हिन्दु समाजात धनत्रयोदशी चे महत्व का आहे ?
ह्याचे असे आहे की पुर्वापार कथन केलेली ह्या दिवसाची महतीचि कथा हिन्दु सामाजात दृढ झाली व त्याप्रमाने साजरी केली जाते.
एकदा यमराजाने आपल्या दूतास विचारले की तुम्हाला मनुषाचे प्राण हरताना दया येते का? दूत भय व संकोचाने वदले महाराज नाही. आम्ही फक्त आपले कर्तव्य पालन करतो तेव्हा दया,क्षमा, ह्या गोष्टिंचा काही विचार येत नाही. यमराजास वाट्ले की माझ्या भयामुळे हे दूत सत्य कथन करित नाहित. तेव्हा त्यानी दुतांस अभय दान देउन सत्य कथन करण्यास सांगीतले.
यमदुतानी भित भित कथन केले महाराज एकादा असे घडले खरे, ह्र्दय द्रावक दृष्य बघून. यमराजाची उछुकता वाढाली की अशी कोणती घटना घडली ज्या मुळे माझ्या यमदुतानाही पाहवले नाही? दुतानी पुढे कथन केले की
एकदा राजा हंस महाराज शिकारी साठी आपल्या मित्र समवेत गेले असता वाट चुकुन भटकत राहिले पण त्याना रस्ता सापडेना व असेच भटकत , भटकत त्यानी दुसरया राज्यात प्रवेश केला. त्या प्रदेशाचा राजा महाराज हेमा नी राजा हंसाचे स्वागत व सत्कार करुन आपल्या अथिथी भावनात त्यांची राहण्याचि व्यवस्था केली.
महाराज हेमाच्या पत्निने त्याच दिवशी एका सुन्दर बालकास जन्म दिला. जोतिषाना पाचारण्यात आले व मुलाची कुण्डली बनवली. जोतिषा च्या भविष्या नुसार राजकुमाराचे लाग्ना नंतर चार दिवसात मृत्यु योग आहे. महाराज हेमा च्या आदेशा नुसार त्या राजपुत्रास यमुना तिरी असलेल्या गुहेत ठेवण्यात आले व व्यवस्था केली की राजकुमारावर
स्त्रियांची छाया पण पडु नये. राजाला कसेही करुन त्यास ब्रम्हचारी ठेवले पहिजे तरच मृत्यु पासुन भय उरणार नाही.
कलंताराने राजा हंस कन्या यामुनातिरी गेली असता तीची भेट योगो योगाने राजा हेमाच्या राजकुमाराशी झाली व ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले आणि त्यानी गाधर्व विवाह केला. विधि लीखिता प्रमाने बरोबर चार दिवसानी राजकुमराचा मृत्यु झाला. हंस राजकन्याचे दुख व आक्रोश पाहुन यामदुताचे मन पार गलबलूंन गेले. दुतानी संगीतले महाराज त्यांची जोडी आपल्या कामदेव व रति पेक्षा ही सुन्दर होती. महाराज त्या राजकुमाराचे प्राण हरण करताना आम्हाला अति दुख झाले.
यम दुतानी यमराजास प्रर्थिले की या अश्या अकाली मृत्यु पासुन वाचण्या साठी काही उपाय आहे का ? तेव्हा यमराजानी कथन केले की धन त्रयोदशी च्या दिवशी पुजन व दीप दान विघी पुर्वक केल्याने हा अकाली मृत्यु वाचउ शकतो . ज्या घरी असे पुजन होते त्या घराच्या आस पास पण मृत्यु भटकणार नाही. ह्या घटने पासुन हिन्दु संस्कृतित धन त्रयोदिशी च्या दिवशी धन्वन्तरीचि पुजा व दिप दान करण्याची प्रथा पडली आणि ती आता पर्यन्त तशीच चालु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा