मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

महाकवी कालिदास रचित " रघु वंश " 6

पवित्र कृष्णाजिण शोभवी जया /
समंत्र आस्त्रा शिकवी पिता त्या /
दिलीपसा भूप दुजा नसे जनी /
धनुर्धरा माजि हि तोच अग्रणी // ३१ //

जसा कुणी वत्स वृषत्व पावतो /
द्वीपेंद्र शोभा गजशाव लाभतो /
तसा रधू शैशेव भाव त्यागुनी /
सुरम्य गात्रे युव शोभला जनी // ३२ //

विधी समावर्तन जाहल्या वरी /
पिता विवाहोत्सव साजरा करी /
विधू सवे शोभति दिव्य तारका /
रधूसवे त्यापरि राजकन्यका // ३३ //

सुदीर्घ बाहू बलवान कंधरा /
विशाल वक्षे युव शोभला बरा /
बलीष्ट देहें जरि तो पित्यापरी /
गमें उणा पुत्र सदा नयावरी // ३४ //

पिता प्रजेचा बहुभार आपला /
करावया त्या लघु सिद्ध जाहला /
कुमार शास्त्रज्ञ विनीत पाहुनी /
करी तसे त्या युवराज तेक्षणी // ३५ //

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: