शनिवार, १३ जुलै, २०१३

आम्ही खरेच राक्षस झालो का ?




भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत  प्रश्न आम्ही सोडवु  शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य  मिळुन  काय उपयोग झाला. ह्या काळात लोक संख्या ३० कोटी वरून आज १३० कोटी झाली .जस जशी वर्षे जातील लोकसंख्या  वाढतच जाणार मग  मुलभुत  गरजा अन्न,पाणी व निवारा ह्याचे काय होणार ? ह्या सुविधा आपण कश्या देणार ? येणारया  काळात जर नाही देवू शकलो तर बळजबरीने हुसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल ह्याला जवाबदार कोण असेल ? असे अनेक प्रश्न दुर्लक्षित झाल्याने कोणती आपत्ती आपल्यावर ओढवणार आहे ह्याची चिंता आहे का ? इतके सर्व स्पष्ट दिसत असताना आम्ही इतके उदासीन का आहोत ?



दिल्लीतील सामुहीक  बलात्कार आणि त्यानंतर येणारया  तशाच प्रकारच्या  बातम्या हे कश्याचे द्योतक आहे ? अनेक जणांनी अनेक उपाय सुचविलले पण मुळात अशी प्रवृत्ती का वाढीस लागली ह्याचा विचार कुणी करतील का ? मुळात असे प्रकार का घडतात ? आपण संस्कार देण्यात कुठे तरी कमी पडतो आहोत का ? आई ,वडील, समाज कुठे तरी ह्या बाबतीत चुकत आहे हे निश्चित .चंगळवाद वाढीस लागलेला दिसतो का ? विकृति कुठल्या टोकाला जावून पोहोचणार आहे ?



अश्या घटना घडत असताना आपण बघ्याची भूमिका का घेतो ? समोरचा व्यक्ती आपणास जिवे  मारेल म्हणून ? त्या प्रसंगी पिडीत महिलेत आम्हास आपली बहिण , आई का दिसत नाहीत ? का आपण षंढ बनतो व तसे वागतो ? सर्वांचीच संवेदना गोठली आहे जनता , राजकर्ते, तत्ववेत्ते ,विद्ध्वनाची  नुसत्या मेणबत्या पेटवून, त्या प्रसंगावर मोठ मोठी भाषणे देवुन  , सहानूभुति  प्रगट करून आपले इति कर्तव्य झाले का ? आजची परिस्थिती अशी आहे कि घराबाहेर गेलेला  संध्याकाळी परत येईल ह्याची शास्वती राहिलेले नाही. आपण खरेच सामान्य जिवन जगु  शकु  का ? कोणावरही  भरवसा राहिलेला नाही असे जगणे ह्याला जगणे म्हणता येईल ?



जुनी जाणती म्हणतात इंग्रजाच्या काळात असे होत नव्हते सगळ्यांना भीती होती आणि पोलिसांचा वचक होता सर्व काही सुरळीत चालत होते .स्वातंत्र्य मिळाले ब्रिटीश गेले आणि नवी जमात " नेते "आले पण सामान्य माणसांच्या जीवनांत बदल झाला का ? शेतीस पाणी नाही, पिण्यास पण नाही, अन्न धान्य महागले, अराजकता वाढली, सर्व अमानुष झालो, नीतिवान समाज अनीतीने वागायला लागला, संस्कार क्षम नाही अश्या प्रमाणे आम्ही स्वतंत्र राक्षस झालोच ना ?



आम्हाला परत स्वतंत्र माणुस  व्हायचे आहे प्रत्येकाच्या डोळ्यात माणुसकी बघायची आहे हे सर्व घडायचे असेल तर जनतेला जागृत व्हायला हवे व चांगल्या राजकर्त्यांची निवड करावि  लागेल.समाज नीतीने चालेल नसता जगण्याला अर्थच राहणार नाही मग कदाचित आपण राक्षस बनू. 


 बघा सुजलाम सुफलाम म्हणविणारा भारत खऱ्या  अर्थाने बनविणे हे सर्वस्वी भारतीय नागरिकांच्या हातात आहे ते मतदानातुन चांगली  पर्यायी राज्यव्यवस्था स्वीकारावी लागेल तेव्हाच हे शक्य होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: