एकटा
कुशल आहे आज मी
नाही कुणाची काळजी मज
मस्त माझ्या धुंदीत मी !!ध्रु!!
नाही कुणाचे बंध मजला, नाही स्वताचेही मला
कंठितो जो दिवस आला, सुख-दुख्ख ना त्याचे मला
तोल गेला माझा कधी जर, सांवरी माझाच मी!!१!! ध्रु !!
प्रेम केले एकमार्गी, गवसले नाही कुणी
वाट सारी धुंडिली पण, भेटले नाही कुणी
आईन्यातून केले स्वतावर, प्रेम मग माझेच मी !!२!!ध्रु!!
पडतो बिछान्यावर जधी, वाटतो मी एकटा
हात असूनी, पाय असूनी, शिथिल जणू मी थोटका
माझा, मला, मग मीच पुसतो, अस्तित्व माझे मन्मनी!!३!!ध्रु!!
जगण्यास असते एक आशा, व्हावे कुणाचे कधीतरी
साधणे संवाद-भाषा, हीच ईच्छा अंतरी
एकपात्री खेळ माझा, तोही पाही, माझाच मी!!४!!ध्रु!!
माझी नको चिंता कुणाला, धुंदीत माझ्या ग्रस्त मी
कुशल आहे आज मी, कुशल आहे आज मी
शशिकांत पानट, जून, २००९
" ह्या कवितांच्या Recording साठी शशिकांत पानट ह्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. shashi@panat.org ह्या ईमैल वर संपर्क साधावा"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा