आश्वीन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुध्द द्वितीये पर्यंत जो दीप उत्सव आपण भारतीय साजरा करतो मोठ्या उत्साहाने त्यालाच " दिवाळी " किवां " दीपावली " असे म्हणतात .
दीपावली हा शब्द दीप आवली ( ओळ,रांग ) असा बनला आहे. त्याचा आर्थ आहे दिव्याची रांग किवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासुन बनला आहे.
आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, `दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे', असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूत: ते सण वेगवेगळे आहेत.
वसुबारस........( आश्विन शुध्द द्वादशी )
"वसू " या शब्दाचा अर्थ " धन " किवां " द्रव्य " असा आहे. यादिवसाला " गोवत्स द्वादशी " असे पण ओळाखले जाते. सायंकाळी गोमाता व तिचे पाडस यांची मनोभावे पूजा केली जाते कारण या योगें घरात लक्ष्मी चे आगमन होतें असा समज आहे. या दिवसा पासून दीपावलीची खरी सुरवात होतें कारण लोक घरापुढे पणत्या लावतात व रांगोळी काढतात ते दिवाळी संपे पर्यंत.
धनत्रयोदशी ........ ( आश्विन कृष्ण त्रयोदशी )
भगवान धन्वंतरीची पूजा करा. घरात नवीन झाडू किवां सूप खरेदी करून त्याची पूजा करा. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी. मंदिर ,गोशाला, घाट,विहीर,तलाव,बागेत दिवा लावावा.
तांबे, पीतळ, चांदीच्या गृहपयोगी वास्तु व आभूषणाची खरेदी करा. कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट,गोशाला ,विहीर,मंदिर आदि स्थानावर तीन दिवस दिवा लावा.
नरक चतुर्दशी ........( कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शी )
कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.
या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
हें व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते.रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.
चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.
या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.
दत्तो दीप: चतुर्दश्या नरक प्रीतये मया //
चतु: वर्ती समायु सर्वपापापनुत्तये //
संध्याकाळी घर, दूकान, कार्यालय आदि प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.
नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे.
नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती.
त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता.
लक्ष्मीपूजन........ ( अमावास्या )
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो.
महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो.
भाऊबिज ..................
यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने खलील मन्त्र म्हणून भावाच्या दिर्घायुषासाठी प्रार्थना करावी .
भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।।
तसेंच भावाला गोड जेवण घालुन त्यास औक्षण करावे व भावाच्या दीर्घायुषांसाठी
प्रार्थना करावी व भावाने जर बहिण मोठी असल्यास तिच्या पाया पडावे व भेटवस्तू द्यावी व तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी व आशीर्वाद घ्यावा.
या दिवशी यमपूजा केली जाते व खालील यामंत्र म्हणावे.
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।
पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।
चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग करावा
मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।
धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्या नरकासूरांचा नाश केला पाहिजे.
दिवाळीच्या दिवशी 'तमसो मां ज्योतिर्गमय' या मंत्राची साधना करून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षादिवाळीच्या दिवशी जुने भांडण विसरून शत्रूला जवळ केले पाहिजे.
नवीन वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस! अशा प्रकारे समजूतदार ज्ञानाचे दिवे आपल्या मनात लावले तर आपले जीवन सदैव दीपोत्सवा सारखे उजळेल
दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-
१ ) प्रभू रामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परतत असताना त्यांच्या वाटेवर अयोध्याच्या लोकांनी दिवे लाऊन त्यांचे स्वागत केले असे त्रेतायुगांत सांगितले आहे.
२) श्री कृष्णाने अत्याचारी नरकासुराचा जेव्हा वध केला तेव्हां समस्त गोकुळवासियांनी
आपला आनंद दिवे लावून व्यक्त केला अशी कथा प्रचलित आहे.
३) देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा नाश केला तरी तिचा क्रोध कमी जाहला नाही. तेव्हां भगवन शंकराने स्वतः देविच्या चरणी लोटांगण घातले व त्यांच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत जाहला. ह्या दिवशी लक्ष्मीची तिच्या रोद्ररुपाची पूजा करण्याची प्रथा आहे.
४) बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर संपूर्ण त्रैलोक्यावर विजय मिळविला या विजयामुळे देवलोक भयभीत झाले व त्यांनी विष्णूची प्रार्थना करून देवलोक वाचविण्यास साकडे घातले. विष्णूनी देवांची प्रार्थना ऐकून वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत मावेल एवढे भूभाग दानात मागितला. बळीराजाच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूनी त्यांच्या तीन पायांत तीन्हीलोक सामावले गेले. बळीराजास पाताळाचे राज्य देवून देवलोक देवांस दिले आणि या दिवसाची आठवण म्हणून भू-लोकवासी प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे विष्णूनी आश्वासन दिले.
५) शिखांचे सहावे गुरु हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक महिन्याच्या आमावस्येला अमृतसरला परत आले म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
६) दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. त्यां आनंदा प्रीत्यर्थ गोकुळवासी दुसऱ्या दिवशी अमावास्येला दिवे लावून
साजरा करतात.
७) इसवी सन पूर्व ५०० वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या पुरातन मातीच्या मूर्ती आणि त्याच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना सापडली त्यावरून असे अनुमान आहे कि त्यांकाळी दिवाळी साजरी केली जात असे.
८) इसवी सन पूर्व २५०० वर्षापूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वगता प्रीत्यर्थ दिवे लावून दिवाळी साजरी केली होती.
९) सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता.
१०) इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावास्येच्या दिवशी मंदिरांत व नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असत.
११) अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरु झाले होतें.
१२) जैन धर्मांचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी बिहार मधील पावापुरी येथे आपल्या शरीराचा त्याग केला होता तो दिवस दिवाळीचा होता. " महावीर सवंत "
त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरु होतो. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आढळते.
महावीर यांच्या निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझली व त्याची आठवण म्हणून दीप प्रतिक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रांत सांगितले आहे.
महावीर यांच्या निर्वाणामुळे जी अंतरज्योती कायमची विझली व त्याची आठवण म्हणून दीप प्रतिक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रांत सांगितले आहे.
१३) पंजाब मध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगा किनारी स्नान करताना " ओम " म्हणत संमाधी घेतली.
.
१४) महर्षी दयानंद ज्यांनी आर्य समजाची स्थापना केली त्यांनी दिवाळीच्या दिवशी अजमेर जवळ समाधी घेतली.
१५) मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर ४० गज उंच अस्या बांबूवर मोठा आकाश कंदील लावला जात असे व राजमहालात मोठ्या आनंदाने बादशाहा देखील दिवाळी साजरी करीत असे.
१६) हिंदुस्तानचा मोगल वंशाचा शेवटचा सम्राट बहादूरशहा जफर दिवाळीचा सण
१७) शहा आलम (दुसरा ) यांच्या काळात संपूर्ण शाही राजवाडा दिव्यांनी सजवला जात असे. लाल किल्ल्यावेरील कार्यक्रमात हिंदू-मुसलीम मोठ्या संख्येने सहभागी होत असत
------------------------------------------------------------------------------------------------------
१६) हिंदुस्तानचा मोगल वंशाचा शेवटचा सम्राट बहादूरशहा जफर दिवाळीचा सण
साजरा करीत असे. दिवाळीच्या अनुशंघाने आयोजित कार्यक्रमात सम्राट सहभागी होत असत.
------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व माहिती निरनिराळ्या लेख व निबंधातुन संगृहीत केले आहे. छायाचित्रे गूगल इमेजस च्या सौजन्याने.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा