शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

एअर इंडिया च्या फ्लाईट पर्सरचा धिंगाणा ................दही भाता साठी.

गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना आहे. टोरांटो अंतर राष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोईंग विमान नवी दिल्लीस जाण्यास सज्ज होते विमानात प्रवाशाना जाण्यासाठी जो सरकता जिना असतो तो पण लावण्यात आला होता. सर्व तय्यारी जवळ जवळ झाली होती. बोर्डिंग कक्षा मध्ये सर्व प्रवासी विमानात चढण्यासाठी वाट पाहत होतें. विमानतळावर उद्घोषणा झाली " लवकरच टोरांटो-नवी दिल्ली एअर इंडिया चें विमान फ्लाईट १८८ सुटणार आहे व प्रवाशाना विनंती आहे कि सर्वांनी बोर्डिंग सुरु होताच प्रथम वृद्ध व नंतर मुले आणि अपंग व्यक्ती चढतील व त्या नंतर बाकी सर्वांनी आपापल्या सीट ग्रुप प्रमाणे विमानात बसून घ्यावे. धन्यवाद "

विमानातील सर्व कर्मचारी व विमानचालक त्याचे सहकारी सज्य होतें पण त्यातील एक कर्मचारी फ्लाईट पर्सर महादेवन ( नाव खोटे आहे ) ह्याची फक्त प्रतीक्षा होती. एकदाचा महादेवन आला तो थेट टोरांटो विमानतळ अधिकारी ह्यांच्या केबिन मध्ये गेला. इकडे बाकी सर्व कर्मचारी विमानात आपल्या कामावर लागले. महादेवन ने अधिकारयास सांगितले कि मला कर्ड-राईस ( दही-भात ) चें जेवण पाहिजे. त्यावर त्यांनी सांगितले कि अशी व्यवस्था आता करणे जमणार नाही, जर कां आपण आगाऊ सुचना दिली असती तर व्यवस्था झाली असती. तरी पण महादेवन आपला हेका सोडीना तेव्हां त्या अधिकाऱ्यांनी पदो पदी त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. तरी हा प्राणी त्यांच्याशी हुज्जत घालीत राहिला.

यां वेळे पर्यत सर्व प्रवासी स्थानापन्न झाले होतें. विमान चालक व त्याचे सहचालक विमानतळावरच्या टॉवर कडून मिळणाऱ्या सुचेनेची वाट पाहत होतें. इकडे महादेवन आपला हेका सोडीना तेव्हां सुरक्षा अधिकारीना पाचारण करण्यात आले . ही बातमी व फ्लाईट पर्सरचा आतताईपणा पाहून शेवटी विमान चालकांनी स्वतः समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ तो काहीं केल्या आपला हेका सोडीना व काहीही एकूण घेत नव्हता.

इकडे कंट्रोल टॉवर कडून वारवंवार निघण्याच्या सुचना देण्यात येत होत्या पण महादेवाचा गोंधळ काही थाबत नव्हता. विमानस उड्डाण करण्यास उशीर होत होता आणि त्यां मुळे टोरांटो विमानतळावरच्या अनेक विमानांचे गमन आणि आगमन मध्ये बाधा येत होती. शेवटी विमानाच्या चालकांनी सूचना केली कि विमानाचे दरवाजे बंद करा व विमान महादेवन शिवाय उडेल. त्यांच्या हुकमा प्रमाणे विमानाचे दरवाजे बंद होत असताना महादेवन रागातच चढला. चालकांनी सिग्नल मिळताच विमानास गती दिली व विमानाने आकाशांत झेप घेतली. ह्या सर्व गोंधळात विमानास ३० ते ४० मिनिटे उशीर झाला. आपणास कल्पना नसते कि एवढ्या वेळात अश्या व्यस्थ विमानतळा वरून ३० ते ५० विमानांची उडाणे व उतरण्यास उशीर झाला तर त्यांचा पुढचा कार्यक्रम विस्कळीत होतो ह्याची महादेवानला जाण नव्हती असे नाही, तरी पण आपल्या हट्टा पुढे त्याला कोणाची पर्वा ?

असेच एकदा घडले होतें लॉस इंजीलास विमानतळावर, त्याचे कारण थोडे वेगळे होतें कारण त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन जबाबदार होतें." एअर फोर्स वन " क्लिंटननां परदेशी जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले पण ते विमान १५ ते २० मिनिटे उशिरा सुटले. क्लिंटन ह्यांची केशभूषा करण्यास उशीर झाला व विमानाला पण काय गंमत आहे बघा क्लिंटन च्या केशभूषे साठी त्यांच्या विमानाला १५ मिनिटे उशीर झाला आणि त्या मुळे हजारो प्रवासी एकतर हवेत घिरट्या घालीत होतें, तर दुसरे जाण्यासाठी प्रतीक्षेत ताटकळत विमानतळावर बसून होतें किती ह्श्यास्प्द गोष्ट आहे नाही ? असो,

तर आपले महादेवन विमानात चढल्यानंतर सरळ कामावर रुजू न होता आपल्या सहकार्याशी वाद घालीत राहिला एवढेच नाही तर त्याने आपला युनिफार्म काढून चक्क " लुंगी-सदरा " असा पेहराव केला. त्याच्या वरच्या अधिकार्यांनी विचारले कि तु युनिफार्म कां घातले नाहीस? तेव्हां हा म्हणाला हा तर माझा " न्याशनल ड्रेस " आहे. लुंगी-कुर्ता हा केव्हा पासुन भारताचा ड्रेस झाला ? तो कोणती अस्मिता जपत होता देव जाणे ? बरे, इतक्या वरच त्याचे नाटक संपले नाही तर नोकरी च्या अटी प्रमाणे त्यासं फक्त ५ ते ६ तास झोप घेणे ची मुभा आहे तरी ह्या महाशयांनी चक्क ९ ते १० तास झोप काढली तेही पहिल्या वर्गाच्या सीटवर आणि आपल्या निर्धारित जागे यैवजी . तो त्यां दिवशी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता जसा झपाटलेला असतो तसा.

सोळा तास नंतर विमान नवी दिल्लीस सुखरूप उतरले सर्व प्रवासी आणि कर्मचार्यानी सुटकेचा श्वास सोडला.
ही घटना अर्थातच एअर इंडिया च्या अधिकाऱ्याला रीतसर रिपोर्ट दिला. परंतु त्या नंतर कोणती पाऊले उचलली गेली व असे प्रकार पुन्हा होउ नये म्हणून काय उपाय योजना करण्यात आले आणि महादेवानला कोणती शिक्षा देण्यात आली ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत. पत्रकारांनी ह्याचा पाठपुरावा करून सुद्धा एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही गंध लागू दिला नाही. महादेवनचे लागे बंधे अगदी वर पर्यंत असल्यामुळे हें प्रकरण दाबण्यात आले का ?

अशा प्रकाराने आपल्या देशाची बाहेरच्या जगात आपली काय प्रतिमा होईल ? असे तर नाही नां जर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आपल्या केश भूषे साठी १५ ते २० मिनिटे विमान खोळंबून ठेऊ शकतात तर आपले ग्रेट महादेवन साहेब " दही भात " या साठी कां नाही करू शकत ?.............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: