कालिदासाचे " रघुवंश " यां महाकाव्यास कां महाकाव्य गणले जाते हें निश्चितपणे सांगणे कठीण आहे. कदाचित हरिवंश वरून यां महाकाव्याचे नाव " रघुवंश ' कालीदासाना सुचले असेल असा पण एक तर्क आहे.श्री कालिदास रचित काव्य " हरिवंश " मध्ये रघुवंशातील सर्व राज्यांचे जसें अग्निवर्ण , परिवर्ती, या राजांचे जें राजा दिलीपच्या पूर्वी होऊन गेलेत त्यांचा उलेख आढळतो.
रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही. यां काव्यात सर्व साधारण व प्रासंगिक भागामध्ये देव, मानव, ऋषी , असुर, राक्षस इतकेच नाहीतर पशु, पक्षी, यांचा पण मुक्तपणे विचरण करताना दिसून येते. ह्या महा काव्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष सर्वच प्रवृतीचा सामान रूपाने आणण्यात कवीची कुशलता दिसून येते. निः संदेह ह्या काव्यात्मक आख्यान तत्वाना एक रमणीय काव्यमय वस्त्र परिधान करण्यात महाकवी कालीदासाना सफलता प्राप्त झाली कारण प्रत्येक पात्र जिवंत असल्याप्रत भासते.
रघुवंश काव्यात राजा दिलीपची श्रेष्ठता,उच्चता, व गुणगान ह्या सर्वांचे वर्णन आढळते व त्यांनी रघुला इंद्रा पेक्षा जास्त मान दिला आहे. कालीदासनी खरें तर इंद्राची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्याचे पराक्रम सर्व लोकां समोर ठेविले कारण वैदिक युगा पश्चात लोक इंद्रास विसरू लागले कारण भूतलावर महा पराक्रमी राजे आपले महत्व वाढवीत होतें. कालीदासनी इंद्रास तात्कालीन रांजा बरोबर काम करताना तो कर्मण्य आहे हें दाखून देतात.
कवी कालिदास राजा दिलीप व रघू यानां इंद्र समानच समजत असत .त्यांच्या विचारांत मानव, व देवता यांचे एकमेकास भेटणे व संपर्कात असणे स्पष्ट होतें कारण कवी लिहतात मगध नरेश यांच्या अनेक यज्ञात इंद्राने येऊन त्यानां मदत केली. इंद्राने बैलाचे रूप धारण करून राजा कुत्स्थ समवेत आसुरां बरोबर युद्धात वाहन बनून साह्य केले असा उलेख आढळतो .
रघुवंश यां महाकाव्यांत कालीदासानी अनेक अलंकारांचा उपयोग केला आहे. म्हणूनच त्यांना " रशेस्वर " ची उपाधीने अनेक विद्वानांनी, अलोचकानी सन्मानित केले कारण त्यांनी जें काव्य रचीयले ते रस व अलंकार युक्त काव्य लिहिले त्याला दुसरी कोणतीही उपमा देणे संयुक्तिक व योग्य ठरले नसते. रघुवंशात कवींनी राजांचे जिवन चरित्र वीर रसात्मक शैलीने लिहिले . कवींनी ह्या काव्यांत अनेक छन्दांचा उपयोग केला त्यां वरून त्यांची प्रत्येक छन्दावर किती आभ्यास व पकड होती हें जाणवते.
कालीदासानी आपल्या रघुवंश ह्या महाकाव्यात अनेक छन्दाचा समावेश केला जसें अनुष्टुप, प्रहषीणी,अजति, मालिनी, वंशास्थ ,हरिणी ,वसंत तिलका, पुष्पिताग्रा , वैतालीय, तोटक, मंदाक्रांत, द्रुत विलंबित, शालिनी, औप छनदीक, रथो ध्द्ता , स्वागता, मत्त मयुर, नाराच, तथा प्रहर्शिनी यांत काहीं कठीण व अप्रचलित छंद यांचा पण त्यांनी उपयोग केला आहे.
रघुवंशची कथा (कहाणी ) महाराजा दिलीप पासुन सुरु होतें. ह्यात त्यांनी दिलीप राजा हा सूर्य वंशाचा आहे व प्रिथ्वी तलवारचा प्रथम राजा मनु होता असे दर्शिले. राजा दिलपा विषयी तीन सर्गा मध्ये वर्णन आढळते. रघू मुळे यां काव्यास रघुवंश असे नवं देण्यात आले. ह्यांत कालीदासानी रघू हा आदर्श राजा म्हणून वर्णिले कारण तो दिग्विजयी होता त्याचे वर्णन चतुर्थ सर्गात आहे.
पंचम सर्गात रघूच्या दरबारांत कौत्स नावाचा स्नातक गुरु दक्षिणेस येण्याविषयी लिहिले आहे. जरी रघुनी विश्वजित यज्ञात आपले सर्वस्व दान केले तरी कौत्सलां दक्षिणा देण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या आशीर्वादाने रघुस अज नामक पुत्र प्राप्ती झाली. युवा राजकुमार अज याचा विवाह विदर्भ कन्या इंदुमातीशी झाला. परत येते वेळी नर्मदा नदी काठी एक विशाल गजराजस मारावे लागले व त्यातून एक गंधर्व प्रगट झाले. त्या गंधर्वाने अज यासं सम्मोहन अस्त्र दिले.
सहाव्या आणि सातव्या सर्गात मध्ये इंदुमतीचे अजशी लग्न व परतीच्या वाटेवर अनेक राजांशी युध्ये व विजय तसेंच राजा रघूनि अज यासं राज्य कारभार सोपवणे व सन्यास घेणे ह्याचे वर्णन आहे. आठव्या सर्गात रघूचे मरण, अज यांस दशरथ नामक पुत्र प्राप्ती, कालांतराने राणी इंदुमती इहलोकांत जाणे या विषई वर्णन आहे.
सर्ग नऊ ते बारा यांत दशरथ व रामा विषयी आणि वाल्मिकी रामायणा विषयी श्लोक लिहिले आहे. तेराव्या सर्गांत राम सीता विमानाने आकाश मार्गे अयोध्येस येणे व चौदाव्या सर्गांत राम आपल्या राजकुल आप्ताना भेटणे,भरताने रामास राज्य परत करणे, रामराज्य समारंभ, सीता गर्भवती असणे, त्याच सुमारास भद्र नामक दूत रामास लोक भावना सांगणे, लोकाना रामाने सीतेस ग्रहण करणे पटले नाही,लक्षुमण राम आज्ञे प्रमाणे सीतेस जंगलांत सोडणे, सीतेच्या रक्षणास वाल्मिकी ऋषी येणे, रामाचे अश्वमेध यज्ञ करणे व दिग्विजयासाठी घोडा सोडणे, ह्या सर्व प्रसंगाचे वर्णन केले आहे.
पंधराव्या सर्गांत रामाने शत्रुंघ्न यांस मथुरा प्रदेशाचा करभार सोपवणे, संतापक लवणासुर हत्या, लक्षुमण वाल्मिकी आश्रमात राहणे, सीतेस दोन पुत्र प्राप्ती,वाल्मीकीचे लव आणि कुश ह्यांच्यावर संस्कार करणे, राम गीत शिकविणे, अश्व मेध यज्ञात लव ,कुश यांचे रामायण गाणे,रामाने आस्थेने लव ,कुश यांच्या गुरूची विचारपूस करणे, राम वाल्मिकी ऋषीस भेटणे, वाल्मिकींनी रामास लव, कुश त्यांचेच पुत्र आहेत व सीतेस स्वीकारण्यास सांगणे, सीतेचे शुद्धता प्रमाण देणे, धरणी सीतेस आपल्यात सामाऊन घेणे, कालांतराने राम,लक्षुमण दिवंगत होणे, ह्या सर्व घटनांचे वर्णन सविस्तर केले आहे.
सोळा ते एकोणवीस सर्गांत कुश राजा ते अग्निवर्ण रजां पर्यंत चरित्र आख्यान आहे. कुशाची कुमुधती नामक नाग कन्येशी विवाह तसेंच सतराव्या सर्गात कुश इंद्रा साठी युद्ध करणे व धारातीर्थी पडणे ह्याचे वर्णन आहे. कुश राजा नंतर त्याचा पुत्र अतिथी राजा बनणे, अठराव्या सर्गात निषिद्ध, नल, उन्नाभ, वज्रनाभ, शंखण व्युशिताश्च्य,विश्वसह,हिरण्य भान ,कौशल्य, ब्रह्मिष्ठ, कमल लोचन, पुष्य, धृवसंधी, आणि सुदर्शन राजांचे कार्यकाल वर्णिले आहे. एकोणविसाव्या सर्गात राजा सुदेर्षांचा पुत्र अग्नी वर्ण त्याचा विलासीपणा व यक्ष्मा रोगाने मरण ,त्याची राणी सिहासनावर बसने इथेच संपूर्ण काव्याची समाप्ती कालीदासानी केली.
मा.नां.बासरकर.
( अनुवाद कर्ता )
संक्षिप्त भाषांतर दिनांक ०७-१२-१०
संदर्भ लेख श्री अमितेश कुमार " मालवा " कालिदास रघुवंश कि कथा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा