परोक्ष वस्तू तवं नेत्र पाहती /
मृखद्विषां दंडयिता शची पती /
असा जरी विघ्न सवास आणिसी /
सत्कर्म लोपा प्रती कां न जाणीशी //४६ //
म्हणोनी याज्ञाग आशा तुरंगमा /
त्वरे करी मुक्त अंता सुरोत्तामा /
श्रुतीचीये मार्ग जनास दाविती /
मलीनसा मार्ग कधी न चालती //४७ //
आशा परीची रघु उक्ती ऐकुनी /
सुरेंद्र विस्मीतचि जाहला मनी /
दिशा प्रीतीचीस वेळोनिया रथा /
महेंद्र प्रत्युतर देत सर्वथा //४८ //
कुमार जें बोलसि योग्य तें असे /
यशापरी कांहिच रक्ष तें नसे /
प्रसिद्ध लोकी मम कीर्ती त्या तिला /
सवें क्रमाया नृप सिद्ध जाहला // ४९ //
हरीच होई पुरषोत्तम प्रभू /
महेश्वरे मनि उमावर प्रभू /
तया परी मीच असे शतऋतू /
त्रिशब्द आम्हा इतरा न जाण तु // ५० //
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा