तो दिवस मला अजुनही आठवतो पुणे स्थानकांत
सिकंदराबाद एक्स्प्रेस ३२ अप आपल्या पुढच्या प्रावासाठी सज्य होती ,तिच्या
सुटण्याची वेळ होऊन गेली तरी का सुटत नाही ? ही चर्चा सर्व
प्रवाश्यामध्ये चालु असता कुणीतरी खिडकीतून डोकावून बघितले ग्रीन सिग्नल दिलेला
दिसत होता पण गार्ड शिट्टी तोंडात ठेवून न वाजवता कोणाच्या परवानगीची वाट पाहत
होता हे प्रवाश्याना एक कोडच होत . ह्या गाडीचा उशिरा सुटण्यामुळे सर्व
फेरीवाल्यांचा धंदा भरपूर झाला. चायवाला, नाश्तावला,
पेरूवाला,
पाणीवाला सर्वांचा धंदा व्यवस्थित
झाल्याचे समाधान त्यांच्याकडे बघुन जाणवत होते.
शेवटी तिष्ठत उभी असलेले मंडळींनी श्वास सोडला जेव्हा
गार्डनीं शिट्टी वाजवून हिरवा झेंडा इंजिनास दाखवला आणि एकदाची ही गाडी पुणे
स्थानक सोडून आपल्या निर्धारित प्रवासास मार्गस्त झाली.
माझी ड्युटी त्यादिवशी फर्स्ट क्लास
वातानुकूलित कोचवर होती .गाडीने पुणे सोडतानाच मी आंत चढून रिझर्वेशन चार्ट नजरे
खालून घालत होतो . गाडीने खडकी सोडली आणि माझी नजर सहज कोचच्या प्रवाश्यावर गेली
तेव्हा माझ्या नजरेस एक बाई बहुधा सिंधी असावी तिच्या शेजारी एक आया प्रमाणे दिसणारी
बाई व तिच्या जवळ एक छोटस बाळ फार फ़ार तर १,२ महिन्याचे
असावे अतिशय गोंडस होते ते बाळ. त्या आयाचेपण तिकीट फस्ट क्लासचे असल्यास मनात आले
अशी पण माणसे आहेत जी आपल्या अटेण्डेण्टना पण आपल्या सोबत फस्ट क्लासमध्ये घेऊन
जातात. मी माझे तपासणीचे काम करीत करीत त्या सिंधी बाईकडे पोहोंचलो तेव्हा कळले की आयाचे तिकीट तिसर्या वर्गाचे आहे . मी त्यांना
समजावले की नियमा प्रमाणे त्या ह्या
कोचमध्ये प्रवास करू शकत नाहीत तेव्हा त्या म्हणाल्या की लोणावळ्यास तिला तिकडे
पाठवते.
लोणावळा स्टेशन आले तशी ती आया उतरली व मागच्या
डब्यात बसण्यास निघुन गेली. आता गाडीने लोणावळा सोडले आणि घाटातुन मार्गक्रमण करीत
पुढच्या प्रवासास निघाली. कोच मध्ये तशी
शांतता होती ती तरुण सिंधी एकटीच बसली आणि
तिचे मुलं गाढ निद्रिस्त झाले होते.
गाडीने दोन ठिकाणी थोडी थांबत थांबत घाट उतरत कर्जत स्टेशन गाठले. मी खाली
उतरून सर्व काही ठीक आले ते बघुन परत माझ्या जागी स्थानापन्न झालो. गाडीने आता वेग
घेत अंबरनाथ पार केले आणि पंधरा मिनिटांनी कल्याण जंक्शन येईल ह्या विचारात थोडी
विश्रांती घ्यावी म्हणून डोळे मिटून स्वस्थ बसलो. इतक्यात " कंडक्टरजी ,कंडक्टरजी
" अशी हाक आली माझी तंद्री भंग पावली व कोण हाक मारतोय हे बघितले तर काय तीच
सिंधी तरुण अतिशय घाबरलेली रडत माझ्याकडे आली व म्हणाली " मास्टरजी "
मेरे पचास हजार
रुपये गाडीमेसे गीर गये . मी लगेच खिडकीतून बाहेर बघितले व कोणत्या नंबरचा
खांब गेला व लगेच जोरात साखळी ओढली .
गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक्स लावले आणि गाडीचा
वेग हळूहळू मंदावत होता आणि काही क्षणातच गाडी थांबणार होती . त्या अवधीतच मी त्या
तरुणीस किती पैसे पडले हे लोकांनी विचारले तरी सांगूनये अशी सूचना केली व तिला
विचारले ते कसे पडले? ती म्हणाली मी स्वच्छता गृहात गेली आणि जसे
कामोटचे झाकण
उघण्यास लवले तेव्हाच माझ्या
ब्लॉउज मध्ये रुमालात बांधून ठेवले १०० रुपयाचे नोटा खाली कामोट मध्ये पडले .पैसे
गुंडाळून ठेवलेला रुमाल बांधलेले नव्हता तेव्हा नोटा वाऱ्यामुळे गाडी खाली पडताना
सुट्या होऊन उडत गेल्या .
गाडी विठ्ठलवाडी जवळ थांबली आणि गार्डनी लाल
सिग्नल दाखवत आमच्या कोच पर्यंत आला .त्यांना मी थोडक्यात सर्व हकीकत सांगितली
तेव्हा तो म्हणाला इतके पैसे ? त्या काळात ती रक्कम तशी मोठीच होती.
गार्डने गंभीर होत म्हणाला " चलो हम पीछे जायेंगे और देखेंगे " मी त्या
तरुणीस म्हणालो आम्ही मागे जातो आणि बघु मिळतात का पैसे . खाली उतरून वाकून
बघितले असता एक १०० ची नोट नळकांड्यास
चिटकलेली दिसली ती काढली आणि गार्डसह मागच्या बाजुस निघालो.
गार्डने लाला झेंडा आपल्या डब्यास अडकवला व थोडे दूर गेलो तेव्हा आम्हास एक लोकल अंबरनाथकडे जाताना दिसली . मोटरमनने थांबलेले गाडी बघुन व आम्ही दोघे
ट्रकमधून चालत काही तरी हुडकत असलेले बघितले व त्याने लोकल आमच्या जवळ थांबवली व
आम्ही मोटरमनच्या कॅबिन मध्ये चढून त्यास मागच्या खांबाचा नंबर जवळ सोडण्यास
विनंती व त्यास झाल्या गोष्टीची कल्पना दिली. मोटरमनने त्या नंबरचा खांब
येताच आम्हास उतरविले आणि तो पुढे गेला. आम्ही दोघे नोटा शोधण्यास सुरवात केली
.थोडे चालत पुढे गेलो तर शंभराच्या
हिरव्या नोटा बऱ्याच ठिकाणी दिसल्या आम्ही एक ,दोन , तीन
असे गोळा करत करत क्रॉसिंग पर्यंत पोहचलो .त्या क्रॉसिंगला चार
मुले जात होती आणि त्यांना पण त्या नोटा
दिसल्या ती मुले आनंदाने नाचत ज्याला जेवढी मिळतील तशी खिश्यात कोंबत होती. आम्ही त्या मुलांना थांबविले व आम्ही तेच
शोधत आहोत हे सांगितले आमच्या युनिफॉर्म
मुळे आम्ही रेल्वे अधिकारी आहोत हे मुलांना कळले होते . मुलांना सांगितले की गोळा
केलेल्या सर्व नोटा परत करा .मुलांनी खिश्यात त्या कोंबलेल्या नोटा नाराजीने आम्हास दिल्या
व आपल्या वाटेने गेले.
थोड्या अंतरावर काही मजदूर रेल्वे रुळावर काम
करताना दिसत होते . मनात शंका आली की
ह्यांना पण काही नोटा सापडल्या असतील तर त्यांच्या बाजुस जाऊ लागलो . इतक्यात
त्यातील एक मजुर रुळांची दुरुस्थी करीत
आमच्याकडे येताना दिसला .तो जवळ आला व हलकेच दबक्या आवाजात म्हणाला साहेब आमच्या मुकादमाला कसलेतरी एक छोटे पुडके मिळाले
आहे तेच कदाचित तुम्ही शोधात आहात तो तिकडे आहे. आम्ही बघुन न बघितल्यासारखे केले
आणि त्या दिशेने चालू लागलो . मुकादमाकडे दोन मिनिटे बघताच तो चपापला व घाबरला .
आम्हीं त्याला सांगितले की आम्हाला माहीत आहे की एक छोटे नोटांचे पुडके तुला
रुळामध्ये सापडले ते बऱ्याबोलाने आमच्या स्वाधीन कर. आमचा रोख बघून त्याने आपल्या
खिश्यातुन नोटांचे छोटे बंडल काढून दिले . गार्ड म्हणाले "और होंगे नोट तो निकालो " त्याने
मग चक्क आपला रिकामा खिसा काढून दाखविला .
आता पर्यंत जवळ जवळ अर्धा तास होऊन घेला आणि गाडी उभी ठेवली आणीक
लेट झाली तर साहेबाना जाब द्यावं लागेल तेव्हा आम्ही मिळतील तेवढ्या नोटा घेतल्या आणि गाडीकडे निघालो .
आम्ही जसे डब्या जवळ पोहोचलो बोघतो तर अजून एक
नोट दिसली ती पण उचलली आणि आंत
शरलो. त्या सिंधी तरुणीला गार्डची ओळख करून दिली आणि हे सांगितले की ह्यांच्या मदतीने जितक्या मिळतील तितक्या नोटा जमवील्या. अगोदरच उशीर
झाला होता गार्ड आपल्या जागेकडे जाता
जाता इंजिन ड्रायव्हरला हिरवा
सिग्नल दाखवत आपल्या जागेवर पोहोचला . पुन्हा एकदाचीगाडी आपल्या गंतव्य स्थानी
जाण्यास निघाली. मी त्या बाईंना जमा केलेल्या सर्व नोटा दिल्या आणि घडलेली सर्व माहिती सांगितली आणी विनंती केली की आपले निवेदन व मिळालेल्या रकमेची पोच द्यावी .
निवेदन आणी पोच पावती त्यांच्या कडून घेतली . आमची कर्तव्यदक्षता व मेहनतीचे आभार
त्यांनी आपल्या निवेदनात केले . पैसे परत मिळाल्याचे समाधान तसेच काही कमी
मिळाल्याची हळहळ त्यांच्या डोळ्यात दिसत होती . आपल्या गाफील पणामुळे दहा हजार
गमवावे लागले ही तर जबर किंमत होती त्याचे
वाईट वाटत होते .
दादर स्टेशन आले तिने आपले सामान व तान्हुल्यास
संभाळत खाली उतरली आयाने सर्व सामान उतरवून
घेतले . त्यांना रिसिव्ह
करण्यास घरची मंडळी पळत प्ल्याटफॉर्मवर हजर होती .मी खाली उतरलो
तेव्हड्यात गार्डपण
आले आम्ही झालेली हकीकत त्यांना सांगितली ते तर चाटच झाले . उतरून
घेण्यासाठी आलेले त्या बाईचे सासरे
होते त्यांनी सांगितले की ती रक्कम खरे तर त्यांच्या एका मित्राची
आहे ती
त्यांच्या बिझिनेस पार्टनरने त्यांना देण्यासाठी त्यांच्या सुनेकडे दिले होते.असो जे झाले ते झाले
असे म्हणत आपल्या सुनेचे
सांत्वन केले आणी आमच्या झालेल्या धावपळीचे तसेच तत्परतेचे कौतुक
करीत कृतघ्न्ता
व्यक्त करीत आभार मानून गेले. ते जाण्या
अगोदर मी त्यांचे नाव व पत्ता घेतला हे बघून
गार्ड माझ्याकडे प्रश्नर्थक दृष्टीने
बघितले मी कखूणेनेच नंतर बोलू असे सांगितले.
गार्डेने
हिरवा सिग्नल दाखवला ट्रेन व्हीटीच्या दिशेने निघाली. व्हीटी स्टेशन आले आम्ही आपआपल्या
डिपार्टमेंटला गेलो व आजचा
रिपोर्ट तय्यार करून साहेबाना दिला . ह्यांत घडलेला संपूर्ण घटणे बाबत
सविस्तर
लिहिले . ह्या घटनेमुळे गाडीचे डिटेन्शन जवळ जवळ ४० ते ४५ मिनिटे झाली पण इलाज
नव्हता आम्ही हेल्पलेस होतो . साहेबानी तो रिपोर्ट वाचला आणी पुढे वरिष्ठांना
पाठवतो म्हणाले . काही
दिवसा नंतर कळले की वरिष्ठ अधिकारी तो रिपोर्ट वाचून खूप
समाधानी झाले कारण कंडक्टरने आपले
कर्तव्य नीट बजावले होते. त्यांनी ह्या कर्तव्यदक्षते बद्दल
प्रमाणपत्र दिले आणी माझ्या सर्व्हिस रेकार्डवर
पण तसे नमूद केले. मला अतिशय आनंद
व समाधान मिळाले लवकरच माझ्या बढतीचे इंटरव्हू होणार
होते.
गार्डनीं पण आपला रिपोर्ट दिला व त्यांत ह्या
घटनेमुळे गाडी ४० ते ४५ मनीटे
गंतव्यस्थानी उशिरा
आली . त्यांच्या वरिष्ठांनी ह्याच कारणासाठी त्यांना
चार्जशीट का देवूनये अशी विचारणा केली.गार्डनीं
आपली कैफियत परत एकदा सविस्तर मांडली व बऱ्याच खटपटी नंतर त्यांचे चार्जशीट रद्द झाले पण
वार्निंग मात्र मिळाले.
दोन एक महिन्यांनी गार्ड मला ड्युटीवर असताना भेटले तेव्हा त्यांनी ही हकीकत सांगितली . हातजोडून
म्हणाले ह्या नंतर असे उपकाराचे
काम कधीच करणार नाही. तसे बघितले तर ही रेल्वे आहे लोकल प्रमाणे
दोन्ही बाजूने चालते नाहीतर बघाना
रेल्वे एकच आहे पण ह्याचे दोन डिपार्टमेंट
एकाच घटनेचा
वेगवेगळा पद्धतीने विचार करतात . ज्या चांगल्या कामां बद्दल
आपणास आपले डिपार्टमेंट सर्टिफिकेट
देते
आणी बढती देते तर दुसरीकडे आमचे डिपार्टमेंट त्याच कामासाठी आपणास मदत केल्या बद्दल मला
वार्निंग लेटर देते
जसा मी काही मोठा गुन्हा केला आहे.त्यांची व्यथा ऐकून मन उदास जाहले .
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा