गुलाब पुष्पचे रंग व त्यांचे म्हणणे........
गुलाबाला नवी पालवी फुटत आहे आणि त्याच्या फांद्यावर नवीन काळ्या उमलत आहेत. ह्या काळ्या जेव्हा पूर्ण फुलात रुपांतरीत होतील तेव्हा संपूर्ण आसमंतात सुगंध दरवळेल सर्व वातावरण व जीवन आनंदाने भरून जाईल.
ह्या रंगी बेरंगी फुलांत कोमलता, कल्पना आणि संवेदनशीलता ओतप्रोत भरलेला असतो.
प्रेमाचे प्रतिक बनून कित्येकांना प्रेम समजावतात तर काहीवेळा उदास व एकटेपणाचा त्यांच्या रंगातून तो व्यक्त होतो.
प्रेमाचे प्रतिक बनून कित्येकांना प्रेम समजावतात तर काहीवेळा उदास व एकटेपणाचा त्यांच्या रंगातून तो व्यक्त होतो.
मनुष हा भावनांचा व संवेदनाचा पुतळा आहे. तो उद्वेग व सर्व प्रकारचे संवेदना यांची अभिव्यक्ती वेळो वेळी
करीत असतो. अश्या भावना मूकपणे व्यक्त करण्यास फुल हे चांगले मध्यम आहे.
रंग आणि सुवासांनी ओतप्रोत भरलेला फुलांचा राजा गुलाब व त्याचे निरनिराळे रंग कोण कोणत्या भावना अभिप्रेत करतात ते आपण पाहू या.
रंग आणि सुवासांनी ओतप्रोत भरलेला फुलांचा राजा गुलाब व त्याचे निरनिराळे रंग कोण कोणत्या भावना अभिप्रेत करतात ते आपण पाहू या.
आपण लाल गुलाब हा प्रेमाचा प्रतिक मानतो. आणि ज्यानां आपण हा गुलाब भेट देतो तेव्हा तुमचे प्रेम घेणारया व्यक्तीस अभिप्रेत आहे किवा असे म्हणू आपण त्याच्या प्रती प्रेम व्यक्त करतो., म्हणूनच " व्हेलनटाइन डे " च्या दिवशी लाल गुलाबाला जास्त मागणी असते.
भावना माझ्या जाणुन घे
हे तुला लाल गुलाब सांगतो,
ह्रदयी माझ्या तुच असशी,
दरवळ तुझ्या आठवणीतच असतो.... ......नंदू
२ ) पिवळा गुलाब :---
भावना माझ्या जाणुन घे
हे तुला लाल गुलाब सांगतो,
ह्रदयी माझ्या तुच असशी,
दरवळ तुझ्या आठवणीतच असतो.... ......नंदू
२ ) पिवळा गुलाब :---
जर प्रेम संबध नसेल तर नुसते मित्रता ठेवावयाची असेल तर पिवळा गुलाब हा उत्तम भेट होईल.
नव विवाहित जोडप्यास किवा नुकतीच आईपण अनुभवणारी आणि कोणत्याही शुभ प्रसंगात जर पिवळा गुलाब भेट दिला तर आपल्या भावना त्यांच्या पर्यंत पोहचतील.
पदरात तुझ्या सार्या,
जगाचे सुख सामावले,
पिवळा गुलाब म्हणतो,
काट्यांनीच बोचण्याचे दुखः कमावले......... नंदू
३) जांभळा गुलाब ( लीलेक रोज ) :---
पदरात तुझ्या सार्या,
जगाचे सुख सामावले,
पिवळा गुलाब म्हणतो,
काट्यांनीच बोचण्याचे दुखः कमावले......... नंदू
३) जांभळा गुलाब ( लीलेक रोज ) :---
ज्या वक्तीला हा लीलेक रोज ( जांभळा गुलाब ) देण्यात येतो ती देणारी व्यक्ती " प्रथम तुज पाहता..." प्रेमात पडलो हा संदेश देतो.
स्वप्न असो की सत्य तुझा,
गुलाबी चेहरा मी त्यात पाही,
"जांभळ्या"गुलाबाच्या बागेत,
तुझे नारंगी हासु बागडत राही...............नंदू
४ ) पांढरा गुलाब ( श्वेत गुलाब ) :--
हा गुलाब सच्चेपणा ,निरागसतेचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही हा गुलाब भेट देता तेव्हा असे अभिप्रेत होते कि " I miss you " " आठवण येते "
अंतरीचे ते स्वप्न माझे,
सत्यात कधी उतरेल का,
पांढरा गुलाब प्रितीचा हा,
जीवनी कधी बहरेल का.......... नंदू
५ ) सुकलेले गुलाब :--
बरयाच वेळा आपले संबंध अशा एका टोकाला जाऊन पोहचतात कि पुन्हा मागे फिरणे शक्य नसते
वाटते कि आता सर्व काही संपले .
अशा वेळी शब्दा मध्ये सांगणे महाकठीण असते पण जर सुकलेला गुलाब दिला गेला तर हा
संदेश निश्चित त्यांच्या पर्यंत पोहचेल.
जायचेच होते सोडुन मला तर,
आठवणीत माझ्या आलीस का,
सुकल्या गुलाबाची लाल पाकळी,
माझ्या ओंजळीत टाकुन गेलीस का......... नंदू
सर्व चित्रे गुगल इमेजच्या सौजन्याने .
कविता आमचे मित्र श्री नंदू सावंत (फेस बुक मित्र मुंबई ) यांच्या सौजन्याने.
कविता आमचे मित्र श्री नंदू सावंत (फेस बुक मित्र मुंबई ) यांच्या सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा