि तुमचा देव पांढरा असा वाद न घालतां त्या देवांची पुजा बांधण्याची संधि मिळणे हे  जास्त महत्वाचे असावे. म्हणुनच रंगांच्या पलीकडे विरोधकांची दृष्टी असणे ही निदान या वर्षीच्या समारंभाची गरज आहे

शेवटी फक्त एकच की धंदा आणि कला यांची सांगड घालणे भल्याभल्यांना जमले नाही! आज हॉलीवूड देखील त्याच ऊंबरठ्यांत अडकले आहे हे मात्र खरे!

 

शशिकांत पानट

------------------------------------------------------------------------------

सर्व छायाचित्रे गुगल ईमेजेसच्या सौजन्याने . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: