पूर्वीच्या काळी जैविक/सेंद्रिय अन्न धान्य अस वेगळ काहीच नव्हते कारण सर्व काही उत्पादित अन्न हे जैविक / सेंद्रियच होते. परन्तु सध्याच्या परिस्थितीत हे आवशक झाले कि आपणास जैविक /सेंद्रिय अन्न म्हणजे काय हे जाणून घेण्याची. हें किती आवशक आहे आपल्या आरोग्यासाठी आणि हें सेंद्रिय ( Organic ) कुठे मिळेल.
सेंद्रिय अन्न म्हणजें ते होय जें उत्पादित करण्यासाठी काहीं बाबींची पुरता करावी लागते
१) सुपीक जमीन
२) ईतर रासायनिक शेती करण्यात येते अशा जमिनी पासुन वेगळे असलेले.
३) असे अन्न उत्पादिताना ,कृत्रिम पेस्टी साइड्स , रासायनिक खते,किवां पेट्रोलियम जन्य खते वापरली जाऊ नये.
४) कुठल्याही प्रकारचे रासायनिक औषधे जी अधिक उत्पादन घेण्यासाठी वापरू नये.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय अन्न हें रासायनिक उत्पादित अन्ना पेक्षा महाग असते तरी पण रासायनिक खते वापरून भरघोस उत्पादित अन्ना पेक्षा सेंद्रिय अन्न हें शतपटीने आपल्या आरोग्यास
चांगले असते.
परवाच आमिरखान यांच्या " सत्यमेव जयते " ह्या कार्यक्रमा द्वारे आपण सर्वांनी बघितले कि रासायनिक खतामुळे किती आपल्या शरीराचे नुकसान होतें. ती आकडेवारी व रोगांची संख्या बघता तर असे वाटते कि आपण कोणतेही अन्न खाऊच नये पण जिवन जगण्यासाठी अन्न ही एक आवशक गोष्ट आहे तेव्हां सेंद्रिय अन्न हेचं त्यासं पर्याय आहे.
आमच्या माहिती प्रमाणे सर्वात जास्त धोका हा रासायनिक पद्धतीने उत्पादित फळे आणि भाज्या होत. भाज्या आणि फळे ही जी रासायनिक खतावर व औषधी फवारणी केलेली असतात आणि आपल्या आरोग्याला फार घातत्क व अपायकारक आहेत तेव्हां ही फळे व भाजीपाला फक्त सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेलेच सेवन केल्यास आपण आपले आरोग्य टिकवू शकू.
फळे ..............................
------------------------------ --------------------------
Apple - सफरचंद.
Bellpaper - सिमला मिरची
Peaches --- पीच Carrots - गाजर
Pears - पेअर्स
Strawbery- स्ट्राबेरी
Cherries - चेरीज
Mango - अंबा
Grapes - द्राक्षे ( इम्पोर्टेड )
अशा प्रकारची सर्व फळे व भाज्या ज्या रासायनिक खतावर उत्पादित आहेत ते वापरण्या पेक्षा सेंद्रिय पद्धतीने उत्पादितच वापरावे म्हणजे आपल्या आरोग्यास बाधक होणार नाहीत .
अशी सेंद्रिय उत्पादित अन्न सेवन केल्याने बरेच फायदे आहेत. हें अन्न भरपूर पौष्टिक असते आणि शरीरास आवशक असलेली सर्व प्रकारची घटके पुरविते तसेंच ह्यामुळे कोठल्याही प्रकारची अलर्जी जी रसायनीक किवां प्रिझरवेटिव वापरलेली पेक्षा सुरक्षित अन्न आहे. सेंद्रिय अन्न सेवन केल्यामुळे ह्या कोणतेही रोग होणार नाहीत.
सेंद्रिय अन्नामध्ये काहीं प्रमाणात किंवा नगण्य रासायनिक खतांचा उपयोग केला जातो म्हणून हें लहान मुलांच्या वाढीस तसेंच त्याची प्रतिकार शक्ती वाढवते. शरीराची वाढ,सतेज बुद्धी व असे आजार जें मुलांमध्ये अपंगत्व किवां मातीमंदिता आणतात ह्या पासुन रक्षण होतें. गरोदर असणाऱ्या स्त्रिया रासायनिक पदार्थ सेवन करतील तर ते गर्भाला पण हानिकारक होईल सेंद्रिय अन्न सेवन केल्यामुळे गर्भाची चांगली वाढ होईल तसेंच कोणतेही मुल संपूर्ण स्वस्थ जन्मेल
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न नेहमी स्वच्छ व आरोग्य वर्धक असतात. सेंद्रिय शेतीमुळे बरेच फायदे पण आहेत जसें जमिनीची धूप कमी होतें, पाण्याचा जमिनी खालचा साठा वाढीस मदत होतें, नापीक जमीन सुपीक होण्यास मदत होतें, तसेंच जमीन फाटणे अधिक प्रमाणात उर्जा ह्या सारख्या बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो.
आपल्या माहितीत आहे कि स्थानिक शेतकरी किवां फळबागवाले ह्यांच्या कडील वस्तू ( माल ) हा नेहमी बाजारातील माला पेक्षा उच्च दरज्याचा असतो कारण तो सेंद्रिय पद्धतीने उत्पादित असतो. खरें तर जर सर्वांनी स्थानिक शेतकऱ्या कडून सरळ विकत घेतले तर पैसा त्यानां मिळेल व त्यां अनुशंघाने त्यां भागाची आर्थिक प्रगती पण होईल.
रासायनिक प्रक्रियेतून उत्पादित अन्न साठविण्यासाठी त्याच्या कच्चेपणातच विकत घेतले जातात व वेळ प्रसंगी त्यावर रासायनिक प्रक्रिया करून माल बाजारात विक्रीसाठी आणला जातो तो माल शरीरास अत्यंत घातक असेल.
सध्या बाजारात सेंद्रिय खतावर केलेल्या शेत मालावर " सेंद्रिय " ( ओर्ग्यानिक ) प्रमाणपत्र आपणास दिसून येईल तोच माल विकत घ्यावा आणि सर्व रोगा पासुन मुक्तीचा मार्ग अवलंबवावा. हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे असा सेंद्रिय माल घ्यावा कि रासायनिक प्रेक्रीयेचा जो आरोग्यास घातक ठरेल
विचार करा कश्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित वस्तू आपल्या आरोग्यासाठी किती आवशक आहे.
========================================
छाया चित्रे गुगलच्या सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा