बाबरी मस्जिद. आणि राम जन्भूमी
बाबरी मस्जिद.
ही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.
अलहाबाद हाईकोर्टाच्या निकाला वर स्थगिती व पूर्वीची " जैसे थे वैसे " स्थिती ठेवण्याची आर्डर दिली .
आपणा समोर संपूर्ण राम जन्मभूमी ( अयोध्या ) संधर्भात संक्षिप्त घटना क्रम ठेवावे जेणे करून
विस्मृतीत गेलेल्या घटना पुन्हा एकदा लक्षात राहाव्या या साठी हा प्रपंच.
१) सन १५२८ :---
मुगल बादशहाच्या दरबारातील एक उच्च पदस्त दरबारी मीर बाक्वी यांनी ज्या स्थळी मस्जिद बांधिले त्या वर हिंदू समाजानी ती जागा श्री राम जन्मभूमी असल्याचा दावा केला होता आणि हा प्रश्न ब्रिटीश साम्राज्यात पण असाच चिघळत ठेवला.
२) सन १९४९ :---
ह्या वर्षी बाबरी मस्जिद मध्ये श्री रामाच्या मूर्ती सापडल्या. मुस्लीम समाजास वाटले कि ह्या मूर्ती हिंदू समाजाने ठेविल्या त्या वरून दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण झाले. दोन्ही समाजातील बांधवानी आंदोलने केली व तंटा न्यायालयात गेला. प्रतेक समाजाने आप आपले म्हणणे न्यायाधीशा समोर मांडले. श्री महंत परमहंस रामचंद्र दास हें हिंदुच्या वतीने तर हाशीम अंसारी हें मुस्लीम समाजाकडून आपले म्हणणे कोर्टात दाखल केले. कोर्टाने ही जागा विवादित घोषित करून सील केले.
३) सन १९५० :---
श्री महंत परमहंस रामचंद्र दास आणि श्री गोपाल सिंग विशारद यांनी फैजाबाद कोर्टात आर्ज केला कि स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा करण्यास परवानगी मिळावी. कोर्टाने पूजा करण्याची परवानगी दिली पण आतील भागाचे गेट्स बंद करून त्यांत प्रवेश बंदी घातली.
४) सन १९५९ :---
महंत रघुनाथ आणि निर्मोही आखाडा संयुक्त पणे कोर्टात अर्ज केला कि त्यांना पण पूजा करण्याची परवानगी मिळावी.
५) सन १९६१ :---
सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्ड ,उत्तर प्रदेश नी एका प्रतिज्ञा पत्रा द्वारे विवादित मस्जिद व त्याचा आजू बाजूचा परिसर " मुस्लीम दफन भूमि " होती असा दावा केला.
६) सन १९८४ :---
विश्व हिंदू परिषद ( व्ही. यच. पी . ) नी एक ग्रुप " राम जन्मभूमि " स्थापन केला व जन आंदोलन केले. ह्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा चे जेष्ठ नेते श्री लाल कृष्ण आडवाणी यांच्या कडे सोपविण्यात आले.
७) सन १९६८ ( फेब्रुवरी ) :---
फैजाबाद जिल्हा सत्र न्यायाधीशाच्या आदेशां प्रमाणे विवा दित जागेतल्या आंतरिक गेट्स उघडण्याचे व हिंदूस पूजा करण्याची परवानगी चे ओर्डेर्स काढले. ह्या काळातच " बाबरी मस्जिद एक्शन कमेटी " स्थापन झाली.
८) सन १९८९ :---
श्री राजीव गांधी तेव्हाचे पंत प्रधान यांनी अविवादीत जागेवर " शिलान्यास " करण्याची परवानगी दिली. आणि त्याच वेळी हा बाबरी वाद जिल्हा सत्र न्यालायातून हायकोर्टात पाठविण्यात आले.
९) सन १९९० :---
बाबरी वादाच्या पार्श्व भूमीवर भाजपा अध्यक्ष श्री आडवाणीजी नी " रथ यात्रा " ची सुरवात सोमनाथ ते अयोध्या केली.
रथ यात्रा
१०) सन १९९० ( नोव्हेंबर ) :---
श्री आडवाणीची " रथ यात्रा " समस्तीपुर ( बिहार ) इथें अडविण्यात आली व त्यांना अटक झाली. या नंतर भाजपा ने आपला केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतल्या मुळे श्री व्ही. पी. सिंग यांचे " मिली जुली " सरकार अल्प मतात येऊन केंद्रीय मंत्री मंडळ बरखास्त करावे लागले.
११) सन १९९२ ( डिसेंबर ) :---
विवादित " बाबरी मस्जिद " पाडण्यात आली.
बाबरी मस्जिद
१२) सन २००३ ( ५ मार्च ) :---
इलाहाबाद हायकोर्टनी Archalogical Survey Of India ( ASI ) यांना निर्देश दिले कि विवादित बाबरी जागेचे उत्खनन करून अहवाल द्यावा कि पूर्वी या जागी मंदिर होतें का ? व त्यावर नंतर मस्जिद बांधण्यात आले का ?
पुरातन शिल्प १
पुरातन शिल्प २
शीला लेख
कुशाण संस्कृती चे शिल्प
पुरातन शिल्प ३
१३) सन २००३ ( २२ ऑगस्ट ) :---
ASI ने आपला अहवाल इलाहाबाद हायकोर्टाला सादर केला. हा अहवाल जवळ जवळ ५७४ पानाचा होता आणि त्यांत म्हंटले होतें कि उत्खनना नंतर असे दिसून आले कि १० व्या शतकातील मंदिराच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वरून निष्कर्ष व असे अनुमान निघते कि बाबरी मस्जिद त्यां मंदिरावर बघण्यात आले होतें.
ASI चे उत्खनन व आलेख.
१४) सन २००३ ( ३१ ऑगस्ट ) :---
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्ड यांनी ASI च्या अहवालावर व त्यांच्या निष्कर्षावर फेटाळत न्याय मंदिरांत धाव घेतली.
१५) सन २०१० ( २६ जुलाई ) :---
हाय कोर्टनी सर्व हक्क साबित ठेवून संबधित सर्व अर्जदाराना वेळ दिला., तो सामंजश्याने काहीं तोडगा किवां समझोता करावा पण ह्या साठी कोणीही पुढे आले नाहीत.
१६) सन २०१० ( २६ सप्टेबर ) :---
सुप्रीम कोर्टनी ही केस चालविण्यास व त्यावर निकाल देण्यास हाय कोर्टास परवानगी दिली.
१७) सन २०१० ( सप्टेंबर ) :---
इलाहाबाद हाय कोर्टांनी निकाल जाहीर केला कि विवादित जागा जी २.७७ एकर जमीन आहे ती सम-समान प्रमाणात मुस्लीम, हिंदू व निर्मोही आखाडा ह्यात वाटली. काहीं गटांना हा निकाल ( आदेश ) रुचला व पटला नाही. ह्या गटांनी परत सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
१८) सन २०११ ( ९ मे ) :---
सुप्रीम कोर्टाने इलाहाबाद हाय कोर्टाचा निकालावर आश्चर्य व्यक्त करीत अंतिम निकालाचा हक्क राखीत स्थगिती दिली. निर्देश दिले कि निकाला पूर्वीची स्थिती "" जैसे थे वैसे "" राहील.
आता बघू यां सुप्रीम कोर्ट कश्या प्रकारचे निकाल देईल ते.
बघा ........वाट पहा ..............
मा.ना. बासरकर.
१० मे २०११.
------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ ---- टाईम्स ऑफ इंडिया लेख. मे २०११.
गुगल इमेज्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा