मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

विकृत व्यक्तिंना चागुलपणाची शिक्षा ........ सुधारणा होणार का?

  परवाच कुठल्याश्या वर्तमान पत्रांत एक बातमी वाचली  " विनय भंगाच्या केस ( खटल्यात ) न्याय मुर्तींनी निकाल दिला, दोन तरुणास वेग वेगळी शिक्षा "हेडिंग वाचून उत्कंठा वाढली  व सर्व बातमी वाचली ती अशी होती .
 
 एका गावातील दोन तरुण मुलांनी त्याच गावातील ओळखीच्या मुलीचा निर्जन ठिकाणी विनय भंग केला. त्याची वयें साधारण १९व २२ वर्षांची आहेत. हल्ली आशा प्रकारची विकृती सर्वत्र आपणास पाहण्यास मिळते व रोज नवीन बातमी वाचण्यास मिळते. .

मुलीनी आपल्या  घरच्याना झाला तो प्रकार सांगितला आणि समाजातील बदनामीला न घाबरता त्यांनी ठरवुन पोलिसांत रीतसर त्यां मुलांची तक्रार नोदवली.पोलिसांनी दोघांना पकडून रीतसर खटला दाखल केला.
सरकारी वकिलांनी खरें तर कडक शिक्षेची मागणी केली व इतरास पण वाटत होते कि अशीच शिक्षा व्हावी तेणे करून पुढे कोणीही असे करण्यास धजू नये.

न्याय दानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायमुर्तींनी आपला निकाल दिला पण तत्पूर्वी त्यांनी दोन्ही तरुणांना निवेदनाची  संधी दिली. त्यां तरुणांनी आपल्या निवेदनात न्याय मूर्ती  समोर आपला गुन्हा कबुल केला व पश्चातापाने सागितले कि हे घृणास्पद  कृत्य करताना आम्ही मनुष्यच नव्हतो तर श्वापदा प्रमाणे वागलो.त्याचा आम्हास पश्च्चाताप होत आहे. तेव्हां  होणाऱ्या परिणामाचा पण विचार आला नाही आणि  हे कृत्य किती घृणास्पद व विकृतीचे आहे हा विचार मनाला पण शिवला नाही. आता आमच्या आयुष्यांत पश्चातापा शिवाय काहीच शिल्लक राहणार नाही आणि ह्या कृत्या बद्दल आपण जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगु .

न्यायाधीशानां  खात्री झाली कि हा गुन्हा पहिलाच आहे व त्यांची वयें लक्षात घेता आणि सुधारण्याची ईच्छा बघता, त्यांच्या पुढच्या जिवनाचा विचार करून त्यांनी आपला निर्णय( निकाल ) दिला .
 
" दोघांनी वेगवेगळे एकेक वर्ष अनाथालय , वृधाश्रम , अश्या संस्थेत मनोभावे सेवा करावी व आपले चारित्र्य चांगले आहे हें सिद्ध करावे. ह्यां दोघांवर स्थानिक पोलीस व ऐन. जि. ओ. संस्था लक्ष ठेवील आणि वर्ष पुर्ण होतांच परत न्यायासना समोर हजार होऊन पुढच्या आदेशां प्रमाणे वागावे "

असा आगळा वेगळा निकाल पूर्वी कधीच दिला गेला नाही. खरेंच न्यायाधीशाना खात्री वाटते का ?  कि ही मुले अश्या प्रकारच्या शिक्षे मुळे मत परिवर्तन होऊन सुधारतील ?
आपणास काय वाटते ............?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: