स्यान फ्रान्सिस्को इंटरन्याशनल एअरपोर्ट दुपारची वेळ , विमल आपल्या दोन मुलाना घेऊन शेखर शिवाय पहिल्यांदाच प्रवास करीत होती. धास्तावलेली कारण भारताचा प्रवास २० ते २२ तासांचा व त्यांत पैरिस ला विमान बदलणे मुलं व सामना समवेत होते. ऐरपोर्टचें सर्व सोपस्कार आटोपून विमानाचे बोर्डिंग पास घेऊन विमानात आरूढ होणे हें म्हणजे एक दिव्यच आहे जें करतात तेचं जाणो .
विमल दोनीही मुलाना विकी मुलगा व विनी मुलगी साधारण ६ व ३ वर्षाचे असतील त्यांना घेऊन एअर पोर्ट च्या दाराशी थबकली व आपण सर्व सामान व्यवस्थित घेतले ह्याची खातरजमा करीत असतानाच विनीने तिचा हात झटकून धूम ठोकली ते थेट आंत पण सेक्युरिटी ने तिला आडविले, त्यामुळे तिने घाबरून भोकाड पसरले व खाली लोळणच घेतली. विमलने तिला कसे बसे सावरून सर्वांचे पास पोर्ट व तिकिटे तपासनीस देऊन दालनात प्रवेश केला.
तिची नजर शेखर कुठे दिसतो का शोधण्यात मग्न असताना एकदाचा दिसला टाटा, बायबाय दोन्ही कडून हात हलून निरोप घेतला गेला व विमलचे डोळे पाणावले ,कदाचित विरहामुळे किवां प्रवासाच्या धास्ती मुळे असेल.
विमानाचे बोर्डिंग पास घेऊन सामान मुल साभाळत ती एकदाची प्रतीक्षालयातील एका बाकावर स्थिरावली. विमलच्या मनांत इच्छा कि बाजूचे आसन ( सीट्स ) रिकामे मिळावे म्हणजे मुलांची झोपण्याची सोय होईल. तिने विमानातील ३-५-३ अशा बसण्याच्या व्यवस्थेत मधल्या ५ आसना मधील मधले तीन आसन मुद्दाम मागून घेतले कारण जर कोणी आले नाही तर मुलाना निट झोपता येईल.
भारतात जाणारे विमान पैरीस,लंडन मार्गे मुंबईस जाणार होते. एकदाचे उद्घोषणा झाली व विमल मुलाना आणि सामान घेऊन तयार होत असतानाच परत उद्घोषणा झाली " मुंबई कडे जाणारे विमान तयार आहे प्रथम वृद्ध ,लहान मुले व व्हील चेअर्स वर असलेले प्रवासी ह्यांनी प्रथम विमानात चढावे व नंतर इतर प्रवासी " विमलने विमानात प्रवेश केला हवाई सुंदरीने हासत मुखाने सर्वांचे स्वागत केले व सीटवर बसण्यास मदत करीत होती. विमल मुलां समवेत आपल्या निर्धारित सीट्स वर स्थिरावली .
आतां जवळ जवळ संपूर्ण विमान भरले ,सुदैवाने विमालच्या शेजारील दोन ही आसने रिकामी राहिली. विमलने दोन्ही मुलाना आपल्या दोन्ही बाजूस वेगवेगळे झोपवले. तिचा पैरीस पर्यंतचा प्रवास सुखाचा झाला. आतां उरलेला प्रवास पैरीस मार्गे लंडन ते मुंबई तो एकदाचा पार पडला कि हूश sss.....
पैरीसला विमान वेळेत पोहचले व तेथुन दुसरे विमान मुंबईस लंडन मार्गे जाण्यास जय्यत तय्यार होते. ते विमान गेट नंबर ४५ वरून सुटणार होते. विमलने आपले सामान व मुलांनां घेऊन ४५ नंबर गेट वर पोहचली व तिने मुलांचे खाणे पिणे आवरून वाट पाहत बोर्डिंग गेटच्या एका बाकावर बसली. मुलांच्या धिंगा मस्तीत व त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देता देता एक तास कसा गेला ते तिचे तिलाच कळले नाही.
दुसरे विमान ठरल्या वेळे प्रमाणे पैरीसहून लंडन मार्गे मुंबईसाठी निघाले पण यावेळी विमालच्या शेजारील एकच सीट रिकामी राहिली. बोर्डिंगचें सोपस्कार पूर्ण करून विमान लंडनच्या दिशेने झेपावले. लंडन हिथ्रो विमानतळावर उतरावे लागणार नव्हते फक्त तिथे मुंबईस जाणारे लोक चढतील. हिथ्रो विमानतळावर विमान उतरण्या पूर्वी विमानात गोड आवाजात सूचना मिळाली कि विमानात काहीं किरकोळ बिघाड झाल्या मुळे सर्वाना उतरावे लागेल व दुरुस्ती नंतर विमान परत मुंबई कडे रवाना होईल. ही सूचना ऐंकल्यावर विमालच्या पोटात गोळा आला, आतां किती तास हिथ्रो विमानतळावर थांबावे लागेल आणि त्यांत मुलांचा त्रास आधीच ह्या प्रवासाला कंटाळेली त्यांत ही भर ह्या चिंतेन तिला टेन्शन आलं.
ठरल्या प्रमाणे सर्व प्रवासी विमानातून ट्राझीट लॉन मध्ये शिफ्ट झाले व सर्वाना खाण्या , पिण्याचे व्हाचर्स देण्यात आले. विमलने मुलांचे आपले खाणे आवरले व एका प्रशस्थ बाकावर वाट बघत बसली. विनी तर सैरावैरा भिरभिरत होती त्यामानाने विकी मात्र एकदम शहाण्या सारखा वागत होता हेही थोडके नसे .
थोड्या वेळाने एक मनुष विमल बसलेल्या बाकावर असलेल्या रिकाम्या जागी येऊन बसला. नजरा नजर होताच विमलने स्मित हास्य करून विनिस दंगा मस्ती न करण्याच्या सूचना देत त्या व्यक्तीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याच्या पेहरावरून तो भारतीय असावा असे वाटते.
" हाय "
" आपण कोठून आलात " त्यां व्यक्तीने विमला प्रश्न केला.
तिने औपचारिकता म्हणून सांगितले " अमेरिकेहून " लगेच दुसरा प्रश्न
" किती वर्षे अमेरिकेत आहात "
" विस वर्षे "
" अमेरिकेत कुठे असता ? "
" सानफ्रान्सिस्को "
त्यांच्याशी संभाषण करण्यास विमल अनुइच्छित होती म्हणून विमलने झोपण्याचे सोंग करत पडून राहिली.
त्यानं प्रश्न केला
" काय करता अमेरिकेत "
विमलने वैतागून त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्षिले. पण तो लोचाटा सारखा तोच प्रश्न विचारला ,एव्हाना मुले झोप्लाली आणि विमला जास्त वेळ झोपेच सोंग पण घेता येत नव्हते.
" आपण अमेरिकेत नौकरी करता " ?
" हो " विमल.
" आपले मिस्टर " ?
" ते पण करतात " विमल.
त्यां गृहस्थाच्या आगंतुक प्रश्नाना तिने " हां " " हो " " बरोबर " अश्या मोजक्याच शब्दात उत्तरे देत होती.
इतक्यांत विमानात उद्घघोषणा झाली "विमान थोड्याच वेळात बोर्डिंग सुरु होईल "
लगेच विमलने मुलांना व आपले सामान घेऊन ती बोर्डिंग पास व पासपोर्ट साभाळत गेट कडे जाण्यास निघाली.
" मी मदत करू का ? " त्याने विचारले.
विमल नाकार अर्थी मान हलविली कारण ती त्याच्या बरोबर संभाषण न करण्याचे प्रयत्न करीत होती.
एकदाचे सर्व सामान व मुलाना घेऊन विमानात स्थिरावली. विमला वाटले अजून पर्यंत शेजारची सीट वर कोणीही आले नाही. विमालच्या मनांत आले कि असेच रिकामे राहिले तर किती बरे होईल.
पण..... कसचे काय ? मनातले विचार मनांतच राहिले करण तीच व्यक्ती शेजारच्या सीटवर हसत मुखाने येऊन बसला. विमालचा भ्रमनिरास तर झालाच पण वाटले ही ब्याद पुन्हा...? विमलला वाटले आजचा प्रवासाचा दिवस फारच वाईट आहे.
विमानांची घरघर सुरु झाली, हवाई सुंदरीने प्रत्येकाचे सीट बेल्ट्स बांधण्यास सांगितले. बाजूच्या ग्राहस्थांकडे मुळी लक्षच द्यायचे नाही असा मनाचा निग्रह केला व मुलांच्या कडे लक्ष देत असतानाच विमानाने आकाशांत झेप घेतले.
विमलने समोरच्या टी.वी. वर विमानांची माहिती उंची, मार्ग, दिशा वेळो वेळी दाखवीत होते ते बघत मुलांच्या प्रश्नाची उत्तरे देत होती. विमानाने ४०,००० हजाराची फुट उंची गाठली तेव्हां स्थिर झाले. विकिला बाथरूमला जायचे होते त्याच्या साठी सर्व नवीनच होते आणि तो उछुकतेने सर्व बघत आई कडून माहिती घेत होता. विनी तर सारखी चुळबुळत होती.
हवाई सुंदरीने सर्वाना पेय व खाण्यासाठी देण्यास सुरुवात केली. शेजारचा गृहस्थ इतक्यावेळ गप्पच होता. विमलला वाटले कि बहुतेक त्याला कळले असेल आपण बोलू इच्छित नाही. असे वाटतच होते कि त्याने प्रश्न केला.
" आपले मुंबईला कोण आहे ? "
" नातेवाईक " विमल.
'" आपण कधि परत जाणार अमेरिकेला ? "
विमल ने कानाला हेड फोन लाऊन कुठलासा चेनल बघत होती, तो त्याचे प्रश्न टाळण्यासाठी .जसा तिने हेंड फोन काढला तसा परत प्रश्न आला.
" माफ करा पण तुम्हास वाटेल कि मी आपणास उगाच त्रास देतो ''
" कृपया माझे आपण ऐकून घ्यावे '
विमल ने विचार केला कि काय बरे तो माझ्याशी बोलणार ? आणि नको ते प्रश्न विचारणार .
" मी गंगाधर बडवे "'
" मला आयुष्यांत काहीतरी करायचे आहे आणि तशी संधी फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे .
"माझ्या गुणांचे खरें तर तिथेच चीज होईल जी भारतात होत नाही. " गंगाधर.
" मी काहीच करू शकत नाही ह्या बाबतीत ' विमल.
गंगाधर बडवे नावा प्रमाणे नको असताना ही विमलशी बडवेगिरी व सलगी करण्याचा प्रयत्न करीत होता.
" मी असे ऐकीयाले कि अमेरिकेत लग्ना साठी उपवर भारतीय मुले नाहीत व असतील तरी बरेच जण गोऱ्यां मुलींशी लग्न करतात " गंगाधर
' तेव्हां अमेरिकेस येण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे तेथील मुलीशी लग्न करणे." गंगाधरने विमलकडे पहिले.
" मी आपणास काहीही मदत करू शकणार नाही." विमलने सांगितले. तरी पण लोचटा सारखा म्हणाला
"' आपल्या ओळखीत कोणी मुलगी जी अमेरिकन सिटीझन असेल तर माझे तिच्याशी जुळवून दया ."
पाहिजे तर," मी नुसते शिरकाव मिळण्यापुरते लग्न करीन व नंतर घटस्पोट देईन आणि तसे प्रतिज्ञा पत्र लिहून देईन '' गंगाधर म्हणाला.
विमल त्याच्याकडे बघतच राहिली व तिला वाटले कि अशी पण माणसे यां जगात आहेत ह्याचे तिला आश्चर्य वाटले ? किती हा आट्टाहास अमेरिकेला येण्यासाठी ?.....
" तशी माझ्या पहाण्यात किवां ओळखीत कुणी नाही '" विमल
" मग तुम्ही असे कराल का? तुम्हीच कां माझ्याशी लग्न करीत ? " गंगाधर बडवे
विमल संतापाने फन फनली व रागाच्या भारत मोठ्याने ओरडली
" आतां मात्र मी तुम्हास चपलेने मारीन...हें आती होतंय ......
" मिस्टर.. गंगाधर मी तुम्हास ओळखत नाही आणि आपण प्रवासात भेटलो ,माझी दोन मुले बघितलीत तरी आपण माझ्या कडून ही असली अपेक्षा करतां ? "
लंडन पासुन तुम्ही मला वैताग देत आहात याची आपणास जाणीव आहे का ? असले प्रश्न विचारून आपण कहर केलात .मी तुमची कम्प्लेंट करणार ...... इतक्यात विकी जागा झाला त्याने आईची ती अवस्था बघून गंगाधरला रागाने म्हणाला " माझ्या आईला आतां त्रास दिलात तर मी काय करीन हें तुम्हाला कळणार नाही "
त्याचा तो रौद्रा अवतार व तार सप्तकांत त्याचे ओरडणे बघून बाकी सहप्रवासी काय गोंधळ आहे हें विचारणा करू लागले. ह्या गोंधळात विनी जागी झाली तिने भोकाडच पसरले.
विमानातील अधिकारी व ईतर प्रवासी ह्याना जेव्हा कळले कि शेजारच्या प्रवाशाने बहुतेक विनयभंग केला असेल नाही तर दुसरे काहीं तरी घडले. काय झाले ते हें सर्वाना सांगणे विमला कठीण झाले. विमान अधिकारी व हवाई सुंदरी यांनी शांतता व्हावी म्हणून गंगाधरची गठडी विमानाच्या शेवटच्या सीट वर टाकली. ह्या सर्व प्रकाराने गंगाधर एकदम चूप झाला कारण हें असे काहीं होईल अपेक्षितच नव्हते.
थोड्या वेळाने सर्व शांत झाले विमल मुलांना समजावण्यात गुंतली तरी तिचे सर्व अंग अजून थरथरत होते. सर्व प्रवासी परत एकदा निद्रिस्थ झाले. जशी मुले परत झोपले तशी विमलला पण मनस्तापाने क्षीण व थकवा जाणवत होता आणि तिचा डोळा लागला .
"नमस्कार !! " आपण आता थोड्याच वेळांत मुंबई विमानतळावर उतरणार आहोत सर्वांनी आपापले सीट बेल्ट्स लावावे. मुंबईचे आताचे तापमान ३० डिग्री सेल्सियस आहे .आता सकाळचे २ वाजून १० मिनिटे होत आहेत. विमान थाबता क्षणि लगेच उतरण्याची घाई करू नये. आपल्या सहकार्य बद्दल धंन्यवाद."
उद्घोषणा कानी पडताच विमल जागी झाली व मुलाना जागे करून आपण मुंबईस पोहचत आहोत असे सांगून सीट बेल्ट्स लावून प्रतीक्षेत बसली.
एकदाचे विमान मुंबई विमानतळावर उतरले व इमिग्रेशन, ब्यागेज घेऊन सर्व सोपस्कार आटोपून आपली प्रतीक्षा करीत असलेले नातेवाईकाकडे जाण्यास निघाली. त्यांना घेण्यासाठी तिच्या सासरची मंडळी बाहेर उभी होती.
इतक्यात विकीने विमला खुणविले .....तिकडे बघ.
विमलने त्या दिशेकडे बघितले तर तो गंगाधर बडवे होता व त्याला रिसीव्ह करण्यासाठी एक सुंदरशी मॉड युवती आली होती आणि ते दोघे आलिंगन देत एका महागड्या कार मध्ये बसत होती.
विमल ला काहीच कळेना कि ...लंडन विमानतळ ते विमानात हा माणूस असा कां वागला जसा एक हपापलेला वासना युक्त व अमेरिकेस येण्याचा प्रचंड हव्यास त्याकरिता काहीही करण्यास तयार असलेला हा ग्रहस्थ ,इथें तर......खरेच काहीं तर्क करवेना........... गंगाधर बडवे हें तरी त्याचे खरें नाव होतें कि खोटे ?
विमल हां तिचा प्रवास आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तीच्या मनांत सारखा एकाच प्रश्न असेल कि गंगाधरचा अमेरिकेस येण्याचा हव्यास कि एक प्रकारची विकृती ...........
मा. ना . बासरकर.
२९-१०-१०
स्यान होजे , क्यालीफोर्निया .

1 टिप्पणी:
कथा अपूर्ण आहे...
पण लिहिण्याची पद्धत साधी आणि सुरेल आहे.....
आणि पुढे काय होणार याची सतत उत्कंठा वाढत होती.
टिप्पणी पोस्ट करा