शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

नवीन लेख .......... संध्या आणि गायत्री मंत्र विज्ञान....

                                                                                लेखक…… हेमन्त सहस्रबुद्धे 



मित्रांनो प्राचीन काळी ऋषींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगून, करून ठेवल्या आहेत. आज आपण त्यापैकी गायत्री मंत्र आणि तो "संध्या" करण्या बरोबर का जोडला गेला आहे ते पाहू या....


गायत्री मंत्र आहे १] "तत सवितृ वरेण्यं" ! 
                     २] "भर्गो देवस्य धीमही" ! 
                     ३] "धियो योन: प्रचोदयात" ! 



एव्हढाच ... पुढील सात व्याहृतीन मधील [ व्याहृति म्हणजे एकापेक्षा एक लहान अथवा सूक्ष्म होत जाणारे "लोक" उदा. जसे विष्णुलोक, शिवलोक वगैरे....] 


ओम भू: र्भूव: स्व: मह: जन: तप: सत्यं: पैकी पहिल्या ३ व्याहृतीच आपण दर वेळेस गायत्री मंत्रा बरोबर म्हणावयाच्या असतात. या सातही व्याहृति फक्त पहिल्या वेळेस म्हणावयाच्या असतात. कारण ते अतिशय सूक्ष्म होत जाणारे "लोक" असल्याने आपल्या शरीराला, हृदयाला त्याच्या लहरी त्रासदायक ठरू शकतात.

 हृदयामध्ये - ७० ते ९० Nano Volts एव्हढा विद्युत प्रवाह वाहात असतो. नंतर श्री. ना. या. जोशी, सोबत मी देत असलेल्या मुखपृष्ठाच्या पुस्तकाचे जग प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था "नासा" येथून निवृत्त झालेले लेखक श्री [Dr ] र.प. थत्ते आणि इतर अनेक विद्वान यांचा सखोल अभ्यास आणि श्रीमत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत यात केलेल्या उल्लेखाप्रमाणे गायत्री मंत्र हा सूर्यप्रकाशाचा किरण विभाजित केल्यावर त्याचे जे ३ मुख्य भाग होतात, त्यांचे प्रतिनिधित्व करणारा आहे.


 हे भाग आहेत- १] इन्फ्रा रेड [अवरक्त ] विभाग] यात इन्फ्रा रेड रेज, मायक्रो वेव्ज, रेडीओ वेव्ज हे उप विभाग येतात. 

                     २] विजिबल रेज [ दृश्य पट्टा ] यात रेड, ऑरेंज यलो, ग्रीन. ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायोलेट या सात रंगांचा पट्टा येतो तर यानंतर 
                     ३] अल्ट्रा व्हायोलेट रेज [ अतिनील विभाग यात अल्ट्रा व्हायोलेट रेज, X रेज, Gamma रेज, आणि कॉस्मिक रेज हे उप विभाग येतात. तर हे सगळे स्वन्त्र विभाग असल्याने, त्यांची कार्ये अगदी भिन्न असल्याने "गायत्री मंत्र" म्हणताना तो वर दिलेल्या १,२ आणि ३ क्रमांकाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक दोन क्षण थांबून मग पुढचा भाग अश्या पद्धतीने पश्यंती वाणीतच म्हणजे "मनातच" जप करावयाचा असतो. अन्यथा त्याचंही सरमिसळ झाल्यास अतिशय घातक सिद्ध होऊ शकतो.


तसेच एका विद्वानांच्या म्हणण्या नुसार गायत्री मंत्र ही "4 1H + 2 e --> 4He + 2 neutrinos + 6 photons " या सूर्यावर हायड्रोजन वायूपासून हेलियम, मुक्त Neutrons , Photons आणि उर्जा निर्मितीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे. सध्या माझ्याकडे तो लेख उपलब्ध नाहीये. झाल्यास अवश्य आपल्या पुढे सादर करेन. 



असो. त्यामुळे गायत्री मंत्र हा नुसता "कॅसेट " बनवून ऐकण्याचा मंत्र नाही हे आपल्या नक्की लक्षात आले असेल. तसेच त्याचा उच्चार बरेच जण "तस्य" असा करतात तो तसा नसून "तत सवितुरवरेण्यं" असा करणे आवश्यक आहे. गायत्री मंत्रावर लेडबिटर वगैरे अनेक परदेशी संशोधकांनी अभ्यास करून त्याचे गुण गायले आहेत. सर्वात जास्त स्पंदने निर्माण करणारा मंत्र म्हणून त्याचे कौतुक केले आहे. असा हा गायत्री मंत्र लाल, शुभ्र असा अतिशय तप्त असल्याने त्याला ओम हा फिल्टर लावला जातो. ब्राह्मणांनी ३ वेळा, क्षत्रियांनी २ वेळा आणि विषयांनी १ वेळेस ओम लावावा असे सांगितले आहे.



 गायत्री मंत्राला शाप आहेत. पूर्वी वसिष्ठ, गाथी राज पुत्र विश्वामित्र [नावातच विश्व मैत्री आहे] हे शास्त्रद्न्य ऋषी, विरिंची [शंकर ], या मूळ देवता आणि वरुण ही निसर्ग देवता यांचे शाप आहेत. शाप म्हणजे त्यावर घातलेले बंधन. या मंत्राचा गैर वापर होऊ नये म्हणून या देवतांनी आणि संशोधक ऋषींनी [ज्यांच्या शास्त्र, शस्त्र, अस्त्र, वस्त्र, गात्र [अवयव], पात्र, नेत्र [ बघण्याची उपकरणे], नंतर, मंत्र, यंत्र या जीवन विषयक सर्व अंगांचा अभ्यास करणारया सुसज्ज प्रयोग शाळा होत्या] या गायत्री मंत्राला "बांधून" ठेवले आहे. 



शापोद्धार मंत्राचा उच्चार करून मग गायत्री मंत्राचा जप करावयाचा असतो. तर त्याचे योग्य ते फळ मिळते. तसेच गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर फक्त पहिल्या वेळेस "गायत्री शिरस" म्हणावयाचे असते]. गायत्री मंत्राच्या ध्यान मंत्रात [ मुक्ताविदृम हेम नील धवल छायेर्मुखे स्त्रक्षणेई...र्युक्तामिंदू कलानिबद्ध मुकुताम तत्वार्थ वर्णात्मिकाम... गायत्री वरदा भयान्कुश्कशा शूलं कपालं गुणं... शंखं चक्र मथार विंदयुगुलं हस्तेर्वहन्तिं भजे.... [ हे व्याकरण दृष्ट्यासगळे बरोबर नसू शकते- टायपिंग च्या अडचणीमुळे] सुरवातीला प्रकाश किरणातील रंगान्बाबत सांगून नंतर आकाशातील गदा, शंख, चक्र अशा वेगवेगळ्या आकाराच्या आकाश गंगान बद्दल वर्णन आहे, की जे आकार आपल्या माता भगिनी सकाळी रांगोळी काढताना काढत असतात. अर्थात ऋषींनी आपल्याला या नक्षत्रे, आकाशगंगा, एव्हढेच काय सारा खगोल जाणून घ्या असे तर सांगितलेच आणि त्यांच्या एव्हढे "व्यापक" विशाल होण्यासही सांगितले आहे....


गायत्री जपा आधी २४ मुद्रा केल्या जातात. मुद्रांबाबत स्वतंत्र चर्चा करेन. आणि संध्या सुद्धा केली जाते. ती फक्त ब्राह्मणानीच करावयाची असे अजिबात नाही. गायत्री मंत्र हा अतिशय शक्तिशाली असल्याने तो पेलण्याची शक्ती यावी म्हणून आणि हात, कान, डोळे, पाय, जीभ आणि सारी सारी गात्रे म्हणजे अवयव सोनाराच्या तराजू प्रमाणे "अलाईन्ड" किंवा बरोबर लावलेले किंवा adjust केलेले अतिशय शक्तिमान होतात. 



संध्या म्हणजे दिवस आणि रात्र, उजेड आणि अंधार यांच्या संधीकालात केलेली उपासना. श्री थत्ते [नासा] यांच्या म्हणण्यानुसार सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या थोडा काल आधी "उत्तरेकडे" मुख करून उपासना केल्याने आपली उपासना फोटोत दाखवल्या प्रमाणे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा कोणताही अडथळा न येता सरळ आपल्या आकाश गंगेच्या मुळाशी म्हणजे "मूळ नक्षत्रात" पोहोचते. आणि हेच ते कारण आहे "संध्या वंदनाचे".


गायत्री उपासना ही फक्त सूर्याची उपासना नसून ती "सविता" म्हणजे "सृष्टीला जन्म देणाऱ्या" देवतेची, "गायत्री छंदातील" उपासना असल्याने दुपारी बारा ते जवळपास सव्वा पाच हा कालावधी वगळता कधीही केलेली चालते, अर्थात प्रत्येक वेळेच्या उपासनेचे लाभ आणि त्यांचा काल हा वेगवेगळा असू शकतो. 



असो. संध्येसाठी आणि हिंदू धर्मात इतर सर्व धार्मिक विधींसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी "तांब्या पितळेची" भांडी वापरली जातात. कारण आधुनिक संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की सोने, चांदी, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी ठेवले तर ते ग्राम + ve , ग्राम - ve आणि सर्व प्रकारच्या उदा, इ कोलाय वगैरे जंतूंचा नाश होतो. यामध्ये या विशिष्ठ धातूंमुळे पाण्यातील आयन्स मुक्त होऊन ते पाण्यातील जानुन्चा नायनाट करतात. या क्रियेला विदेशी लोकांच्या "शास्त्रीय" भाषेत "ओलीगो डायनामिक इफेक्ट" असे जड नाव आहे. ते वाचले की मग खरच पाणी शुद्ध झाल्यासारखे वाटते म्हणून दिले आहे. आता संध्येतील महत्वाचे विधी, त्यांचे अर्थ आणि उपयोग हे थोडक्यात पाहू...त्यातील मात्र वगैरे भाग तुम्ही संध्येच्या बाजारात मिळणाऱ्या पुस्तकात वाचू शकता.


१] संकल्प- यात आपण संध्यावंदन का करीत आहोत यासाठी संकल्प सोडावयाचा असतो. "संकल्प" का? तर आपल्या मनात नेहमी सतत आपण पुढे काय करणार आहोत याची "चित्रे तयार होत असतात. नंतर आपण ते कार्य करतो. सवयीने आपल्याला असे होत आहे हे आता जाणवेनासे झालेले आहे. पण जर मनात विकल्प आला तर आधीचे संकल्प चित्र पुसले जाऊन कामात विघ्न येते. म्हणून प्रतिदिन संकल्प करून निश्चयाला दृढ करावयाचे.

2] मार्जन - यात मार्जनाचे मंत्र म्हणून पाळीतील पाणी मस्तकावर शिंपडायचे असते. याने आपण स्वत:ची शरीर आणि मनाची शुद्धी करत असतो. 

३] अघमर्षण - यामध्ये मंत्र म्हणून पळीभर पाणी उजव्या हातात धरून नंतर त्यात उजव्या नाकपुडीने श्वास जोरात सोडून ते पाणी डावीकडे टाकायचे असते. हे केल्याने श्वासातील, मनातील सर्व घाण बाहेर टाकली जाते. डावीकडे टाकणे म्हणजे ही प्रक्रिया नाश करण्यासाठी करणे होय. आसन विधी आणि न्यास यामध्ये आपली आसनाची म्हणजे बैठकीची शुद्धी आणि न्यासामध्ये शरीरावर देवतांना धारण केले जाते. याबाबत सविस्तर पुन्हा कधीतरी. 



यानंतर गायत्री ध्यान, गायत्री जप करावयाचा. यामध्ये हृदयावलभ्भन हा अतिशय आवश्यक विधी आहे. याचेही स्वतंत्र मंत्र आहेत. या विधीमुळे गायत्री जपाला सहन करण्यासाठी कोमल, नाजूक हृदयाला तयार करणे हाच आहे. तसेच हृदयाचे तापमान सुद्धा नियंत्रीत करण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर दिशावंदन, प्रदक्षिणा, न्यास विसर्जन आणि ईश्वरार्पण असे विधी होऊन संध्या संपते. वेगवेगळ्या शाखांची थोडी थोडी वेगवेगळी मंत्र उच्चारण पद्धत, संध्या पद्धत आहे. त्यात आपल्याला जायचे नाहीये. या सर्व संध्या विधींना कोणी "कर्म कांड" म्हणून त्याची चेष्टा करत असेल तर त्या विद्वानांबद्दल म्या पामर काय बोलणार?


गायत्री जपाचा संबंध गायत्री मधील २४ अक्षरान प्रमाणे शरीरातील २३ गुणसूत्रांच्या जोड्या आणि चोविसावे मन याच्याशी आहे. शरीरातील पेशिंबरोबर आहे. शरीरातील ७ चक्रांबरोबर आहे. की ज्या सात चक्रांना आपापले रंग, गुण आणि कार्ये आहेत. श्वासा बरोबर आहे. गायत्री जप करताना श्वासामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. तो एक वेगळाच विषय आहे. मेंदूशी, हृदयाशी अगदी शरीराच्या प्रत्येक अवयवा बरोबत गायत्री संबंधित आहे. तो विषय घेऊन पुन्हा भेटेन....जाता जाता एक सांगायचे म्हणजे प्रत्येक देवतेचे स्वतंत्र गायत्री मंत्र आहेत. 



आपण अथर्वशीर्षा मध्ये किंवा गणेशाची स्तुती करताना जे "एकदन्ताय विद्महे ! वक्रतुंडाय धीमही ! तन्नो दंती प्रचोदयात ! असे जे म्हणतो तो गणेश गायत्री मंत्र आहे. इतर देवतांचे गायत्री पुन्हा कधीतरी देईन. सोबत गायत्री जप आणि विषयाशी इतर असे ५-६ फोटो देण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे मी आत्ताच लिहिलेली गायत्रीची प्रार्थना, आरती देतो आहे. 


गायत्री देवी तू अससी त्रिशक्ती,
भक्तांना देसी तू दु:खातून मुक्ती......
जय देवी जय देवी गायत्री देवी ...
जय जय मंगल वदने, मुनिजन वंदिती.....!! धृ !! जय देवी जय देवी....
पंचमुखे धारण करुनी अवतरली,
अष्टायुध हातात, घेउनी सज्जली,
पापांची राशीही सत्वरी नाशिली,
तुझ्या तेजाच्या पूजाव्या ज्योती..............!! १ !! जय देवी जय देवी....
कमलासनी बैसुनी, माता गायत्री,
काली, लक्ष्मी, शारदा, कैवल्यदात्री,
भरते आनंद ती मनुजाच्या गात्री,
असा ठेवा आला साधका हाती...............!! २ !! जय देवी जय देवी....
अष्ट सिद्धी, नवनिधी मिळतील,
हर्षाच्या लहरी हृदयी उठतील,
ह्रीं, श्रीं, क्लीं मंत्र सिद्ध होतील,
संसार सुखाचा, जमतील नाती,,,,,,,,,,,,!! जय देवी जय देवी......
महिमा वर्णाया थकले त्रिवेद,
अंतरी घुमू दे अनाहत नाद,
पोचेल देवाला भक्ताची साद,
कलादास गायत्री चरणांची माती..........!! ३ !! जय देवी जय देवी....



कवी Dr हेमंत उर्फ कलादास .......


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: