शुक्रवार, १ जुलै, २०११

अभिनव योग शास्त्र


" यं ब्रम्हा वरुणेद्र रुद्र मारुतःस्तुन्वति दिव्ये: स्तेवे वेंदै: सांग पदक्रमोप निषदै: गायति यं सामगा: /

ध्यानावस्थित तद्वतेन मनसा पश्यति यं योगित: यस्यान्न न विदू: सुरा सुरगाणा देवाय तस्मै नमा: //



ब्रम्हा, वरूण,रुद्र, इंद्र आणि मरुत हें पाच ही देवता ज्याची स्तोत्रा द्वारे व सामवेदाच्या अंग. पाद, कर्म, आणि उप निशिदाच्या द्वारे त्या  परमेश्वराची स्तुतीपर गायन करतात.


योगीजन ध्यान धारणा करून आणि आत्मस्थ होऊन मनानी ज्याचे दर्शन करतात व  ज्याचा अंत कोणासही माहित नाही ना देवता,ना राक्षस अश्या दिव्य स्वरूपी भगवंताला माझा प्रणाम.


ब्रम्हा,वरूण , रुद्र, इंद्र आणि मरुत हें पाचही देवता अनुक्रमें पृथ्वि, आप, आकाश, तेज, व वायू चें अतिनिधी आहेत. या पृथ्वि तालावरील सर्व काहीं या पंच महाभूतानेच बनलेले आहेत आणि त्यांत यांचे गुण पूर्ण पणे सामावलेले आहेत जसें, शब्द, स्पर्श, रस, रूप तथा गंध हें पाचं विषय आकाश, आप , तेज, आणि प्रथ्वी ह्या क्रमाने हें दिव्य गुण दिसतात. ह्यांना दिव्य गुण का म्हटलेले आहे कारण प्रलोभन युक्त असलेल्या जीवांना स्वतः चा जीव त्यागण्यासाठी उद्विक्त करतात. हें सारे दिव्य गुण त्याने परमात्म्या कडूनच प्राप्त केले आहेत आणि ह्या साठीच हें पाचं देवता त्या परमेश्वराची स्तुती व स्तवन करतात.


पाचं महा भूतांचे दिव्यत्व सिद्ध करण्यासाठी काहीं उदाहरणे पाहू ........


शब्द :-- शब्द हा आकाशच गुण आहे. सुरेल संगीत ऐकून मृग जसें त्यां कडे आकर्षित होतात व आपला जीव पण धोक्यात घालतात आणि अश्या अवस्थेत ते एखाद्या  शिका रयाच्या जाळ्यात अडकून स्वतःचे स्वतंत्रता  व प्राण गमावून बसतात.


स्पर्श :-- हा वायूचा गुण आहे. जंगलात स्वंछदि विहरणारा गजराज जेव्हा एखाद्या हत्तीणीला बघून आपले शरीर तीच्या  शरीरास घासण्यास लालाईत होतो कारण त्यासं स्पर्श सुख अनुभवायचा मोह होतो. हा मोहच त्यासं शिकारयाने ठेवलेल्या काष्ठ हत्तींनी मुळे त्या रचलेल्या जाळ्यात अडकतो. परिणाम म्हणजे स्वात्यंत्र गमावून बंदी होणे यापेक्षा वेगळे ते काय होणार?


रस :-- हा आप तत्वाचा गुण आहे. असा कोण माणूस आहे ज्याला मिष्ठान आवडत नाही तरी तो  आपल्या जीभेवर ताबा ठेऊ शकतो का ?  नाही पण फक्त विरक्त साधुच हें करू जाणे.जसें मासा सुग्रास भोजनाच्या आशेने गळास लागतो हें रस ह्या भूता मुळेच घडते.


रूप :-- . रूप हें नेत्राचा गुण आहे. म्हणूनच दिव्याची सुंदरता बघून पतंग  आकर्षित होऊन मरण पत्करतो.


गंध :-- पृथ्वि ही गंधाचा विषय आहे आणि ईतर विषया प्रमाणे याचं पण एक निराळे सामर्थ्य आहे. भ्रमर कमलाच्या सुंदर गंधामुळे आकर्षित होतो व गंध वेचण्यास जातो. पण जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हां कमल पुष्प बंद होतें. भ्रमर त्यांत अडकतो तो सूर्य उदयापर्यंत . हा भ्रमर कठीणातल्या कठीण लाकडाला छेदु शकणारा पण नाजुकश्या कमळाला छेदु शकत नाही कारण गंध मोहा मुळे.
अचानक एखादा गजराज पाणी पिण्यासाठी येतो व सर्व कमल पुष्पाना बाजूला सारून फेकून देतो आणि त्यातल्याच एका कमळामध्ये हा भ्रमर पण फेकल्या जातो. तो एका दगडावर आपटतो व त्यांतच भ्रमर मारतो . हें सर्व काहीं होतें ते त्या भ्रमराच्या मोहापाई.


ब्रम्हा व ईतर देवता त्या परम पराक्रमी परमात्माची स्तुती करतात कि हें भगवन तुझ्या कृपे  शिवाय आम्ही पंगु व हतबल आहोत. अग्नी जवळ जाळण्याची, वायू जवळ उडवून टाकण्याची, पाण्या जवळ भिजवण्याची शक्ती आहे. ह्या सर्व शक्ती तुझ्या कृपे शिवाय राहूच शकत नाहीत. सारांश काय तर  हें भगवंता तुझ्या कृपे शिवाय भौतिक उन्नती होणे नाही.


सामवेद ,अथर्ववेद, आपल्या सर्व अंगा सहित व संहिता, पाद, कर्म, अरण्यक, उप निशिधा समवेत उत्तम प्रकारचे साम गायनाद्वारे स्तुती करतात.


सारांश हा कि पृथ्वीच्या उत्पत्ती पासुन आज पर्यंत जें काहीं ज्ञान ( वेद ) मिळाले ते शास्त्र ,कला, आणि ईतर कोणतेही ज्ञान असेल ते सर्व गुणात्व असलेले संपूर्ण ज्ञान त्यां परमेश्वरा कडून मिळाले.
योगीजन ध्यान मग्न होऊन आपले चित्त एक करून व स्थिर करून त्या भगवंता मध्ये लीन झाले आणि त्यांना भगवंताचा साक्षात्कार ( दर्शन ) झाले.


यां योगीच्या साधनेस " योग शास्त्र " म्हंटले जाते. अश्या प्रकारची जर साधना केली तर त्या भगवंताचा साक्षात्कार होतो हा एक प्रकारच ' योग" च आहे. ह्या योगां मुळे आपल्या ठाई असलेल्या सर्व इच्छा सफल होतात कारण तो परमात्मा सर्व जगाचा जनक आहे.


अश्या या सामर्थ्यवान भगवंताचे अंत जाणून घेणे व त्यांत लीन होऊन त्याची प्राप्ती करणारे योगी खरेच अतिमाहान आहेत . ह्या योगींच्या साधनेस " योग शास्त्र " म्हणतात व ते आपण आत्मसात करून भगवंता  पर्यंत पोहचू शकू यात शंका नाही.


मा.ना.बासरकर .


(अनुवादक )


२५-०३-१०


( मुळ लेखक हिंदी कै. नागोराव बासरकर )







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: