तेलंगाणा .........धगधगतो आहे !!!!! धगधगतय......... तेलंगाणा !!!!!!!
सध्या तेलंगाणा विभागात अशांतता सर्व थरांत दिसून येते. मी नुकताच या भागास भेट दिली आणि मला तिथला खदखदणारा असंतोष सर्वत्र जाणवला. मी मुळचा त्याच विभागातला असल्यामुळे तो अधिक प्रकर्षाने जाणवत होता आणि म्हणून मी विचार केला कि ह्या धगधगी मागे कोणता विचार आहे ते जाणून घ्यावे. बऱ्याच मंडळीशी बोलल्या नंतर व माहिती घेण्याची जबरदस्त इच्छा झाली व तसा प्रयत्न केला व येथील अशंतोषाचे कारण व विचार सर्वासमक्ष ठेवावा असा निश्चय केला व सर्व थरातील लोकांशी बोलून माहिती घेतली तसेंच पूर्व इतिहास व ज्वलंत प्रश्न माडण्याचा प्रयत्न आपल्या साठी समक्ष माडीत आहे.
तेलंगणाचे खरें दुख काय आहे हें व सध्या चालेल्या " स्वतंत्र तेलंगाना " आंदोलना विषयी जाणून घेण्यापूर्वी आपण प्रथम तेलंगाना प्रदेशाचा पूर्व इतिहास बघितला पाहिजे ज्या योगें आपणास बरीच काहीं माहिती मिळेल व अशंतोशाची कारणे पण कळतील आणि नंतर आपण आपले मत बनवू शकू नाही का?
पूर्व इतिहास .............
त्रेता युगांत श्री राम ,सीता व लक्षुमणा संगे दंडकारण्य भागातून जात जात या भागात रामगिरी पर्वत पायथ्याशी असलेल्या गावात मुक्काम केला. हें पूर्वीचे स्थान म्हणजे सध्याचे करीमनगर होय .
पुढे गोदावरीच्या नदीच्या काठा काठाने त्यानी भद्राचलम पर्यंत प्रवास केला. तेलंगाना हा विभाग सातवाहन राज्याचा भाग होता.पुढे काकतीय वंशाच्या राजानि राज्य केले त्या वेळी हां प्रदेश सोनेरी भूमि म्हणून ओळखली जात होती. मुळ तेलगु संकृती असलेल्या राज्यांचा या प्रदेशावर अधिपत्य होतें त्यांत काकतीय व चोला घराणे प्रसिद्ध होऊन गेले. ह्याच कालखंडात " गोवलकोंडा " किल्ला बांधण्यात आला.
तेलंगणा मुस्लीम अधिपत्याखाली आला तो दिल्लीच्या सुलतानाच्या काळात बहामनी,लोधी, कुतुबशाही आणि मोगल साम्राज्यात. १८ व्या शतकांत ' असफअली " घराणे वेगळे होऊन हैद्राबाद स्टेट निर्माण झाले. नंतरच्या काळात हैंद्राबाद स्टेट ब्रिटीशां बरोबर तहनामा करून राज्य करीत होतें. त्या काळच्या ब्रिटीश साम्राज्यात हैद्राबाद स्टेट सर्वात मोठे राज्य होतें. तेलंगाणा केव्हाही थेट ब्रिटिशाच्या अधिपत्याखाली नव्हता. पण आंध्र, रायलसीमा व तटवरती विभाग हा मद्रास रेसिडेन्सीचा व ब्रिटीश राज्याचा एक भाग होता.
तेलंगणा स्वतंत्रता लढाई सन १९४६ ते १९५१ यां कालखंडात काम्मुनीस्ट पार्टी आफ इंडिया यांनी चालविली ते हैद्राबादच्या निजाम विरुद्ध . त्या काळचे राज्यातील जहागीरदार,देशमुख ह्यांच्या कडून जनतेची पिळवणूक व वेठ बिगारी (bonded lobour ) प्रथा रूढ होती ज्यास तेलगु मध्ये " वेट्टी चीक्कीरी " म्हणत व ती बंद करावी म्हणुन . हळू हळू ही चळवळ उग्र होत जाऊन थेट निजाम उस्मान अली खान,आसीफ्जाहा ७ वा ह्यांच्या विरुद्ध सुरु झाली .
सन १९४७ मध्ये भारत ब्रिटीश साम्राज्यातून स्वतंत्र झाला व त्यां वेळची लहान लहान राज्ये भारतात विलीन होण्यास तय्यार झाली पण हैद्राबाद निजाम मात्र यासं तय्यार नव्हता .येथील जनता मात्र तय्यार होती त्यांनी आंदोलने करण्यास सुरवात केली. हैद्राबाद स्टेट अबाधित ठेवण्यासाठी निजामाने लोकांचे आंदोलन चिरडून टाकण्यास आपले सैन्य " रझाकार " व " कासीम रझवी " नामक अतिशय कडव्या मुस्लीम सेनापतीच्या अधीन करून पाठविले., कासीम रझवी ने शेकडो लोकांना यमसदनास पाठीविले तसेंच बरीच हिंदू देवळे नष्ट केली. रीझविने केलेल्या हत्या ह्या
" जालियान बाग " हत्ये पेक्षा महा भयंकर होती. भारत सरकारच्या निझामा बरोबरच्या वाटाघाटी ने जेव्हा हा प्रश्न सुटेना तेंव्हा सरदार पटेल त्या वेळचे गृहमंत्रीनी सैनिक कारवाई " opration polo " करून हैद्राबाद स्टेट भारतात विलीन केले.
हैदराबाद स्टेटचा करभार सभाळण्यासाठी m k vellodi यांना चीफ मिनिस्टर बनून मद्रास व बॉम्बे स्टेट मधील अधिकार्याच्या साह्याने राज्य चालविण्यास सांगितले. त्या नंतर श्री. बुरुगुलू रामकिशन राव हें चीएफ मिनिस्टर झाले त्याच काळात तेलंगाणा जनतेनी नवी चळवळ उभारली ते मद्रासहून आलेल्या अधिकारी लोकांना परत पाठवून त्यांच्या जागी स्थानिक अधिकारी नेमावे. हें आंदोलन फक्त स्थानिक लोकच्या हाती राज्य सत्ता असावी व पर प्रन्तियांच्या अधिकारात राहणे नाही म्हणून केली गेली.
श्री पोट्टी श्रीरामुलूनि सर्व तेलगु भाषिक जनतेस एकत्र आणून स्वतंत्र तेलगु राज्य निर्माण करण्यासाठी प्रखर आंदोलन केले. सरते शेवटी भारत सरकारनी तेलंगाना,आंध्र व रायलसीमा या तिन्ही विभागाचा मिळून " आंध्र प्रदेश " राज्य बनविले. तरी पण तेलंगाणा प्रजेस हें मान्य नव्हते म्हणून भारत सरकारनी सन १९५३ साली एक उच्च स्तरीय कमेटी नेमली " State Reorganation Commission " जी भाषिक प्रांत रचनेची शक्यता पडताळून हैद्राबाद स्टेट ( आताचा तेलंगाणा ) याचं एक राज्य निर्माण करण्याची शिफारस करेल. ह्या कमेटीचे पण हेचं मत होतें कि इतक्यात तेलंगाणा विभाग आंध्र प्रांतात विलीन करू नये. SRC च्या रीपोर्ट पान कृ ३८२ नुसार हें स्पष्ट करण्यात आले कि तेलंगणाच्या लोकांनी ठरवावे कि त्यांना आंध्रात जायचे आहे कि नाही. जनतेचा जो कौल मिळेल त्या प्रमाणे विलीनीकरण करावे .
त्या वेळेची परिस्थिती अशी होती कि संपूर्ण तेलंगाणा विभाग हा सर्व बाबतीत म्हणजे आर्थिक, शिक्षणिक , शेती, औद्योगिक ,बेरोजगारी,सत्तेती वाटा,ह्या सर्व आघडीवर मागासलेला होता आणि सध्या अजून ही आहे. त्या मानाने आंध्र प्रांत हा ब्रीटीशाच्या राजवटील सर्व क्षेत्रात आघाडीवर होता. त्यामुळे तेलंगण जनतेस असे वाटत होतें कि आंध्रतील जनता तशी श्रीमंत,शिक्षित, आणि राज्य कारभार त्यांच्या हाती असल्या ने त्यांनाच ह्या विलीनीकरणाने जास्त फायदा होईल. SRC च्या अहवालात शेवटी असे नमूद केले कि तेलंगाणा प्रांत वेगळा करावा पण विलीनीकरणचा मार्ग राखून ठेवावा. तो पर्यंत जेव्हा १९६१ साली सार्वत्रिक निवडणुका होतील व असम्ब्ली मध्ये २/३ मताधिक्याने सार्वमताने विलीनिकरणाचे विधेयक पास करतील तेव्हाच करावे.
सन १९५५ मध्ये तेलंगाणा व आंध्रच्या सर्व नेत्यांची बैठक झाली व त्यांत असे ठरले कि तेलंगाणा प्रांतासाठी विशिष्ट सवलती ,सुधारणा,नौकऱ्या मध्ये आरक्षण, शिक्षण, तसेंच राज्यसत्ते मध्ये योग्य वाटा, ह्या अटीवर एकमत झाले व विलीनिकारणास तय्यार झाली. सन १९५६ मध्ये एक" Gentalman Agreement " होऊन नवीन आंध्र प्रदेश निर्माण करण्यात आले. ह्या "जंटल मेन अग्रीमेंट" मध्ये तेलंगणा विभागासाठी राज्य अधिकार,स्थानिक अधिकार, राज्य उत्पन्नात वाटा, मुलभूत प्रगती, रस्ते,वीज.शेती,शिक्षण, ह्या सर्व सुधारणा करण्याचे आश्वासन समाविष्ट करण्यात आले तेव्हां कुठे विलीनिकरणास नेते मंडळी राजी झाले.
तेलंगाणा चळवळ ............
तेलगाणा चळवळ सर्व प्रथम सन १९६९ मध्ये विद्यार्थ्यानी खम्मम इथे आन्दोलन केले कारण सन १९५६ साली विलिनिकरणाच्या वेळी केलेले " gental man " प्रोमिस पाळण्यात आले नाही म्हणून ,परन्तु ह्या चळवळिचे दोन गट पडले एक गट " प्रान्ताला दिलेले वचन पाळन्यासाठी " तर दुसरा गट " तेलगणा वेगळा प्रान्त " बनविण्यासाठी आन्दोलन करित होते हि चळवळ हळु हळु सर्वत्र पसरली.
राज्याच्या Non Gageted officers नी असहकार आन्दोलन सुरु केले व त्याची परीणिती म्हणजे आन्ध्रा सरकारने Public employment Act १९५७ च्या आधारे सर्व अ-स्थानिक अधिकारी ह्यांच्या बद्ल्या केल्या व त्यां जागी स्थानिक ( तेलगणा ) अधिकारी नेमण्यात आले. ह्या सरकारी आदेषाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तेलगाणा स्वतन्त्र राज्य आन्दोलन चालुच होते आणि तेलगाणा प्रजा समिती ( TPS ) ने नवी चळवळ उभारली व तीव्र आन्दोलने केली त्यांत बरेच लोक मारले गेले ,चळवळ अधिकच भडकत गेली. श्री चन्ना रेड्डी, श्री रंगा रेड्डी ह्या नेत्यानी पाठींबा दिला पण श्रीमती इन्दिरा गान्धीनी दुर्लक्ष् केले त्याचा परिणाम म्हणजे ठिक, ठिकाणी मोर्चे, हरताल ,बंद होऊ लागले , कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उभा राहिला. लोकांची एकच मागणी होति "' तेलगना राज्य " . श्रीमती इन्दिरा गान्धी, वाय बी चव्हाण राज्यास भेटी देउन शान्तता निर्माण करण्याचा प्रयत्न्य केला व तत्कालीन मुख्यमंत्री श्री कासु ब्रम्हान्नदा रेड्डी याना बडतरफ करण्याच्या मागणीचा विचार करु व त्याच्या जागी तेलगाणाचा मुख मन्त्री असेल पण हे सर्व शान्ताता प्रस्थापित झाल्या नंतर असे आश्वासन मिळाले .
सन १९७१ मध्ये इन्दिरा गान्धीनी मिड टर्म् नीवडनुका घोषित केल्या व ह्या निवडनुकित तेलगाणा प्रजा समिती ने भाग घेउन राजकारणात उतरले व लोक सभेत आपले १४ यम पी निवडून आणले. पण त्याच वर्षी TPS नी कान्ग्रेस बरोबर येक अग्रीमेनट करून काग्रेस मध्ये विलीन झाले.
अग्रीमेनट असे होते.....
१) तेलांगणं साठी " मूलकी रुल " चालु राहिल
२) तेलांगणं साठी वेगळा आर्थिक बजेट असेल.
३) तेलांगणं चा चीफ मिनिस्टर असेल.
TPS च्या ह्या चळवळीने जास्त काही साधले गेले नाहि पण पी व्ही नरशिव्हराव मुख मन्त्री झाले पण त्याचा खास प्रभाव पडला नाही कारण आन्ध्राचे नेते मण्डली त्यांच्या वर हावी होते
तेलंगाणा राज्य का? व कशा साठी ? ते आपण पाहु ----
१) आन्ध्रा प्रदेशात एकुण जिल्हे २३ आहेत यात १० जिल्हे तेलगाणा, ९ जिल्हे आन्ध्रा व ४ जिल्हे रायलसीमाचे आहेत. यातील ७ जिल्हे तेलगाणा ,३ जिल्हे आन्ध्रा, व १ जिल्हा रायलसीमाचा अतिशय मागासलेले आहेत हे सत्य आहे. पण १० जिल्ह्या पैकी ७ जिल्हे म्हणजे तेलगाणाचे ७०% जिल्हे मागासलेले आहेत.
२) सरकारी आकडेवारी नुसार तेलगाणाचे उत्पन्न एकुण राज्याच्या उत्पन्नाच्या ४०% आहे पण, तेलगाणा वर किति खर्च केला जातो तर फक्त २८% इतकाच
३) खरे तर राज्यातिल् नद्याचे पाणी छोटे,छोटे केनाल खोदुन शेतिसाठी पाणी पूर्वठा केला जातो पण जेवढा एकटया गुन्त्तुर मध्ये केला जातो तेवढा संपुर्ण तेलगाणा विभागात केला जात नाही.
४) नल्लगोण्डा जिल्ह्यात पूर्वी Lime Stone च्या क्वारी होत्या, हा लाइम स्टोन सीमेन्ट बनविन्यासाठी उपयोगात आणला जात असे परन्तु नागार्जुना डयाम मुळे ह्या सर्व क्वारिज पाण्याखाली आल्या व ही प्राकृतिक खानिज् संपत्ति नष्ट झाली याचा विचार सुद्धा केला गेला नाही बरे, डयाम पूर्ण झाल्यावर पाणी तेलगाणा विभागास शेतिसाठी मिळायला हवे होते पण आन्ध्रा कडील श्रीमन्त शेतकरी लाबी मुळे मोठा हिस्सा हा कृष्णा आणी गुन्त्तुर जिल्ह्याना देण्यात आला.
५) नलगोण्डा जिल्यातिल् दूषित Florinated पाण्याची समष्या आज तागायत तशिच आहे.
६) तेलगाणाचा सर्वात मोठा जिल्हा हा महाबुब् नगर आहे आणि या जिल्यातुन दोन मोठ्या नद्या वाहतात कृष्णा व तुङ्गभद्रा. ह्या दोन्ही नद्यावर एकहि डयाम नसल्या मुळे हा भाग नेहमी कोरडा व दुष्काळ ग्रस्त असतो. काही प्रमाणात शेतिसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले ते फक्त RDS च्या बाधारा प्रकल्पातुन बाधल्यामुळे पण रायलसीमा भगातिल् पुढारीनि त्या बाधाराचे गेट्स तोडुन सरास पाण्याचा वापर करतात व जे काही उरते ते महबुब् नगरच्या शेतकरयाना वाटला जातो. अशा अनेक प्रकारे आन्ध्रचे वर्चस्व असते त्या मुळे येथील जनता खवळलेलि आहे.
७) गोदावरी नदीवर अदिलाबाद ते बे आफ बेन्गाल् जिथे हि नदी सागरास मिळते ह्या संपुर्ण भागा मध्ये एकही डयाम बाधला गेला नाही व बाधण्यास परवानगी नाही, कारण गोदावरी जिल्ह्यातिल नेते व सधन शेतकरी याना भीति आहे कि त्याची सुपिक शेति ज्यातुन ते वर्षला तीन वेळा पीक काढतात व डयाम बाधला गेला तर त्याच्या शेतिस पाणी पूर्ववठा कमी होइल् ह्या मुळे डयाम होउ देत नाहीत. हे एक प्रकारे तेलगाणा वर अन्याय नाही का ?
८) तेलगु देशम पार्टीचे मुख्य मन्त्री NTR च्या सरकारनी एक जि ओ ( GO ) काढून तेलगाणासाठी सरकारी नौकारया उपलब्ध करून देण्याचा आदेश दीला पण खेदाने संगावे लागते कि हा आदेश कधिच अमलात आणला गेला नाही.
९ ) शैक्षणिक दृष्ट्या तेलगाणा मागे आहे आणी इतर विभागाच्या मानाने इथे फार कमी महाविध्यालये आहेत या उलाट कृष्णा,कडप्पा व गुन्त्तुर विभागात जास्त आहेत.
१०) सन २००५ ते २००८ पर्यन्त आन्ध्रा सरकारनी जवळ, जवळ, तीस हजार कोटि रूपयाला सरकारी मालकिची जमिन ( हैदराबाद व त्याच्या आसपासची जामिन ) विकली व मीळालेली सर्व रक्कम रायलसीमा व आन्ध्रा साठी उपयोगात आणली , जर का हा पैसा तेलगाणा साठी वापरला गेला असता तर हा उठाव होत आहे ईतका झाला नसता.
११) तेलंगणात कोणतेही मोठे औद्योगिक,अत्यानुघिक indestrial प्रकल्प उभारले गेले नाहीत, जें सर्व विशाखापटनम, विजयवाडा ,काकिनाडा ,नेल्लूर, तिरुपती, व कडप्पा मध्ये सर्व प्रकल्प उभारले गेले. यां उलट निझामाच्या राजवटीत उभारलेले कारखाने हळू, हळू सर्व बंद पाडले.
उदाहरण दाखल अजम्जाही मिल ( वारंगल ) सर सिल्क ( सिरपूर ) स्पिनीग मिल (आदिलाबाद ) आल्विन रिपब्लिक फोर्ज आणि निझाम शुगर फ्याक्टरी ( निजामाबाद ) .
१२) तेलंगण रीजनल कमेटीनि स्थापन केलेली १२ दुध शीत गृहे बंद करण्यात आली.
१३) राम गुंडम फरटिलाऐझर फाक्टरी बंद केली कारण त्यासं लागणारा कोळसा कमी दरजाचा होता व वीज पुरवठा कमी असल्यामुळे पण त्याच सुमारास दुसरा नवीन कारखाना नेल्लूर जिल्यात स्थापण्याचे ठरविले.
१४) हैंद्राबाद परिसरात प्रकल्प आले पण त्याचा तेलंगाणा जनतेस फायदा झाला नाही कारण ९५% नौकरया आंध्रा लोकांना दिल्या गेल्या .जरी यां औद्योगिक परिसरास वीज, पाणी ,व जागा यां सवलती तेलंगणाच्या होत्या. इतकेच नाही तर यां कारखान्यामुळे दुषित झालेले वातावरण व त्याचे दुष् परिणाम स्थानिक लोकांनाच भोगावें लागते.
१५) तेलंगाणा विभागात सर्व सरकारी व नीम-सरकारी नौकऱ्या मिळून जवळ, जवळ २० ते २५ लाख उपलब्ध आहेत. लोकसंखेच्या मानाने तेलागणं लोकाना फक्त १०% ते १५% मिळतात. बाकी सर्व आंध्रा, रायलसीमा विभागातील लोकाना मिळतात.
१६) तेलगु फिल्म इंडसट्री म्हणायला हैदेराबाद्ला आहे पण त्यावर आंध्राचे वर्चस्व दिसून येते .
१७) Bureao of economics and statics of Andhra pradesh च्या आकडेवारी नुसार sale Tax व excise duty जवळ, जवळ ७५% आणि ५५% इतकी तेलंगण विभागातून जमा होतें. पण यां विभागावर खर्च फक्त २५% ते ३०% इतका होतो. ( हें सर्व आकडे २००१ च्या रिपोर्ट नुसार आहेत )
१८) मिळकती नुसार तेलंगाणा विभागात खर्च किती होतो तो आपण बघू यां.
जल संपदा ( Irrigetion )--- १८.२०% (२००० -२००१ ),
शिक्षणं प्राथमिक -सरकारी,--- ३१.३४%
प्राथमिक-निम सरकारी --- ९.८६%
डिग्री कोलेज -सरकारी,--- ३७.८६%
डिग्री कोलेज नीम सरकारी.---२१.७९%
( हें सर्व आकडे फक्त उदाहरण म्हणून दिले पण जावज, जवळ ह्याच पद्धतीने बाकी क्षेत्रात खर्च होतो. )
१९) जागतिक ब्यान्के कडून रुपये ५०,००० कोटीचे कर्ज development साठी घेतले पण त्याचा विनियोग प्रत्येक विभागास कसा केला जातो हें स्पष्ट होत नाही.
ह्यातला १/५ भाग जरी तेलंगाना प्रकल्पावर केला तर सर्व थांबलेले प्रकल्प पूर्ण होतील.
२०) लोक संख्याच्या वाढी प्रमाणे जरी बघितले तरी तेलंगणा आघाडीवर आहे १८५% वाढ आहे. आंध्रा ११८% वाढ ,रायलसीमा १२१% वाढ आहे.
( सर्व आकडे २००१ चे आहेत व ते प्रातनिधिक आहेत असे समजावे.)
ही जी तेलंगणात लोकसंख्येची वाढ दिसते ती नुसती जन्म व मृत्यु कमी किवां जास्त आहे म्हणून नाही तर ईतर भागातून आलेल्याची संख्या दिवसे दिवस वाढत आहे. ही मंडळी इथें येतात व इथले रहिवाशी होतात व पुढे ते निवडणूक लढवतात आणि मग MLA ,MP , व राज्याचे मंत्री बनतात. ह्या वरून तेलंगण जनतेस वाटते कि हें सर्व हें लोक ठरवुन आंध्रची वसाहत केली जात आहे. आणि काहीं काळा नंतर येथील स्थानिक जनता कमी होत जाईल. ही पण एक भित्ती तेलंगण जनतेमध्ये आहे.
अशा सर्व बाजूनी दडपलेली प्रजा मग " स्वतंत्र तेलंगणा " ची मागणी करतील ते अगदी चुकीचे ठरणार नाही. ह्या मागणी मुळे काहीं प्रश्न उपस्थित होतात किवां काहीं लोक आकसां पोटी विचारतात ज्याना एकत्र राहणे सोयीचे वाटते. पण काहीं लोक खरेच पोट तिडकीने कसे होईल याची चिंता करतात.
आपण पाहू यां कि ती सर्व स्वाभाविक प्रश्न कोणते व त्याची समर्पक उत्तरे कोणती ?........
१) " स्वतंत्र तेलंगणा " चा प्रश्न पुन्हा का उपस्थित झाला ?
हा काहीं नवा प्रश्न्न नाही "स्वतंत्र तेलगणा " प्रश्न्न आंध्रा प्रदेश निर्माण होण्या पासूनचा भिजत पडलेला आहे. आंध्रात समाविष्ट करताना जी भीती होती ती, भीती व परिणाम यां ६० वर्षात तेलंगणा जनतेनी भोगले आहे आतां त्याची पुनरावर्ती नाही. सर्व क्षेत्रात झालेली गळचेपी,आर्थिकमागासलेपण, बेरोजगारी, सत्तेतील वाटा , व ईतर विभागातील लोकांचा इथें विस्तार ह्या सर्वांचा झालेला अतिरेक व ते सर्व भोगणे याचा कसा बर विसर पडेल यां जनतेला.
२) " स्वतंत्र तेलंगणा " व्यतरिक्त दुसरी कोणतीही तडजोड नाही का ?
तेलंगणा जनता म्हणते " नाही " कारण , याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात कि प्रथम Gantalman agreement , सर्व पार्टी ठराव, आठ कलमी फार्मुला, त्या नंतर सहा कलमी कार्यक्रम, हें सर्व उपाय केले पण याचा काहीही उपयोग झाला नाही. इतकेच नव्हे तर ह्यातील एकाही फार्मुल्याची अंमलबजावणी झाली नाही. तेव्हां अशी आशां करणे व्यर्थ आहे. जी मंडळी सुपरीम कोर्टाचा आदेश धुडकावून टाकतात त्यांच्यावर परत भरवसा करणे कठीणच.
३) उत्तर सागरीय आंध्रा व रायलसीमा हें सुद्धा मागासलेले आहेत.ते स्वतंत्र विभागाची मागणी करीत नाहीत मग तेलंगणा जनता का करते ?
हे खरे आहे की ही दोन्ही विभाग आंध्राच्या मानाने तशी मागासलेली आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पहीजे की औद्योगिक प्रकल्प विजगापट्टनमला झाल्या मुळे उत्तरीय सागरी लोकना त्याचा फायदा झाला. रायलसीमा तसा मगसलेला नाही त्याची वेगळी कारणे आहेत व त्यांचे मागसलेपण तेलंगाणाच्या तुलनेने कहीच नाही. तेलंगाणातिल खनिज सम्पत्ति ,नद्यांचे पाणी वाटप, बेरोजगारी, आशा अनेक त्रुट्या मुळे हा भाग अधिक मगसलेला आहे.
ह्या वरील गोष्टीचि पुर्तता झाली तरच हा विभाग निश्चित समृद्ध होइल असे तेलंगाणा स्थानिक जनातेस वाटते. दुसारी गोष्ट म्हणजे SRC कमेटीने इतर उपाय सुचाविले त्याच बरोबर स्वतन्त्र तेलंगाणाला पण मान्यता दिलि. जर् उत्तरीय व रायलसीमा विभागातिल जनतेस जे मीळाले त्यांत ते समाधानी आहेत म्हणुण काय तेलंगाणा जनता गप्प राहावी ? तेलंगाणाला जे काही देण्यात आले ते इतके तुटपुनजे आहे की त्यांत कोणिही समाधानी राहु शकत नाही आणि म्हणुण तेलंगाणा जनता "स्वतन्त्र तेलंगाना " शिवाय दुसरा विचारच करु शकत नाहीत .
४) भाषावारी प्रान्त रचना व त्याची संस्कृतिचे काय ?
भारतात तेलगु भाषा नम्बर दोन वर आहे. पहिल्या नम्बर वर हिन्दी आहे. भारतात हिन्दी भाषिक राज्ये ९ आहेत व आणखीण भविषात होउ शकतात तर तेलगु भाषिक राज्ये का नाही ?
५) " नक्सलवाद " हा कारणीभुत आहे का तेलंगाना विभाग मागासलेला राहण्यामागे ?
हा प्रश्न उपस्थित करण्या मागे एक राजकीय खेळी आहे. ज्याना स्वतन्त्र तेलंगाना होउ द्यायचे नाही आशा लोकानी हा मुद्दा काढला. नक्सलवादाला कोणीच पाठिम्बा देत नाही व देणारही नाही. हा काही फार मोठा मुद्दा नाही ज्या मुळे स्वतन्त्र तेलंगाणा राज्य न बनाविण्यासाठी. तेलंगाणाच्या भागात नक्सालवाद आहे त्या भागातिल औद्योगिक प्रकल्पाना त्यांच्या पासुन कधिच त्रास झाला नाही जसे रामागुणडम ,कोत्तागुडम जे जंगलात उभारलेले आहेत.
तेलंगाणा विभागातिल सरकारी तसेच प्राइवेट इन्डस्ट्रीजना नक्सलवादी कडून त्रास झाला असे ऐकीवात पण नाही. या भागात नक्सलवाद का बोकाळला त्या मागचे कारण आपण लक्षात घेतले पहीजे कारण बेकारी, गरीबी, मागासलेपणा, जो या भागात आहे तो आन्ध्राच्या नेत्यानी सतत ५० वर्षे राज्य व सत्ता भोगुन या भागाची दुर्दशा केली व या राज्यकर्त्यानी हा नक्सलवाद मोडून काढण्याचे कधिच प्रमाणिक प्रयत्न केले नाहित कारण, त्यांत त्यांचा स्वार्थ होता. या भागात सतत अशान्ति राहिली तर जनतेस इतर बाबतित लक्ष घालण्यास वेळ नसेल व आपण राज्य करत राहु.
६) सर्व राजकीय पार्टी चे काय योगदान व मनसुबा आहे ?
कॉग्रेस पार्टी सत्तेत असताना एक व सत्तेत नसताना वेगळी भाषा बोलते.
तेलगु देशम पार्टी ते सत्तेत असो किवा नसो तेलंगाणा बद्दलची भूमीका म्हणजे मौन असणे .
कमुनिस्ट पार्टी ची भूमिका तेलंगाणा बद्दल मुनी बाबाची आहे.
TRS पार्टी ही मुळी अस्तित्वात आली ते स्वतन्त्र तेलंगाणा राज्य बनविण्यासाठी पण धर सोड धोरणा मुळे काहीच साध्य करु शकलेली नाही.
भारतीय जनता पार्टी तर या बाबतित लपंडावचा खेळ खेळत आहेत.
तेलंगाना विभागाचे राजकीय नेते मण्डळी मग ते कोंत्याही पार्टिचे असोत त्याना आपल्या मतदाराचे हीत जर जपता येत नाही तर त्यानी हे निश्चित लक्षात ठेवावे की लोक क्षोभे पुढे त्यांचा काय निभाव लागणार आहे ? आपल्या जनतेचे प्रश्न समजावुन घेउन सोडविण्याचा प्रयत्न केला नाही तर जनता सर्व लेखा जोखा करुन केव्हा तोंडघशी पाडेल याचा नेम नाही तरी सावध असावे. आपला इतिहास सांगतो लोकमत हे सर्वस्वी अन्तिम असते, आणि आत्ता फक्त वाट आहे ते कधी घडेल ?
वरिल सर्व कारण मीमांसा वरुन असे लक्षात येते की आन्ध्र व रायलसीमा विभागातिल नेते व जनता याचा अधिक प्रभाव इथल्या सरकारवर आहे व त्या योगे ते आपली प्रगति साधत आहेत. " स्वतन्त्र तेलंगाना " ह्या मागणीस ते विरोध करित राहतिल व समेटाची भाषा सतत बोलतील कारण त्याना महित आहे की जर तेलंगाणा राज्य झाले तर त्यांच्या हाती काय येणार आहे. जर का हे आन्दोलन अधिक तीव्र व सर्व थरातुन होउ लागेल तेव्हा भरपुर काही देण्याचे आश्वासन देउन समेट घडून आणण्याचा प्रयत्न करतील असे एकंदरीत दिसते.
एकंदर सर्व घाड़ामोडी बघून शाशंकपणे मनाला विचारावे वाटते " स्वतन्त्र तेलंगाना" राज्य बनेल का ?.................
भविषात भारत असा असेल ............
माधव ना बासरकर.
९-३-२०११.
-----------------------------------------------------------------------------------------------------------Referances ----
Wikipidia-Article Telangana
Google Imeges.
shri krishna commossion report.
BBC News 2009.
A Demand of saparete Telangana-- Dr. Jay shankar.
Mulki Agitation in Hyderabad.
Telangana rebellion in India ---Elliot Carolyn.
New telangana state to be Hyderabad state--Article Indian Express (1956)
Hydrabad Mukti Sangram.
Vepa Chedu Org.
Telangana Movement--Dr. Jayshankar.
1 टिप्पणी:
आंध्र प्रदेशच्या पोलिसांपासून सुटका व्हावी यासाठी नक्षलवादी हे आंदोलन चालवीत आहेत अशी शंकायेते.
टिप्पणी पोस्ट करा