US लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
US लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

२०१६-ऑस्कर पारितोषिक वितरण सोहोळा पांढरा की रंगीबेरंगी?



ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स ॲन्ड सायन्स (AMPAS) या संस्थेने १९२७ आणि १९२८ या वर्षी तयार झालेले चित्रपट हिशेबांत घेऊन १६ मे १९२९ या दिवशी पहिला पारितोषिक सोहोळा सुप्रसिद्ध हॉलीवूड रूझवेल्ट या हॉटेलमधे साजरा केला.  ह्या सुरुवातीच्या खाजगी समारंभाला फक्त २७० पाहुणे ऊपस्थित होते. तेव्हांपासुन ते आजतागायत ऑस्कर पारितोषिक मिळविणे हे चित्रपट कलावंतांना नोबेल पारितोषिक मिळविण्या इतकेच महत्वाचे, समाधान मिळऊन देणारे व विषेश मानसन्मान मिळऊन देणारे ठरले आहे.

 जशी जशी वर्षे ऊलटली तशी ऑस्कर पारितोषिके मिळविण्याची जिद्द वाढीलाच लागली. हे पारितोषिक म्हणजे चित्रपट कलेच्या क्षेत्रामधला  सर्वोच्च सन्मान समजला गेला. गेल्या जवळ जवळ ८० च्या वर वर्षांत  पारितोषिकाचा कसही बदलत गेला. तो जास्त कडक आणि शिस्तिचा झाला. हळुहळु त्यामधे परदेशी चित्रपटांचा अंत:र्भावही करण्यात आला. ऑस्करच्या तोडीचा अनुभव असलेल्या कलावंतांची बिदागी इतरांच्या मानाने जास्त मिळु लागली. हा समारंभ म्हणजे ऑलिंपीक विजेत्या खेळाडुंसारखाच मोठ्या थाटामाटाने होऊ लागला. चित्रपट क्षेत्रामधला मानाचा तुरा असा सिद्ध झाला.


तसे आतांपर्यंत सुरळीतच चालले होते. मात्र या वर्षी त्याला थोडे गालबोट लागते आहे! या वर्षी त्याला रंग फासला गेला आहे. हा समारंभ विशेषकरुन केवळ पांढ-या कलाकारांनाच न्याय देतो, आणि शिवाय तेही पुरूष कलाकारच. स्त्री कलाकारांना, विशेषकरुन काळ्या स्त्री कलाकारांना ही पारितोषिके हव्या त्या प्रमाणांत मिळत नाहीत असा आरोप ॲकेडमीवर केला गेला आहे. 

Image result for oscars 2016 stage


Image result for oscars 2016 boycott


त्यामधील सत्यासत्यतेची जाण व्हायच्या आंतच कांही काळ्या सुपरस्टार्सनी या वर्षी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णयही घेऊन टाकला आहे. ही नांवे हॉलीवूडमधली गाजलेली, पुर्वी ऑस्कर पारितोषिके मिळविलेली असल्याने तर त्यांचे बोलणे मनावर घेऊन अकादमीने Corrective Actionsसाठी पाऊल ऊचलेलेही आहे. हॉलीवूडनगरी आणि त्यामधे चालत असलेला हा Business किती fast pace operation आहे हेही त्यामुळे सा-या जगाला कळले.


२८ फ़ेबृवारीस हॉलीवूडमधे होणा-या या समारंभाची माहिती, आंकडेवारी या लेखाच्या निमित्ताने रसिकांपर्यंत पोहोचवावी हा या लेखनाचा ऊद्देश आहे. अकादमीवर होणारे आरोप खरे की खोटे, ह्या चर्चेपासुन अलिप्त राहुन केवळ समारंभाच्या पार्श्वभुमीबद्दल चर्चा करणे हा आणि केवळ हाच हेतु आहे! त्यामुळे माझे व्यक्तीगत मतप्रदर्शन मी केवळ खाजगी बैठकीपुरतेच मर्यादित ठेवणार आहे. ऊद्देश असा की जाणकरांनी त्यांचे स्वत:चे मत तयार करावे. असो

अकादमी आता ८९ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. गेल्या ८९ वर्षांत खाजगी समारंभापासुन सुरु केलेली ही गंगोत्री आता एका विशाल सागरासारखीच रुंदावली आहे. त्यामुळे भरपुर अनुभव गांठीला बांधुन आणि कोणते चित्रपट पारितोषिकासाठी स्पर्धेत आलेले आहेत ते हिशेबांत घेऊनच आतापर्यंतचे नियम केलेले आहेत, आणि कालानुसार त्यामधे योग्य ते बदलही केले गेले आहेत. मग याच वर्षी असा मुद्दा का आणला जातो आहे हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. असो


वास्तविक पाहाता ४ वर्षांपुर्वीच म्हणजे २०१२ पासुन अकादमीने जास्तीत  जास्त स्त्रि-कलाकार आणि मायनारिटी ग्रूप यांना ऊत्तेजन देण्यासाठी कांही अमुलाग्र बदल करायला सुरुवात देखील केलेली आहे. सध्या ज्या कलाकारांना आयुष्यभर मतदानाचा अधिकार दिला आहे ती संख्या ६२६१ आहे. मात्र सगळे लोक मतदानाचा अधिकार बजावतातच असे नाही! सध्या जो आरोप अकादमीवर केला जातो आहे त्यावर ऊपाय म्हणुन त्यांनी तांतडीची बैठक घेऊन खालील निर्णय घेतले आहेत.


१. ज्या ज्या मतदान अधिकार मिळालेल्या कलाकारांनी गेल्या कांही वर्षांत मतदानाचा हक्कच बजावला नाही त्यांचा अधिकार अकादमी ताबडतोब काढुन घेईल.

२. त्यांची रिप्लेसमेंट करतांना शक्यतोवर काळ्या स्त्री कलाकार आणि मायनारिटी कलाकार (काळे, एशियन, स्पॅनिश वगैरे) ह्यांना संधि दिली जाईल.

३. आणि हे करतांना आजपासुन ते २०२० पर्यंत म्हणजे पुढच्या केवळ ४ वर्षांत सध्या असलेल्या काळ्या कलाकारांची, स्त्री काळ्या कलाकारांची संख्या दुपटीवर नेण्यात येईल.


अकादमीने ऊचललेले हे पाऊल खुपच आक्रमक असे आहे. कलाकारांच्या तक्रारीला न्याय देण्यासाठी कंबर कसुन कामाला लागल्याचे चिन्ह आहे.

सध्या अकादमीमधे १५०० स्त्री कलाकार आहेत. आणि ५३५ अ-पांढरे आहेत. आता ही संख्या पुढील चार वर्षांत दुप्प्ट करायची असेल तर २०२० या वर्षी स्त्री कलाकारांची संख्या ३००० आणि अ-पांढरे कलाकार-संख्या १०७० होईल. याचाच अर्थ असा की पुढील चार वर्षांत प्रत्येक वर्षी ही संख्या अनुक्रमे ३७५ आणि १३३ ने वाढवावी लागेल. अकादमीच्या कसाला ऊतरणारे इतके Qualified कलाकार ऊपलब्ध आहेत कां? आणि समजा-फक्त समजा की त्यांच्या कसाला ऊतरणारी ही एव्हढी कलाकार मंडळी मिळाली नाही तर? तर केवळ हे ऊद्दिष्ट पुर्ण करण्यासाथी कसाची क्वालिटी कमी करणार की काय? याचाच अर्थ असा की २०२० ला जी संख्या तयार होईल त्यामध्ये सर्व योग्य कलाकार असतील? या निर्णयाचे दूरवरचे परिणाम किती धोकादायक असतील हे नव्याने सांगायला नकोच! अकादमीचे सध्याचे नियम हे खुप Stringent आहेत. त्या मधे बसणारे कलाकार मिळाले नाहीत तर ऑस्करच्या मुळ संकल्पनेची किती वाट लागेल हे सांगायला भविष्य संगणा-राची गरज नाही! ह्याच अकादमीचे माजी अध्यक्ष Hawk Koch ह्यांनी अनुभवाचे बोल एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलेही आहेत. ते म्हणाले की, "सध्याच्याच कठिण नियमांत कलाकार बसत नाहीत. कारण पुरेसे चांगले कलाकारच नाहीत! मग अकादमीचे मंडळ आणणार आहेत कुठुन १५०० नविन स्त्री कलाकार आणि ५३५ अ-पांढरे कलाकार? आणि ते ही पुढच्या चार वर्षांत? आणि मग ही संख्या केवळ जाहीर केली आहे म्हणुन पुर्ण करण्यासाठी नियम शिथिल करणे हेच करावे लागेल ह्यांना! मग क्वालिटीचे काय? थोडक्यांत म्हणजे केवळ संख्या पुर्ण करण्यासाठी ती Quality शी केलेली तडजोड असेल.




परंतु विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या सर्व गोष्टींसाठी अकादमी खरोखरीच जबाबदार आहे कां? अकादमीकडे जे चित्रपट निवडीसाठी म्हणुन आणले जातात वा ठेवले जातात त्यांतुनच ते पारितोषिकासाठी कलाकार निवडणार ना! आख्या अमेरिकेतुन शेकडो चित्रपट ऑस्करसाठी पाठविले जातात. त्यामधुन वस्त्रगाळ करुन निवडसमिती कांही मोजकेच चित्रपट अकादमीकडे पाठविते. आणि केवळ त्यामधुनच अकादमीला ~स्करसाठी चित्रपट आणि त्यामधले कलाकार निवडायची संधि असते. निवडसमिती कोणते चित्रपट वस्त्रगाळ करुन पाठविते त्यावर अकादमीला कांहीच अधिकार नाहीत. त्यांनी फक्त समोर आलेल्या कलाकृतींमधुनच निवड करायची असते. निवडसमितीकडे रंगी बेरंगी कलाकारांचे अथवा मायनारिटींनी कामे केलेले चित्रपट पुरेसे येतात का? समजा ते पुरेसे येतच नसले तर? म्हणजे खर तर गा-हाणे मांडायचेच असेल तर वा तक्रार करायचीच असेल तर ती जी निवडसमिती सुरुवातीस त्यांना अभिप्रेत असलेला कस (Criteria) लाऊन चित्रपटांची निवड करतात त्यांच्याकडे करायला हवी नाही का? आणी तक्रार करणा-या मंडळींना हे माहित नाही असेही नाही! मग ते अकादमीस कां छळताहेत? हे सारे महित असतांना ते डायरेक्ट निवडसमितीकडे कां जात नाहीत? निवडसमितीकडे तक्रार करणे हे त्यांना सहज शक्य आहे पण ते करीत नाही! त्याला अर्थात अनेक कारणे आहेत. एकतर ते त्यांना परवडणारे नसावे! कारण शेवटी निवडसमितीच  ठरविणार की पुढे कोणते चित्रपट निवडायचे! म्हणजे त्यांना दुखऊन चालणार नाही. शिवाय तक्रार केली तरी निवडसमिती इतकी बहाद्दर आहे की ती त्याकडे फारसे लक्ष देणार नाही. कदाचित पुरेसे चित्रपट स्पर्धेमधे भाग घ्यायला ऊतरत देखील नसतील! आणि हे सत्य पचविणे सगळ्यांनाच कठिण जाईल. असे असले तर तक्रार करणा-या मंडळींच्या गा-हाण्यातली हवाच निघुन जाईल. म्हणजे ही शक्यता नाकारता येणार नाही. निवडसमितीची भुमिका अशीही असण्याची शक्यता आहे की समजा १०० चित्रपट पारितोषिकासाठी सादर केले आणि त्यातले ८० पांढ-या लोकांनी तयार केले आणि ऊरलेले अ-पांढ-यांनी वा इतरांनी केलेले असले तर त्या प्रमाणातच फायनल रिझल्ट येईल, तेथे डिस्क्रीमिशनचा प्रश्नच कुठे येतोय? शिवाय डायरेक्ट निवडसमितीकडे जाऊन मांजराच्या गळ्यांत घंटा कोण बांधणार?  निवडसमिती ही अशाच मंडळींची तयार केली आहे की ते हा सर्व प्रकार बिझिनेस म्हणुन पाहात आहेत आणि कोणत्याही ईमोशनल प्रेशरची ते फारशी दखल घेणार नाहीत.



शेवटी चित्रपट निर्मिती ही केवळ कलेसाठी कला म्हणुन नव्हे तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती नफा मिळतो आहे, आणि तो वापरुन तुम्ही सरकारला किती टॅक्स देऊ शकणार आहात, मिळालेल्या नफ्यातुन अजुन किती अधिक चित्रपट निर्मिती करणार आहात आणि हा धंदा बरकतीला आणणार आहांत हेही महत्वाचे आहेच ना!


या वर्षी ऑस्कर्सचे अधिकारी एका डझनाच्यावर काळे कलाकार प्रेझेंटर्स आणणार आहेत. शिवाय अ-पांढरे प्रेझेंटर्समधे आपल्या भारताची प्रियांका चोप्रा देखील आहे. एक काळा कलाकारच Chris Rock या समारंभाचे यजमानपद गेली अनेक वर्षे करतो आहे.

Image result for oscars 2016

ऑस्करसारख्या एका कलेच्या देवळांत आमचा देव काळा आणि तुमचा देव पांढरा असा वाद न घालतां त्या देवांची पुजा बांधण्याची संधि मिळणे हे  जास्त महत्वाचे असावे. म्हणुनच रंगांच्या पलीकडे विरोधकांची दृष्टी असणे ही निदान या वर्षीच्या समारंभाची गरज आहे

शेवटी फक्त एकच की धंदा आणि कला यांची सांगड घालणे भल्याभल्यांना जमले नाही! आज हॉलीवूड देखील त्याच ऊंबरठ्यांत अडकले आहे हे मात्र खरे!

 

शशिकांत पानट

------------------------------------------------------------------------------

सर्व छायाचित्रे गुगल ईमेजेसच्या सौजन्याने . 

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

सच्ची कहाणी डॉलर विरुद्ध रुपया.........








अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या  भावाशी निगडीत ठेवली आहे. कारण त्यांना कळले कि सोने आणि पेट्रोल ची किमत सारखीच आहे म्हणून त्यांनी मिडिल इस्ट मधील देशा सोबत एक करारनामा केला आणि त्यामुळे  ते लोक पेट्रोल डॉलर मध्येच  विकतात.

 ह्याच कारणाने त्यांच्या डॉलरवर छापलेले असते " this note is legal tender of all debts  pablic and privete " ह्याचा अर्थ जर का  तुम्ही  डॉलरच्या किमती  बदल्यात सोने मागितले तर त्यांचे गव्हर्नर देणार नाहीत . ह्या उलट भारत सरकाचा रुपया म्हणतो "  ” I promise to pay the bearer ......' असे नोटेवर छापलेले असते आणि खाली रिझर्व ब्यांकेच्या गव्हर्नरची सही आहे. याचा अर्थ जर तुम्ही रुपयाच्या किमती बदल्यात सोने घेवू शकता असा होतो .

डॉलरचा रेट खाली आणू शकू जर भारतीयांनी एक आठवडा आपली वाहने रस्त्यावर आणली
 नाहीत तर होणार्या पेट्रोल बचती मु ळे  डॉलरची किमत कमी होईल हे सत्य आहे कारण डॉलरची किमत   पेट्रोलशी  निगडीत आहे आणि  ह्यालाच  म्हणतात " Derivative Trading."


आता आपण उदाहरण  बघू या. आपला देश जेव्हा मिडिल इस्ट देशाकडे पेट्रोल विकत घेण्यासाठी जातो तेव्हा ते फक्त डॉलरच्या बदली पेट्रोल विकतात. समजा आपल्याकडे डॉलरची गंगाजळी पुरेशी नाही तेव्हा नाईलाजाने आपणास अमेरिकेकडे डॉलरची मागणी करावी लागते .ते जेव्हडे  डॉलर देतात त्या बदली आपण आपले रुपये देतो म्हणजेच तेवढ्या किमतीचे सोने नाही का ? पण गमत अशी आहे कि जर आपले मन बदलले आणि अमेरिकेस डॉलर परत करून आपले सोने घेवू तर ते देणार नाहीत व सांगतील "  Have we promised to return something back to you? Haven’t you checked the Dollar ? We clearly printed on the Dollar that it is Debt” कारण अमेरिकेस त्यांचे डॉलर चलन छापण्यासाठी सोन्याची गरज नाही ते कागदावर छापतात जेव्हा लागेल तसे.
प्रश्न असा उरतो अमेरिका मिडिल इस्ट कडून पेट्रोल डॉलर देवून घेत असेल असे  नाही भारताची खरी गोची अशी आहे कि आपणास डॉलर घ्यावे लागते पेट्रोल साठी म्हणजेच पर्यायाने तेवढ्या किमतीचे सोने देवून .जर भारतीयांनी पेट्रोलचा वापर अगदी जरुरी असेल तरच केला तर डॉलरची किमित निश्चित खाली येईल, 

दुसरा भाग म्हणजे आपल्या देशासाठी आपले उत्तर्दाइत्व   काय आहे ह्याची सर्व जनतेस माहिती  असावे .राजकारणी लोक निर्बुद्ध असल्या प्रमाणे वागत आहेत हे सत्य असले तरी त्यांना निवडून देणारे आपणच आहोत तेव्हा चुकीची दुरुस्ती आपणासच  करावी लागेल .भारताची खालावत जाणारी परिस्थिती सुधारायची असेल तर काही गोष्टी जनतेस कराव्या लागतील.

२००८ मध्ये डॉलरचा भाव रु, ३०-४० होता आता २०१३ तो रु,६३-६५ इतका झाला .ह्यावरून काय दिसते अमेरिकेची इकोनामी सुधारत आहे  नाही उलट आपली रसातळाला जात आहे हे सत्य .

आपल्या देशाची अर्थ व्यवस्था आपल्या हातात आहे जवळ जवळ ३०,००० कोटी रुपये बाहेरील देशात जात आहेत कारण जगभरातून जो माल आपल्या देशात विकला जातो त्यामुळे. परदेशी कंपनी ज्या मालाची इथे विक्री करीत   आहेत  जसे कोक,पेप्सी,पिझा ,बर्गर, सौंदर्य  ब्र्यांड ,सिंगल ब्र्यांड ,मल्टीपल ब्र्यांड वस्तू इत्यादी.जर का भारतीयांनी ठरविले कि ज्या वस्तू इथे मिळतात त्या वस्तू दुसर्या देशाच्या असतील तरी घेणार नाही आणि फक्त भारतीयच घेवू तर २/३ वर्षात आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सौजन्य राधिका  Gr. ह्यांच्या तेलगु लघु लेखावरून …… 

गुरुवार, ४ जुलै, २०१३

.अमेरिकन स्वातंत्र्य दिन ,,,,,,,,,,,,,,,.




अमेरिकन स्वतंत्रता दिवसाच्या सर्व अमेरिकनांना 


                    हार्दिक शुभेच्छा .........!!!



Posted Image Posted Image










४ जुलाई  हा दिवस अमेरिकन आपला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतात. अमेरिकन लोक हा दिवस साजरा करतात कारण ह्या दिवशी म्हणजे ४ जुलाई  १७७६ मध्ये त्यांना ब्रिटीश साम्राज्याकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि युनाईटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आले आणि ह्याच दिवशी resolution of independence . " चा ड्राफ्ट मंजुर करण्यात आला.



अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्राम ( अमेरिकन रेव्हलुशन ) काळांत ग्रेट ब्रिटन साम्राज्यातील तेरा राज्ये जी ब्रिटीशांच्या राजवटीत होत्या ह्या सर्वांचे ब्रिटीश कॉलेनितुन मुक्तता झाली ती जुलै २ तारखेस. ह्याच  दिवशी अमेरिकन Continental  Congress  नी बहुमताने  resolution of independence पारित केला जो  Richard Henry Lee of Virginia  यांनी  प्रस्तावित केला. त्या नंतर काँग्रेसनी Declaration of Independence   ड्राफ्टची तय्यारी केली जी पांच सद्सिय  कमेटीनी बनवली त्या कमेटीचे प्रमुख सदस्य थोमस जेफरसन हे होते. हा ड्राफ्ट कांग्रेस मध्ये चर्चिल गेला आणि त्यांत काही दुरुस्त्या पण करण्यात आल्या आणि फायनल  Declaration of Independence  हा ४ जुलै १७७६ रोजी पारित झाला. 











हा ड्राफ्ट मंजूर होण्याआधी ह्या कमेटीचे एक सदस्य श्री. जॉन अडम्स ह्यांनी आपल्या पत्नीस लिहिले कि जुलाई २ , १७७६ हा दिवस अमेरिकन इतिहासांत सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल व हा दिवस पुढील सर्व अमेरिकन पिढ्या आनंदाने ,उत्साहाने स्वातंत्र्य   दिवस म्हणून साजरा करतील.पण घडले दुसरेच आणि ४ जुलाई हा स्वतंत्रता  दिवस म्हणून साजरा करण्यात येईल कारण त्या दिवशी  Declaration of Independence पारित झाला .



अमेरिकन इतिहासकारांना असे वाटते कि  खरेच अमेरिकन काँग्रेसनी ४ जुलाई रोजी त्या ड्राफ्टवर सह्या केल्यात का ? जरी  थामस जेफरसन जॉन अडम्स आणि बेन्जामिन फ्रांक्लीन ह्यांनी सांगितले कि आम्ही त्याच दिवशी  Declaration of Independence वर  सह्या केलेल्या आहेत. तरी इतिहासकारांना वाटते हे  Declaration of Independence  जवळ जवळ एक महिन्यांनी म्हणजे २  आगस्त १७७६ रोजी सह्या करण्यात आल्या तिथे हा विषय त्यावेळी वादातीत होता.



खरे पहिले असता हा  स्वतंत्रता दिवस स्वतंत्र झाल्या पासून १५  ते २०  वर्षे साजराच केला गेला  नाही  कारण नवीन देशाची उभारणीत सर्व जनता आणि राज्यकर्ते गुंतले होते.१८७० साली जवळ  जवळ १०० वर्षा नंतर काँग्रेसनी अधिकृतरित्या ४ जुलाई  हाच दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे ठरविले . सन १९३९ आणि १९४१ साली कॉंग्रेसने एक लेजीसलेशन पारित केले आणि इतर राष्ट्रीय सुट्ट्या  बरोबरच  ४ जुलाईला सरकारी अधिकृत सुट्टी जाहीर झाली.



तेव्हा पासुन संपूर्ण अमेरिकेत हा राष्ट्रीय स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लोक निरनिराळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करताना दिसतात कोणी फटाक्यांची आतिषबाजीने ,तर  कुणी जुन्या मित्रांना किवा आपल्या नातेवाईकांना भेटुन बारब्याक्यु ,पिकनिक करून साजरा करतात. ह्या दिवशी सरकारकडून भव्य दिव्य फटाक्यांची आतिषबाजी आणि सर्व सरकारी इमारती रोषनाईने उजळून टाकतात. ह्या दिवशी संगीताचे कार्यक्रम आखले जातात. काही लोक बेसबॉलचे सामने भरवुन पण आनंद साजरा करतात.



अमेरिकन स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!   








------------------------------------------------------------------------------------------------------------

हा लघु लेख constitution fact .com ( The Story of the Fourth of July  ) आणि विकेपीडीया ह्यांच्या माहितीच्या आधारे लिहिला.छायाचित्रे गुगलच्या सौजन्याने .