मंगळवार, १८ जानेवारी, २०११

भारतीय काँग्रेस स्वतासाठी भ्रस्टाचारी खड्डा तर खाणीत नाही नां ?

२ जी च्या घोटाळ्यामुळे श्री राजा यांना पायउतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री कपिल  सिब्बल यांना मनमोहन सिंगनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ये.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून असे द्रीष्टीस येते कि कांग्रेस मधला आत्म विश्वास ढासळत आहे. त्यांच्या सरकारवरच्या भ्रष्टाचारच्या आरोपानां सामोरे जाण्याचे सोडून घोटाळा उघडकीस आणलेल्या सी.ये.जी. यांच्या अहवालावर टिप्पणी करणे म्हणजे जनते मधील असंतोष निवळण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे.

खरे तर असे वक्तव्य केल्यामुळे मनमोहनसिंग सरकारचे काम अजून कठीण होत आहे. Aditor General च्या अहवाला नुसार Rs १.७६ लक्ष  करोडचा तोटा २ जी च्या सौद्यातून झाला, पण कपिल यांच्या म्हण्यानुसार सी.ये.जी. ने मुळ तोटा वाढवून अहवालात नोदी केल्या आहेत.
 पी. ये.सी. ( public accuont committee ) श्री सिबल यांच्या यां वक्तव्याची गंभीर पणे दखल्ल घेऊन कपिल विरुद्ध " Breach Of Privilage Motion ' पार्लीयामेंट मध्ये आणण्याच्या विचारात आहेत.

कपिल सिबलनी जें भाष्य केले ते काहीं त्यांच्या स्वतहाचे नाही हें निश्चित. त्यांचा बोलविता धनी कोणी तरी वरचा आहे. हा जो प्रयत्न चालला आहे तो श्री राजा यानां वाचविण्यासाठी नाही तर coalition पार्टनर DMK ला भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटण्यासाठी व त्या योगें आपले सरकार टिकविण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे.

श्री. मनमोहन सिंग प्राय मिनिस्टर यांनी सभाग्रहात कबुल केले कि ते स्वतहा पी.ये.सी. (P A C ) समोर सर्व आरोपांचे उत्तर देतील , पण सिबल यांच्या वक्तव्या वरून असे वाटते कि कांग्रेस पार्टी सी. ये. जी. चा अहवाल व त्यातील दाखवलेल्या चुका कडे गाभिर्याने न बघता नुसते आरोप कोणा तरी दुसरयाच्या माथी मारीत आहेत. सी.ये.सी. चा रिपोर्टच चुकीचा आहे असे म्हणणे योग्य नाही. अश्या प्रकारच्या अयोग्य हालचाली मुळे शेवटी हें सर्व काँग्रेस च्या अंगलट येईल अशी चिंन्हे दिसत आहेत.

नुकतेच श्री. सिद्धार्थ वरदराजन नि "The Hindu " मध्ये अशाच प्रकारची काँग्रेस बद्दल भीती व्यक्त केली.
" If the UPA Govt . continues to remain in denial , it will pay a heavy political price . "

आतां जवळ जवळ एक वर्ष होत आहे व नवं वर्ष पण आलं तरी भ्रष्टाचाराच्या बातम्यानी रोज रकाने च्या रकाने वर्तमान पत्रांत भरले जात आहेत. पुढे येणारया Budget पर्लीयामेंट मघ्ये  येणार आहे आणि विरोधी पार्टी ह्या विषयावर बराच गोंधळ घालणार व जाब विचारणार तेव्हां यु.पी.ये. सरकार अडचणीत येणार.

श्री मनमोहन सिंगनी देलेल्या आश्वासना प्रमाणे भ्रष्टाचाराचे मुळ शोधून त्या वर उपाय योजना करावी अन्यथा पुढच्या वेळी सरकारांत येणे कठीणच जाईल. जर कां असेच कोणी नां कोणी त्यांच्या पक्षातील नेते मंडळी उलट सुलट विधाने करतील व त्यासं पायबंद घातला नाही तर ज्वलंत आगीत तेल ओतल्या सारखे होईल. आग विझविण्यासाठी केलेल्या उपाय योजना मुळे आग अधिकच भडकेल असे होऊ नये म्हणजे झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: